लागीर मधील राहुल्या प्रत्येक्षात रडतानाचा व्हिडीओ लिक झालाय, का रडतोय राहुल्या ?

लागीर झालं जी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिका आहे. या लागीर झालं जी मालिकेतील शूटिंग दरम्यान चा एक व्हिडिओ लिक झाला आहे. या व्हिडीओ मध्ये राहुल्या प्रत्येक्षात रडताना दिसतो आहे. का भावनिक झाला हे आपण व्हिडीओ मध्येच पाहावे.

सध्या राहुल्या चा या व्हिडीओ मुळे त्याचे चाहते ही भावनिक झाले आहेत.राहुल जो एकदम नैसर्गिक अभिनय करतो त्याचे ही गुपित प्रेक्षकाला समजले आहे. हा व्हिडीओ लिक झाल्यामुळे चॅनल आणि मालिकेतील निर्मात्यांनी शूटिंग च्या ठिकाणी लोकांना मोबाईल नेण्यावर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे.

राहुल्या म्हणजेच राहुल मगदूम हा लागीर झाल जी मालिकेतील विनोदी पात्र म्हणून सर्वपरिचित आहे.
‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. राहुल चा जन्म २१ जानेवारी १९९१ साली उरून तालुका इस्लामपूर येथे झाला. त्याने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून येथून डिग्री घेतली. लागीर झाला जी या मालिकेच्या माध्यमातून राहुल घराघरात लोकप्रिय झाला.

मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या लागीर झाल जी या मालिकेतील इतर कलाकारांविषयी थोडक्यात जाणून घेऊया…

मालिकेतील लीडिंग अभिनेता म्हणून आज्या हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचले आहे या अभिनेत्याचे नाव आहे नितीश चव्हाण नितीश चा जन्म ७ जुलै १९९० साली सातारा येथे झाला त्याचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल दापोली येथे झाल्यानंतर त्याने BCA ची डिग्री किसन वीर महाविद्यालय वाई येथे घेऊन पुणे येथे त्याने सनबीम इन्स्टिट्यूट मधून DACA हा डिजाईनचा कोर्स केला तसेच त्याने CDac चा कोर्स केला. मालिकेत एक सातारी फौजीची चे लीडिंग रोल असणारी भूमिका नितीश चव्हाण ला मिळाली आणि त्याने ती अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. आज आज्या हे पात्र प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहचले आहे आणि सामान्य नितीश चव्हाण मोठा स्टार बनला आहे.

शितली या नावाने संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या शितलीचे नाव आहे शिवानी बावकर..शिवानीचा जन्म २९ ऑगस्ट १९९२ रोजी पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.शिवानी ला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.त्यामुळे तिने मुंबई मध्ये येऊन अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. व नाटकांच्या माध्यमातून तिची इंट्री झाली.

मालिकेतील खलनायक भैयासाहेब याचे प्रत्येक्षातील नाव किरण गायकवाड आहे व त्याचा जन्म १२ जून १९९० सालचा पुणे येथील आहे.पण सध्या तो सातारा येथे राहतो. विक्या विकास म्हणजेच निखील चव्हाण. हा मालिकेतील लीड रोल असनाऱ्या आज्याचा जिगरी मित्र त्याचा जन्म ३० मे १९९२ चा आहे तसेच तो प्रत्येक्षात अत्यंत देखणं व्यक्तिमत्व आहे. मुळचा पुण्याचा असणारा निखील लागीर झाल जी च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *