उध्दवला ठाकरेंना राग आल्यास काय होते नक्की वाचा..

उद्धव ठाकरे हे मवाळ आहेत अशी त्यांची प्रतिमा आहे पण उद्धव ठाकरे यांना राग आल्यावर काय होते हे सध्या अनुभवयास मिळते आहे. त्याच असे झाले नेहमीच्या दगदगीतून निवांत असे फिरायला म्हणून 4 दिवसासाठी उद्धव ठाकरे कुटुंबियांना घेऊन महाबळेश्वर येथे आले. अविनाश भोसले या उद्योपती मित्राच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम होता.

उद्धव ठाकरे निवांतपणा अनुभवत असताना शेजारच्या हॉटेल ‘एव्हरशाईन कीज’मध्ये लग्नाच्या वरातीत डीजे सुरू झाला. या डीजे च्या गोंगाटाने उद्धव ठाकरे यांच्या निवांतपणाला अडथळा निर्माण झाला. उद्धव ठाकरे यांना त्रास होतोय म्हटल्यावर हॉटेलला सांगून हा डीजे बंद करायचा प्रयत्न केला पण ही वऱ्हाडी मंडळी निघाली नेमकी मुख्यमंत्र्यांच्या जवळची त्यामुळे लगेच काही आवाज बंद होईना यामुळे उद्धव ठाकरे यांना राग आला. उद्धवजी यांना त्रास होतोय म्हटल्यावर लगेच काही सूत्रे हलली

मग, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मुंबईतल्या कार्यालयातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आदेश गेले. मग पोलीस खात्यालाही आदेश गेले… पण रात्रीचे दहा वाजायच्या आत कारवाई कशी करणार? असा सवाल खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयातून विचारला गेला. शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना महाबळेश्वरातही रंगला. दोन खात्यांच्या भांडणात पोलीस आणि साता-याच्या प्रशासनाची पुरतची गोची झाली. त्यात दबाव प्रचंड वाढल्यानंतर अखेर वऱ्हाडी मंडळींवर ध्वनी प्रदूषणाची कारवाई करण्यात आली.

बंद केलेले हाॅटेल

काही दिवसांनी ठाकरे कुटुंबीय मुंबईत परतल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून सूत्रं हलली. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलवरच थेट कारवाई केली. जवळपास ८४ अलिशान खोल्या असलेल्या सर्वात मोठ्या हॉटेलला सील ठोकलं गेलं. हॉटेलचं नळ कनेक्शन तोडलं. विद्युत पुरवठा तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. महाबळेश्वर नगरपालिकेने हॉटेलमधलं बांधकाम बेकायदेशीर असल्याबाबत आठवडाभरात तीन नोटीसा पाठवण्यात आल्या. ऐन धंद्याच्या टाईमला हॉटेल ला सील ठोकल्याने मोठे नुकसान व्यावसायिकाला सहन करावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे हे जरी मवाळ असले तरी त्यांना राग येतो आणि राग आला की समोरच्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसत नाहीत हे यावरून दिसून आले.
साभार:- भैया पाटील
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…
फेसबुक पेजमूळे कसे वाचले बेवारस वृद्ध महिलेचे प्राण, नक्की वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *