अपहरण केलेल्या विमानातून अशा प्रकारे अटल वाजपेयी यांनी ४८ प्रवाशांची केली सुखरूप सुटका.. वाचा हा शौर्यदायी किस्सा 0

अटल वाजपेयी यांच्या साहसाचा एक किस्सा कधीच समोरआला नाही. हा किस्सा अटलजी वाजपयी किती शौर्यवान होते हे दाखवून देतो. लालजी टंडन या प्रसिद्ध व्यक्तीने हा किस्सा आज तक या वाहिनीच्या पत्रकाराला सांगितला आहे. लालजी टंडन यांनी काय किस्सा सांगितला आहे तो त्यांच्याच शब्दात अवश्य वाचा.

२२ जानेवारी १९९२ साली लखनो वरून दिल्ली येथे जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक केले होते. त्या विमानात एकूण ४८ व्यक्ती होते. विमान नेमकेच उडालेच कि त्या प्रवाशाने आपल्याकडे केमिकल बॉम्ब असून जर विमान पुन्हा लखनौ ला वळवले नाही तर बॉम्बचा स्फोट करायची धमकी दिली. हि धमकी ऐकून विमानाच्या पायलट ला धक्का बसला तसेच विमानातील सर्व प्रवाशी घाबरलेल्या अवस्थेत राहिले. लागलीच पायलट ने विमानतळ ऍथॉरिटी ला विमानात एका प्रवाशाकडे बॉम्ब असून त्याने विमान हायजॅक केल्याची गोष्ट कळवली. काही वेळातच विमान ४८ प्रवाशांसह खाली लखनौ विमानतळावर उतरवले.

विमान उतरल्यावर विमानाला एका बाजूला नेण्यात आले आणि अजून हि त्या हायजॅकर ला काय हवंय याची माहिती कोणाला नव्हती कि त्यांनी काही बोलणे केले होते. त्या काळात उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रपती शासन लागलेले होते. विमानातील प्रवाशी भीतीने थरथरत होते. त्या दिवशी अटल वाजपेयी लखनौ मध्ये होते. ते सर्किट हाऊस वर आपल्या कार्यकर्त्यांसह जेवण करायला बसलेले होते. अटल वाजपेयी तेव्हा विरोधी पक्षातील एक तागडे व्यक्तिमत्व होते. जेवण करणार तेव्हाच तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक प्रियदर्शी व लाल जी टंडन हे भयभीत होऊन जोराचा सुस्कारा टाकत आले आणि त्यांनी अटलजी ना सांगितले कि लखनौ विमानतळावर एकाने विमान हायजॅक केले आहे आणि तो आपल्याशी बोलण्याची मागणी करतोय. ४८ प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. अटलजीने जेवण तसेच टाकून विमानतळ गाठले.

विमानतळावर पोहचल्यावर अटलजी यांनी हायजॅकर सोबत संभाषण करायचा प्रयत्न केला पण हायजॅकर ला हे अटलजी बोलत आहेत असा विश्वास आला नाही. त्यामुळे तो विमान बॉम्ब ने उडवण्याची धमकी देत होता. तेव्हा मोठ्या ध्येयाने अटलजी यांनी परिस्थिती सांभाळत हायजॅकर च्या जवळ जाण्याची तयारी केली. पण प्रशासनाने परवानगी दिली नाही पण अटलजी वाजपेयी यांनी मोठा धोका पत्करत त्या हायजॅकरला भेटून बोलू असे कालवून प्रशासनाचे मन वळवले.

अटलजी वाजपेयी यांच्या मागणी बाबत प्रशासन सहमत झाले आणि त्यांच्या सोबत सुरक्षा रक्षक देऊन त्यांना हायजॅकर च्या विमानापासीं जायची परवानगी दिली. अटलजी वाजपेयी विमानतळावर ज्या ठिकाणी हायजॅक विमान आहे तिथे गेले त्यांच्या सोबत अशोक प्रियदर्शनी व लाल जी टंडन हे होते. विमानाजवळ गेल्यावर अशोक प्रियदर्शी यांनी विमानात जाऊन हायजॅकरला सांगितले कि अटलजी वाजपेयी येथे आले आहेत त्यांच्या शी बोल तर त्याला त्याच्यावर विश्वास नव्हता तर शेवटी आपल्या जीवाची चिंता ना करता अटलजी ने विमानात जाण्याचा निर्णय घेतला.

अटलजी ने अत्यंत धाडस केले व हायजॅकर असलेल्या विमानात धडक मारली ते हायजॅकर ला भेटले व त्याच्याशी संभाषण सुरु केले तेव्हा लाल जी टंडन यांनी हायजॅकर ला सांगितले कि एवढा मोठा तुला भेटायला आला आहे त्यांच्या पायाशी लागायला हवे व तुझ्या मागण्या कळवायला हव्यात तर हायजॅकर त्यांच्या पायाशी लागलाच कि सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून त्याच्या जवळील वस्तू हिसकावून घेतली. शेवटी त्याच्याकडे बॉम्ब नव्हता पण अटलजी यांनी जी समयसूचकता दाखवली धाडस दाखवले त्याचे सर्वत्र कौतुक झाले. विमानातील सर्व प्रवाशाने त्यांचा जयजयकार केला.

हि घटना आता जेष्ठ नेते लाल जी टंडन यांनी सांगितली आहे. या घटनेवरून अटलजी चे एक वेगळे स्वरूप आपल्याला पाहायला मिळाले . आपल्याला हा किस्सा आवडला तर नक्की शेअर करा

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *