डच चित्रकाराने काढलेल्या शिवरायांच्या अस्सल फोटो मागील वायरल सत्य.. नक्की वाचा 0

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत. या गोष्टीचा फायदा घेत मागील काही दिवसापासून एक फोटो सोशल मिडीयावर वायरल झालेला आहे. शिवरायांचा अस्सल फोटो म्हणून हा फोटो शेअर करण्यात येतो वाचा काय आहे फोटो मागील सत्य..

तर याबाबत मागील काही दिवसा अगोदर वासुदेव कामत यांनी एक लिहलेला आहे त्यामधील सारांश आपल्या समोर सादर करत आहोत त्यावरून आपल्या लक्षात येईल चित्र अस्सल आहे कि खोटे, सदर चित्र हे डच चित्रकाराकडून काढण्यात आले असे वायरल करण्यात आले आहे. तर झाले असे कि वासुदेव कामत यांचे मित्र एका चित्रप्रदर्शनात गेले तिथे शिवरायांचे अस्सल चित्राची प्रत म्हणून हा फोटो विकायला ठेवण्यात आली होती. शिवगौरवच्या कार्यक्रमाला गेलेल्या त्यांच्या चित्रकार मित्राने तिथे चित्राची प्रत विकत घेतली आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी वादही घातला. हे चित्र डच चित्रकाराचे नाही तर कामत यांचे आहे, हे त्यांनी सांगितले. तर त्यावर कार्यकर्त्यांपैकी एकाने त्यांना सांगितले की, तुमच्या सरांनी रशियात जाऊन मूळ चित्र पाहून ते काढले असेल. त्यावर तो मित्र म्हणाला, आमचे सर कुठे कुठे गेले हे आम्हाला पक्के ठाऊक आहे. तुम्ही चित्रचोरी केली आहे. त्यानंतर खिलारे यांनी सारवासारव करणारा फोन केला, तेव्हा कामत सरांनी त्यांना सांगितले की, ‘माझे चित्र तुम्ही डच चित्रकाराचे चित्र म्हणून विकणे ही माझीच नव्हे तर शिवप्रेमींचीही घोर फसवणूक आणि विश्वासघात आहे.’ त्यावर ते म्हणाले की, ‘आम्ही चित्रविक्रीमध्ये नफा कमवत नाही.’ ‘पण तुम्ही माझे चित्र डच चित्रकाराचे म्हणून विकणे ही फसवणूकच आहे’

मधातील फोटो वासुदेव कामत यांनी रेखाटलेला आणि बाजूचे फोटो बनविलेले.

प्रत्यक्षात डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र हे एकाच बाजूचा चेहरा दिसणारे आहे. म्हणून तर आजवर कोणत्याही चित्रकाराने समोरून दिसणारे महाराजांचे चित्र काढलेले नाही. दुसरा एक बदल या चित्रामध्ये करण्यात आला होता तो म्हणजे यावर महाराजांची स्वाक्षरी आहे, असे भासविण्यासाठी मोडीमधील एक शब्द त्यावर टाकण्यात आला. पण इथे मोडी येते कुणाला? अनेकांनी ती महाराजांची मोडीमधील स्वाक्षरीच आहे, असे समजून ते चित्र विकतही घेतले. त्यात एका चित्रकार मित्राचाही समावेश होता. त्याला तर हे सारे पाहून धक्काच बसला होता. कारण हे डच चित्रकाराचे नाही तर कामत सराचे चित्र आहे, हे त्याला ठाऊक होते. कार्यक्रमाच्या उद्घोषणेतही वारंवार हाच डच चित्रकाराचा उल्लेख सुरू होता. लोक तर केवळ शिवप्रेमापोटी चित्र विकत घेतात. लोकांची चूक काहीच नाही. पण हा चित्रकार आणि शिवप्रेमी या दोघांचाही त्या संस्थेने आणि संबंधितांनी केलेला विश्वासघातच होता. आता तर हेच चित्र कृष्णधवल करण्यात आले असून त्याला थोडा सेपिआ टोन देण्यात आला आहे. कारण जुनी चित्रे-फोटो अशा सेपिआ टोनमध्ये असतात. आणि आता तेच माझे चित्र कृष्णधवल रूपात डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र म्हणून विक्रीही होते आहे. आणि व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांतूनही फिरते आहे. अशाच प्रकारे लोकांच्या मनातील श्रद्धेचा गैरवापर करून मग प्रगत टेक्नॉलॉजीच्या आधारे त्या शिवप्रेमींच्या श्रद्धेचे अंधश्रद्धेमध्ये रूपांतर केले जाते.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *