आज या अवस्थेत आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या परिवारातील हे सदस्य.. 0

माननीय माजी प्रधानमंत्री अटल जी वाजपेयी यांच्या परिवाराबद्दल जास्त कोणाला काही माहिती नाही आहे. आज आपण अटलजींच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेणार आहोत. अटलजी यांचे वडील पंडित कृष्णबिहारी वाजपेयी शिक्षक होते तर अटलजींच्या आई कृष्णा वाजपेयी या गृहिणी होत्या. अटलजींना ३ मोठे भाऊ अवध बिहारी, सदा बिहारी और प्रेम बिहारी हे होते तर ३ बहिणी असा एकूण त्यांचा ७ बहीण भावंडांचा परिवार होता. अटल जी यांचे जीवन सामान्य राहणीमानात गेले आहे. त्यांचे कुटुंबीय हि अत्यंत सामान्य जीवन आज हि जगते.

अटल जी यांचे पुतणे रमेशचंद्र वाजपेयी हे आजही त्यांच्या पूर्वजांच्या बटेश्वर या गावी राहत आहेत. अटलजी यांची जुनी हवेली याच गावात आहे. रमेशचंद्र वाजपेयी हे प्रधानमंत्री अटलजी यांचे पुतणे आहेत ते रिटायर्ड शिक्षक आहेत. त्यांनी सांगितले कि त्यांच्या म्हाताऱ्या पत्नीला आज या वयात स्वतःला हापशाचे पाणी स्वतः भरून आणावे लागते. अटलजी वाजपेयी यांच्या त्या सून बाई होत. एका माजी प्रधानमंत्र्यांच्या सुनबाईला सार्वजनिक पॅम्पवरील पाणी स्वतः घेऊन यावे लागते यावरून त्यांचे कुटुंबीय किती सामान्य आहे हे आपण पाहू शकतात.

त्यांचे गाव बटेश्वर हे फतेश्वरी शिक्री या लोकसभा मतदारसंघात येते या गावात अटलजी राजकारणात असे पर्यंत रौनक होती पण जेव्हा अटलजी आजारी पडले तेव्हा पासून या गावाची रौनक निघून गेली. या गावातील विकासकामे हि थांबल्या गेली गावात ६ पम्प (हापशें) आहेत त्यावरून गावकऱ्यांना पाणी घ्यावे लागते. अटलजी यांच्या निधनानंतर आता गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. अटलजी यांचे सर्व नातेवाईक त्यांच्या अंत्यविधी साठी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. आज हि त्यांचे सर्व नातेवाईक सामान्य आयुष्य जगत आहेत. अटलजी यांनी नेहमी देशाचा विकास चिंतिला कुटुंबीय नातेवाईक यांच्यात ते गुंतले नाहीत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *