आपल्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये हा नंबर सेव्ह झाला असेल तर सावधान ! 1

आधार कार्डच्या नंबर वरून माहिती चोरल्या जाऊ शकत नाही असे म्हणत ट्राय चे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी ट्विटर वर हकेर्स ना चालेंज दिले होते आणी त्यात त्यांची सर्व माहिती सार्वजनिक झाल्याने भारतीय जनमानसात आधार बद्दल एक भीतीचे वातावरण तयार झाले होतेच कि एक नवीन प्रकार सध्या समोर आला आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया च्या UIDAI या नावाने 18003001947 हा हेल्पलाईन क्रमांक बहुसंख्याच्या मोबाईल मध्ये सेव्ह झाला आहे. हा क्रमांक तुमच्या मोबाईल कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह झाला असेल तर सावधान. कारण हा क्रमाक UIDAI शी संबधित नाही आहे.

हा क्रमाक मोबाईल मध्ये सेव्ह होण्याची घटना अत्यंत धोकादायक आहे कारण आपल्या परवानगी शिवाय आपल्या लिस्ट मध्ये हा नंबर सेव्ह झाला आहे. या प्रकाराने आपल्या मोबाईलची गुप्तता धोक्यात आली आहे. या घटनेनंतर UIDAI ने आपल्या आधिकारिक ट्विटर खात्यावर जाहीर केले आहे कि त्यांचा 18003001947 हा क्रमांक टोलफ्री क्रमांक नाही आहे त्यांचा 1947 हा टोलफ्री क्रमांक आहे. त्यांच्या खुलाशा नंतर मोबाईल धारकांच्या मनात आणखी भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

आपण जर मोबाईल मध्ये सेव्ह झालेल्या 1800300194 या क्रमांकावर फोन करून पाहिला तर हा नंबर लागत नाही. या नंबर बाबत एक अजून धक्कादायक प्रकार काहींच्या म्हणण्यानुसार उघडकीस आला कि हा क्रमांक आपल्या मोबाईल मधून डिलीट करावयाचा प्रयत्न केला तर तो डिलीट होत नव्हता.त्यामुळे गोंधळ उडाला. ट्विटर वर अनेकांनी या बाबत आपली काळजी चिंता व्यक्त केली आहे. अनेक संस्था व तज्ञांनी या प्रकाराला आपल्याला मोबाईलच्या गुप्ततेचे उलंघन झाले आहे असे म्हटले आहे. एकूणच हा क्रमांक कसा काय आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह झाला आहे याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *