मराठा मोर्चाच्या आंदोलनात वायरल होणा-या या फोटोचे काय आहे सत्य? नक्की वाचा 4

नुकताच मराठा मोर्चाचे आंदोलन सुरू असताना एक फोटो भयंकर वायरल झालेला आहे. ज्यामध्ये पोलीसाच्या पाठीवर बुटाचा ठसा आहे. आणी या मेसेजमध्ये लिहण्यात आले आहे कि पाठीवर हातावर थाप देण्या एवजी बुटाने दिली आहे.
फोटोत पोलीसांची विवंचना लेखकाने मांडली आहे. परंतु हा फोटो खरच मोर्चातील आहे का. याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. खरच ही घटना मोर्चातील आहे का?

प्रत्येक फोटोला exif data असतो. हा डाटा म्हणजे माहिती फोटो कुठे काढला कोणी काढला, कधी काढला ईत्यादी बाबतीत माहिती देतो. सदर फोटोचा exif data तपासल्यास फोटो काढणा-याचे gps बंद असल्याने त्या ठिकाणची माहिती मिळाली नाही परंतु फोटो हा २२ ऑगस्ट २०१७ चा आहे. मराठा आंदोलन व या फोटोचे कसले ही देणे घेणे नाही. मुद्दाम मोर्चेक-यांवर आक्षेप निर्माण करण्या करीता हा खोडकर पणा करण्यात आलेला आहे. आपण खाली दिलेल्या फोटोमध्ये exif data बघु शकता.

सदर फोटो बारकाईने बघितल्यास लक्षात येईल की हा फोटो अपघात ठिकाणचा आहे कारण रस्त्यावरील डिवायडर वर गाडी चढलेली आहे. कदाचीत सोबतच्या पोलीस कर्मचा-यास गाडीवर चढण्याकरीता ह्या दुस-या पोलीस कर्मचाऱ्यांने मदत केली व त्याचा बुटाचा ठसा पाठीवर उमटला आहे. ठस्याच्या आकारावरुन हा पोलीस बुट आहे हे स्पष्ट दिसते. त्यामुळे या सोशल जगात एखादा फोटो वायरल करण्यापूर्वी नक्की लक्ष द्या व कुठल्याही समाजाची बदनामी होणार नाही असे पाऊल उचलु नका.

वेगवेगळ्या पेजवर फोटो वायरल करण्यात आले आहेत-

फोटोची माहिती बघितल्यावर तुम्हाला तिथे त्याची तारीख दिसेल-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

4 Comments

  1. Ho barobar ahe pan yacha yevadha abhyas karnyat vel vaya ghalvnyapeksha morcha darmyan ek police jawan varala. Tyacha tari follow up ghetla asta tar bar zale asta.

  2. Before sharing this post look at thishttp://beinghindustani.com/truth-behind-viral-pic-in-maratha-morcha/

    I have also got this info… Please crosscheck…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *