श्रीदेवी आपल्या मुलीच्या नावे किती संपत्ती ठेवून गेल्या? वाचा खासरेवर.. 0

९० च्या दशकात जेव्हा कित्येक टॉप क्लास अभिनेत्री एका चित्रपटासाठी ५० ते ६० लाख फीस स्वीकारत असत, तेव्हा श्रीदेवी यांना एक कोटी रुपयांपर्यंत फीस आॅफर केली जायची. खरं तर हा त्यांच्या स्टारडमचा जलवा होता. त्यामुळेच आज त्यांचा उल्लेख बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून केला जातो. परंतु आज ही सुपरस्टार आपल्यात नसल्याने अनेकांना श्रीदेवी यांच्या आयुष्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची जणूकाही ओढ लागली आहे. आपल्या जमान्यात सर्वाधिक कमाई करणाºया अभिनेत्रींमध्ये श्रीदेवी यांचे स्थान पहिले होते. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती.

श्रीदेवी यांनी त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमधून छाप सोडली. त्यांची ‘चांदनी’ची भूमिका अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. श्रीदेवी यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरायचा. पुढे बोनी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी बराच काळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी त्यांनी २०१२ मध्ये ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. या चित्रपटातील त्यांचा अभिनय कौतुकास पात्र ठरला. त्यांची सुदरता आणि लोकप्रियता पाहता ग्लोबल ब्रॅण्ड्सने त्यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले.

श्रीदेवी यांच्या कमाई आणि संपत्तीविषयी सांगायचे झाल्यास, त्यांच्या संपूर्ण संपत्तीवर दोन्ही मुलींचा हक्क आहे. मीडिया रिपोर्टनुसार श्रीदेवी यांच्या संपत्तीवर पती बोनी कपूर यांचा नव्हे तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या त्यांच्या दोन्ही मुलींचा अधिकार आहे. श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत मुंबईतील अंधेरी वेस्टमध्ये असलेल्या एका शानदार बंगल्यात राहायच्या. श्रीदेवी यांची १३ कोटी रुपये वार्षिक कमाई असल्याचे बोलले जाते. त्या एका चित्रपटासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये फीस स्वीकारत असत. ‘इंग्लिश-विंग्लिश’मध्ये दमदार कमबॅक केल्यानंतर त्यांच्या फीसमध्ये तब्बल २४ टक्के वाढ झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१८ पर्यंत श्रीदेवी यांची संपत्ती जवळपास २४७ कोटी इतकी आहे. श्रीदेवी या बंगले आणि आलिशान गाड्यांच्या शौकीन होत्या. त्यांनी त्यांच्या कमाईतून सात महागड्या गाड्या खरेदी केल्या होत्या. ज्यांची किंमत ९ कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. ज्यामध्ये दोन कोटी रुपयांच्या बेंटले कारचाही समावेश आहे. त्यांच्या नावे तीन बंगले आहेत. ज्यांची किंमत ६२ कोटींपेक्षा अधिक आहे. कमी बजेटच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ने तब्बल ४० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यांच्या ‘जुदाई’ आणि ‘हिम्मतवाला’ या चित्रपटांनीही जबरदस्त कमाई केली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *