बघा स्मिता दीदी आर आर पाटील यांच्या साखरपुड्याचा विडीओ खासरेवर.. 0

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर आर (आबा) पाटील यांची राजकीय वारसदार असलेली त्यांची कन्या स्मिता पाटील या साखरपुडा पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी झाला आहे. या सोहळ्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमातील काही क्षण आपल्या पुढे घेऊन येत आहोत फक्त खासरेवर

त्यामुळे त्या आता पुणे जिल्ह्याच्या आणि दौंड तालुक्याच्या सूनबाई होणार आहेत. आनंद थोरात यांनी ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंट मधून शिक्षण पूर्ण केले असून सद्या ते पुण्यामध्ये व्यवसाय संभाळत आहेत. या साखरपुडा समारंभाला मोठी गर्दी झाली होती. स्मिता पाटील आणि आनंद थोरात हे १ मे २०१८ ला विवाहबंधनात अडकणार आहेत. हे लग्न जमविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात मगरपट्टा येथे येत्या १ मे ला पार पडेल अशी थोरात यांनी माहिती दिली आहे. आणि विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याचे संपूर्ण देखरेख शरद पवार करणार आहेत त्यामुळे या विवाह सोहळ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे थोरले बंधू प्रभाकर थोरात यांचा मुलगा आनंद थोरात आहे. आनंदने त्याचे शिक्षण परदेशात पूर्ण केले आहे आणि तो सध्या स्वतःचा व्यवसाय सांभाळतो. स्मिता दीदीकडे राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची जवाबदारी आहे. महाराष्ट्राचे भावी नेतृत्व म्हणून सर्व स्मिता दीदीकडे बघतात.

आर.आर. आबा आणि पवार साहेबाचे संबंध घनिष्ट होते पवार साहेबाच्या सर्वाधिक जवळचे आर. आर. आबा होते. आबाच्या निधनाने पवार साहेब अतिशय दुखी झाले होते. कारण आबणे संघर्षाने राजकारणात स्थान बनविले होते. र आर आबा सामान्य घरातून पुढे आले होते. आजही त्यांचे सर्व कुटुंबिय सामान्य व साधे राहतात, वागतात. आबांचे घराणे तालेवार नव्हते. त्यामुळे आबांच्या निधनानंतर पवारांनी त्यांच्या कुटुंबांकडे वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे म्हटले होते. आबांना दोन मुली व मुलगा रोहित आहे. मात्र, हे सर्व जण अद्याप महाविद्यालयीन व शालेय शिक्षण घेत होते. त्यामुळे आबांच्या माघारी शरद पवारांनी स्मिताच्या लग्नात लक्ष घातले.

दौंड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेश थोरात यांच्याशी पवारांचा राजकारणाशिवाय स्नेह आहे. त्यामुळे थोरातांच्या पुतण्याला स्मिताचे स्थळ पवारांनी सूचवले. थोरात कुटुंबियांकडून पसंती झाल्यानंतर हे लग्न जमल्याची माहिती मिळाली. येत्या मे महिन्यात स्मिता व आनंद यांच्या लग्नाचा बार पुण्यात उडणार आहे. महाराष्ट्र आबाला चाहत होता आणि स्मितामध्ये आबालाच बघतात चाहते..

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
आर. आर. आबा यांच्याविषयी माहिती नसलेली गोष्ट…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *