स्वदेशीचा नारा देणारे रामदेवबाबा कोणत्या ब्रान्डचे शूज वापरतात पहा … 0

बाबा रामदेव हे एक यशस्वी उद्योजक म्हणून जगभरात ओळखले जातात. भारतात स्वदेशी चळवळीबाबत ते आग्रही असतात भारतीय वस्तू वापरा विदेशी वस्तू वापरू नका या बाबत ते जाहिरातीचा भडीमार करतात. विदेशी कंपनियों के द्वारा की जा रही लूट को रोकें. स्वदेशी अपनाएं : बाबा रामदेव या लाईनचा सतत प्रत्येक उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये ते वापर करताना दिसतात. पण काल त्यांच्या स्वदेशी प्रेमाचे भिंग फुटले.

रामदेव बाबा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहेत. फेसबुक ट्विटर व इन्स्टाग्राम या माध्यमावर त्यांचे अधिकृत प्रोफाईल आहे आणि त्याला लाखो लोक फोल्लो करतात. काल त्यांनी इन्स्टाग्राम ला एक गंगा किनारी बसलेला फोटो पोस्ट केला. त्या फोटोला लगेच डिलीट करून तोच फोटो पायाचा अर्धा भाग क्रॉप करून पोस्ट केला.

पहिल्या फोटो मध्ये रामदेव बाबा यांनी एक बूट घातलेला दिसत होता त्यामुळे त्यांनी तो फोटो डिलीट केला व त्याठिकाणी बूट असणारा भाग काढून टाकून तो फोटो पोस्ट करण्यात आला. पण तो पर्यंत दोन्ही फोटोंचे स्क्रीनशॉट अनेकांनी काढून ठेवले होते.पहिल्या फोटोत बाबा रामदेव यांनी जो बूट घातलेला दिसत होता तो वूडलंड(woodland) या ब्रान्डचा होता. हि कंपनी परदेशी आहे आपल्या देशात सह जगभरात चामड्यांच्या बुटाची विक्री करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचमुळे रामदेव बाबा यांनी फोटो क्रॉप करून टाकला होता.

रामदेव बाबा हे स्वतः विदेशी कंपनीचे बूट वापरात हा मसेंज या निमित्ताने लोकांमध्ये गेला. याबाबत चे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिल्यानंतर बाबांनी तो हि फोटो डिलीट केला. पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ढोंगीबाबा म्हणून घाणेरड्या शिव्या दिल्या. तसे पाहिले तर रामदेव बाबा सामाजिक कार्यक्रमात लाकडी पादुका घातलेले पाहायला मिळतात.पण या फोटोच्या निमित्ताने त्यांचे वेगळे स्वरूप पाहायला मिळाले.. आपण खाली दोन्ही फोटो पाहू शकता.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *