काय काय विशेष सुविधांसह राहत होता संजू बाबा जेलमध्ये, वाचा खासरेवर संजय दत्तची जेलवारी 0

कैदी नंबर १६६५६ उर्फ संजय दत्त आर्म्स अॅक्ट अंतर्गत संजय दत्त याला शिक्षा झाली होती. पुणे येथील येरवाडा कारागृहात याने हा तुरंगवास भोगला. लहानपणापासून एशोआरमात जगलेला संजय दत्त याने जेलमध्ये दिवस कसे काढले हा प्रवास त्याने मागे एका दैनिकास सांगितला होता आजतीच जेलवारी बघूया खासरेवर

संजय दत्त सांगतो कि त्याच्या दिवसाची सुरवात हि रडण्याने होत असे. आठवण येत होती भयंकर घरची आणि मुलांची तो सांगतो कि जेलमध्ये त्याला सुरक्षेच्या कारणामुळे वेगळे ठेवण्यात आले होते. तो एकटा राहत होता. परंतु त्याला वागणूक एका सामान्य कैद्यासारखीच देण्यात येत होती. कुठलीही दयावया त्याला दाखविण्यात येत नव्हती. तो जेलमधील अन्नाविषयी सांगतो कि, जेलमधील अन्न असे होते कि जनावर सुध्दा ते अन्न खाणार नाहि असे अन्न खायला मिळत होते. रोज सकाळी ६ वाजता तो उठायचा आणि दिवसाची सुरवात रडण्यानेच होत असे असा तो सांगतो.

रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर आंघोळ आणि त्यानंतर तो शिव पुराण, गणेश पुराण, महाभारत, भगवद्गीता आणि रामायण याचे रोज वाचन करत होतो. तो सांगतो कि जेलमध्ये तो पूर्ण पंडित झाला होता. एक वर्ष जेलमध्ये त्याने फक्त तुरीची डाळच खाल्ली तो सांगतो कि जेलमध्ये राजगिर्याची भाजी मिळत होती. या भाजीचे नावच त्याने पहिल्यादा एकले होते असा संजय दत्त सांगतो. तो म्हणतो कि हि भाजी जनावरास लावल्यास ते देखील खाणार नाही. खाण्यात कधी किडे वगैरे सुध्दा निघत होते परंतु जेलमधील कैदी प्रोटीन मिळते म्हणून ते किडेही खात असे त्यामुळे त्यालाही हि सवय लागली होती असा तो सांगतो.

जैलमध्ये फिट राहण्याकरिता तो दोन तास रोज रनिंग करत असे. बकेटीने पाणी भरून तो झाडांना टाकत असे. सिक्स पैक बनविण्याकरिता तो व्यायाम सुध्दा करत असे असा तो सांगतो. जेव्हा तो जेलमध्ये गेला तेव्हा संजय दत्त याचे वजन १०० किलो होते आणि तो जेव्हा परत जेलमधून बाहेर आला तेव्हा त्याचे वजन ४० किलोने कमी झाले होते. तो सांगतो कि जेलमध्ये त्याला कुठलीही विआयपी सुविधा मिळत नव्हत्या उलट इतर कैद्यापेक्षा त्याच्याकडून जास्त काम करून घेतल्या जात असे असा संजय दत्त सांगतो. तो सांगतो या अगोदर ड्रग्स सोडायला त्याला अमेरिकेत पाठविले होते तेव्हापासून त्याने ड्रग्सकडे परत बघितले नाही. तो म्हणतो कि अंडरवर्ल्ड मधील लोकासोबत बोलण्याकरिता त्याच्यावर दबाव आणण्यात आला होता त्यामुळे तो या सर्व प्रकारात अडकला.

तो सांगतो कि जेलमधील दोन मित्र समीर आणि जीशान या दोघाने त्याला शायरी करण्यास प्रोत्साहन दिले. जवळपास ५०० शेरो शायरी त्याने लिहिल्या आहे लवकरच तो पुस्तक हि प्रकाशित करणार आहे. जेलमध्येच त्याला पैस्याची बचत कशी करायची याची सवय लागली होती. तो सांगतो कि महिन्याला २००० रुपये मिळत होते खर्चाला त्यापैकी तो दर रोज २० रुपये वाचवत होता. इथेच मिश्रा नामक धारावीच्या आरोपीने त्याला हेअरस्टाईल विषयी काही सल्ले दिले.

सध्या तो जेलच्या बाहेर आला आहे. त्याने केलेल्या गुन्ह्याकरिता शिक्षा हि भोगली आहे. संजू बाबास भावी आयुष्यास शुभेच्छा.. लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

मुकेश अंबानीच्या मुलीला झाल प्रेम, क्लिक करा व बघा कोन आहे मुलगा…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *