उपवासाला साबुदाणा खात असाल तर हे वाचा. परत खाण्याअगोदर करसाल विचार.. 0

साबुदाणा हा बहुतेक सर्वांचा आवडीचा पदार्थ? खिचडी खाण्यासाठी आईला खोटा उपवास धरलाय असं बऱ्याच जणांनी सांगितलं देखील असेल. तर अनेक जणांच्या डोक्यात प्रश्नही पडला असेल कि बुआ हा प्रकार काय आहे? कसा बनत असेल साबुदाणा? साबुदाणा मांसाहारी आहे का शाकाहारी? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात असतील आणि याचं अपेक्षित उत्तर अजून मिळालं नसेल तर टेन्शन नॉट आम्ही आहोत ना! आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत…

साबुदाण्याचा इतिहास
साबूदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम (Sago) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, खीर तसेच खिचडी अथवा उसळ बनवण्यासाठी करतात.
हा एक प्रकारच कंद आहे. साबुदाणाचे कंद मुळात दक्षिण अमेरिका येथले आहे. पोर्तुगाल व्यापाऱ्यांनी ते आफ्रिकेत आणले आणि तेथून त्यांनी 1900 च्या शतकात भारतात आणले. साबुदाण्याचे कंद टॅपिओकाची भारतात मुख्यतः तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश येथे शेती केली जाते. त्याची लागवडीसाठी हलकी भुसभुशीत मुरमाड जमीन योग्य आहे. साबुदाणा कंदच पिक येण्यासाठी 9 ते 10 महिने लागतात.

साबुदाणा बनवण्याची पद्धत
शेतातून आणलेल्या कंदांना पाण्यात उकळले जाते. धुतलेल्या कंदांचे 6 ते 8 इंच तुकडे केले जातात. पिलिंग मशीनचा वापर करून त्याचं टरफल काढतात. या तुकड्यांना कृशिंग मशीनने पाण्यासोबत क्रश केले जाते. हे द्रव दुधासारखं दिसतं. याला द्रव्याला पुन्हा फिल्टर करून त्यातले तंतुमय पदार्थ वेगळे काढले जातात त्याचा पशु खाद्यासाठी उपयोग होतो. फिल्टर केलेलं द्रव स्थिर ठेऊन त्यातलं पाणी काढल जात व उरलेला पांढरा पदार्थ प्रेशर वापरून सुकवला जातो. याच पांढऱ्या भुकटी पासून मशीनमध्ये गोल गोल दाणे बनवले जातात. हे साबुदाण्याचे दाणे गरम भट्टीच्या तव्यावर थोडस नारळ तेलं टाकून भाजले जातात किंवा काही कारखान्यामध्ये रोस्टर ड्रायर ने सुकवले जातात. नायलन साबुदाणा कच्च्या दाण्यांना मेटलच्या भांड्यामध्ये वाफेवर शिजवले जातात नंतर हवेने थंड केले जातात. पुन्हा हा साबुदाणा उन्हात वळवला जातो. अशाप्रकारे साबुदाणा बनवला जातो आणि तो पूर्णपणे शाकाहारी आहे.

काय मंडळी भेटलं ना प्रश्नाचं उत्तर मग शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *