जाणून घ्या काय आहे रहस्य ७८६ या आकड्यामागे… 0

मुस्लीम समाजात ७८६ हा आकडा जास्त प्रमाणात आढळतो. मोबाइल नंबर, गाडीचा नंबर हा ७८६ घेण्याकरिता स्पर्धा लागलेली असते परंतु तुम्हाला माहिती आहे का या ७८६ नंबर मागे काय रहस्य आहे ? चला तर आज खासरे वर बघूया ७८६ या नंबर मागील रहस्य..

मागे ebay वर एकच खळबळ उडाली होती जेव्हा नवीन २००० ची नोट मार्केटमध्ये आली आणि ७८६ नंबरची नोट हि तब्बल १५ लाख रुपयात विकल्या गेली. खरेदी करणारा मुस्लीम होता परंतु त्याने या नंबर करिता एवढे पैसे का मोजले असावे ? ७८६ नंबर असलेले सीम कार्ड हि मोठ्या भावात विकल्या जाते. आशिया खंडात ७८६ या आकड्यास जास्त महत्व दिल्या जाते. अरबी बाराखडीत २८ अक्षरे आहेत आणि प्रत्येकास एक वेगवेगळी संख्या देखील दिलेली आहेत. खालील फोटोत आपण ह्या अक्षराच्या संख्या बघू शकता.

जर ७८६ नंबर आपण एकत्र मिळविला तर बिस्मिल्लाह उर रहमान ए रहीम हे वाक्य तयार होते. हे नाव अल्लाहचे आहे त्यामुळे ७८६ हा आकडा मुस्लीम समाजात पवित्र मानल्या जातो. परंतु हि संख्या भारत आणि पाकिस्तानात जास्त प्रसिद्ध आहे करणा उचारातील फरक असा आहे भारता बाहेर अल्लाह चे नाव Bismillah ir-Rahman ir-Rahim असा केला जातो. खालील फोटोत आपण बघू शकता ७८६ हि बेरीज कशी येते.

वरील सर्व अंकाची बेरीज हि ७८६ एवढी येते त्यामुळे मुस्लीम लोकात ७८६ हा आकडा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.ह्या सर्व कारणामुळे नोट,मोबाइल नंबर किंवा गाडीचा नंबर हा अल्लाह सोबत जुळलेला असावा याकरिता मुस्लीम लोक ७८६ या संख्येस मोठ्या प्रमाणात पसंदी देतात.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *