मुळा मूळव्याध मुळापासून संपवतो..

मुळ्याच्या भाजीला असणार्‍या विशिष्ट आणि उग्र वासामुळे अनेकजण त्याचा आहारात समावेश करताना टाळाटाळ करतात.परंतू भाजी, रायता, पराठा अशा विविध आणि रुचकर माध्यमातून मूळा आहारात घेता येऊ शकतो. मूळव्याध सारख्या पचनाच्या विकारांमध्ये मूळा अत्यंत फायदेशीर ठरतो.

मुळा खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत, मूळव्याधवर मुळा हा रामबाण उपाय आहे. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रूग्णाला आराम मिळतो, थंडावा मिळतो, आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

नियमित मुळा खाल्ल्यास लवकर फायदा

घरात सलाद म्हणून जेवताना खाल्ला जाणारा मुळा तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगला असतो. मुळा हा पाईल्स म्हणजेच मूळव्याधवर उपाय तर आहेच, पण मूळव्याधी होणं थांबवण्याचं कामही मुळा करतो. मूळव्याधचं स्वरूप वाढल्यास भंगदर, बवासीर सारखे भयंकर प्रकार समोर येतात. हे थांबवण्यासाठी मुळा खाण्याशिवाय साधा सोपा उपाय कोणताही नाही.

काही महिन्यात समस्या दूर

नियमित मुळा खाल्ला तर पाईल्सची समस्या काही महिन्यात दूर होते. मुळा रामबाण उपाय असला तरी डॉक्टरने दिलेली औषधीचं सेवन करणे सोडून देणे असाही त्याचा अर्थ नाहीय. मात्र हा घरगुती उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्ही औषधांपासून दूर जाऊ शकता.

वाचा प्लेटलेट्स मानवी शरीराची कवचकुंडलं विषयी संपूर्ण माहिती…

मुळा गुणकारी का?

मूळव्याधच्या रोग्यांना नेहमी मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण याच्यात लवकर मिळणारे फायबर्स असतात, फायबर्स मल मुलायम करतात, आणि पचनक्रिया तंदुरूस्त ठेवण्यात मदत करतात.

यात वाष्पशील तेलही असतं, जे पाईल्स असताना होणारा दाह कमी करण्यास मदत करतं आणि सूज कमी होते. तसेच मुळा थंडावा देण्याचं काम करतो आणि दाह कमी होतो.

वाचा हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर लवकर व्हाल म्हातारे…

कसा वापरावा मुळा

मूळव्याध असणाऱ्या लोकांना कच्चा मुळा खाल्ला पाहिजे. मुळा किसूनही तुम्ही खाऊ शकता. १०० ग्रॅम मुळ किसून १ चमचा मध मिसळून, दिवसातून दोन वेळेस खा. यापेक्षा सोपा उपाय मुळ्याचा रस काढा, ग्लासभर रसात थोडसं मीठ टाका आणि दिवसातून दोन वेळेस प्या. पण कच्चा मुळा खाणं हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहे.

वेदना आणि सूज कमी करण्यसाठी: किसलेला मूळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट इंन्फेक्टेड भागावर लावा. म्हणजे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
पादने आहे शरीरास चांगले वाचा पादण्या विषयी २५ अपरिचित गोष्टी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *