बापरे बाप प्रियंकाच्या एंगेजमेंटच्या रिंगची किंमत ऐकून तुम्ही नक्की हैराण होणार.. 0

प्रियंका चोप्रा व निक जोन्स या जोडप्या बद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. आज या जोडप्यांची एंगेजमेंट होत आहे. त्यामुळे प्रियंकाच्या फॅन्स मध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रियंका चोप्रा हिचे अमेरिकन टीव्ही वाहिनी वरील सिरीज मुळे जगभरात फॅन्स तयार झाले आहेत. त्यांच्यासाठी हि प्रियंकाच्या एंगेजमेंट ची बातमी आनंददायी आहे. सध्या सर्वाना एक उत्सुकता लागली आहे कि प्रियंकाच्या हातात असणाऱ्या रिंग ची किंमत किती ??

प्रियंकाच्या रिंग ची किंमत तिने कुठे उघड केली नाही पण harpersbazaar.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल २०० हजार डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय किंमत १ कोटी ४० लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय जेमोलोजिस्टनुसार, ही ५ कॅरेटची रिंग आहे. रिंगमध्ये असलेल्या डायमंडला कुशन कट डायमंड म्हटले जाते. हा डायमंड सर्वात महागड्या डायमंडपैकी एक आहे. निक ने आपल्या लाडक्या प्रियंका साठी हि रिंग दिली आहे. मुंबईमध्ये अधिकृतरीत्या हे दोघेजण पंजाबी पद्धतीने एंगेजमेंट करत आहेत. आता सर्वाना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा असेल. निक हा प्रियंका पेक्षा ११ वर्षाने लहान आहे यामुळे सुध्दा दोघाचे संबंध या अगोदर मिडिया मध्ये चर्चेचा विषय ठरले होते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *