मिस वर्ल्ड होण्या पूर्वी प्रियांका चोप्रा करायची हा जॉब ..प्रियांकाने स्वतः केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारताबरोबरच विदेशातही चर्चित सेलिब्रिटी आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही तिच्या चाहत्यांची संख्या अगणित आहे. याचा प्रत्यय सध्या येत असून, प्रियांका ज्या-ज्या ठिकाणी तिच्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या प्रमोशनसाठी विदेशात जात आहे त्या त्या ठिकाणी चाहत्यांचा तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वास्तविक या मालिकेत बरेचसे कलाकार आहेत; परंतु प्रियांकाची लोकप्रियता काही औरच आहे. प्रियांकाचे चाहते तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेऊ इच्छितात. अशात प्रियांकाने नुकताच एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे.

तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की, प्रियांकाने तिच्या करिअरची सुरुवात मिस इंडिया वर्ल्डचा ताज जिंकल्यानंतर २००२ मध्ये आलेल्या ‘थामिजान’ या तामिळ चित्रपटातून केली. परंतु तुम्हाला हे जाणून खरोखरच धक्का बसेल की, अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर प्रियांका चक्क बर्फ खोदण्याचा जॉब करायची. याबाबतचा खुलासा स्वत: प्रियांकानेच केला आहे.

नुकताच प्रियांकाने एका यूएस मॅगझीनला एक मुलाखत दिली. वीकली यूएस मॅगझीनसोबत चॅट करताना प्रियांकाने सांगितले की, ‘माझी पहिली नोकरी बर्फ खोदण्याची होती. यावेळी प्रियांकाने हेदेखील सांगितले की, चित्रपट असो वा टीव्ही शो माझे स्टंट मी स्वत:च करीत असते. प्रियांका सध्या अमेरिकन टीव्ही सिरीज क्वांटिकोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच लवकरच ती काही बॉलिवूड प्रोजेक्टवरही काम करताना दिसणार आहे. तब्बल दोन वर्षानंतर ती सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटातून कमबॅक करणार आहे.

प्रियांका चोप्रा ने हॉलीवूड चित्रपट सृष्टी पण आपल्या अभिनयाने गाजवली आहे तिच्या भूमिकेला सर्वत्र पसंती मिळाली.प्रियांका चोप्रा हि बॉलीवूड मधील एकमेव अभिनेत्री आहे जिने हॉलीवूड मध्ये हि आपली अभिनयाची कामगिरी बजावली आहे.तिने स्वताचा मराठी चित्रपट हि निर्मित केला होता. तिचा आता चाहता वर्ग आता जगभर पसरला आहे. भारतात हि तिची लोकप्रियता कमी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *