हेलिकॉप्टर छतावर उतरवून देवदूत ठरलेला हा पायलट आहे महाराष्ट्राचा सुपुत्र.. 0

केरळमध्ये सलग ९ दिवसांच्या जलप्रलयामुळे उत्पात माजला होता. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातील 14 पैकी 11 जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले होते. मागील १०० वर्षातील सर्वात भयानक पूर केरळमध्ये आला होता. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले. केरळमध्ये जवळपास २० हजार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केरळमधील पूरस्थितीला केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘गंभीर नैसर्गिक आपत्ती’ घोषित केलं आहे. केरळमध्ये पावसाने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. ही गोष्ट लक्षात घेत ही गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं.केरळमधील पूर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. हजारो घरं पुरात वाहून गेल्यामुळे नागरिक बेघर झाले आहेत.

केरळमध्ये बचावकार्य करताना सैनिकांनी अक्षरशः आपले प्राण धोक्यात घातले. केरळमधील बचावकार्यात थरारक पद्धतीने नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यापॆकी एक बचावमोहीम म्हणजे 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट घराच्या छतालाच हेलिपॅड करून हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या मोहिमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. आणि हि कामगिरी करणारा धाडसी पायलट दुसरा-तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याचे समोर आले आहे.

हा भीम पराक्रम केला आहे लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड यांनी. अभिजित यांच्याकडून यावेळी एकजरी चूक झाली असती तरीही केवळ तीन सेकंदात होत्याचे नव्हते झाले असते. अभिजीत गरुड यांनी आपला केरळमधील बचावकार्याचा थरारक अनुभव सांगितला आणि सबंध महाराष्ट्राचा उर अभिमानाने भरून आला.

चालाकुढी क्षेत्रामध्ये एका गर्द झाडांनी व्यापलेल्या ठिकाणी 23 जण अडकले होते. त्यांना वाचविणे म्हणजे हेलिकॉप्टर बऱ्याच काळासाठी जमिनीवर उतरविणे गरजेचे होते. मात्र, आजुबाजुला पाणी आणि झाडी असल्याने ते अशक्य होते. यामुळे हेलिकॉप्टर चालविणारे लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड आणि त्यांचे सहकारी पी राजकुमार यांनी हेलिकॉप्टर एका घराच्या छतावर उतरविण्याचा धाडसी परंतू तितकाच धोक्याचा निर्णय घेतला.

घर जरी स्लॅबचे असले तरीही हेलिकॉप्टरच्या हजारो किलोंच्या वजनाने स्लॅब कोसळन्याची शक्यता नाकारता येत नव्हती. गरुड यांनी ‘लाइट ऑन व्हील्स’ म्हणजेच छतावर हलके वजन ठेवत नौदलाचे सी किंग हे हेलिकॉप्टर उडते परंतू स्थिर ठेवले होते. या स्थितीत ८ मिनिट हेलिकॉप्टर ठेवण्यात आले. सर्वांना दोरीने वर घेऊन सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अभिजित आणि सहकार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हि धाडशी कामगिरी पार पाडली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *