स्त्रिया आणि मुलींना भारतात पाठवू नका म्हणून इस्तांबुल टर्की विमानतळावरील फोटो व्हायरल…

जम्मू काश्मीरमधील कठूआ मध्ये आठ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने सध्या सर्वत्र टीकास्त्र सुरू आहे. आठ वर्षाच्या असिफाची बलात्कार करून हत्या करण्यात आली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध नोंदनवण्यात येत आहे. सोशल मीडियावर इस्तांबुल टर्की विमानतळावरील फोटो सांगून काही फोटो प्रचंड व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. या फोटोमध्ये काही व्यक्तींच्या टीशर्ट वर लिहिलेलं आहे की ‘भारतात स्त्रियांना आणि मुलींना पाठवायच्या अगोदर विचार करा. भारतात स्त्रीया आणि मुली सुरक्षित नाहीयेत. तर इथे स्त्रियांपेक्षा गायीला जास्त पूजले जाते.’ अनेकांनी हे फोटो खरे की खोटे याची सत्यता न तपासता भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप खराब झाले, अशा पोस्ट टाकून फोटो पोस्ट केले आहेत. पण या फोटोंची सत्यता तपासली असता यामागचे सत्य समोर आले आहे. खासरेवर जाणून घेऊया या फोटोमागची सत्यता…

ही बलात्काराची घटना घडली तेव्हापासून सोशल मीडियावर फेक फोटोंचो अक्षरशः त्सुनामी आली आहे. फेसबुक आणि व्हाट्सएपवर ते मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. #JusticeForAsifa हा हॅशटॅग लिहुन भारत देशाला नाव ठेवण्यात आले आहे. पण हे फोटो फेक असल्याचे समोर आले आहे. हे फोटो फोटोशॉप करण्यात आलेले आहेत. Beware In Sending लिहिलेला फोटो झुम करून बघितला तर तिथे एक चौकोन दिवू शकतो. शब्दाच्या बाजूला पिक्सल सुद्धा ब्रेक होताना दिसत आहेत.

फॉरेन्सिक पद्धतीने हा पडताळला आहे. यामध्ये एरर लेव्हल एनलिसिस केले(ELA) आहे. यामध्ये दिसून येतं की फोटोतील सर्व काही मिक्स झाले आहे फक्त ते शब्द सोडून. यावरून ते फोटोशॉप केल्याचं निष्पन्न होतं. या व्यक्तींचे इन्स्टाग्राम वरील अकाउंट तपासले असता त्यांनी प्लेन पांढरे टीशर्ट घातल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *