हे आहे सर्वात महाग मशरुम.. नरेंद्र मोदीही आहे याचे दिवाणे

गुजरात च्या निवडणुकी अंतिम टप्प्यावर आल्या आहेत आणि वातावरण सध्या गरमागर्मीचे आहे. कॉंग्रेस नेते अल्पेश ठाकूर यांनी नरेंद्र मोदींच्या खाण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण केले त्यांनी मोदी ८० हजार वाले मशरूम खातात व ते तैवान वरून येते असा आरोप केला.त्यांच्या आरोपाने वातावरण अजूनच गरम झाले आहे. त्यांच्या आरोपात काय तथ्य आहे हे पाहिले पाहिजे. नरेंद्र मोदी हे खात असणारे मशरूम ची किमत ८० हजार सांगितली गेली पण ते खरे नाही मग मोदिजी कोणते मशरूम खातात.

मोदी हे उतराखंड भागातील हिमालय पर्वतात मिळणारे गुच्छी नामक मशरूम खातात त्या मशरूम ची किमत १० हजार ते ३० हजार किलो आहे. हे मशरूम नैसर्गिकरित्या येतात त्यामुळे त्याची लागवड वैगेरे करता येत नसल्याने ते दुर्मिळ असतात. त्यामुळे याची किमत ३० हजार पर्यंत होते दिल्ली मध्ये हे मशरूम ३० हजार किलोने मिळते.

मशरूम चे काय फायदे आहेत ते पाहू

मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. आपल्या शरीराच्या वाढी साठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत.

1) मधुमेही व्यक्तींकरिता उपयुक्त
2) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत.
3) मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त
4) लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम अन्न
कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.

5) स्कर्व्ही रोगापासून बचाव
मशरूममध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो.
6)पचनक्रिया सुरळीत ठेवण्य करिता मदत करणारे अन्न
मशरूममध्ये तंतुमय पदार्थ अधिक आहेत. तसेच फॉलिक अॅसिड आहे. हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करतात.
तसेच मशरूम खाण्याने रंगावर कोणताही परिणाम होत नाही आरोग्य चांगले राहत असल्याने एक प्रकारचे तेज जरूर येते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
या अपमानाचा बदला घेण्यासाठी जगुआर कंपनीच विकत घेतली टाटा यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *