2017 वर्षात सर्वात जास्त वेळा बघितलेल्या या डान्सचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का? 0

2011 साली आलेल्या धनुषच्या कोलावरी डी गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर बरीच गाणी आली पण ज्याप्रकारे या गाण्याचा ट्रेंड तयार झाला होता तो खासच होता. पण 2017 मध्ये एक असे गाणे आपल्याला बघायला मिळाले ज्याने कोलावरी डी ला सुद्धा मागे टाकले. ते म्हणजे मल्याळम गाणे जिमकी कमल या गाण्याने. कोलावरी डी नंतर जिमकी कमल या गाण्याने जगाला अक्षरशः वेड लावले होते. या गाण्याने 2017 वर्षात युट्युबवर रेकॉर्ड सुद्धा केला होता. युट्युबच्या 2017 मध्ये सर्वात जास्त बघितलेल्या व्हिडीओच्या यादीत या गाण्याने दुसरा क्रमांक पटकावला होता.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका असलेल्या वेलीपडीनेट पुष्ठकम या सिनेमातलं हे गाणं आहे. या गाण्याला युट्युबवर सर्च केल्यावर लाखो व्हीव्हज असलेले व्हिडीओ तुम्हाला दिसतील.ऑगस्टमध्ये अपलोड केलेल्या ऑफिशियल व्हिडीओला आतापर्यंत 6 कोटी पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

पण सर्वाना आवडलेला व्हिडीओ म्हणजे या गण्यावरील केरलमधल्या स्कुल ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांचा डान्स. पारंपरिक साडी नेसून केलेल्या या नृत्याला लाखो लोकांची पसंती मिळाली. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हीही डान्स करायचा मोह आवरू शकणार नाही. बघा या डान्सचा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *