हे आहेत जगातील सर्वात अद्भूत आणि विचित्र मुलं, तुम्ही कधीच पहिली नसतील अशी मुलं…

जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी आढळून येतात. जग हे एवढं विशाल आहे की कोणालाच माहिती नसते की कोणत्या देशात नेमकं काय आहे आणि काय चालू आहे. प्रत्येक दिवशी अनेक घटना वेगवेगळ्या देशात घडत असतात. परंतु प्रत्येकाला त्याविषयी माहिती होणे थोडे कठीण काम आहे. आज आपण जगभरातील आशा काही अद्भूत मुलांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना तुम्ही कधी पाहिलेही नसेल आणि तुम्हाला त्यांच्याविषयी माहितीसुद्धा नसेल.

लहान मुलं कोणाला आवडत नाहीत. प्रत्येक घरात मुलांच्या आरडाओरड, खेळण्याची आवाज ऐकू येत असतो. लहान मुलांचा आवाज घरात असेल तर घरात खूप करमतं सुद्धा. पण काही मुलं एवढी वेगळी असतात की त्यामुळे त्यांना जगभरात एक नवीन ओळख मिळते. आज अशाच काही अद्भुत मुलांविषयी आपण माहिती बघणार आहोत.

आपण बरेच वेळा ऐकत असतो की जगात काही तरी विचित्र आणि नवीन नवीन घटना घडली. पण नेमकी माहिती आपल्यापर्यंत पोहचत नाही. अनेकांच्या मनात काही अद्भुत जीवांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण नेमकी माहिती भेटली नाही तर आपण ती गोष्ट विसरून जातो. पण आज खासरेवर जी माहिती आपण बघत आहोत ती तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यास उपयुक्त ठरू शकते.

आपलं जग हे अनेक अद्भुत आणि न सुटलेल्या रहस्यांनी भरलेले आहे. त्यापैकी अनेक रहस्य तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असतील सुद्धा. काही असेही रहस्य आहेत जे की आपल्याला विचार करायला भाग पाडतात की असे कसे शक्य आहे. तुम्ही यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या माणसाविषयी ऐकले असेल सोबतच सर्वात छोट्या मुलाविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असेल. पण आज आपण अशा काही अद्भुत मुलांविषयी माहिती बघणार आहोत ज्यांच्याविषयी तुम्ही कधीच ऐकलं वाचलं नसेल.

1. शारलेट गारसाईड-

ब्रिटनची राहणारी शारलेट जगातील सर्वात छोटी मुलगी म्हणून ओळखली जाते. ती फक्त 27 इंच लांब आहे आणि तिचे वजन फक्त 4 किलो आहे. दिसायला तर ती एकदम नवजात मुलगी वाटते. पण ती सामान्य मुलाप्रमाणे रोज शाळेत जाते. सर्व मित्रांसोबत उभा राहिल्यावर ती एक छोटीशी बाहुलीच वाटते. जेव्हा शारलेट चा जन्म झाला होता तेव्हा ती फक्त 10 इंच लांब होती. डॉक्टरांनी शारलेट फक्त 1 वर्षे जगेल असे सांगितले होते. पण ती आता जवळपास 8 वर्षाची झाली आहे.

2. मोहम्मद कलिम-

भारतात राहणार मोहमद दिसायला एक सामान्य मुलगा दिसतो. परंतु त्याच्या हाताकडे पाहिले तर ते अविश्वसनीय मोठे आहेत. जेव्हा तो 8 वर्षाचा होता तेव्हा त्याचा एक एक हात 8 किलोचा होता. यामुळे त्याचे मित्र त्याला बरेच चिडवतात पण शांत राहायचा. एकदिवस तर त्याला शाळेतून सुद्धा काढून टाकण्यात आले. कारण बाकी मुले त्याच्यामुळे भयभीत होत असल्याचे कारण शाळेने दिले. 2015 मध्ये त्याच्यावर झालेल्या सर्जरीने तो त्याचे सएव काम स्वतः करू शकतो.

3. सायमन आणि जॉर्ज कलन-

Twilight चं नाव आपण सर्वांनी ऐकलच असेल. ही एक मुवि सिरिज होती. या दोन भावांकडे अशाच काही शक्ती आहेत. यांच्याकडे एक अशी कंडिशन आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. सायमन जॉर्ज चा मोठा भाऊ आहे. सायमन हा 13 वर्षाचा आहे तर जॉर्ज हा 11 वर्षाचा आहे. या दोघांना Twilight मुवि च्या प्रसिद्ध कॅरॅक्टर सारख मानलं जातं. दोघा भावांना एक असामान्य डिसऑर्डर आहे. त्यांची त्वचा जास्त प्रकाशात खराब व्हायला लागते. सोबतच दोन्ही भावांना खूप कमी दात आहेत. दोन्ही भाऊ घरातच खेळणे पसंत करतात.

4. निहाल बिटला-

भारतात जन्मलेल्या निहाल ला सामान्य मुलांसारखे व्हिडीओ गेम खेळायला आणि आपल्या भाऊ बहिणीसोबत मस्ती करायला खूप आवडायचे. पण निहाल एका असामान्य जेनेटिक आजाराचा शिकार झाला होता. त्याला प्रोजेरिया होता. यामध्ये त्याचे वय खूप जास्त वेगाने वाढत होते. 15 व्या वर्षीच तो एक म्हातारा माणूस दिसू लागला होता. या रोगावर काही उपचार उपलब्ध नसल्याने निहालचा 3 मे 2016 ला मृत्यू झाला. त्यावेळी निहालचे वय फक्त15 वर्षे होतं. तो प्रोजेरियाचे निदान झालेला पहिला भारतीय होता.

5. फु वेंगवी-

बीजिंगचा राहणारा फु वेंगवी एक 15 वर्षाचा मुलगा आहे. पण सामान्य माणसाच्या तुलनेत त्याच्या मानेत 3 अधिक व्हर्टीब्रे नावाचे हाड आहे. हे हाड आपल्याला चालण्यास आणि उभा राहण्यास मदत करते. एका सामान्य माणसाच्या शरीरात या प्रकारचे फक्त 7 हाडं असतात पण फुच्या शरीरात 10 व्हर्टीब्रे आहेत. ज्यामुळे त्याची मान खूप लांब आहे.

या अद्भुत मूलांविषयी माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हिमालयातील योगींच्या अद्भुत शक्तींनी मोठेमोठे शास्त्रज्ञ झाले आहेत थक्क…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *