या प्रसंगामुळे कळेल कि धोनीची नाळ आजही कशाप्रकारे मातीशी जुळून आहे… 0

महेंद्रसिंग धोनी उर्फ माही प्रतिकूल परिस्थिती मधून धोनीने हे विश्व निर्माण केलेले आहे. पाठीशी कुठलेही पाठबळ नसताना महेंद्रसिंग धोनीने शून्यातून आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. भारताला विश्व विजेता बनविणारा माही आजही मातीशी जुळून आहे. त्याच्या वागण्या बोलण्यात कुठलाही अहंकार नाही. आज खासरेवर असेच काही प्रसंग बघूया ज्यामुळे तुम्हाला महेंद्रसिंग धोनी बद्दल अजून आदर निर्माण होईल..

एक दिवशी अचानक धोनी आपल्या हमर या कारने फिरत असल्यावर लक्षात आले कि त्याच्या गाडीचा पाठलाग कोणीतरी करीत आहे. ती धोनीची चाहती आपल्या स्कुटीने धोनीच्या पाठीमागे होती तिला फक्त एक सेल्फी हवा होता. माहीच्या हे लक्षात येताच त्याने गाडी थांबवून तिच्या सोबत सेल्फी घेतला आणि हा फोटो सोशल मिडीयावर भयंकर वायरल झाला होता.

विजय हजारे करंडका करिता धोनीची निवड झारखंडच्या कप्तान पदावर करण्यात आली होती. तो आरामात विमानाने प्रवास करू शकला असता परंतु धोनीने झारखंडच्या टीम सोबत रेल्वेने प्रवास केला. आणि त्याचा हा प्रसंग इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला होता.

अजून महेंद्र सिंग धोनी बद्दल एक विशेषतः हि आहे कि कधीही भारताने कुठलीही मालिका जिंकल्यास तो चषक धरून समोर मिरवत नाही. आपल्या साथीदारांना तो हा मान देतो आपण बघू शकता अनेक फोटोत तो मागे असेल आणि साथीदार पुढे, उदाहरणा करिता टी२० वर्ल्ड कपचा फोटो, आशिया कपचा फोटो बघा धोनी मागे उभा आहे आणि टीम पुढे आहे.

धोनीच्या स्वभावातील अजून एक खुबी बघायला मिळाली साउथ आफ्रिकेचा फलंदाज फिलीप डूप्लेसीस याला खेळता खेळता इजा झाली आणि तो पिचवर पडला. धोनीने क्षणाचा विलंब न करता त्याच्या मदती करिता पुढे आला. प्रतिस्पर्ध्याला मदत करणारा धोनीच आहे.

जेवढा मोठा सेलिब्रिटी तेवढे मोठे शोक परंतु धोनीच वेगळच आहे त्याने कुठल्या महागड्या सलून मध्ये न जाता आपल्या गावातील जुन्या केस कारागीरा कडून घरात कटिंग करून घेणे. त्याचा हा फोटो सोशल मिडीयावर वायरल झाला आणि त्याच्या साधेपणाची सर्वजण चर्चा करू लागले.

धोनी ज्या काळात खरगपूरला टीसीचे काम करत होता त्या काळात तो ज्या चहा टपरी वर चहा पियाचा त्या व्यक्तीला तो आजही विसरला नाही आहे. त्याने मागे थोमसच्या त्या चहा टपरीवर चहा घेतला आणि थोमसला एका महागड्या हॉटेलमध्ये जेवणाला हि घेऊन गेला. हा प्रसंग सोशल मिडीयावर बराच गाजला होता.

असा सेलिब्रिटी भूतो ना भविष्य होणे नाही. खासरे तर्फे धोनीला सलाम आणि तो नेहमीच असा राहो..

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *