जगातील एकमेव व सर्वात मोठी तृतियपथींयाची जत्रा, कुवागम मध्ये घडतात अजबगजब गोष्टी…

तृतीयपंथीकडून साजरे केले जाणारे विविध सन व त्यांच्याकडून पाळल्या जाणाऱ्या रूढी परंपरा बघणे आणि त्याविषयी जाणून घेणे खूपच मजेशीर आणि आगळे वेगळे असते. आजच्या घडीला आपल्या अधिकारांसाठी आणि बरोबरी साठी त्यांचे स्वतःसाठी आवाज उठवणे खूपच कौतुकास्पद आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सुद्धा आजच्या काळात समाज त्यांना आपलेच समजून जवळ करण्यास तयार नाहीये. याशिवायही ते खूप मेहनत आणि काही संघटनेच्या मदतीने सुंदर जीवन तयार करत आहेत, आता त्यांना मंगलमुखी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

भारतातील पौराणिक कथांमध्ये सुद्धा तृतीयपंथ्याना एक वेगळं आणि दिव्य स्नान दिले गेले आहे. फक्त समाजाच्या वेगळ्या बघण्यानेच नाही तर त्यांच्या आगळ्यावेगळ्या आणि विचित्र रिति रिवाज पण खूप युनिक आणि वेगळे असतात. तृतीयपंथी देवावर खूप विश्वास करतात. वर्षातून एकदा ते आपला कुवागम फेस्टिव्हल खूप धुमधडाक्यात साजरा करतात ज्यामध्ये भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातुन तृतीयपंथी सामील होतात.

हा फेस्टिव्हल तृतीयपंथ्याच्या सर्वात मोठ्या फेस्टिव्हलपैकी एक आहे जो की तामिळनाडू मध्ये साजरा केला जातो. विल्लीपुरम च्या कुवागम गावात कुतांडवार मंदिरासाठी प्रसिध्द आहे. हा सॅन तामिळ कॅलेंडरनुसार चैत्र( एप्रिल-मे)च्या महिन्यात साजरा केला जातो. कुतांडवार ला अरावन या नावाने सुद्धा ओळखले जाते. जो की महाभारतातील महान योद्धा अर्जुनचा पुत्र होता. काही लोक तर हे पण बोलतात की अरावन हे बाब्रूवहनाचं दुसरं नाव आहे.

महाभारतातील पौराणिक कथा आपल्याला युद्धाच्या काळात घेऊन जातात. जिथे महाभारतातील युद्धाच्या दरम्यान भविष्यवाणी होते की ते युद्ध हरणार. असे होण्यापासून रोखण्यासाठी ज्योतिष त्यांना काली माँ च्या समोर एका माणसाचा बाली देण्याचे सांगतात. अडचण ही होती की तो बळी कोणत्या आशा माणसाचा द्यायचा होता ज्यामध्ये सर्व गुण म्हणजे सर्वगुणसंपन्न माणूस हवा. धर्मर्याला याची चिंता वाटत होती कारण तिथे फक्त तीनच जण असे होते, कृष्ण, अर्जुन आणि अरावन. त्यांच्यामध्ये कृष्ण आणि अर्जुन तर महाभारतातील युद्धाचे मुख्य होते ज्यांना धर्मर्या कधी सोडू शकत नव्हते. त्यांनी मग अरावन ला हे करायला सांगितले जे की त्याने आनंदात स्वीकारले. फामत त्याने एक अट घातली की त्याला असे करायच्या अगोदर लग्नाचे सुख घ्यायचे आहे. पण कोणताच राजा आपल्या मुलीचा विवाह त्यांच्याशी का करायला तयार झाला असता जे की काही दिवसात मरणार होते. हे सर्व पाहून भगवान श्रीकृष्णाने एका सुंदर मनमोहक स्त्रीचे रुप धारण केले आणि त्यांच्याशी विवाह केला.

हा सण 18 दिवस साजरा केला जातो. ते अरावनची कोतांडवार च्या रुपात पूजा करतात. तृतीयपंथी स्वताला मोहिनी समजून कोतांडवार सोबत लग्न करतात. मंदिरातील पंडित त्यांना धार्मिक रक्षा धागा बांधतात. लग्नाच्या एक दिवसानंतर ते विधवेचे रुप धारण करतात व अरावन च्या मृत्यूचे दुःख करतात. विधवा तृतीयपंथी पांढरी साडी घालून 10 दिवस लोकांची सेवा करतात.

कुवागमचा हा फेस्टिव्हल तृतीयपंथीसाठी खूप मोठा सण असतो. एकप्रकारे त्यांची जत्राच इथे भरते. इथे संपूर्ण भारतातून तृतीयपंथी सामील होतात. मजेशीर गोष्ट म्हणजे हा सण साजरा करण्यासाठी मागच्या काही वर्षात बाहेर देशातील तृतीयपंथी सुद्धा येत आहेत.

तृतीयपंथीयांच्या या सणाविषयी खासरे माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वेश्या वस्ती बुधवार पेठ बद्दल संपूर्ण माहिती

One Comment on “जगातील एकमेव व सर्वात मोठी तृतियपथींयाची जत्रा, कुवागम मध्ये घडतात अजबगजब गोष्टी…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *