लागीर झालं जी मालिकेला मोठं वळण, सर्वांचा लाडका विक्या देशासाठी बॉर्डरवर शहिद.. 0

मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या लागीर झाल जी या मालिकेतील अनेक कलाकार प्रथमच प्रेक्षकांच्या सामोरे आले आहेत तरीसुद्धा त्यांनी केलेल्या अभिनयामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील जवळपास सर्वच प्रमुख भूमिका प्रेक्षकांना खूप आवडले. मालिकेतील कलाकारांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

मालिकेतील लीडिंग अभिनेता म्हणून आज्या हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचले.अभिनेता नितीश चव्हाण ने ही भूमिका साकारली. शितली या नावाने संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारि शिवानी बावकर सुद्धा या मालिकेत अभिनयातून छाप पाडून गेली. विक्याची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल चव्हाण असो किंवा राहुल्याची भूमिका साकारणारा राहुल मगदूम असो, सर्वांनी सर्वोत्तम अभिनय करून मालिकेला यशाच्या शिखरावर पोहचवले. याशिवाय खकनायकाची भूमिका असलेला भैय्यासाहेब ज्याप्रमाणे किरण गायकवाड ने साकारला आहे तो ही प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

याशिवाय मालिकेतील जयडी आणि मामी हे पात्र तर प्रेक्षकांना फारच आवडले. लागिर…’मध्ये विद्या सावळे (मामी) आणि किरण ढाणे (जयडी) यांच्या नकारात्मक भूमिका असल्या तरी त्या अल्पावधितच प्रेक्षकांना आवडल्या होत्या. पण नुकतेच काही दिवसांपूर्वी मामी व जयडी यान मालिका सोडल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी याला प्रोडक्शन जबाबदार असल्याची टीका केली तर काहींनी जयडी आणि मामीवर सुद्धा टीका केली. मानधन मनासारखे मिळत नसल्यामुळे अनेक वेळा प्रोडक्शन हाऊसबरोबर चर्चा करूनही दोघींना रिस्पॉन्स ना मिळाल्याने मालिका सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अनेक वेळा अतिरिक्त केलेल्या कामाचा मोबदलाही त्यांना मिळाला नाही, असे विद्या म्हणाल्या.

मालिकेला पुन्हा एकदा मोठं वळण!

लागीर झालं जी मालिकेत आता विक्या नंतर अज्या सुद्धा देशसेवा करण्यासाठी बॉर्डरवर जाणार आहे. त्यामुळे सर्वाना याबाबतीत उत्सुकता आहे. पण मालिकेत याआधी एक मोठा उलटफेर होणार असल्याचे समोर आले आहे. अज्या बॉर्डरवर जाण्यापूर्वी विक्या म्हणजेच विक्रम राऊत मालिकेत शहिद होनार आहे. विक्या बॉर्डरवर युद्ध करताना शहीद होतो हे आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे. या भागाचे शुटींग पार पडले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *