फेसबुक पेजमूळे कसे वाचले बेवारस वृद्ध महिलेचे प्राण, नक्की वाचा…

सोशल मीडिया आपली जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. सध्या लोकं आपल्या दैनंदिन जीवनातील जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर घालवतात. परंतु याच इंटरनेटच्या मदतीने माणुसकीचे सुद्धा रक्षण केले जात आहे. सोशल मीडियामध्ये अशी ताकद आहे जी जगभरातील लोकांना जोडून ठेवते. नुकतेच एक सोशल मीडियाच्या ताकतीचे एक उत्तम उदाहरन बघायला मिळाले आहे. आंध्र प्रदेशातील राजमंडरी शहराच्या नावाने पेज चालवणाऱ्या आदित्य वैभव नामक युवकाने रोडवर बेसहारा पडलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात मदत केली आहे. रोडवर अनाथ आजारी पडलेल्या व्यक्तीची मदत करण्यासाठी त्याने आपल्या फेसबुक पेजची मदत घेतली आणि बघता बघता खूप लोकांनी मदतीचा हाथ पुढे केला.

आदित्य ने सांगितले की त्याचे वडील श्री राजा गोपाल यांनी रस्त्यावर एक अनाथ वृद्ध व्यक्तीला पाहिले होते, ज्याचे वय जवळपास 60 वर्षे होते. तिथल्या स्थानिक लोकांच्या मते तो वृद्ध सिम्हाचलन गोदावरी गुट्टू रोडवर पाच वर्षांपासून राहत होता. परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष नाही दिले. एकेदिवशी त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे तो तिथेच फुटपाथवर पडून राहिला. जखम एवढी भयंकर होती की त्याचे उठणे बसने बंद झाले. आदित्य च्या वडिलांनी त्याच्या देखभालीसाठी एका नर्सला बोलावले. पण यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होणे अशक्य असल्याचे दिसत होते.

आदित्यने स्थानिक नेत्यांना सुद्धा मदतीसाठी संपर्क केला पण त्याला कुठूनच काही मदत नाही मिळाली. त्यानंतर त्याने आपल्या फेसबुक पेजवर या व्यक्तीची मदत करण्यासाठी आवाहन करणारी पोस्ट लिहिली. त्यानंतर काहीच वेळात त्यांना भरपूर मेसेज येऊ लागले. लोकांनी सिम्हाचलनची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेथील एक स्थानिक नेते कांडूला दुर्गेश यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन सिम्हाचलन याना दवाखान्यात भरती केले. कांडूला हे आमदार सुद्धा राहिलेले आहेत आणि ते सर्वाथी नावाने एक सामाजिक संघटना सुद्धा चालवतात. आता सिम्हाचलनच्या तब्येतीत खुप सुधारणा झाली आहे. त्यांच्या जखमा सुद्धा आता हळू हळू बऱ्या होत आहेत.

सिम्हाचलन याना वेळेवर दवाखान्यात नेले नसते तर त्यांचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू झाला असता. परंतु एका व्यक्तीच्या कल्पकतेने आणि विचाराने कोणाचे तरी प्राण वाचवले आहेत. त्यांना पुर्णपणे बरे होण्यास बराच वेळ लागेल पण दवाखान्यात असल्याने सध्या त्या धोक्यातून तरी बाहेर आहेत. आदित्य ने सांगितले की सोशल मीडियाचा असा उपयोग आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे, तेव्हाच माणुसकी जिवंत राहील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
मागच्या 45 वर्षांपासून पेशंटकडून फक्त 5 रुपये घेऊन उपचार करणारा अवलिया डॉक्टर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *