एकाच मोबाईलमध्ये तीन व्हाट्सएप वापरता येतील असा हा नवा स्मार्टफोन लाँच…

व्हाट्सएपच्या वापरकर्त्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. कारण जिओनी कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये व्हाट्सएप क्लोन नावाचे फिचर दिले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना एकाच वेळी तीन व्हाट्सएप अकाउंट वापरणे शक्य होणार आहे. जिओनी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात हा बजेट स्मार्टफोन घेऊन आली आहे. जिओनी आपल्या ग्राहकांसाठी हा आकर्षक फोन घेऊन आली आहे. जिओनीने नवीन जिओनी S10 लाईट हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. यावर्षी मे महिन्यात जिओनी S10 हा मोबाईल चीनमध्ये लाँच केला होता. यापूर्वी आलेल्या जिओनी S10C मध्ये थोडेफार बदल करत हा नवीन फोन बाजारात आला आहे. या फोनची अजून एक विशेषतः म्हणजे या फोनमध्ये सेल्फी लव्हर्स साठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा फ्लॅशसोबत दिला गेलाय. कॅमेऱ्यामुळे सेल्फी प्रेमींमध्ये या स्मार्टफोनची प्रचंड उत्सुकता होती.

महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले व्हाट्सएप क्लोन फिचर पहिल्यांदाच स्मार्टफोन प्रेमींना भेटणार आहे. यामुळे एकाचवेळी तीन व्हाट्सएप अकाउंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.

जिओनी S10 लाईट ची किंमत-

जिओनी S10 लाईट या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात 15 हजार 999 रुपये असणार आहे. आजपासूनच हा स्मार्टफोन भारतीयांसाठी दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. सोनेरी आणि काळ्या रंगामध्ये हा नवीन स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.

जिओनी S10 लाईट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन-

जिओनी S10 लाईट मध्ये 5.2 इंचचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1.4 गिगाहर्ट स्नॅपड्रॅगन 427 प्रोसेसर देण्यात आले आहे. सोबतच फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे.

फोटोग्राफीची आवड असणाऱ्यासाठी यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर ऑटो फोकस कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा सुद्धा 16 मेगापिक्सल देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी साठी 4G VoLte, वायफाय 802.11 बी/जी/एन, ब्लुटूथ v4.0, जीपीएस/ ए जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. सोबतच फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन मध्ये देण्यात आलं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सेकंड हँड मोबाईल विकून तो करतोय वर्षाला 150 कोटींची उलाढाल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *