बापरे प्रिया वरीअर विरोधात पोलीस तक्रार.. वाचा काय आहे कारण 0

लाखो तरुणाच्या ह्रद्ययाचा ठोका चुकवणाऱ्या प्रिया वरीअरने इंटरनेटवर दोन दिवस धुमाकूळ घातला. मागचे 2 दिवस इंटरनेटवर सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय बनलेले आहे तिचे नुकतेच रिलीज झालेले मल्याळम गाणे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड वायरल झालेला आहे. या गाण्यातील मुलीने आपल्या हटके एक्सप्रेशनने अनेक लोकांना भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ रिलीज होऊन काही तासच उलटले असताना या व्हिडीओला करोडो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे.

परंतु प्रिया वारियरच्या विरोधात आज हैद्राबाद येथील फलकनुमा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या मागे कारण हि भयंकर आहे. हि तक्रार मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यांच्या मते प्रियाने मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. याचे स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले आहे कि, प्रियाचा सिनेमा ओरु आदर लव्ह या सिनेमातील गाणे चुकीच्या वाक्याच्या उपयोग करण्यात आला आहे. हे गाणे माणिक्य मालार्य पूर्वी ह्याने लिहलेले आहे. ज्यामध्ये मुस्लीम समाजाचे मुहम्मद पैगंबर आणि त्यांची पत्नी खादिजाह बिवी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधाने वापरली आहेत. परंतु सिनेमाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी हा दावा फेटाळून लावलेला आहे.

मोहमद अबुद्ल मुक़िक्द खान व काही मुस्लीम तरुणा मार्फत कलम २९५अ अंतर्गत प्रियाच्या या गाण्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. यावर पोलीस अधिकार्याने तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे. या गाण्यावर बंदी आणण्याची या युवकामार्फत मागणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या तरुणांना मल्याळम भाषा येत नसून त्यांनी सांगण्यावरून हि क्म्प्लेंत नोंद केल्याचे सांगण्यात येत आहे. फिल्म निर्माते सांगत आहे कि हे ओरीजनल गाणे १९७० साली आले असून परत या सिनेमात वापरण्यात आले आहे. या मध्ये काहीही आक्षेपर्ह नाही आहे. बघूया पुढे काय होते खासरेवर

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *