३.५ कोटी रुपयाच्या कारमध्ये फिरणारा शेतकरी, वाचा खासरे माहीती… 0

व्हाट्सएप अन फेसबुकवर सध्या एक फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे. हा फोटो आहे एका शेतकऱ्याचा. हा साधासुधा शेतकरी नाहीये तर हा चक्क 3.5 कोटींच्या गाडीत फिरणारा शेतकरी आहे. सोशल मीडियावर सध्या रोल्स रॉयस या महागड्या कार सोबत उभा राहिलेल्या एका शेतकऱ्याचा फोटो प्रचंड वायरल झाला आहे. जाणून घेऊया कोण हा शेतकरी खासरेवर…

सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले हे व्यक्ती आहेत पुण्यातील कोंढापुरी गावचे शेतकरी आणि उद्योजक विजय गायकवाड. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावचे ते एक अत्यंत प्रगतशील शेतकरी आहेत. विजय गायकवाड यांच्या यशाच्या मागे त्यांच्या वडिलांचे विशेष कार्य आहे. त्यांचे वडील काही वर्षांपूर्वी पुण्यात व्यवसायासाठी गेले. तिथे त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसला. कोंढापुरीच्या एका शेतकऱ्याने पुण्यात येऊन व्यवसायात भरारी घेतली होती. माणिकराव गायकवाड यांनी व्यवसायात घेतलेली भरारी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभराटी साठी कारणीभूत ठरली.

पुणे-नगर रस्त्यावर असलेले हे गाव 20-25 वर्षांपूर्वी फक्त माळराने आणि कोरडवाहू शेतीचे गाव होते. पण इथल्या लोकांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता जवळच असलेल्या पुणे शहरात व्यवसायात पाय रोवले. शेतीबरोबर व्यवसाय करून ही गाव इतरांसाठी प्रेरणा बनले आहे. अनेक शेतकऱ्यांचे स्वतंत्र भव्य बंगले, बंगल्यापुढे चारचाकी गाड्या असा थाट इथल्या शेतकऱ्यांचा आहे.

विजय गायकवाड यांनी आपल्या व्यवसाय आणि शेतीच्या बळावर 3.5 कोटींची रोल्स रॉयस ही भव्य कार घेतली त्यावेळी ते पूजा करण्यासाठी गावात आले होते. पूजेसाठी त्यांनी पारंपरिक शेतकऱ्याचा पायजमा आणि शर्ट घातला होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पूजा करतानाचेच आहेत. विजय गायकवाड यांच्या या गाडीमुळे मात्र कोंढापुर गाव आणि त्यांचे कुटुंबीय चांगलेच चर्चेत आले आहे.

कशाची करतात शेती-

विजय गायकवाड यांच्या यशात महत्वाची भूमिका राहिली आहे ते करत असलेल्या नैसर्गिक शेतीची. नैसर्गिक शेतीमुळेच विजय गायकवाड हे एवढ्या महागड्या गाड्या घेण्यासाठी आणि त्या वापरण्यासाठी सक्षम बनले आहेत. इतर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती करण्यासाठी ते प्रेरणास्रोत बनले आहेत. विजय गायकवाड यांच्याकडे रोल्स रॉयसशिवाय ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज या महागड्या कारसुद्धा आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *