शेतकऱ्याला चावला साप, रागात शेतकरीही चावला सापाला, पुढे जे झाले ते धक्कादायक आहे… 0

सध्या उत्तर प्रदेशात घडलेल्या एक घटनेची सर्वत्र खूप चर्चा होत आहे. घटनाही तशी मजेदार आहे. झालं असं की एक शेतकरी आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेला. तिथे त्याला एका सापाने चावले. सापाने चावल्याने तो शेतकरी घाबरला आणि खूप रागावला. त्याने तो राग त्या सापावर असा काही काढला की त्याने त्या सापाला जिवंत चावलं ज्यामुळं सापाचा मृत्यू झाला. पण साप चावल्याने त्या शेतकऱ्याला मात्र काहीच झाले नाही. थोडया वेळानंतर तो शेतकरी मात्र पूर्णपणे बरा झाला.

वेगवेगळ्या चॅनेलवर या घटनेविषयी वेगवेगळी माहिती देण्यात आली. सर्वप्रथम सर्व चॅनेलवर उत्तरप्रदेश मधील सोनेलाल नामक या शेतकऱ्याला सापाने चावल्याची माहिती दिली गेली. नंतर काही चॅनलवर सांगितले गेले की या शेतकऱ्याने सापाचा फणा चावला तर काहींनी सांगितले की या शेतकऱ्याने पूर्ण सापाच चावून टाकला. तर कुठे सांगण्यात आले की या शेतकऱ्यामध्ये रोग प्रतिकारक क्षमता खूप आहे. त्यामुळे साप चावून त्याला थोडाही फरक पडला नाही. पण ही सर्व माहिती कशी खोटी आहे जाणून घेऊया खासरेवर…

सोनेलालने चावलेल्या सापाचे जे फोटो समोर आले आहेत त्यामध्ये तो साप हा एक अजगर असल्याचे दिसते, जो को बिनविषारी आहे. सोनेलाल यांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की त्यांनी सापाचा मागच्या बाजूचा थोडाच भाग चावला होता. पण सोशल मीडियावर पसरवले गेले की सोनेलाल यांना साप चावल्याने ते विष त्यांच्या शरीरात पसरले त्यानंतर ते सापाला चावल्याने सापाच्या शरीरात गेले आणि साप मेला.

सोनेलाल यांना साप चावल्यानंतर फक्त 3 तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. या गोष्टीचे दोन पुरावे आहेत. पहिला म्हणजे अजगराचा फोटो आणि दुसरा डॉक्टरांच स्टेटमेंट ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की सोनेलाल यांना चावलेल्या अजगराचे विष त्यांच्या शरीरात गेलेच नाही.

सोशल मीडियावर अशा प्रकारे अनेक अफवा पसरवल्या जातात. ही माहिती शेअर करून या घटनेची सत्यता लोकांपर्यंत पोहचवा…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *