जाणून घ्या का असते शीतपेयाच्या बॉटलच्या झाकणावर हि रबरची पट्टी…

आपल्या दैनदिन जीवनात आपण अनेक गोष्टी कडे दुर्लक्ष करतो. काही काही छोट्या गोष्टी फार मोठे काम करतात परंतु तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहितीच नसते. त्यामुळे आज खासरेवर आम्ही असाच विषय घेतला दैनंदिन आयुष्यातील काही अश्या गोष्टी ज्या लाख मोलाचे काम करतात.

रोजच्या आयुष्यात प्लास्टिक बॉटल हा भाग बनलेल्या आहेत. अनेक बॉटल आपल्या हातातून दिवसभरात जातात परंतु आपण कधी बॉटलच्या झाकणा कडे लक्ष दिले आहेत का ? मी शर्त लावून सांगतो कि ९०% लोक हे झाकणाकडे लक्ष देतच नाही. जे लक्ष देतात त्यांना या मध्ये रबरची गोल पट्टी आढळत असेल. परंतु त्यांनीही कधीच विचार केला नाही कि का राहते हि रबरची पट्टी ह्या झाकणात. शीतपेयाच्या बॉटलमध्ये हमखास हि पट्टी असते. राहण्याचे कारण हि तसे महत्वाचे आहे हि छोटीशी पट्टी खूप मोठे काम करते.

पट्टीच्या मागील कारण असे आहे कि, तुमच्या डोक्यात हा विचार आलाच असेल कि बॉटल लिक न व्हावी या करिता हि रबरची पट्टी असेल. अंशतः हे बरोबर हि आहे बॉटल लिक न व्हावी म्हणून हि पट्टी लावली जाते परंतु या पेक्षा हि वेगळे कारण आहे. शीतपेयाच्या बॉटलमध्ये कार्बन असतो हा वायू शीतपेयातून निघून गेला तर त्याची चव चालली जाते त्यामुळे हा वायू यामध्ये राहणे आवश्यक आहे. सध्या काचाच्या बॉटलमध्ये हा वायू बाहेर जाऊ शकत नाही कारण झाकण त्या पद्धतीने बनविले जाते. परंतु प्लास्टिकच्या बॉटलवर साधे झाकण राहिल्यामुळे या वायूकरिता बॉटल सील असणे आवश्यक आहे. त्यामुळेच एक रबरची पट्टी लावून हा वायू बाहेर निघण्यास रोखले जाते. त्यामुळे प्रत्येक शीतपेयाच्या बॉटलच्या झाकणावर हि रबरची पट्टी ठेवली जाते.

एक रबरची पट्टी तुम्हाला अश्या प्रकारे शीतपेयाची चव राखण्यास मदत करते. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *