चला हवा येऊ द्या येतोय परत तुमच्या भेटीला… वाचा खासरे

‘कसे आहात मंडळी, हसताय ना.. हसायलाच पाहिजे..’ असे म्हणत गेली तीन वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ची टीम संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करत आलीय. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धीचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांतच घराघरांत लोकप्रिय झाला.

साडे तीन वर्षे प्रेक्षकांना खळवळून हसवणारा मराठीतील सुपरहीट कार्यक्रम’चला हवा येऊ द्या’पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.होय,अगदी नव्या ढंगात आणि नव्या जोमात हा कार्यक्रम पुन्हा एकदा झी टीव्हीच्या पडद्यावर अवतरून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या तयारीत आहे.खुद्द कुशल बद्रीके आणि श्रेया बुगडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एका व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारीमध्ये शो सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

अतिशय कमी वेळेत निलेश साबळे आणि त्याच्या टीमने चला हवा येऊ द्या या क्रार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.कपिल शर्माच्या प्रसिद्ध कॉमेडी शो ला टक्कर देत’चला हवा येऊ द्या’ने अल्पावधीतच मराठीतील टीआरपीचा उच्चांक गाठला होता.त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात शेवटचा भाग प्रसारित झाल्यानंतर काही महिने शो बंद राहिल्यानंतर हा शो जानेवारी महिन्यात नव्या रंगात रुपात येणार आहे

‘चला हवा येऊ द्या’ची टीआरपी मुळे बॉलीवुडमधील शाहरूख खान,सलमान खान,अक्षय कुमार,अजय देवगण यांच्यासारख्या सुपरस्टार अभिनेत्यांनाही या शोने भुरळ घातली. तसेच प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही या कार्यक्रमात हिंदी कार्यक्रमाला डावलून हजेरी लावल्याने चला हवा येऊ द्या चे महत्व हिंदी माध्यमातून रंगले.त्यामुळे आपल्या सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी बॉलीवुडमधील अनेक सेलेब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली होती.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
रितेशला बायकोकडून बर्थडे गिफ्ट मिळाली टेस्ला सुपरकार,संपूर्ण भारतातील दुसरी टेस्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *