प्रकाश आंबेडकर यांना एका पत्रकाराचे खुले पत्र..

बाळासाहेब,
नमस्कार (करण्याची इच्छा नाही, पण संस्कार आड येतात.)
तसे आपण एकदाच भेटलो. आंबेडकर भवनमध्ये. तुम्ही जन्मदाखल्यावरून जातीचा उल्लेख काढून टाकण्याची मागणी केलीत आणि हा क्रांतिकारक विचार समजून घेण्यासाठी मी आतुर झालो. माध्यमकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ता या दोन पातळ्यांवर मला तुमच्या भूमिकेचं खूप कौतुक वाटलं होतं तेव्हा. एका क्षणासाठी वाटलं की महामानव डॉ. बाबासाहेबांचा वारसा तुम्ही पुढे नेणार, जातिविरहित समाज उभा करणार. आणि म्हणूनच रात्री उशिरापर्यंत थांबून तुमची मुलाखत केली. सा. विवेकसारख्या साप्ताहिकाने तुमची दखल घेतली होती याचं तुम्हाला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. पुढे दहा-पंधरा दिवसांतच तुम्ही तो विषय बासनात बांधून टाकलात आणि नवा विषय हाती घेतलात. सातत्याने नवे नवे विषय घेऊन येणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं तुम्हाला बहुधा आवडत असावं.

कधी संघसमाप्तीची घोषणा तुम्ही केलीत, तर कधी संविधान जाळण्याची इच्छा व्यक्त केलीत. मी मात्र तुमच्याकडे पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचा वारस या दृष्टीने पाहत राहिलो.
मात्र तुम्ही ऑक्टोबर २०१७मध्ये एका कार्यक्रमात म्हणालात, “नक्षलवादी देशाचे मित्र आहेत.” देशाचे आहेत की नाही ते माहीत नाही, पण तुमचे मित्र आहेत, हे मात्र तुम्ही वारंवार सिद्ध केलं आहे. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर तर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता तर तपास यंत्रणेने तुमचा माओवादाशी असलेला संबंध अधोरेखित केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साम्यवादापासून दूर राहण्याचा सल्ला देऊन ठेवला आहे. त्याचबरोबर संविधानाच्या माध्यमातून समतेची हमी दिली. तुम्ही मात्र बाबासाहेबांची वाट सोडून साम्यवाद्यांना अपेक्षित असणाऱ्या अराजकाचे वाहक होत असल्याचं चित्र समोर येतं आहे. तुमची राजकीय, सामाजिक वाटचाल आणि त्यातून तुम्ही निर्माण केलेलं शत्रू-मित्र समीकरण याविषयी मला बोलण्याचा अधिकार नाही.
पण तुम्ही आणि नक्षलवादी यांच्या संबंधाविषयी माध्यमकर्मी बंधूने विचारलेल्या प्रश्नासंबंधीचा तुमचा व्यवहार याविषयी मला बोलण्याचा नक्कीच अधिकार आहे आणि त्या अधिकारात मी तूमचा जाहीर धिक्कार करतो. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार मिळालेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यालाच तुम्ही धमकावलं आहे आणि म्हणून तुमचा निषेध. डॉ.आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तुम्ही मान्य करत नसाल. पण माझी त्याच्यावर नितांत श्रद्धा आहे. तुम्ही माझ्या श्रद्धेला ठेच पोहोचवलीत, म्हणून तुमचा धिक्कार. माझ्यासारख्याच एका माध्यमकर्मीशी तुम्ही अर्वाच्य भाषेत बोललात, धमकी दिलीत म्हणून तुमचा त्रिवार धिक्कार.
बाळासाहेब,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आणि समाजजीवनाला सकारात्मक वळण लावू पाहणारे चिंतक म्हणून आजवर तुमच्याबद्दल अपार आदरभाव होता. पण… बाळासाहेब, तुम्ही तुमची पत जगाला दाखवून दिलीत आणि माझ्याही मनातून उतरलात. तुमचा मार्ग तुम्ही खूप आधीच निवडला असाल, मलाच तो उशिरा कळला असावा. तुम्ही तुमच्या मार्गाने जा. मी बाबासाहेबांच्या विचारप्रकाशात पुढची वाटचाल करेन.
बाळासाहेब,
हा शेवटचा
जय भीम.

रवींद्र गोळे

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

नरेंद्र मोदीजींना एका भारतीय नागरिकाचे खुले पत्र लिहून चॅलेंज ! पत्र व्हायरल..

प्रिय मोदीजी,
तुम्ही विराट कोहलीचे फिटनेसचे आव्हान स्वीकारले. तुम्हाला अशा खेळकर मूड मध्ये पाहून आनंद झाला. कदाचित तुमचा फिटनेसचा व्हिडीओ पाहून या देशातील लोक त्या पासून बोध घेऊन आरोग्याच्या दृष्टीने जागरूक होतील.
पण कसे आहे मोदीजी की या फिटनेस सारख्या गोष्टींपेक्षा पण खूप गंभीर आणि महत्वाच्या गोष्टी आपल्या देशात आहेत त्याचे आव्हान स्वीकारून तुम्ही तशी वाटचाल केली तर देशातील जनतेचे जगणे सुसह्य होईल. तुम्हाला आव्हानेच स्वीकारायची आहेत तर-
1. हल्लीच वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करायचे आव्हान स्वीकारा. पेट्रोल आणि डिझेल वर इतके कर का आहेत आणि ते कसे कमी करता येतील ते बघा (फक्त माहितीसाठी सांगतो, दात टोकरून कधी पोट भरत नसते. तसेच कर आकारून देशाची तिजोरी भरणार नाहीय).

2. तुम्ही तुमची शैक्षणिक पदवी दाखवण्याचे आव्हान स्वीकारा आणि तुमच्या पदवीबद्दल जनमाणसांत संशय आहे तो दूर करा.
3. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 2 कोटी रोजगाराचे जे आश्वासन दिले जिथे तुम्ही कसेबसे 2 लाख रोजगार निर्माण केले, ते 2 कोटी रोजगाराचे आव्हान स्वीकारा आणि देशातील तरुणाईच्या हाताला काम द्या.
4. एक पत्रकार परिषद घ्या आणि नोटबंदी आणि जीएसटीच्या यशा-अपयशाबद्दल बोला.
5. भारत देशाचे पंतप्रधान असूनही तुम्ही जास्तीत जास्त वेळ निवडणुकीच्या प्रचारात घालवता. अशा प्रचार सभेत धादांत खोटं न बोलण्याचं आव्हान स्वीकारा. सोबतच जुन्या सरकारांचे अपयश न दाखवता स्वतः काय केले यावरच फक्त भाषण द्यायचे आव्हान स्वीकारा. (एकदा जनतेला कळू देत तरी तुम्ही काय काम केले आणि कशाकशांत तुम्हाला यश मिळाले).

6. तुम्ही एका धर्मनिरपेक्ष आणि प्राचीन परंपरा असलेल्या भारतासारख्या महान देशाचे पंतप्रधान आहात हे लक्षात ठेवून धर्मविरहीत राजकारण करण्याचे आव्हान स्वीकारा. देशाच्या प्रत्येक घटकाला देशात सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करायचे आव्हान स्वीकारा.
7. ज्या रामाचे नाव घेऊन राजकारण करता त्या रामाचा आदर्श घेऊन जशोदाबेनना पत्नी म्हणून देशासमोर स्वीकारायचे आव्हान घ्या.

मी सांगतोय म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारावे असा कुणी महान माणूस नाहीय मी. पण मी जे मुद्दे मांडले आहेत ते देशातल्या प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनातले आहेत. मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात मांडत आहे. ही आव्हाने जर तुम्ही स्वीकारली तर नक्कीच या देशाच्या नागरिकांचे जगणे सुसह्य होईल.

आपलाच,
डॉ. अजित धनवडे
एक जागरूक भारतीय नागरिक

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणारा डुप्लिकेट विराट कोहली कोण आहे माहीती आहे का?

निवडणूक म्हणलं की मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार हा महत्वाचा असतो. प्रचार चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी उमेदवार विविध प्रकारे नवनवीन संकल्पना वापरून प्रयत्न करत असतो. निवडणुकीच्या मैदानात उभं राहिल्यानंतर मतदारांना कसं अपल्याकडे आकर्षित करता येईल यावर उमेदवार भर देतात. ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी सेलेब्रिटीना बोलावण्याचे खूप आकर्षण असते. मोठमोठे सेलेब्रिटी प्रचारासाठी बोलावले जातात. सेलेब्रिटी ठीक आहे पण विराट कोहली सारखा स्टार खेळाडू जर ग्रामपंचायतच्या प्रचाराला आला तर? होय पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत पॅनलच्या प्रचारासाठी चक्क विराट कोहली आला आहे. सर्व देशभरात याची मागील 2 दिवसांपासून चर्चा होत आहे. पण प्रचाराला आलेला हा कोहली चक्क विराट कोहलीचा हुबेहूब ड्युप्लिकेट आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीतील रामलिंग ग्रामविकास पॅनलने प्रचारात आघाडी घेत विराट कोहलीला प्रचाराला आणणार असल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रामलिंग ग्रामविकास पॅनलच्या पोस्टरवर प्रचार रॅलीचं मुख्य आकर्षण म्हणून खऱ्याखुऱ्या विराट कोहलीचं नाव आणि फोटो या बॅनरवर छापण्यात आला होता. त्यामुळे सगळेच जण चक्रावून गेले होते. पण त्याची पूर्तता करत शिवलिंग पॅनलने प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली म्हणजेच विराटच्या डुप्लिकेटला प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे.

रामलिंग ग्रामविकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करताना दिसत आहे. गावामध्ये त्याची मोठी रॅली काढण्यात आली होती.

आता, ड्युप्लिकेट विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी, विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याच्या सोबतचे सेल्फी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कोण आहे हा डुप्लिकेट विराट कोहली?

हा डुप्लिकेट विराट कोहली देहू गावातील एक सामान्य कुटुंबातील युवक आहे. क्रिकेटची आवड असलेल्या या तरुणाचं नाव आहे सौरभ गाडे. सौरभ गाडेला क्रिकेटशिवाय गाण्याची देखील आवड आहे. त्याच्या विराट कोहली सारखं दिसण्याने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. सौरभ गाडे आता पुणे जिल्ह्यात डुप्लिकेट विराट कोहली म्हणून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. लोकही त्याला बघण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी करत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री एच डि कुमारस्वामी यांच्या बद्दल माहिती नसलेल्या १० गोष्टी..

कर्नाटकमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात भाजपचे सरकार पडले आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. भाजप सरकार पडल्यामुळे आता कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जनता दल सेक्युलरचे एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेतील. खासरेवर जाणून घेऊया कुमारस्वामी यांच्याविषयी माहिती नसलेल्या 10 गोष्टी…

1. हरदनहाली येथे जन्मलेले एच डी कुमारस्वामी हे भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पुत्र आहेत.

2. एच डी कुमारस्वामी हे राजकारणात येण्यापूर्वी नावाजलेले फिल्म निर्माते होते.

3. एच डी कुमारस्वामी यांनी फेब्रुवारी 2006 ते नोव्हेंबर 2007 मध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री पददेखील भूषवले आहे.

4. एच डी कुमारस्वामी हे कर्नाटक राज्याचे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आहेत.

5. कुमारस्वामीना त्यांचे कार्यकर्ते कुमारअण्णा म्हणून ओळखतात. कुमारस्वामी यांनी बंगळुरूच्या नेशनल कॉलेज मधून आपले डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

6. कुमारस्वामी यांनी 1996 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

7. एच डी कुमारस्वामी यांनी त्यांच्या 22 वर्षाच्या राजकिय कारकिर्दीत 9 वेळा निवडणूका लढवल्या असून त्यामध्ये 6 वेळा ते विजयी झाले आहेत.

8. यावेळी त्यांनी 2 ठिकाणावरून निवडणूक लढवली होती ज्यामध्ये चांनापाटना आणि रमनगरा मतदारसंघाचा समावेश होता. त्यांनी दोन्ही ठिकाणाहून 20-22 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

9. एच डी कुमारस्वामी यांचे दोन लग्न झालेले असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अनिता आणि दुसऱ्या पत्नीचे नाव राधिका आहे. राधिका या कन्नडच्या अभिनेत्री आहेत. राधिका या कुमारस्वामी यांच्यापेक्षा तब्बल 29 वर्षांनी लहान आहेत.

10. काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर कुमारस्वामी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कर्नाटकचा जीडीपी सर्वोच स्थानावर होता. 2007 मध्ये भाजप सोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी तुम्ही बघितली का?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला तर भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल यांच्याकडे केली होती. राज्यपालांनी ही मागणी मान्य करत आज बीएस येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. जेडीएस कडून मुख्यमंत्री पदासाठी एच डी कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. कुमारस्वामी यांची संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्याबद्दल व8विविध माहिती आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कोण आहेत एच डी कुमारस्वामी यांच्या पत्नी जाणून घेऊया खासरेवर..

हरदनहाली मध्ये जन्मलेले एच डी कुमारस्वामी हे भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी यांचे दोन लग्न झालेले असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अनिता आहे. अनिता आणि कुमारस्वामी यांना निखिल नावाचा मुलगा आहे जो कन्नड फिल्म स्टार आहे.

कुमारस्वामी यांचे ज्या पत्नीसोबत फोटो व्हायरल झाले आहेत त्या त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहेत. कुमारस्वामी यांनी 2006 मध्ये कन्नड अभिनेत्री राधिका सोबत दुसरं लग्न केलं होतं.

राधिकाने आपल्या अभिनयास सुरुवात 2002 साली कन्नड सिनेमा नीला मेघा शामा मधून केली. तेव्हा ती फक्त 9 वी पास झाली होती. 2000 च्या सुरुवातीला राधिका कन्नड फिल्म इंडस्ट्री मधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. राधिका ही अभिनेत्री सोबत प्रोड्युसर देखील आहे. राधिका आणि कुमारस्वामी यांचा विवाह कातील मधील दुर्गा परमेश्वरी मंदिरात 26 नोव्हेंबर 2000 ला झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हे होते बाळासाहेबांचे शेवटचे शब्द…

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बाळासाहेब ठाकरे यांची धगधगता निखारा म्हणून ओळख होती. त्यांना आपण शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट म्हणूनही ओळखतो. बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मातोश्रीवर अखेरचा श्वास घेतला. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी निधन झाले होते. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

बाळासाहेब निधन होण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द त्यांची सेवा करणारा थापा याच्याशी बोलले होते. थापा हा एकप्रकारे बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईतच होता. 27 वर्षांपूर्वी मुंबईत आलेला थापा हे भांडूपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के टी थापा यांच्यामुळे बाळासाहेबांचे सेवक म्हणून रुजू झाले. थापा हा बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबतच होता. बाळासाहेब त्याला पुत्रवत प्रेम करायचे. मीनाताई ठाकरेनंतर थापा यानेच बाळासाहेबांची काळजी घेतली. शेवटच्या श्वासापर्यंत थापा हा बाळासाहेबांची सावली बनून राहिला

बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या दिवसात आजाराने घेरलं होतं. त्यांच्या निधनापूर्वी बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. एक दिवस त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने त्यांना एक खास इंजेक्शन दिले. ज्यामुळे त्यांची प्रकृती थोडी सुधारायला लागली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आशेचा किरण तयार झाला होता.

थापा बाळासाहेबांसोबतच होता. बाळासाहेबांनो त्यांचे शेवटचे शब्द थापालाच बोलले आणि त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली. बाळासाहेब थापाला नाजूक आवाजात म्हणाले, ‘ थापा मी आरती करायला जातोय’. आणि हेच शब्द बाळासाहेबांचे शेवटचे शब्द ठरले. यानंतरच्या 48 तासातच बाळासाहेबांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

थापा बाळासाहेबांच्या गोळ्याऔषधी पासून रोजचे सर्व काम करत असे. थापा हा असा माणूस होता ज्याला बाळासाहेबांच्या खोलीत कधीही प्रवेशास परवानगी होती. तो ठाकरे कुटुंबियांना कुटूंबातील एक सदस्य असल्या सारखाच होता. बाळासाहेब यांनी शेवटची इच्छाही उद्धव याना सांगताना थापाला कायम मातोश्रीवर ठेवण्यास सांगितले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सर्वत्र चर्चा फक्त स्मिता दीदी आर आर पाटील यांच्या लग्नपत्रिकेचीच..

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर आर (आबा) पाटील यांची राजकीय वारसदार असलेली त्यांची कन्या स्मिता पाटील या साखरपुडा पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी झाला आहे. या साखरपुडा समारंभाला मोठी गर्दी झाली होती. स्मिता पाटील आणि आनंद थोरात हे १ मे २०१८ ला विवाहबंधनात अडकणार आहेत. हे लग्न जमविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता.

हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात मगरपट्टा येथे येत्या १ मे ला पार पडेल अशी थोरात यांनी माहिती दिली आहे. आणि विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याचे संपूर्ण देखरेख शरद पवार करणार आहेत त्यामुळे या विवाह सोहळ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परंतु हे लग्न चर्चेत आले आहे सध्या लग्नपत्रिके मुळे अगदी साधी लग्नपत्रिका या लग्नासाठी छापण्यात आली आहे.

ही लग्नपत्रिका एखाद्या सामान्य कुटुंबांतील विवाह सोहळ्याची असावी असे पाहताक्षणीच वाटते. पण हातात घेतल्यानंतर ती माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांची कन्या स्मिता हिच्या विवाह सोहळ्याची असल्याचे लक्षात येते. पत्रिकेवरून नजर फिरत असताना वाचणा-यांच्या डोळ्यासमोर आबांचे साधेपण चटकन तरळून जाते. आबांच्या साधेपणाला साजेशी वाटावी अशीच ही निमंत्रण पत्रिकाही साधीच छापण्यात आली आहे.

येत्या मे महिन्यात स्मिता व आनंद यांच्या लग्नाचा बार पुण्यात उडणार आहे. हा विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटी या ठिकाणी होणार आहे. पत्रिकेत निमंत्रक म्हणून कै. आर. आर. आबांच्या आई भगिरथी, पत्नी आमदार सुमनताई, बंधू सुरेश इत्यादींची नावे आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पवार यांचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्र आबाला चाहत होता आणि स्मितामध्ये आबालाच बघतात चाहते. हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
बघा स्मिता दीदी आर आर पाटील यांच्या साखरपुड्याचा विडीओ खासरेवर..

देवेद्र फडणवीस यांचा नविन व्हिडीओ बनलाय ट्रोलचा विषय.. हे व्हिडीओ बघून पोट दुखेपर्यत हससाल…

मुंबई आणि राज्यातील नद्यांची अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडीओ द्वारे लोकांना नदी वाचवण्यासाठी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राज्याचे पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा दिसत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त सुद्धा या व्हिडीओमध्ये मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला नदी वाचवण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी संदेश देताना दिसत आहेत. हे गाणे अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायले आहे.

या गाण्यातील जास्तीत जास्त भाग हा बंगल्यात शूट करण्यात आला आहे. व्हिडीओ मध्ये लहान मुलं, युवक-युवती, पोलीस कर्मचारी इत्यादी जण नदी वाचचा हा संदेश देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांनी नदी वाचवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना या गण्यावरून खूप ट्रोल करण्यात येत आहे. काल सोशल मीडियावर या गाण्याने एका वेगळ्याच कारणाने धुमाकूळ घातला होता. ते म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा व्हिडीओ एडिट करून नेटीझन्सनी त्याला वेगवेगळे गाणे जोडले. काल दिवसभर हे ट्रोल व्हिडीओ चांगलेच ट्रेंडिंगला होते. ययापैकी काही गाणे तर एवढे व्यवस्थित एडिट करण्यात आले होते की ते पाहताना असे वाटते की खरच मुख्यमंत्री त्या गाण्यावर अभिनय तर करत नाहीयेत ना..

काही इंग्लिश गाणे तर काही जुने मराठी गाणे घेऊन एडिट केलेले हे व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही स्वताला हसण्यापासून आवरू शकणार नाहीत. चला तर खासरेवर बघूया काही निवडक व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जाणून घ्या उदयनराजे भोसले यांच्याकडे किती आहे एकूण संपत्ती…

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचा एक वेगळाच अंदाज आहे. त्यांना प्रेमाने लोक महाराज साहेब म्हणतात. आजही बरेचसे लोक त्यांना(अर्धवट) मुजरा करतात. सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी असलेल्या उदयनराजे भोसले यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात.

‘मला हवं तसं राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसं राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही’, असे महाराज साहेब नेहमी ठणकावून सांगतात. महाराजांचा सातारा लोकसभा मतदारसंघात नेहमीच दबदबा राहिला आहे. उदयनराजेंनी 1996 ला सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पण त्यांच्या वाट्याला त्यावेळी पराभव आला होता. त्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि 1998 ला सातारा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री पद देण्यात आले होते. 1999 आणि 2004 मध्ये 2 वेळा पराभूत झाल्यानंतर महाराजांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथेही त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पण निवडणुकांचा विषय आला की एक चर्चेचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे महाराजांची संपत्ती. खासरेवर जाणून घेऊया उदयनराजेंची संपत्ती…

उदयनराजे भोसले यांनी संपत्ती-

उदयनराजे भोसले यांची एकूण संपत्ती किती हा प्रश्न अनेकांना पडतो. उदयनराजेंनी 2009 च्या लोकसभा निवडणूकीत अर्ज भरताना दिलेल्या संपत्तीच्या तपशीलानुसार उदयनराजेंची संपत्री त्यावेळी 12 कोटीच्या आसपास होती. पुढे 2014 साली अर्ज भरताना यामध्ये वाढ होऊन महाराजांची संपत्ती ही 14 कोटी झाली. उदयन महाराजांना गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे जिप्सी, अंबेसिडर, स्कोडा आणि अनेक त्यांच्या आवडत्या कार आहेत.

महाराजांच्या संपतीमध्ये 4 कोटी रुपये किंमत ही जागा आणि शेतीची आहे तर 3 कोटी रुपये हे ज्वेलरीचे आहेत. शिवरायांचे तेरावे वंशज असल्याने त्यांचे जवळपास 11 हजार 470 एकर जमिनीवर भोगवटादार म्हणून नाव आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

बघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…

भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे सुपुत्र गौरव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सांगलीतील स्वरदा केळकर सोबत गौरव हे विवाहबद्ध होणार आहेत. स्वरदा या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या कन्या आहेत तर स्वरदाचे वडील हे सांगलीत व्यावसायिक आहेत.

स्वरदा केळकर या स्वतःही भाजपच्या पदाधिकारी आहेत। त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच स्वरदा या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक आहेत. राज्य सरकारने स्वरदा यांची बाल हक्क आयोगावरही नेमणूक केली आहे.

स्वरदा आणि गौरव यांची पुण्यातील डिईएस लॉ कॉलेजमध्ये ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंब एकाच पक्षाशी बांधिलकी असणारे आहेत त्यामुळे त्यांना घरून विवाहाला लगेच पाठिंबा मिळाला. स्वरदा आणि गौरव या दोघांनीही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदरच दोघांची ओळख होती. आता ही ओळख नात्यामध्ये रूपांतरित होत असल्याने दोन्ही कुटुंबाकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय.

स्वरदा यांच्या आई नीता केळकर यांनी आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. स्वरदाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रगती करत आहेत. स्वरदा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चांगली ओळख आहे. स्वरदा यांनी परदेशातही भाजपकडून विविध सेमिनारमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी थोड्याच कालावधीत भाजपच्या तरुण फळीतील आक्रमक चेहरा अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी कमी वयातच अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमीच स्वरदावर कौतुकाची थाप टाकली. स्वरदा आणि गौरव 25 फेब्रुवारीला पुण्यातील शुभारंभ लॉंन येथे विवाहबद्ध होणार आहेत. राज्याच्या विद्यमान मंत्र्याची सून यामुळे स्वरदा यांची राजकीय कारकीर्द चांगलीच बहरणार यात शंकाच नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…