छोटा पुढारी घनश्याम दरोडे दहावीमध्ये पास झालाय! बघा किती मिळाले मार्क्स..

2 वर्षांपूर्वी व्हाट्सएपवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या घराघरात एक नाव पोहचले, ते म्हणजे छोटा पुढारी घनश्याम दरोडे. फक्त नावच पोहचले असे नाही तर छोटा पुढारी अशी एक वेगळी ओळख त्याला मिळाली. छोटा पुढारी म्हणून फेमस असलेला घनश्याम दरोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी या गावचा आहे. साईकृपा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी असलेल्या घनश्यामचा आठवीमध्ये असताना राजकीय फटकेबाजी करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासून तो आजपर्यंत नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. कधी तो एखाद्या राजकिय पक्षाच्या व्यासपीठावरून फटकेबाजी करताना दिसतो तर कधी तो टीव्ही चॅनेल्सवर चर्चांमध्ये सहभागी होतो.

भविष्यात आपल्याला जिल्हाधिकारी होऊन सुधारणा करायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायचं असं घनश्याम नेहमी सांगतो. शेतकरी आत्महत्या, वीज, शेतमालाचा दर, शैक्षणिक धोरण अशा अनेक विषयावर तो एखाद्या जाणत्या राजकारण्यासारखे बेधडक व्यक्त होतो. गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर जेव्हा तो बोलू लागतो तेव्हा त्याच्या शाब्दिक फटकाऱ्यांनी अनेक जण निरूत्तर होतात.

घनश्याम हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला एक बहिनही आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या घनश्यामक्सच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. काही दिवस त्याने घारगावच्या (ता. श्रीगोंदे) आश्रम शाळेतही शिक्षण घेतले आहे. घनश्याम दरोडे जन्मजात एका दुर्धर आजारानं ग्रस्त आहे. त्याच्या जीवनावर आधारित एक सिनेमाही मध्यंतरी रिलीज झाला.

आता दहावी उत्तीर्ण झाल्यानं घनश्याम पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आनंदाची बाब म्हणजे यंदा घनश्याम दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्याला दहावीच्या परीक्षेत ५१ टक्के गुण मिळाले आहेत. पण दहावीत एवढे कमी मार्क्स मिळाल्याने त्याला एकप्रकारे अपयशच आले आहे. त्याने आपल्या या अपयशाचं खापरं सरकारवर फोडलं आहे. गावात धड वीज आणि रस्ते नसल्यानं कमी गुण मिळाले, असा दावा पुढारी घनश्यामनं केलाय.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

प्रकाश आंबेडकर यांना एका पत्रकाराचे खुले पत्र..

बाळासाहेब,
नमस्कार (करण्याची इच्छा नाही, पण संस्कार आड येतात.)
तसे आपण एकदाच भेटलो. आंबेडकर भवनमध्ये. तुम्ही जन्मदाखल्यावरून जातीचा उल्लेख काढून टाकण्याची मागणी केलीत आणि हा क्रांतिकारक विचार समजून घेण्यासाठी मी आतुर झालो. माध्यमकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ता या दोन पातळ्यांवर मला तुमच्या भूमिकेचं खूप कौतुक वाटलं होतं तेव्हा. एका क्षणासाठी वाटलं की महामानव डॉ. बाबासाहेबांचा वारसा तुम्ही पुढे नेणार, जातिविरहित समाज उभा करणार. आणि म्हणूनच रात्री उशिरापर्यंत थांबून तुमची मुलाखत केली. सा. विवेकसारख्या साप्ताहिकाने तुमची दखल घेतली होती याचं तुम्हाला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. पुढे दहा-पंधरा दिवसांतच तुम्ही तो विषय बासनात बांधून टाकलात आणि नवा विषय हाती घेतलात. सातत्याने नवे नवे विषय घेऊन येणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं तुम्हाला बहुधा आवडत असावं.

कधी संघसमाप्तीची घोषणा तुम्ही केलीत, तर कधी संविधान जाळण्याची इच्छा व्यक्त केलीत. मी मात्र तुमच्याकडे पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचा वारस या दृष्टीने पाहत राहिलो.
मात्र तुम्ही ऑक्टोबर २०१७मध्ये एका कार्यक्रमात म्हणालात, “नक्षलवादी देशाचे मित्र आहेत.” देशाचे आहेत की नाही ते माहीत नाही, पण तुमचे मित्र आहेत, हे मात्र तुम्ही वारंवार सिद्ध केलं आहे. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर तर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता तर तपास यंत्रणेने तुमचा माओवादाशी असलेला संबंध अधोरेखित केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साम्यवादापासून दूर राहण्याचा सल्ला देऊन ठेवला आहे. त्याचबरोबर संविधानाच्या माध्यमातून समतेची हमी दिली. तुम्ही मात्र बाबासाहेबांची वाट सोडून साम्यवाद्यांना अपेक्षित असणाऱ्या अराजकाचे वाहक होत असल्याचं चित्र समोर येतं आहे. तुमची राजकीय, सामाजिक वाटचाल आणि त्यातून तुम्ही निर्माण केलेलं शत्रू-मित्र समीकरण याविषयी मला बोलण्याचा अधिकार नाही.
पण तुम्ही आणि नक्षलवादी यांच्या संबंधाविषयी माध्यमकर्मी बंधूने विचारलेल्या प्रश्नासंबंधीचा तुमचा व्यवहार याविषयी मला बोलण्याचा नक्कीच अधिकार आहे आणि त्या अधिकारात मी तूमचा जाहीर धिक्कार करतो. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार मिळालेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यालाच तुम्ही धमकावलं आहे आणि म्हणून तुमचा निषेध. डॉ.आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तुम्ही मान्य करत नसाल. पण माझी त्याच्यावर नितांत श्रद्धा आहे. तुम्ही माझ्या श्रद्धेला ठेच पोहोचवलीत, म्हणून तुमचा धिक्कार. माझ्यासारख्याच एका माध्यमकर्मीशी तुम्ही अर्वाच्य भाषेत बोललात, धमकी दिलीत म्हणून तुमचा त्रिवार धिक्कार.
बाळासाहेब,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आणि समाजजीवनाला सकारात्मक वळण लावू पाहणारे चिंतक म्हणून आजवर तुमच्याबद्दल अपार आदरभाव होता. पण… बाळासाहेब, तुम्ही तुमची पत जगाला दाखवून दिलीत आणि माझ्याही मनातून उतरलात. तुमचा मार्ग तुम्ही खूप आधीच निवडला असाल, मलाच तो उशिरा कळला असावा. तुम्ही तुमच्या मार्गाने जा. मी बाबासाहेबांच्या विचारप्रकाशात पुढची वाटचाल करेन.
बाळासाहेब,
हा शेवटचा
जय भीम.

रवींद्र गोळे

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हि सांगलीची कन्या बनली मिसेस इंडिया पहा कोण आहे ??

सौंदर्य व बुद्धिमतेच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करीत मूळ सांगलीची आणि सध्या कर्नाटकची सून असलेल्या वैशाली पवार हिने ‘मिसेस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेत ‘मिसेस इंडिया’ च्या मुकुटावर नाव कोरले. ती आली…तिने पाहिले…आणि जिंकलेही, अशा दिमाखात तिने स्पर्धा जिंकून सांगलीचे नाव गाजविले आहे. आता तिची ‘मिसेस वर्ल्ड’ साठी निवड झाली आहे.

काही दिवसांपूर्वी तिची ‘मिसेस इंडिया’साठी निवड झाली होती. निवडीनंतर वैशालीला लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. ‘मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन’ स्पर्धेतील विजेतेपदाचा अनुभव असल्याने या स्पर्धेला ती मोठ्या आत्मविश्‍वासाने सामोरी गेली. दिल्लीतील ‘किंग्डम ऑफ ड्रीम्स’ मध्ये ग्लॅमरस वातावरणात चार दिवस ही स्पर्धा रंगली. स्पर्धा पहाटे पाच वाजता सुरू होऊन मध्यरात्रीनंतर दोन किंवा पहाटे तीन वाजता संपायची. यात वेगवेगळ्या कसोट्यांवर स्वत:ला सिद्ध करायला लागायचे. वैशालीने अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी चुणूक दाखवली. मुलाखतीत प्रेक्षणीय वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी काय करणार, असे विचारले असता तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या संवर्धनावर विशेष भर देऊ, असे सांगितले.

महाविद्यालयीन जीवनात आपण अनेक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याचे तिने नमूद केले. इथेच तिने निम्मी बाजी मारली. यातच तिला सर्वाधिक गुण मिळाले. फिटनेस फेरी, भारतीय व पाश्‍चिमात्य पोशाख प्रतिनिधीत्वमध्ये तिने परीक्षकांची मने जिंकली. टॅलेंट फेरीत वैशालीने ‘सेलीन डायोन’ या गायिकेचे गाणे गाऊन गायिका असल्याचे सिद्ध केले. इतर स्पर्धक, प्रशिक्षक आणि कर्मचार्‍यांशी प्रेमळ वागून तिने खर्‍या आयुष्यातही सुस्वभावी असल्याचा ठसा उमटविला. मॉडेलिंगमधील अनुभव टिप्स तिने इतरांना देऊन मदत केली. याने सर्व स्पर्धेत तिची एक आगळीवेगळी छाप पडली. यामुळेच वैशाली ‘मिसेस इंडिया’ ची मानकरी बनली. स्पर्धेचा मुकुट पटकावित तिने सांगलीचे नाव गाजविले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

रविना टंडनला एका शेतकरी पुत्राचे खुले पत्र नक्की वाचा

इंडियास्थीत रविनाताई टंडन यांना खुले पत्र…
प्रती,
आ. रविनाताई टंडन,
मौजे मुंबापूरी (मुंबई)
सप्रेम नमस्कार

एक शेतकरी व शेतकऱ्यांचा पिढीजात पिसलेला, दबलेला, खचलेला, चुरगाळलेला वारसदार म्हणून आज तुम्हांला हे पत्र लिहितो आहे. तुमची इच्छा नसेल ताई हे सर्व वाचायची पण आमची परिस्थिती तुम्हाला सांगावीच लागेल ना ! तुम्हालाही कळू देत आमची होणारी फरफट म्हणून लिहितो आहे.
आम्हीच कापूस पिकवतो तरी आमच्या अनेक पिढ्यांनी स्वतःच्या अंगावर नवा कोरा पूर्ण कापड घातलेला आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. आमच्याच शेतात पिकलेली फल्ली व सोयाबीन तेलही आम्हाला कधी कधीच खायला मिळते. अहो हेच काय आमच्यामूळे सर्व जग आनंदात पोटभर जेवत असतांना आमची लेकरं रात्री पाणी पिऊन उपाशी झोपलेली असतात ताई. आम्हां खेड्यातील भारतीयांचे असणं तुम्ही शहरातील इंडियन्स का नाकारता? याचा उलगडा अद्यापही आम्हाला झालेला नाही. आमच्या अंगातही रक्त आहे, आम्हालाही भावभावना आहेत. आम्हालाही पोट आहे जे एखाद्यावेळी जेवायला नाही मिळाले तर पिळवटून निघतं. आम्हालाही लेकरंबाळं आहेत ताई ; ज्यांना उत्तम आरोग्य व उत्तम शिक्षण देऊन चांगला नागरिक घडवण्याची इच्छा आहे. मॉलमध्ये पन्नास रूपयांना घेतलेली कोशिंबीर तुम्हां इंडियातील मंडळींना रस्त्यावर विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून ‘पाच रूपयांत’ हवी असते. फक्त कोशिंबीरच नाही तर आम्ही प्रत्येक पिकवलेला माल आपणांस स्वस्त पाहिजे असतो कारण आम्ही कदाचित हरामाचे पीक घेत असू असा आपला समज असावा किंवा दोन रूपये जास्त देणे म्हणजे आपली लूट होते आहे असा आपला समज असावा.असो ! हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना आपण अटक करा म्हणाल्यात आपले खूप खूप अभिनंदन आपले असे वक्तव्य आम्हाला जिव्हारी मुळीच लागले नाही कारण गेल्या अनेक पिढ्या व्यवस्थेने आम्हांला गुलामच समजले आहे. त्यात काही वेगळे असे नाही. इतकं मात्र नक्की की येणाऱ्या काळातील तुमच्या ताटातील घास आमच्या शेतातील नसावा. शहरातील सिमेंटच्या वावरात तुम्ही सगळे भरघोस पीक घ्या. भाजीपाला, गहू, तांदूळ, तुर, मूग, भुईमूग जवळपास सर्वच पीक घ्या व आनंदाने जगा. महागाई वाढल्यावर किंवा आम्ही आम्ही दूध रस्त्यावर सांडवले तेव्हा कसे कळवळीने बोलता. तसेच आमचा बाप भाव मिळत नाही म्हणून मरतो तेव्हा मात्र सर्वच सो कॉल्ड शहरी लोकं आपले शेपूट घालून कुठे लपलेले असतात? काय माहित? आमच्या बापाला पोरी उजवायची चिंता, पोराला शिकवायची चिंता. आमच्या आईला घरदार सांभाळायची चिंता आणि आम्हांला त्यांच्यावर ओझं वाढू न देण्याची चिंता.

जरा आमच्या विदर्भात येऊन बघाच वैफल्यग्रस्त असणारा शेतकरी ४५-५० अंश सेल्सिअस मधे जेव्हा शेतातील नांगरटी करतो, काडीकचरा वेचतो आणि वर्षभर मरमर करतो तेवढे येऊन बघाच ताई आणि हो फक्त एकदिवस जरी तुम्ही आमच्या घरादाराची छोटी छोटी कामे करू शकलात तर आम्ही आमची चूक मान्य करू. लेकराला कडूनिंबाच्या झाडाला पाळणा बांधून पाठीवर खंदाळी बांधून दिवसभर कापूस वेचणारी माय आहे आमची. मेहनत काय असते आता इंडिया भारताला शिकवतोय ; ऐकावे ते नवलच ! पावसाळा तोंडावर आहे नैराश्याच्या गर्तेत अडकलेला बाप आजही विचार करतोय पेरणीला बी-बियाणे कुठून आणायचे. त्यानंतर बाकी जुळवाजूळव कशी करायची. दोन तीन गाण्यावर नाचून लाखो रूपये आम्हाला मिळत नाही नाही. एखाद्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोला जाऊन विचारा तुझा नवरा का मेला ते? आणि जखमांवर मीठ चोळायचे असल्यास ‘कसं वाटतं नवरा मेल्यावर?’ हेही हातोहात विचारून घेजा. तुमचा व तुमच्या अभिनयाचा आम्हाला आदर आहे पण नको त्या विषयात नाक खूपसून आपली काशी करून घेऊ नका. तुमची लेकरं विदेशात जाऊन इंग्रजी शिकतात आमच्या पोरांच्या शाळेला शिक्षक मिळत नाही हाच फरक आहे म्हणून आम्ही रस्त्यावर आणि तुम्ही बंगल्यात आहात.

जाता जाता इतकेच म्हणेल की तुम्हांला खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून हा पत्रप्रपंच केला आहे. आम्ही आमचे सन्मानाचे आयुष्य मागतोय. आमच्या लेकरांसाठी दोनवेळची भाकरी, उत्तम आरोग्य तथा उत्तम शिक्षण मागतोय यात चूक काय आहे. आमच्या मालाचे काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही रस्त्यावर दूध सांडवले भाजीपाला फेकला तर लगेच तुमच्या पोटात दुखणे सुरू झाले विचार करा गेली अनेक वर्षे आम्ही असेच फकिरासारखे जगत आहोत आमची किती आग होत असेल. शेवटी इतकेच म्हणेल की ; ताईसाहेब तुमच्या ताटात असलेला घास हा आमच्या रक्ताच्या थेंबाला जाळून, घामाला गाळून आम्ही इंडियापर्यंत पोहोचता केला आहे. अशी कृतघ्नता कृपया दाखवू नका. शिव्या आम्हालाही देता येतात पण शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रीयांचे वारसदार आहोत आम्ही शेतकरी अन् स्त्रीला आजही आमच्या येथे देव्हाऱ्यात जागा आहे. म्हणून कोणत्याही स्त्रीचा अनादर आमच्या हातून घडू नये म्हणून सन्मानपूर्वक बोलतो आहे. तुमच्या इंडियाची काळजी घ्या कारण त्याचे रक्षण करणारा सिमेवरील जवान हा आमचाच पोरगा आहे.
‘साऱ्याच निघतात फसव्या भाकरीच्या योजना…! एसीमधे कळत नाही झोपडीच्या वेदना…!!’
धन्यवाद ! कळावे लोभ असावा !
आपलाच वैभव अनिलराव भिवरकर ( किसानपुत्र ) 9422785707

महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल खासरे माहिती..

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला 20 मे ला 130 वर्षे पूर्ण झाले. या रेल्वे स्टेशनला अगोदर व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) नावाने ओळखले जायचे. स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत मुंबईच्या सौंदर्यात भर घालते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात ताज महाल नंतर सर्वात जास्त फोटो या इमारतीचे काढले जातात. या इमारतीचे डिझाइन फ्रेडरिक स्टीवेन्सने तयार केले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल 1 दशक कालावधी लागला होता.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीचे बांधकाम 1978 मध्ये सुरू झाले होते आणि ते 1987 मध्ये पूर्ण झाले. महाराणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून इमारतीला व्हिक्टोरिया टर्मिनस नाव देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला बनवण्याकरीता 16,13,863 रुपये खर्च झाला होता. स्टीवेन्स यांनी डिझाइन केलेल्या या वास्तूला त्याकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी वास्तू म्हणून ओळख होती. 1996 मध्ये या वास्तूचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे ठेवण्यात आले होते. जुलै 2017 ला पुन्हा यामध्ये बदल करून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. 2004 मध्ये युनेस्कोने या भवनाला वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जागतिक वारसा यादीत स्थान दिले होते.

पूर्ण इमारतीचा सर्वोत्कृष्ट बिंदू हा मुख्य घुमट आहे. त्यावर महिलेचा एक विशाल पुतळा आहे ज्याची उंची 16 फूट 6 इंच आहे. डाव्या हातात एक ज्वलंत मशाल आहे आणि उजव्या हातात एक चाक आहे जे प्रगतीचे प्रतीक आहे. या इमारतीचे डिझाइन हे गॉथिक शैलीचे आहे ज्याला भारतीय संदर्भानुसार बांधण्यात आले.

1029 मध्ये या स्टेशनवर 10.4 लाख रुपये खर्चून 6 प्लॅटफॉर्म बनवण्यात आले होते. नंतर पुनर्निर्माण केल्यानंतर इथे 13 प्लॅटफॉर्म झाले. यार्ड आणि स्टेशन मध्ये त्यावेळी काही बदल करण्यात आले होते. 1994 मध्ये येथील प्लॅटफॉर्मची संख्या 15 झाली. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18 प्लॅटफॉर्म आहेत. पूर्वेकडून प्रवेश करण्यासाठी मोकळी जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शताब्दी निमित्ताने एक डाक तिकीट देखील प्रकाशित करण्यात आले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

गोविंदालाही लाजवेल असा डान्स करणारे हे काका कोण, वाचा खासरेवर

सोशल मीडियावर मागच्या 2 दिवसात एका डान्सच्या व्हिडीओनर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिकडे बघाल तिकडे हा डान्स लोकांनी शेअर केलेला दिसत आहेत. कोणी कोणी तर या डान्स करणाऱ्या व्यक्तीची गोविंदा सोबत पण तुलना केली तर काहींनी गोविंदा पेक्षाही हा डान्स भारी असल्याचे म्हंटले आहे. एका कार्यक्रमात सेटवर खुदगर्ज सिनेमातील ‘आपके आ जाने से’ या गाण्यावर तर आपल्या पत्नीसोबत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत सोशल मीडियावर लाखो लोकांनी शेअर केले असून करोडो लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे डान्स करणारे काका नेमके कोण आहेत हा प्रश्न अनेकांना पडला. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडलं आहे. खासरेवर जाणून घेऊया कोण आहेत हर गोविंदाला लाजवेल असा डान्स करणारे काका..

इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलेले ते काका कोण?

आप के आ जाने से या गाण्यावर डान्स केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काल दिवसभर इंटरनेटवर स्टार बनलेले काका आहेत विधीशाचे रहिवाशी असलेले संजीव श्रीवास्तव. संजीव श्रीवास्तव यांचे वय 46 वर्षे आहे. त्यांना घरी प्रेमाने डेब्यु अंकल म्हणून ओळखले जाते. संजीव यांना लहानपणी पासूनच डान्स करण्याची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक काँटेस्ट मध्ये भाग घेतला असून अनेकदा ते विजेते देखील बनले आहेत. त्यांना डान्स करण्याची प्रेरणा मिथुन चक्रवर्ती पासून मिळाली होती. विशेष म्हणजे संजीव श्रीवास्तव हे पेशाने प्रोफेसर आहेत. ते भोपाळच्या प्रसिद्ध भाभा युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर आहेत.

कधीचा आहे व्हिडीओ?

हा व्हिडीओ कधीचा आहे याविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता तो 12 मे ला एका लग्नसमारंभात शूट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही कल्पना नव्हती की आपला डान्स कोणी शूट करत आहे आणि तो सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या परिचयाच्या आणि नातेवाईकांचे त्यांना फोन येत असून त्यांच्या या कौशल्याची सगळीकडे वाहवा करण्यात येत आहे.

गोविंदा स्टाईल डान्स केलेला पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचा अजून एक नवीन व्हिडीओ देखील समोर आला आहे. या दुसऱ्या व्हिडीओ मध्ये ते चढती जवानी या गाण्यावर डान्स करत आहेत.

बघा संजीव श्रीवास्तव यांच्या अप्रतिम डान्सचे दोन्ही व्हिडीओ-

पहिला व्हिडीओ-

दुसरा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

रणबीर कपूर करतोय या अभिनेत्रीला डेट, त्यानेच केला आपल्या प्रेमाचा खुलासा..

बॉलिवूडचा आगामी सुपरस्टार रणबीर कपूरचं नाव कधी कतरिना कैफसोबत जोडलं गेलं, तर कधी दीपिका पदुकोणसोबत… अवंतिका मलिक, सोनम कपूर, नर्गिस फाक्री, माहिरा खान अशी अनेक नावं यामध्ये रणबीरच्या ‘अफेअर्स लिस्ट’मध्ये होती. रणबीरने आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळलं, मात्र अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली त्याने दिली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भटट् यांचं अफेअर सध्या बॉलिवूड मध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा विषय ठरत आहे. एकिकडे रणबीरची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, तर दुसरीकडे आलियासोबतच्या त्याच्या नात्यावरही अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणबीर आणि आलियाने एकत्र हजेरी लावली, अगदी तेव्हापासूनच त्याच्या या नव्याकोऱ्या अफेअरने सर्वांचं लक्ष वेधलं.

विविध कार्यक्रम आणि मुलाखतींमध्येही या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे रणबीर आणि आलिया यांनी माध्यमांपासून हे नातं लपवण्याचा प्रयत्न केला असला तरीही एकमेकांप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना काही केल्या लपून राहत नसल्याचं स्पष्ट होत आहे. याची प्रचिती नुकतीच आली. ‘GQ इंड‍िया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नुकतच रणबीरने आलियासोबतच्या नात्यावरचं मौन सोडलं.

आलिया भट्टसोबतच्या डेटिंग आणि बॉन्डिंगबद्दल रणबीरने म्हटले की, ‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काहीकाळ हवा आहे. काहीतरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे.’दरम्यान, या अगोदर एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते की, ‘होय, एक मुलगा म्हणून मला तिच्यावर क्रश आहे.’ विशेष म्हणजे आलियानेही रणबीर कपूरविषयी तिच्या मनात असलेल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

निसर्गाची किमया असलेल्या जुळ्या बहिणींना बारावीत मिळालेले मार्क्स बघून आश्चर्याचा धक्काच बसेल..

जुळी मुलं जन्मने ही निसर्गाची एक किमया आहे. एका मुलीसाठी किंवा मुलासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या कुटुंबात जर अशी किमया घडली आणि जुळी मुलं झाली तर त्या कुटुंबियांना तो आश्चर्याचा धक्काच असतो आणि एकप्रकारे आनंद देखील असतो. आईसाठी होणे आनंदाचे असते त्यात जुळी झाल्याने अजून आनंदात भर पडते. जुळी होण्यामागे सहसा आनुवंशिकता, वजन आणि उंची, वाढत्या वयातील गर्भधारणा, संप्रेरकीय बदल, कृत्रिम गर्भधारणा या गोष्टी कारणीभूत ठरतात.

अकोल्यातील देठे कुटुंबात देखील अशाचप्रकारे निसर्गाची किमया म्हणून दोन बहिणी जुळ्या जन्मल्या. कुटुंबात आनंदाने त्यांचा सांभाळ केला. सहसा जुळ्या मुली सारख्याच दिसतात. मग पुढे पण बऱ्याच गोष्टी सारख्या वापरण्यावर सर्वांचा भर असतो. पण, नवल झालं ते या जुळ्या बहिणींना बारावीत जे गुण मिळाले आहेत त्याचं. ही गोष्ट ऐकून सर्वानाच आश्‍चर्य वाटेल मात्र हे सत्य आहे. ही किमया आहे राधादेवी गोयंका महाविद्यालयातील सई आणि जुई पेठे या बहिणींची.

अकोल्यातील गौरक्षण रोड स्थित माधवनगर येथील रहिवासी चंद्रशेखर पेठे यांना सई आणि जुई नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. त्या यंदा राधादेवी गोयंका महाविद्यालयात इयत्ता बारावीला कला शाखेत शिक्षण घेत होत्या. त्यांनी बारावीच्या परीक्षा यावर्षी दिली. जन्माने जुळ्या या बहिणी लहानपणापासूनच थोड्या हटके स्वभावाच्या. काहीपण करायचं, तर सोबत करायचं, मग अभ्यासात मागे का? अभ्यासही सोबतच करायचा अन्‌ मार्कही सारखेच मिळवायचे. असंच काहीसं गणित बारावीला असताना केलं. परीक्षेची तारीख जवळ आली, तशी दोघींनी अभ्यासाला जोमाने सुरुवात केली. दोघीही अभ्यासाला सारखाच ठरवून वेळ द्यायच्या. दोघींच्याही अभ्यासाच्या वेळा सारख्याच व सोबत बसूनच करायच्या.

काल बोर्डाने बारावीचे निकाल वेबसाईटवर जाहीर केले. पण कोणाला विश्वास बसणार नाही की सई आणि जुई यांनी ज्याप्रकारे ठरवून अभ्यास केला त्यांच्या या परिश्रमाचं फलित बुधवारी बारावीचा निकालातून अशाप्रकारे मिळणार आहे. या जुळ्या दोघींप्रमाणे त्यांना या परीक्षेत जुळ्या गुणांनी फलित मिळालं आहे. सई आणि जुई या दोघींना ८४.९२ टक्के गुण मिळाले आहेत. आई-वडिलांसोबतच कॉलेजातल्या शिक्षकांनाही हा आश्‍चर्याचाच धक्का आहे. सर्व गोष्टी सारख्या करणाऱ्या या बहिणींना मिळालेले सारखे गुण सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

अज्या व शीतलच्या लग्नाची धम्माल वरात एकदा बघाच..

सध्या सर्वत्र लग्नाचं सिजन चालू आहे. लग्न म्हंटलं की सगळीकडे धामधूम आणि आनंदाचे वातावरण असते. सोशल मीडियावर देखील लग्नाचे फोटो आपल्या रोजच बघण्यात येत आहेत. खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्न समारंभ तर चालूच आहेत पण टीव्ही सीरिअल मध्ये देखील सध्या लग्नाची धूम बघायला मिळत आहे. त्यामध्ये एका लग्नाची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. ते म्हणजे लागीर झालं जी या मालिकेतील फेव्हरेट जोडी अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाची. अज्या आणि शितलीचे लागीर झालं जी मालिकेत आज लग्न झालं आहे.

एका सामूहिक विवाह सोहळ्यात अज्या आणि शितलीचं लग्न झालं आहे. या मालिकेत अजिंक्य आणि शीतलच्या लग्नात अनेक विघ्न येतात. या सर्व विघ्नावर मात करत त्यांचा आज विवाह या मालिकेत झाला आहे. या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अजिंक्यचं लग्न पार पडल्यानंतर त्याच्या वरतीचा व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये वरातीत पाहुने मंडळींनी किती धमाल केलीये तुम्हीच बघा..

😎💕🔥वरातीला या भावांनो…

A post shared by Nitish Chavan (@nitishchavan_) on

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

बारावीचा निकाल आज, दुपारी 1 वाजता या वेबसाईटवर बघा निकाल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याविषयी अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. हि उत्सुकता संपली असून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून निकालाची प्रिंट घेता येणार आहे.

बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल. आज वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. यावर्षी 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना तो करता येणार आहे. हा अर्ज करण्यासाठी 31 मे ते 9 जून अशी मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनाही जुलै-ऑगस्ट 2018 व फेब्रुवारी 2019 या पुढील परीक्षांमध्ये संधी मिळणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागात बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मोबाईलवर निकाल कसा मिळवाल?

बारावीचा हा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटशिवाय मोबाईलवर देखील एसएमएस द्वारे मिळणार आहे. एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल. बघा कशाप्रकारे मिळवायचा निकाल..

MHHSC हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

या वेबसाईटवर बघू शकता निकाल-

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.knowyourresult.com

www.hscresult.mkcl.org

किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?

यावर्षी राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विदयार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यर्थिनी होत्या. यामध्ये विज्ञान शाखेचे 5 ,लाख 80 हजार 820 विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख 79 हजार 863 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 693 विद्यार्थी समाविष्ट आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…