हा व्हीडीओ बघुन विश्वास बसणार नाही की हे काश्मीर आहे का जालना…

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला होता. रविवारी हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. रविवारी सकाळी मराठवाडा, विदर्भातील काही शहरांमध्ये अवकाळी पाऊसासह तुफान गारपीट झाली. खरीप पिकावर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असतानाच या अवकाळी गारपिटीने रब्बी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गारपिटीचा सर्वात जास्त तडाखा जालना जिल्ह्याला बसला आहे. जालना जिल्ह्यातील मंठा, जाफराबाद, अंबड, घनसावंगी तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, माजलगाव तालुक्यात आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याला या गारपिटीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तूर, हरभरा, गहू, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट पुढील 48 तास कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

जालना जिल्हात काश्मीर सदृश परिस्थिती-

या गारपिटीचा फटका सर्वात जास्त फटका जालना जिल्ह्याला बसला असून प्रचंड नुकसान झाले आहे. जालना आणि मंठा तालुक्यात गारपीटीनंतर सर्वत्र गारांचा अक्षरशः खच पडला होता. यात गारांचा आकार हा दीडशे ते दोनशे ग्राम असल्याने अनेकजण जखमी सुद्धा झाले आहेत. सर्वत्र गारांचा खच साचल्याने बऱ्याच ठिकाणी काश्मीरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. बघूया याचाच प्रत्येय देणारा हा जालना जिल्ह्यातील गारपिटीनंतरचा हा व्हीडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

लाखो तरुणाच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या प्रियाला हिंदी गाणे गाताना बघितले का?

इंटरनेटवर सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय बनले आहे एक नुकतेच रिलीज झालेले मल्याळम गाणे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड वायरल झाला आहे. यामागे कारणही तसंच खास आहे. या गाण्यातील मुलीने आपल्या हटके एक्सप्रेशनने अनेक लोकांना भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ रिलीज होऊन काही तासच उलटले असताना या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे.

अभिनेत्री प्रिया वरीअरचा हा पहिलाच सिनेमा आहे. ओरु आदर लव्ह या सिनेमातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. प्रियाने या गाण्यात जे एक्सप्रेशन दिले आहेत खूपच खास आहेत. माणिक्य मलाराया पूवी असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यामध्ये प्रिया हायस्कूल मधील क्रश दाखवण्यात आली आहे. PMA जब्बार यांचे शब्द असलेलं हे गाणं शान रहमान यांनी कंपोज केले आहे तर विनीत श्रीनिवासन यांनी हे गाणं गायले आहे.

प्रियाला या गाण्यामुळे चांगलीच प्रसिध्दी मिळाली आहे. तिला इन्स्टाग्रामवर का दिवसात तीन लाख लोकांनी फॉलो केले आहे. तर फेसबुक आणि युट्युबवरसुद्धा सध्या ती ट्रेंडिंगला आहे. प्रियाच्या जुन्या गोष्टी लोकं आज इंटरनेटवर शोधत आहेत. प्रियाने गायलेले एक जुने हिंदी गाणे आज आपण खासरेवर बघूया…

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

इस लड़की के वीडियो ने इंटरनेट पर मचा दिया है हंगामा कौन है ये लड़की.

इंटरनेट पर कब क्या व्हायरल होगा पता नही इन दिनों एक लड़की के वीडियो ने इंटरनेट पर काफी हंगामा मचाया है.फेसबुक व्हाट्सएप और सभी सोशियल वेबसैंड्स पर इस लड़की के गाने का वीडियो पसंद किया जा रहा है.ये वीडियो इतना व्हायरल होने का कारण है कि उस वीडियो में लड़कीने दिखाई हुई एक्सप्रेशन्स वो देख कर कोई भी उसके प्यार में पागल हो सकता है.ये वीडियो अपलोड होकर कुछ घंटे हो चुके है फिर भी इस वीडियो को हजारों लोगोंने देखा है और शेर किया है.

इस गाने में दिख रही है वो कोई मामूली लड़की नही है.वो है मलयालम अभिनेत्रि “प्रिया प्रकाश वरिअर” प्रिया एक अभिनेत्री है और वो मल्यालम सिनेमा “ओरु आदर लव्ह” फ़िल्म से अभिनय के क्षेत्र में डेब्यूट कर रही है.ओमर लूलूने इस फ़िल्म को निर्देशित किया है.इसी फिल्म का एक गाना अभी अभी रिलीज़ हुआ है.इस गाने ने काफी थोड़े समय में इंटरनेट पर बहुत हिट्स पाए है.
‘माणिक्य मलाराया पूवी’ इस गाने ने प्रिया को एक दिन में लोकप्रिय बनाया है.

इस गाने में प्रिया को स्कूल का क्रश दिखाया गया है.PMA जब्बार के शब्द और शान रहमान ने गाने को कम्पोज़ किया है और विनीत श्रीनिवासन ने उसे गाया है.शान रहमान ने इस गाने को अपलोड करतेही इंटरनेट पर इस गाने ने हंगामा मचा दिया.प्रिया की ये पहेली फ़िल्म 03 मार्च 2018 को सिनेमाघरों में आनेवाली है.

या मुलीच्या व्हिडीओने इंटरनेटवर घातलाय अक्षरशः धुमाकूळ, बघा कोण आहे हि मुलगी…

इंटरनेटवर कधी कोणती गोष्ट वायरल होईल सांगता येत नाही. सध्या इंटरनेटवर एका मुलीच्या व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. व्हाट्सएप, फेसबुक सहित सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मुलीचं गाणं असलेला व्हीडीओ सध्या खूप गाजला आहे. या व्हिडीओचे प्रचंड वायरल होण्यामागचे कारण म्हणजे या मुलीने या व्हिडीओ मध्ये जे एक्सप्रेशन दाखवले आहेत ते पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. या एक्सप्रेशननी लोकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ रिलीज होऊन काही तासच उलटले आहेत मात्र या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे.

या गाण्यात दिसणारी ही मुलगी एखादी साधीसुधी मुलगी नाहीये तर ती आहे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरीअर. प्रिया ही एक अभिनेत्री असून ती मल्याळम सिनेमा ‘ओरु आदर लव्ह’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. याच सिनेमातील एक गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. या गाण्याने थोड्याच कालावधीत इंटरनेटवर लाखो हिट्स मिळवले आहेत. ‘माणिक्य मलाराया पूवी’ या गाण्याने एक दिवसातच प्रिया ला प्रसिद्धीझोतात आणले आहे.

या गाण्यामध्ये प्रिया हायस्कूल मधील क्रश दाखवण्यात आली आहे. PMA जब्बार यांचे शब्द असलेलं हे गाणं शान रहमान यांनी कंपोज केले आहे तर विनीत श्रीनिवासन यांनी हे गाणं गायले आहे. शान रहमानने हे गाणं पोस्ट केल्यानंतर इंटरनेटवर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रियाचा हा पहिला सिनेमा 03 मार्च 2018 ला रिलीज होणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

लेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी

जेव्हा आपण लेदरच्या वस्तू खरेदी करण्यास बाजारात जातो तेव्हा आपल्या मनात संशय येतोच की हे लेदर ओरिजनल आहे की नाही. तसं आपण सर्वसामान्य व्यक्ती असल्यामुळे लेदर बद्दल आपल्या अधिक माहिती असण्याचं काही कारणच नसते. त्यामुळे अनेकदा लेदरच्या दिसायला सुंदर वस्तू बघून आपण ओरिजनल लेदर घेतल्याचा आनंद घेत असतो. किंवा बरेचदा आपण जी लेदरची वस्तू महाग आहे ती वस्तू ओरिजिनल म्हणून घेऊन आनंद मानतो.
लेदरच्या वस्तू ओळखणं तसं कठिण काम आहे. या वस्तू महाग असतात पण या टिकावू असल्यानं एकदाच खर्च करावा लागतो. खरं लेदर ओळखण्यासाठी ही काही टिप्स आहेत. आणि त्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कसं ओळखावं खरं लेदर ?

सर्वप्रथम लेदरच्या वस्तूला आग लावा. उत्तम दर्जाच्या लेदरवर आगीचा कोणताही परिणाम होत नाही. दुसरीकडे खोटे किंवा पेंटेड लेदर आगीमुळे आक्रसते. आगीशी संपर्क झाल्यास खर्‍या लेदरच्या आकारावर आणि टेक्स्चरवर कोणताही परिणाम होत नाही. लेदरचे उत्पादन खरेदी करताना सोबत लाइटर बाळगा. लेदरच्या उत्पादनावर लाइटर फिरवून ते खरे असल्याची खात्री करून घ्या. अनेकदा खरं लेदर आहे याची ओळख करून देण्यासाठी दुकानदार स्वतः लायटरने त्याची ओळख पटवून देतो.

लेदरला तुम्ही पिननं छिद्र पाडू शकता. जर लेदर खरं असेल तर त्याला तुम्हाला छिद्र पाडता येणार नाही. शिवाय तुम्ही जिथं छिद्र पाडता त्याचा निशाण देखील काही वेळातच मिटून जाते. जर डुप्लिकेट असेल तर त्या छिद्राचं निशाण तिथंच राहते.

ख-या लेदर मध्ये आपल्या शरीरावर असतात तसे छिद्र असतात. जर लेदर प्लेन असेल तर समजायचं की ते लेदर डुप्लिकेट आहे.
खरं लेदर हे नकली लेदरपेक्षा मऊ असते. तसंच ते एकसारखं नसते. कोही ठिकाणी ते जाड तर काही ठिकाणी ते पातळ असते. शिवाय त्याच्या खरपूसपणाही कमी अधिक प्रमाणात असतो.

लेदरला विशिष्ट प्रकारचा वास असतो. या वासाची कॉपी करणे तंत्रज्ञानालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे लेदरचा वास जाणून घेऊन उत्पादन खरेदी करताना नाकाचा प्रभावी वापर करा.

ख-या लेदरला शायनिंग कमी असते. तसंच त्याची फिनिशिंग ही डुप्लिकेट लेदरच्या तुलनेत थोडी कमी असते. जर लेदरला शायनिंग जास्त असल्यास समजून घ्यावे की हे लेदर डुप्लिकेट आहे.

लेदर ओळखण्याची महत्त्वाची खूण म्हणजे लेदर उत्पादनाच्या कडेची बाजू. लेदर उत्पादनाच्या कडेची बाजू काहीशी खरखरीत असते. लेदर कठीण असताना आकार दिल्याने कडा खरखरीत राहतात. लेदर खोटे असेल तर कडेची बाजू गुळगुळीत लागते.
लेदरच्या वस्तू थोड्या ओढून बघा. खर्‍या लेदरचे टेक्स्चर कधीही एकसारखे नसते.

काय असतो नागमणी ? जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…

काही दिवस अगोदर युट्यूबवर एक विडीओ वायरल झाला ज्यामध्ये सापाच्या डोक्यातुन एक खडा काढण्यात येतो. तथाकथित विडीओ मधे त्या खड्यास नागमणि सांगण्यात आले आहे. युट्यूब वर वेगवेगळ्या लोकांनी हा विडीओ अपलोड केला जवळपास १ करोड लोकांनी हा विडीओ बघितला व लाखो लोकांनी हा विडीओ शेअर केला आहे. आज खासरे वर बघुया काय आहे या विडीओची सत्यता…

विकीपेडीयाच्या माहितीनुसार या खड्याचा उपयोग सर्पदंश झाल्यावर उपचारासाठी करण्यात येतो. परंतु या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक दुजोरा दिलेला नाही आहे. दक्षिण भारतात हा काळसर रंगाचा खडा कोब्रा सापाच्या डोक्यावरील भागात सामान्यतः आढळून येतो. हा खडा थोडाफार चमक ही देतो. खड्याचा रंग सापानुसार वेगवेगळा असतो. परंतु हा खडा नाही हा नागमणि नसुन सापाने न वापरलेले विष काही दिवसाने स्थायु स्वरूपात रुपांतरीत होते त्यामुळे हा खडा तयार होतो. हा खडा काढल्यामुळे सापाचा मृत्यू होत नाही याला चमक असण्याचे खास कारण हे आहे की या चमकदार पणामुळे अनेक जिव त्याकडे आकर्षित होतात व साप आपला भक्ष पकडू शकतो.

काही देशात सर्पदंश झालेल्या ठिकाणावर हा खडा ठेवल्या जातो असे म्हटल्या जाते की हा खडा विष ओढुन घेतो. तसेच काही जागेवर दुध व पाण्यात हा खडा टाकुन काही वेळ ठेवल्या जातो व नंतर खडा बाहेर टाकुन पाणि पिल्याने विष शरीरातुन निघुन जातो असा समज आहे परंतु यास वैज्ञानिक मान्यता नाही. हा खडा जवळ असल्यावर साप जवळ येत नाही असाही समज आहे. परंतु हिंदू पुराणानुसार १०० वर्ष पूर्ण झालेला साप जो कोणालाही चावला नाही त्याच्या डोक्यावर खरा नागमणी तयार होतो व हा आकाराने मोठा व अंधारात प्रकाशमय असतो. कदाचीत औषधी कंपन्यांना हे सत्य समोर येऊ द्यायचे नसल्याने या खड्या विषयी सर्वाना अज्ञात ठेवले असेल.

आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका

क्या है नागमणि? जानिए इस व्हायरल वीडियो के पीछे का सच…

कुछ दिन पहले यूट्यूब पर एक वीडियो व्हायरल हुआ था जिसमें साँप के सिर से एक मनी निकाला जाता है.उस वीडियो में उस कंकड़ को नागमणि कहा गया है. यूट्यूब पर अलग अलग लोगोने ये वीडियो अपलोड किया.लगभग एक करोड़ लोगोने ये वीडियो देखा और लाखों लोगोने शेअर किया. आज खास रे पर देखेंगे उस वीडियो के पीछे का सत्य.

विकेपीडिया पर मिली जानकारी के अनुसार साँप के काटने पर ईलाज के लिए उस मनि का उपयोग होता हैं.पर इस बात की कौनसे भी वैज्ञानिक ने पुष्टि नही की.दक्षिण भारत में काले रंग के नाग के सिर पर ये मणि दिखाई देता है. ये मणि थोड़ा चमकता भी है.मणि का रंग साँप के रंग के अनुसार अलग अलग पाया जाता है. पर ये कोई नागमणि नही है बल्कि साँप ने उसके जहर का इस्तेमाल न करने पर उसका स्थाई रूप में परिवर्तित होता है जिससे उसका कंकड़ बन जाता है.ये मणि निकालने पर साँप मरता नही उसे चमक होने का कारण ये है कि उसके चमकदारी की वजह से उसके और अनेक जीव आकर्षित होते है और साँप उसे अपना भक्ष बना लेता है.

कुछ देशों में साँप ने जिस जगह काँटा है उस जगह इस मणि को रखा जाता है.ऐसा कहा जाता है कि ये मनि उसका जहर चूस लेता है.वैसेही कुछ जगह पर वो मणि दूध में कुछ देर रख कर फिर मणि बाहर निकाल कर दूध पीने पर साँप का जहर शरीर से बाहर निकल जाता है ऐसा कहा जाता है.परंतु वैज्ञानिकों ने इस बात की पुष्टि नही की है.ये कंकड़ पास होने पर साँप पास भी आता नही ऐसा भी कहा जाता है.परंतु हिंदू पुराणनुसार सौ साल का साँप जिसने किसी को भी काँटा नही उसके सिर पर वास्तविक नागमणि तैयार होता है और ये आकार से बड़ा होता है और अंधेरे में बहुत चमकता है ऐसा कहा गया है.शायद दवा बनाने वाली कंपनीया को ये सच लोगों के सामने नही आने देना चाहती है.इसी लिए इस मणि के बारे में लोगो को अज्ञात में रखा गया होगा.

काय असतो नागमणी ? जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…

काही दिवस अगोदर युट्यूबवर एक विडीओ वायरल झाला ज्यामध्ये सापाच्या डोक्यातुन एक खडा काढण्यात येतो. तथाकथित विडीओ मधे त्या खड्यास नागमणि सांगण्यात आले आहे. युट्यूब वर वेगवेगळ्या लोकांनी हा विडीओ अपलोड केला जवळपास १ करोड लोकांनी हा विडीओ बघितला व लाखो लोकांनी हा विडीओ शेअर केला आहे. आज खासरे वर बघुया काय आहे या विडीओची सत्यता…

विकीपेडीयाच्या माहितीनुसार या खड्याचा उपयोग सर्पदंश झाल्यावर उपचारासाठी करण्यात येतो. परंतु या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक दुजोरा दिलेला नाही आहे. दक्षिण भारतात हा काळसर रंगाचा खडा कोब्रा सापाच्या डोक्यावरील भागात सामान्यतः आढळून येतो. हा खडा थोडाफार चमक ही देतो. खड्याचा रंग सापानुसार वेगवेगळा असतो. परंतु हा खडा नाही हा नागमणि नसुन सापाने न वापरलेले विष काही दिवसाने स्थायु स्वरूपात रुपांतरीत होते त्यामुळे हा खडा तयार होतो. हा खडा काढल्यामुळे सापाचा मृत्यू होत नाही याला चमक असण्याचे खास कारण हे आहे की या चमकदार पणामुळे अनेक जिव त्याकडे आकर्षित होतात व साप आपला भक्ष पकडू शकतो.

काही देशात सर्पदंश झालेल्या ठिकाणावर हा खडा ठेवल्या जातो असे म्हटल्या जाते की हा खडा विष ओढुन घेतो. तसेच काही जागेवर दुध व पाण्यात हा खडा टाकुन काही वेळ ठेवल्या जातो व नंतर खडा बाहेर टाकुन पाणि पिल्याने विष शरीरातुन निघुन जातो असा समज आहे परंतु यास वैज्ञानिक मान्यता नाही. हा खडा जवळ असल्यावर साप जवळ येत नाही असाही समज आहे. परंतु हिंदू पुराणानुसार १०० वर्ष पूर्ण झालेला साप जो कोणालाही चावला नाही त्याच्या डोक्यावर खरा नागमणी तयार होतो व हा आकाराने मोठा व अंधारात प्रकाशमय असतो. कदाचीत औषधी कंपन्यांना हे सत्य समोर येऊ द्यायचे नसल्याने या खड्या विषयी सर्वाना अज्ञात ठेवले असेल.

आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका

बघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…

भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे सुपुत्र गौरव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सांगलीतील स्वरदा केळकर सोबत गौरव हे विवाहबद्ध होणार आहेत. स्वरदा या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या कन्या आहेत तर स्वरदाचे वडील हे सांगलीत व्यावसायिक आहेत.

स्वरदा केळकर या स्वतःही भाजपच्या पदाधिकारी आहेत। त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच स्वरदा या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक आहेत. राज्य सरकारने स्वरदा यांची बाल हक्क आयोगावरही नेमणूक केली आहे.

स्वरदा आणि गौरव यांची पुण्यातील डिईएस लॉ कॉलेजमध्ये ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंब एकाच पक्षाशी बांधिलकी असणारे आहेत त्यामुळे त्यांना घरून विवाहाला लगेच पाठिंबा मिळाला. स्वरदा आणि गौरव या दोघांनीही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदरच दोघांची ओळख होती. आता ही ओळख नात्यामध्ये रूपांतरित होत असल्याने दोन्ही कुटुंबाकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय.

स्वरदा यांच्या आई नीता केळकर यांनी आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. स्वरदाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रगती करत आहेत. स्वरदा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चांगली ओळख आहे. स्वरदा यांनी परदेशातही भाजपकडून विविध सेमिनारमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी थोड्याच कालावधीत भाजपच्या तरुण फळीतील आक्रमक चेहरा अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी कमी वयातच अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमीच स्वरदावर कौतुकाची थाप टाकली. स्वरदा आणि गौरव 25 फेब्रुवारीला पुण्यातील शुभारंभ लॉंन येथे विवाहबद्ध होणार आहेत. राज्याच्या विद्यमान मंत्र्याची सून यामुळे स्वरदा यांची राजकीय कारकीर्द चांगलीच बहरणार यात शंकाच नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

शिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…

नुकताच U-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. भारताने याआधी 2000, 2008 आणि 2012 साली U-19 वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व होते मुंबईच्या प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ कडे. कर्णधार पृथ्वी शॉ याने त्याच्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक अडचणींचा सामना केला आहे. पण त्याला साथ मिळाली होती ती म्हणजे एका शिवसेनेच्या नगरसेवकाची. जाणून घेऊया कोण होता तो शिवसेनेचा नगरसेवक.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर काल भारतीय संघ भारतात दाखल झाला. त्यानंतर पृथ्वी शाॅ याने अाज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पृथ्वी शॉचा मातोश्रीवर आज सत्कार करण्यात आला. पृथ्वी शॉ ला सुरुवातीपासूनच शिवसेनेकडून खूप मदत मिळाली आहे.

पृथ्वी शॉच्या वडिलांची परिस्थिती हालाखीची होती. त्याच्या वडिलांनी मात्र त्याला क्रिकेटचे धडे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पृथ्वी शॉ चे वडील सुरुवातीच्या काळात त्याला घेऊन विरार ते दादर असा प्रवास करायचे. त्यांना यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पृथ्वी आणि त्याचे वडील हा प्रवास करायचे. पृथ्वी शॉ ची मेहनत आणि जिद्द पाहून त्यांच्या मदतीला धावून आले शिवसेनेचे एक नगरसेवक. तत्कालीन नगरसेवक आणि आताचे वाकोल्यातले सेना आमदार संजय पोतनीस यांनी पृथ्वी शॉ चा सर्व खर्च उचलला. एवढेच नव्हे तर त्याला शिवाजी पार्कजवळ राहायला घरही मिळवून दिले. आमदार पोतनीस यांनी केलेली मदत पृथ्वीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

आमदार संजय पोतनीस यांनी केलेल्या या मदतीची जान आजही पृथ्वीला आहे. तो आजही सांगतो की पोतनीस यांनी त्यावेळी मदत केली नसती तर मी आज क्रिकेट खेळताना दिसलो नसतो.

उद्धव ठाकरेंनी दिल घर मिळवून देण्याचं आश्वासन-

उद्धव ठाकरे यांनी आज पृथ्वीचे कौतुक करताना त्याला घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. पृथ्वी, तू घराचं टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. अाम्ही तुला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अस उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…