श्रीदेवी आपल्या मुलीच्या नावे किती संपत्ती ठेवून गेल्या? वाचा खासरेवर..

९० च्या दशकात जेव्हा कित्येक टॉप क्लास अभिनेत्री एका चित्रपटासाठी ५० ते ६० लाख फीस स्वीकारत असत, तेव्हा श्रीदेवी यांना एक कोटी रुपयांपर्यंत फीस आॅफर केली जायची. खरं तर हा त्यांच्या स्टारडमचा जलवा होता. त्यामुळेच आज त्यांचा उल्लेख बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून केला जातो. परंतु आज ही सुपरस्टार आपल्यात नसल्याने अनेकांना श्रीदेवी यांच्या आयुष्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची जणूकाही ओढ लागली आहे. आपल्या जमान्यात सर्वाधिक कमाई करणाºया अभिनेत्रींमध्ये श्रीदेवी यांचे स्थान पहिले होते. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती.

श्रीदेवी यांनी त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमधून छाप सोडली. त्यांची ‘चांदनी’ची भूमिका अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. श्रीदेवी यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरायचा. पुढे बोनी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी बराच काळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी त्यांनी २०१२ मध्ये ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. या चित्रपटातील त्यांचा अभिनय कौतुकास पात्र ठरला. त्यांची सुदरता आणि लोकप्रियता पाहता ग्लोबल ब्रॅण्ड्सने त्यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले.

श्रीदेवी यांच्या कमाई आणि संपत्तीविषयी सांगायचे झाल्यास, त्यांच्या संपूर्ण संपत्तीवर दोन्ही मुलींचा हक्क आहे. मीडिया रिपोर्टनुसार श्रीदेवी यांच्या संपत्तीवर पती बोनी कपूर यांचा नव्हे तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या त्यांच्या दोन्ही मुलींचा अधिकार आहे. श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत मुंबईतील अंधेरी वेस्टमध्ये असलेल्या एका शानदार बंगल्यात राहायच्या. श्रीदेवी यांची १३ कोटी रुपये वार्षिक कमाई असल्याचे बोलले जाते. त्या एका चित्रपटासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये फीस स्वीकारत असत. ‘इंग्लिश-विंग्लिश’मध्ये दमदार कमबॅक केल्यानंतर त्यांच्या फीसमध्ये तब्बल २४ टक्के वाढ झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१८ पर्यंत श्रीदेवी यांची संपत्ती जवळपास २४७ कोटी इतकी आहे. श्रीदेवी या बंगले आणि आलिशान गाड्यांच्या शौकीन होत्या. त्यांनी त्यांच्या कमाईतून सात महागड्या गाड्या खरेदी केल्या होत्या. ज्यांची किंमत ९ कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. ज्यामध्ये दोन कोटी रुपयांच्या बेंटले कारचाही समावेश आहे. त्यांच्या नावे तीन बंगले आहेत. ज्यांची किंमत ६२ कोटींपेक्षा अधिक आहे. कमी बजेटच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ने तब्बल ४० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यांच्या ‘जुदाई’ आणि ‘हिम्मतवाला’ या चित्रपटांनीही जबरदस्त कमाई केली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

श्रीदेवीच्या मृतदेहावर का लावण्यात आला लेप?

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री उशिरा दुबईत निधन झाले. सुरुवातीला त्यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने नाही तर बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांकडून सांगण्यात आले. श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यांचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

दुबई पोलिसांनी काळ त्यांच्या सर्व कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर मृतदेह कुटुंबाला सुपूर्द केला. त्यानंतर तो काल भारतात आणण्यात आला. पण ते भारतात आणण्याअगोदर त्यांच्या मृतदेहावर एक विशिष्ट लेप लावण्यात आला. या मृतदेहाला लेप लावण्याच्या प्रक्रियेला एम्बॉमिंग म्हंटल जातं. खासरेवर जाणून घेऊया का लावण्यात आला श्रीदेवीच्या मृतदेहावर हा लेप…

मृतदेह हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना ही प्रक्रिया केली जाते. हे करण्यामागे अनेक कारणं असतात. खासकरून मृतदेह नेआण करताना त्याची दुर्गंधी येऊ नये, कोणाला त्यापासून काही त्रास होणार नाही, यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. या प्रक्रिया दोन प्रकारे केल्या जातात. अरटेरिअल प्रक्रियेत शरीरात रक्ताऐवजी एम्बोमिंग द्रव्य भरले जाते तर कॅव्हिटी प्रक्रियेत पोट आणि छातीचा भाग रिकामा करून त्यात द्रव्य भरले जाते.

एम्बोमिंग नंतर मृतदेह हा कॉस्मेटिक प्रक्रिया करून तयार केला जातो ज्यामध्ये मृतदेहाला अंघोळ घातली जाते, कपडे, केस ठीकठाक केले जातात. यामुळे लोकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी शक्य होते. एम्बोमिंग प्रक्रियेअगोदर मृतदेहाचे डोळे, तोंड बंद करून खालचा जबडा नीट ठेवला जातो.

ही प्रक्रिया केली नाही तर मृतदेह हाताळणाऱ्यांना त्रासदायक ठरू शकते. मृतदेहातून दुर्गंधी येऊ शकते. तसेच काही घातक वायुसुध्दा बाहेर पडतात.

अधिक वाचा: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा…
अधिक वाचा: श्रीदेवी विषयी कदाचितच तुम्हाला ह्या दहा गोष्टी माहिती असेल..
अधिक वाचा: दुबईतील लग्नात कॅमेऱ्यात कैद झाले श्रीदेवीचे शेवटचे क्षण, बघा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

देवेद्र फडणवीस यांचा नविन व्हिडीओ बनलाय ट्रोलचा विषय.. हे व्हिडीओ बघून पोट दुखेपर्यत हससाल…

मुंबई आणि राज्यातील नद्यांची अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडीओ द्वारे लोकांना नदी वाचवण्यासाठी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राज्याचे पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा दिसत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त सुद्धा या व्हिडीओमध्ये मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला नदी वाचवण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी संदेश देताना दिसत आहेत. हे गाणे अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायले आहे.

या गाण्यातील जास्तीत जास्त भाग हा बंगल्यात शूट करण्यात आला आहे. व्हिडीओ मध्ये लहान मुलं, युवक-युवती, पोलीस कर्मचारी इत्यादी जण नदी वाचचा हा संदेश देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांनी नदी वाचवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना या गण्यावरून खूप ट्रोल करण्यात येत आहे. काल सोशल मीडियावर या गाण्याने एका वेगळ्याच कारणाने धुमाकूळ घातला होता. ते म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा व्हिडीओ एडिट करून नेटीझन्सनी त्याला वेगवेगळे गाणे जोडले. काल दिवसभर हे ट्रोल व्हिडीओ चांगलेच ट्रेंडिंगला होते. ययापैकी काही गाणे तर एवढे व्यवस्थित एडिट करण्यात आले होते की ते पाहताना असे वाटते की खरच मुख्यमंत्री त्या गाण्यावर अभिनय तर करत नाहीयेत ना..

काही इंग्लिश गाणे तर काही जुने मराठी गाणे घेऊन एडिट केलेले हे व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही स्वताला हसण्यापासून आवरू शकणार नाहीत. चला तर खासरेवर बघूया काही निवडक व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जाणून घ्या उदयनराजे भोसले यांच्याकडे किती आहे एकूण संपत्ती…

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचा एक वेगळाच अंदाज आहे. त्यांना प्रेमाने लोक महाराज साहेब म्हणतात. आजही बरेचसे लोक त्यांना(अर्धवट) मुजरा करतात. सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी असलेल्या उदयनराजे भोसले यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात.

‘मला हवं तसं राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसं राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही’, असे महाराज साहेब नेहमी ठणकावून सांगतात. महाराजांचा सातारा लोकसभा मतदारसंघात नेहमीच दबदबा राहिला आहे. उदयनराजेंनी 1996 ला सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पण त्यांच्या वाट्याला त्यावेळी पराभव आला होता. त्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि 1998 ला सातारा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री पद देण्यात आले होते. 1999 आणि 2004 मध्ये 2 वेळा पराभूत झाल्यानंतर महाराजांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथेही त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पण निवडणुकांचा विषय आला की एक चर्चेचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे महाराजांची संपत्ती. खासरेवर जाणून घेऊया उदयनराजेंची संपत्ती…

उदयनराजे भोसले यांनी संपत्ती-

उदयनराजे भोसले यांची एकूण संपत्ती किती हा प्रश्न अनेकांना पडतो. उदयनराजेंनी 2009 च्या लोकसभा निवडणूकीत अर्ज भरताना दिलेल्या संपत्तीच्या तपशीलानुसार उदयनराजेंची संपत्री त्यावेळी 12 कोटीच्या आसपास होती. पुढे 2014 साली अर्ज भरताना यामध्ये वाढ होऊन महाराजांची संपत्ती ही 14 कोटी झाली. उदयन महाराजांना गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे जिप्सी, अंबेसिडर, स्कोडा आणि अनेक त्यांच्या आवडत्या कार आहेत.

महाराजांच्या संपतीमध्ये 4 कोटी रुपये किंमत ही जागा आणि शेतीची आहे तर 3 कोटी रुपये हे ज्वेलरीचे आहेत. शिवरायांचे तेरावे वंशज असल्याने त्यांचे जवळपास 11 हजार 470 एकर जमिनीवर भोगवटादार म्हणून नाव आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

शेतकऱ्याला चावला साप, रागात शेतकरीही चावला सापाला, पुढे जे झाले ते धक्कादायक आहे…

सध्या उत्तर प्रदेशात घडलेल्या एक घटनेची सर्वत्र खूप चर्चा होत आहे. घटनाही तशी मजेदार आहे. झालं असं की एक शेतकरी आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेला. तिथे त्याला एका सापाने चावले. सापाने चावल्याने तो शेतकरी घाबरला आणि खूप रागावला. त्याने तो राग त्या सापावर असा काही काढला की त्याने त्या सापाला जिवंत चावलं ज्यामुळं सापाचा मृत्यू झाला. पण साप चावल्याने त्या शेतकऱ्याला मात्र काहीच झाले नाही. थोडया वेळानंतर तो शेतकरी मात्र पूर्णपणे बरा झाला.

वेगवेगळ्या चॅनेलवर या घटनेविषयी वेगवेगळी माहिती देण्यात आली. सर्वप्रथम सर्व चॅनेलवर उत्तरप्रदेश मधील सोनेलाल नामक या शेतकऱ्याला सापाने चावल्याची माहिती दिली गेली. नंतर काही चॅनलवर सांगितले गेले की या शेतकऱ्याने सापाचा फणा चावला तर काहींनी सांगितले की या शेतकऱ्याने पूर्ण सापाच चावून टाकला. तर कुठे सांगण्यात आले की या शेतकऱ्यामध्ये रोग प्रतिकारक क्षमता खूप आहे. त्यामुळे साप चावून त्याला थोडाही फरक पडला नाही. पण ही सर्व माहिती कशी खोटी आहे जाणून घेऊया खासरेवर…

सोनेलालने चावलेल्या सापाचे जे फोटो समोर आले आहेत त्यामध्ये तो साप हा एक अजगर असल्याचे दिसते, जो को बिनविषारी आहे. सोनेलाल यांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की त्यांनी सापाचा मागच्या बाजूचा थोडाच भाग चावला होता. पण सोशल मीडियावर पसरवले गेले की सोनेलाल यांना साप चावल्याने ते विष त्यांच्या शरीरात पसरले त्यानंतर ते सापाला चावल्याने सापाच्या शरीरात गेले आणि साप मेला.

सोनेलाल यांना साप चावल्यानंतर फक्त 3 तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. या गोष्टीचे दोन पुरावे आहेत. पहिला म्हणजे अजगराचा फोटो आणि दुसरा डॉक्टरांच स्टेटमेंट ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की सोनेलाल यांना चावलेल्या अजगराचे विष त्यांच्या शरीरात गेलेच नाही.

सोशल मीडियावर अशा प्रकारे अनेक अफवा पसरवल्या जातात. ही माहिती शेअर करून या घटनेची सत्यता लोकांपर्यंत पोहचवा…

अबब प्रत्येक घरी बुलेट व तब्बल १४० फॉर्च्युनर कार असेलली महाराष्ट्रातील ग्रामपंचायत…

एक काळ असा होता की एखाद्या खेडेगावात एखादी महागडी कार जसे की फॉर्च्युनर वगैरे दिसली तर लोकं अक्षरशः कुतूहलाने त्या गाडीला बघायला जायचे. खेड्यातील एखाद्या व्यक्तीकडे अशी गाडी असणे म्हणजे पर्वणीच. पण सध्या मात्र हे सर्व बदलताना दिसत आहे. कारण अहमदनगर जिह्यातील एका गावाची ओळखच फॉर्च्युनर गाडीचे गाव अशी बनली आहे. फॉर्च्युनरच्या सोबतीला गावात लाखालाखाच्या नव्या महागड्या गाड्या सुद्धा अनेकांनी खरेदी केल्या आहेत. जाणून घेऊया हे अहमदनगरचे एक खेडेगाव कसे बनले फॉर्च्युनरगाडीचे गाव.

हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील धोत्रे गाव. या गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की गावात चांगले रस्ते सुद्धा नाहीत. कच्चे आणि आबडधोबद रस्ते गावात जाताना आणि गावात सुद्धा आहेत. पण बहुचर्चित समृद्धी महामार्गाने या गावाला एक वेगळीच ओळख दिली आहे. या गावातील लोकांची जीवनशैली एवढी बदलून गेली आहे की इथे गाड्या घेण्याची अक्षरशः चढाओढ लागली आहे.

समृद्धी महामार्गामुळे गावात एकापेक्षा महागड्या गाड्या धावू लागल्या आहेत. सध्या धोत्रे गावात 1-2 नव्हे तर तब्बल 114 बुलेट गाड्या खरेदीसाठी बुक झाल्या आहेत. गावातील अनेकांची बरीच जमीन महामार्गात गेली आहे. गावातील बहुतांश समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या घरी फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या आणि मुलांना शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी नव्या कोऱ्या बाईक घेतल्या आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

करोडोंची मालकीण असलेल्या नीता अंबानी यांच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, बघा व्हिडीओ…

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी असल्याने नीता अंबानी यांना आपण सर्वजण जाणतो. त्यांना देशातील सर्वात श्रीमंत महिला मानले जाते. त्यांनी स्वतःही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लाइफस्टाइलची चर्चा नेहमीच होत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या दिवसाच्या खर्चाविषयी माहिती दिली होती. तेव्हा पण त्या चांगल्याच चर्चेत आली होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे नीता अंबानी या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहेत. पण सध्या त्या एका दुसऱ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. त्यामागचं कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्यांचा डान्सचा व्हीडीओ.

नुकतेच आयपीएलच्या 11 व्या सिजनसाठी खेळाडुंचा लीलाव पार पडला. यावेळी नीता अंबानी आणि प्रीती झिंटा या बोली लावण्यात आघाडीवर होत्या. पण सध्या मात्र मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी त्यांच्या डांसमुळे चर्चेत आल्या आहेत.

तुम्हाला जाणून हैरानी होईल की या व्हीडीओ मध्ये त्या मैदान किंवा एखाद्या कार्यक्रमात नाहीत आणि त्या एखाद्या बिझनेस मीटिंग मध्ये सुद्धा नाहीयेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडीओ मध्ये नीता अंबानी या गुजराती गाणे हे शुभारंभ वर गरबा करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही महिला आणि बॉलीवूड स्टार जुही चावला ही सुद्धा त्यांच्या सोबत दिसत आहे. यापूर्वी सुद्धा नीता अंबानी यांच्या डान्सचा व्हीडीओ अनेकवेळा व्हायरल झाला आहे.

बघा व्हायरल झालेला व्हीडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

बुरी फंसीं प्रिया प्रकाश वारियर, गाने के आपत्तिजनक बोल को लेकर दर्ज कराई FIR

सोशल मीडिया पर सेंसेशन मचाने वाली प्रिया प्रकाश वारियर के खिलाफ हैदराबाद पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाई गई है. ‘ओरु अदर लव’ फिल्म में डेब्यू करने जा रही प्रिया प्रकाश के खिलाफ एक शख्स ने मुस्लिम भावनाओं को आहात करने के चलते पुलिस कंप्लेंट दर्ज करवाई है. रातों रात अपने एक गाने से फेमस हुईं प्रिया की मुसीबतें बढ़ती दिखाई दे रही हैं. उनकी फिल्म ‘ओरु अदर लव’ के गाने ‘मानिका मलयारा पूवी’ के शब्दों मुस्लिम भावनाओं को ठेस पहुंचाते हैं.

सोशल मीडिया पर सुर्खियां बटोरने वाली मलयालम एक्ट्रेस प्रिया प्रकाश वारियर इस बार अपने एक्सप्रेशन के लिए नहीं बल्कि कानूनी पेंच के लिए सुर्खियों में छाई हुई हैं. हैदराबाद के फारुक नगर स्थित पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाई गई है. प्रिया पर शिकायत उनकी फिल्म के गाने को लेकर दर्ज करवाई गई है. कुछ युवकों का कहना है कि मलायलम भाषा के गाने में आपत्तिजनक शब्दों का प्रयोग किया गया है. जो धर्म विशेष की भावनाओं को ठेस पहुंचाते हैं.

गौरतलब है कि प्रिया प्रकाश ने बीते हफ्ते सोशल मीडिया पर अपने एक्सप्रेशन से तहलका मचा रखा था. उनकी तस्वीरें और तरह तरह के मीम सोशल मीडिया पर वायरल हो रहे थे. प्रिया प्रकाश वारियर मलायलम फिल्म ओरु अदर लव से फिल्मी जगत में डेब्यू करने जा रही है. उनकी ये फिल्म 3 मार्च 2018 को रिलीज होगी. हाल में ही फिल्म का ‘मानिका मलयारा पूवी’ गाना रिलीज हुआ था जिसे काफी पसंद किया गया है.

बापरे प्रिया वरीअर विरोधात पोलीस तक्रार.. वाचा काय आहे कारण

लाखो तरुणाच्या ह्रद्ययाचा ठोका चुकवणाऱ्या प्रिया वरीअरने इंटरनेटवर दोन दिवस धुमाकूळ घातला. मागचे 2 दिवस इंटरनेटवर सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय बनलेले आहे तिचे नुकतेच रिलीज झालेले मल्याळम गाणे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड वायरल झालेला आहे. या गाण्यातील मुलीने आपल्या हटके एक्सप्रेशनने अनेक लोकांना भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ रिलीज होऊन काही तासच उलटले असताना या व्हिडीओला करोडो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे.

परंतु प्रिया वारियरच्या विरोधात आज हैद्राबाद येथील फलकनुमा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या मागे कारण हि भयंकर आहे. हि तक्रार मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यांच्या मते प्रियाने मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. याचे स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले आहे कि, प्रियाचा सिनेमा ओरु आदर लव्ह या सिनेमातील गाणे चुकीच्या वाक्याच्या उपयोग करण्यात आला आहे. हे गाणे माणिक्य मालार्य पूर्वी ह्याने लिहलेले आहे. ज्यामध्ये मुस्लीम समाजाचे मुहम्मद पैगंबर आणि त्यांची पत्नी खादिजाह बिवी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधाने वापरली आहेत. परंतु सिनेमाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी हा दावा फेटाळून लावलेला आहे.

मोहमद अबुद्ल मुक़िक्द खान व काही मुस्लीम तरुणा मार्फत कलम २९५अ अंतर्गत प्रियाच्या या गाण्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. यावर पोलीस अधिकार्याने तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे. या गाण्यावर बंदी आणण्याची या युवकामार्फत मागणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या तरुणांना मल्याळम भाषा येत नसून त्यांनी सांगण्यावरून हि क्म्प्लेंत नोंद केल्याचे सांगण्यात येत आहे. फिल्म निर्माते सांगत आहे कि हे ओरीजनल गाणे १९७० साली आले असून परत या सिनेमात वापरण्यात आले आहे. या मध्ये काहीही आक्षेपर्ह नाही आहे. बघूया पुढे काय होते खासरेवर

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

इंटरनेटवर दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या प्रियाचा नवीन व्हिडीओ बघितला का..

लाखो तरुणाच्या ह्रद्ययाचा ठोका चुकवणाऱ्या प्रिया वरीअरने इंटरनेटवर दोन दिवस धुमाकूळ घातला. मागचे 2 दिवस इंटरनेटवर सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय बनलेले आहे तिचे नुकतेच रिलीज झालेले मल्याळम गाणे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड वायरल झालेला आहे. या गाण्यातील मुलीने आपल्या हटके एक्सप्रेशनने अनेक लोकांना भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ रिलीज होऊन काही तासच उलटले असताना या व्हिडीओला करोडो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे.

अभिनेत्री प्रिया वरीअरचा हा पहिलाच सिनेमा आहे. ओरु आदर लव्ह या सिनेमातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. प्रियाने या गाण्यात जे एक्सप्रेशन दिले आहेत खूपच खास होते. माणिक्य मलाराया पूवी असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यामध्ये प्रिया हायस्कूल मधील क्रश दाखवण्यात आली आहे. PMA जब्बार यांचे शब्द असलेलं हे गाणं शान रहमान यांनी कंपोज केले आहे तर विनीत श्रीनिवासन यांनी हे गाणं गायले आहे.

प्रियाला या गाण्यामुळे चांगलीच प्रसिध्दी मिळालेली असताना आज याच सिनेमातील तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडीओ मध्ये सुद्धा तिचे एक्सप्रेशन खूपच खास आहेत. तिच्या या एक्सप्रेशन मुळे प्रिया वरीअर हे नाव अजून काही दिवस इंटरनेटवर धुमाकूळ घालणार यात शंकाच नाही. चला तर खासरेवर बघूया प्रियाचा हा नवीन व्हीडीओ…


माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…