संजुनंतर सनी लिओनीच्या जीवनावर आधारित वेब सीरिज धुमाकूळ घालण्यास सज्ज, बघा व्हायरल ट्रेलर..

पॉर्न स्टार ते बॉलीवूडची अभिनेत्री बनलेल्या सनी लिओनीच्या जीवनावर आधारित बायोपीकच ट्रेलर काल रिलीज झाला आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून पॉर्न स्टार बनण्यापासून ते बॉलीवूड मधील एन्ट्री घेऊन अभिनय क्षेत्रात ठसा उमटवण्यापर्यंतचा तिचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. करनजित कौर कशी य पॉर्न इंडस्ट्री कडे वळली आणि काय परिस्थिती होती अशी ज्यामुळे ती इकडे ढकलली गेली. हे सर्व या वेब सिरीजद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 16 जुलैपासून एपिसोड द्वारे जी5 अँपवर ही वेब सिरिज रिलीज होणार आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे सनी लिओनीला लहानपणी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे घरात नेहमी तणावाचे वातावरण असायचे. तिच्या सौंदर्यावरून मैत्रिणींनी तिची खिल्ली उडवल्याचे देखील दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे ती खूप अपसेट झाली होती. पॉर्न स्टार बनल्यानंतर तिच्या आई वाडीलांची रिऍक्शन काय होती, हे सर्व तुम्हाला या वेब सीरिज द्वारे बघायला मिळणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कशी झाली होती धोनीची कर्णधारपदावर निवड? पवार साहेबांनी सांगितलेला किस्सा जरूर वाचा

मी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा (बीसीसीआय) अध्यक्ष असतानाची ही घटना आहे. त्या वेळी भारतीय संघाचा इंग्लंडमध्ये दौरा सुरू होता. इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. वर्ल्डकपची तयारी महत्त्वाची असल्यामुळं या दौऱ्यापासूनच निवड समितीचे सदस्य आणि आम्ही पदाधिकारी काळजी घेत होतो. संघाची कामगिरी कशी चालली आहे, हे बघण्यासाठी आणि किमान एक-दोन कसोटी सामन्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी मी लंडनला गेलो होतो. माझा मुक्काम लंडनमधल्या बकिंगहॅम पॅलेसजवळच्या टाटांच्या हॉटेलमध्ये होता.

त्या वेळी कसोटी सामन्यामध्ये एक दिवस सुटीचा असायचा. सामन्याच्या सुटीच्या दिवशी सकाळी भारतीय संघाचा कप्तान राहुल द्रविड यानं मला फोन करून ‘भेटायला यायचं आहे,’ असं सांगितलं. निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकरही तिथंच होते. ठरल्याप्रमाणं राहुल माझ्याकडं आला आणि त्यानं, धक्का बसावा असा प्रस्ताव मला दिला. त्यानं सांगितलं ः ‘‘मला कप्तानपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा; कारण कप्तानपदाच्या जबाबदारीमुळं माझ्या खेळावर वाईट परिणाम होतोय.’’ त्याला म्हटलं ः ‘‘तू हे असं काय सांगतोयस?’’ त्या कालखंडामध्ये राहुल, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे हे क्रिकेटपटू नव्या पिढीचे आदर्श होते. संघाचा परदेशदौरा सुरू असताना मध्येच संघनायकाला बाजूला करायचं, हा सगळ्यांच्या दृष्टीनं चुकीचा संदेश जाईल, याची मला काळजी लागली होती.

‘‘या दौऱ्यानंतर आपल्याला आफ्रिकेला वर्ल्डकपसाठी जायचंय आणि त्या तारखा इतक्‍या जवळ आलेल्या असताना कप्तान बदलणं मला योग्य वाटत नाही,’’ असं मी राहुलला समजावलं. राहुल मात्र आपल्या भूमिकेशी ठाम होता. नंतर मी त्याला विचारलं ः ‘‘तू कप्तानपद सोडल्यावर ते द्यायचं कुणाकडं?’’ त्यानं लगेच उत्तर दिलं ः ‘‘संघामध्ये आदराचं स्थान असलेला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. तुम्ही सांगितलं तर सचिन ही जबाबदारी घेईल.’’ आणि निवड समितीच्या अध्यक्षांनी लगेचच सचिनला बोलावून घेतलं आणि राहुलचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला.

सचिननं स्वच्छ उत्तर दिलं ‘‘पूर्वी मी कप्तानपदावर होतो; परंतु माझ्याही बाबतीत राहुलसारखाच अनुभव आहे. कप्तानपदी असताना माझ्या खेळण्यावर नक्कीच परिणाम होतो आणि ही जबाबदारी मला स्वीकारता येणं शक्‍य नाही.’’ आमच्यापुढं प्रश्न होता ‘दोन-तीन महिन्यांतच वर्ल्डकपसाठी जाताना कप्तान कुणाला करायचं?’ आणि त्याबाबतची चुकीची माहिती जर प्रसारमाध्यमांकडून प्रसारित झाली, तर त्याचा चुकीचा परिणाम खेळावर होण्याची शक्‍यता होती. आम्ही सचिनला विचारलं ः ‘‘तुम्ही दोघं नाही म्हटल्यावर आता हे पद द्यायचं तरी कुणाकडं?’’ सचिननं क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं ः ‘‘कदाचित तुम्हाला माझी मतं पटणार नाहीत. निवड समिती त्याबद्दल काय म्हणेल, ते मला माहीत नाही; पण सध्या संघात मला तसा एकच खेळाडू दिसतो, जो ही जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावू शकेल… आणि त्या खेळाडूचं नाव आहे एम. एस. धोनी!’’

माझ्या मनात विचार आला, ‘झारखंडसारख्या छोट्या प्रांतातून आलेला हा खेळाडू ही जबाबदारी कशी पार पाडेल? शिवाय त्याला फार मोठा अनुभवही नाही.’ सचिननंच पुढं मला सांगितलं ः ‘‘पवारसाहेब, आमच्या संघात त्याच्याबद्दलची भावना खूप चांगल्या प्रकारची आहे. निवड समितीनं विचार करून संघाचं नेतृत्व धोनीकडं दिलं, तर मी खात्रीनं सांगतो, की देशाच्या क्रिकेटच्या यशामध्ये जास्तीत जास्त यश मिळवणारा, टीमला नेहमी बरोबर ठेवणारा आणि मैदानामध्ये संघ अडचणीत आला, तर उत्तम खेळ करून दाखवणारा असा हा खेळाडू आहे. त्याच्या तुलनेत दुसरा कुणीही खेळाडू नाही. अर्थात निर्णय निवड समितीनं घ्यायचा आहे; पण मी माझं मत मांडलं आहे.’’ त्यानंतर दिलीप वेंगसरकर, बिंद्रा आणि अन्य सहकाऱ्यांच्या कानावर मी ही सगळी बातमी घातली आणि यथावकाश धोनीची कप्तान म्हणून निवड झाली. त्यानंतरचा सगळा इतिहास, हा निर्णय कसा बरोबर होता, ते दाखवणाराच आहे.

राहुल काय… सचिन काय… सौरव गांगुली काय… हे आपापल्या परीनं उत्तम खेळाडू तर होतेच; पण त्यांची दृष्टी सबंध देशाचं प्रतिनिधित्व करत असताना किती व्यापक होती, याचाच प्रत्यय आला. या सर्वांनी प्राधान्यानं भारतीय संघाचा विचार केला. स्वतःपलीकडं देशाचं मोठेपण जपणारे हे सर्व खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेटचा मौल्यवान ठेवा होय!
-शरद पवार साहेब

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

नाना पाटेकर यांनी का नाही केले आता पर्यंत संजय दत्त सोबत एकाही सिनेमात काम?

संजू चित्रपटाच्या माध्यमातून सध्या संजय दत्त याच्या जीवनातील अनेक पैलू ची चर्चा होत आहे. सर्व अभिनेते संजय दत्त विषयी प्रेम दाखवत आहेत.पण एक अभिनेता असा आहे जो संजय दत्त थोडेही पसंद करत नाही आणि आता पर्यंत त्याने कधीच संजय दत्त सोबत एक ही चित्रपट केला नाही. तर तो अभिनेता म्हणजे नाना पाटेकर.. तर आपण जाणून घेऊया की कशामुळे नाना पाटेकर हे संजय दत्त सोबत काम करत नाही आणि या पुढेही का करणार नाहीत.

नाना पाटेकर हे अभिनयासोबतच त्यांच्या सामाजिक भूमिकेबद्दल ही अत्यंत प्रसिद्ध आहेत. नाम संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे असो..वेगवेगळ्या माध्यमातून नाना हे सामाजिक काम करत असतात. पण त्यांनी संजय दत्त सोबत अभिनय किंवा काम न करायचा निर्णय हा सामाजिक भावनेतून घेतला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोट मध्ये शकडो लोकांचे बळी गेले. या बॉम्बस्फोटात नाना पाटेकर यांचा चुलत भाऊ ही वारला. तसेच त्यांची पत्नी बॉम्बस्फोटातून बाल बाल बचावली. त्यांच्या पत्नी बॉम्बस्फोट झालेल्या बस मध्ये बसायच्या ऐवजी ती बस चुकली म्हणून पाठीमागील बस मध्ये बसल्या. यातून त्या बचावल्या पण नाना पाटेकर यांना मुंबई बॉम्बस्फोटातील पीडितांच्या दुःखाची जाण आहे.

1993 च्या बॉम्बस्फोट मध्ये संजय दत्त चा अप्रत्यक्ष जरी सहभाग असला तरी संजय दत्तने देश प्रेम दाखवले असते तर शेकडो लोकांचे प्राण त्याने वाचवले असते.पण त्याने ते केले नाही. नाना पाटेकर यांनी तेव्हाच ठरवले की मी कधीच संजय दत्त सोबत कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही. आणि आता पर्यंत त्यांनी ते पाळले आहे व यापुढेही ते संजय दत्तसोबत काम करणार नाहीत. नाना पाटेकर यांची ही भूमिका मुंबई बॉम्बस्फोटातील पीडित लोकांच्या नातेवाईकबद्दल ची सहानुभूती आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांनी आता पर्यंत संजय दत्तच्या चित्रपटावर बहिष्कार घातलेला आहे.

आपल्याला नाना पाटेकर यांची संजय दत्त सोबत काम करायची भूमिका मान्य आहे की नाही माहिती नाही पण जे कोणी बॉम्बस्फोटातील पीडित आहेत त्यांचा व त्यांच्या नातेवाईकांचा नाना अस्सल जीवनातील हिरो आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

या शेतकऱ्याने वयाच्या 8 व्या वर्षी बघितले होते मर्सिडीजचे स्वप्न, तब्बल 88 व्या वर्षी घेतली मर्सिडिज-बेंझ..

शेती करून आपल्या आवडी निवडी जोपासणे शेतकऱ्यांना मोठं कठीण काम आहे. शेतीवर अवलंबून राहून मोठी स्वप्न बघणं आनी ती पूर्ण करणं खूप अवघड आहे.आजच्या घडीला शेतीच्या उत्पन्नावर मोठी स्वप्न पूर्ण होऊच शकत नाहीत. पण चेन्नईमधील एका शेतकऱ्याने वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी एक स्वप्न पाहिले होतं आणि त्याने पाहिलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात देखील उतरवलंय. हे स्वप्न आहे लहानपणी पाहिलेल्या मर्सिडिज गाडीचं. त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ही आलिशान गाडी पाहिली तेव्हाच एक दिवस त्यात बसण्याचा निर्धार केला. पण त्यांना हे पूर्ण करण्यासाठी तब्बल 80 वर्ष वाट बघावी लागली.

तामिळनाडू मधील एका खेड्यातील हे शेतकरी आहेत. देवराजन असं या शेतकऱ्याचं नाव आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी मर्सिडीज बेंझ बी-क्लास ही लक्झरी कार विकत घेतली आहे. ग्रामीण भागातून असल्याने त्यांना लहानपणी या गाडीबद्दल थोडीशीही माहिती नव्हती. कारण खेड्यात सायकल किंवा बैलगाडी हीच प्रवासाची साधने. पण त्यांनी कुठेतरी ही मर्सिडिज कार पाहिली, तेव्हा त्यांना ही कार कोणत्या कंपनीची आहे, हे ही माहिती नव्हतं. त्यांनी त्यावेळी फक्त मर्सिडिजचा वर्तुळातील त्रिकोणी चांदणी लक्षात ठेवली. हा लोगो जगप्रसिद्ध मर्सिडिज कार कंपनीचा आहे हे समजल्यावर त्यांनी ती गाडी एक दिवस विकत घ्यायचीच हे ध्येय निश्चित केलं आणि आज 88 व्या वर्षी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.

मर्सिडिज कार विकत घेण्यासाठी चेन्नईतील मर्सिडिज शोरूम कर्मचाऱ्यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी देवराजन यांचं खास आदरातिथ्य केलं.

देवराजन आपल्या पत्नीसह आपल्या स्वप्नातील कारच्या डिलीव्हरीसाठी चेन्नईतील ट्रान्स कार या मर्सिडिज शोरूममध्ये गेल्यावर त्यांच्यासाठी केक मागवण्यात आला. त्यांना त्यांच्या गाडीची चावीही समारंभपूर्वक देण्यात आली. हा सर्व समारंभ चित्रित करण्यात आला. ट्रान्स कार या मर्सिडिज शोरूमने हा सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरही प्रकाशित केलाय. या व्हिडीओ मध्ये देवराजन यांच्या चेहऱ्यावरील स्वप्नांपूर्तीचा आनंद दिसतो. ददेवराजन यांना या स्वप्नांपूर्तीसाठी त्यांच्या पत्नीने मोलाची साथ दिली.

लहानपणी बैलगाडीतून सुरू झालेला प्रवास तब्बल 80 वर्षांच्या खडतर कष्टानंतर मर्सिडिज पर्यंत येऊन पोहोचला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सैराटचे ‘याड लागलं’ चे हिंदी धडक मधील रुपांतर ‘पहली बार’ गाणं रिलीज आपण पाहिले का ??

सैराट चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या धडक चित्रपटातील आता पर्यंत दोन गाणी रिलीज झाली आहेत. सैराट चित्रपटातील झिंगाट हे प्रसिद्ध गाणे हिंदी मध्ये करण्यात आले पण त्या गाण्याबाबत प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. आता तिसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. सैराट च्या मराठी गाण्याल प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. आता हिंदी मधील पहिली बार या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्साक्याचे ठरेल.‘धडक’मध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. ‘पहली बार’ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

बोटे दाखवून सेल्फी घेणे पडू शकते अत्यंत महागात ?? काय आहे वायरल सत्य वाचा

सोशल मीडियावर सध्या एक संदेश वायरल होतो आहे त्यामध्ये आपल्याला धक्का बसेल अशी माहिती आहे. प्रत्येकजण सेल्फी च्या आहारी गेला आहे. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण कधी ना कधी सेल्फी काढत असतात. तरुण तरुणी तर सेल्फी साठी क्रेजी असतात. सतत वेगवेगळ्या पोज मध्ये सेल्फी घेऊन त्या सोशल साईट वर पोस्ट केले जातात.पण आता सेल्फी मध्ये बोट दाखवणे आपल्यासाठी अत्यंत घातक असणार आहे. जाणून घ्या काय आहे सत्य.

व्हाटसअप वरून काय मेसेंज वायरल होतोय ते थोडक्यात पहा .. आपण जर बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर आपल्यासाठी हि गोष्ट महागात पडणार आहे. आपण कधी विचार केला नसेल कि सेल्फी मध्ये आपण बोटे दाखवल्याने त्या बोटांचे फिंगर प्रिंट चोरी करून आपली ओळख चोरल्या जाऊ शकते. आपल्या फोटोतील बोटांचे क्लिअर फोटो असतील तर त्यापासून काही सोफ्टवेअर च्या मदतीने फिंगर प्रिंट्स चोरल्या जातात व त्यांचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी केला जाऊ शकतो. बँक खाते आधार कार्ड इत्यादी करिता फिंगर प्रिंट्स महत्वाचे असतात. आपल्या बोटांच्या ठशाचा वापर सायबर चोरटे वेगवेगळ्या गोष्टी करिता करू शकतात. त्यामुळे आपण बोट दाखवत सेल्फी काढू नये. नाहीतर आपल्याला याची मोठी किमत मोजावी लागेल.

वरील मेसेंज बाबत आम्ही सत्यता तपासली असता या मेसेंज मध्ये तथ्य आहे हे निदर्शनास आले आहे. चांगल्या मोबाईल किंवा कॅमेरा मधून आपण बोटासहित फोटो घेतला तर आपल्या बोटांचे ठसे चोरल्या जाऊ शकतात. याच्या साठी काही सोफ्टवेअर आहेत ज्याच्या माध्यमातून बोटांचे ठसे चोरता येतात व त्या ठशांची थ्रीडी प्रिंट काढून ते वापरली जाऊ शकतात. हे आपल्यासाठी अत्यंत घातक आहे. आपण सेल्फी घेताना बोटांचे ठसे दिसतील अशा प्रकारची सेल्फी घेऊ नये किंवा उलट्या बाजूने बोटे करूनही आपण सेल्फी घेऊ शकतात.आता सेल्फी घेताना आपण सावध राहायला हव कधी आपल्या फोटोचा वापर कोणी अनुचित गोष्टी करिता करू नये.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

संजू चित्रपटाबद्दल नामवंत वकील उज्वल निकम यांनी उपस्थित केलेत काही प्रश्न अवश्य वाचा

संजय दत्त वरील संजू या चित्रपटाबद्दल सर्वसामान्य माणसाला बरीच उत्सुकता आहे.काय वास्तव आहे हे त्यांना माहिती करून घ्यायचे आहे. पण सध्या चित्रपटातून संजय दत्त ची एकच बाजू दाखवली जात आहे. ज्यामधून संजय दत्तच्या जीवनातील वास्तव प्रसंग गाळून संजय दत्त ला पूरक तेवढे प्रसंग घेण्यात आले आहेत. १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींच्या विरोधात खटला लढणारे देशद्रोह्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळख असणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. निकम यांनी संजय दत्त विरोधातील खटला सुद्धा लढवला आहे.त्यामुळे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामधून आपल्याला वास्तव माहिती मिळेल.

सात हँडग्रेनेड्स चित्रपटाच्या कथानकातून का लपवले ?
‘मला आणि वडिलांना धमकी आल्यानंतर मी स्वसंरक्षणाकरिता एके ५६ रायफल घरात ठेवली होती’ ही आरोपीची गुन्ह्यातील कबुली या चित्रपटात दाखवली असून हे वास्तव आहे. परंतु या खटल्यादरम्यान पुढे आलेल्या पुराव्यांनुसार, १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता, त्यातून त्याने ५ एके ५६ रायफल्स व ७ हँडग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरात ठेवल्या हे या चित्रपटात का लपवण्यात आले? काही दिवसांनंतर एक रायफल संजय दत्तने स्वत:कडे ठेवून बाकीच्या सालेमला परत केल्या, हे का दाखवले नाही. चरित्र चित्रपटात वास्तव गोष्टींचा उल्लेख असणे अपेक्षित असताे की गुन्ह्यावर पडदा टाकून सहानुभूती मिळवायचे असते, हे निर्माता, दिग्दर्शकांना समजू नये, हे या चित्रपटाचे दुर्दैव.

कयूमकडून घेतलेल्या पिस्तुलाचे काय?
टाडा कायद्यातील तरतुदींनुसार विनापरवाना संहारक शस्त्र ठेवणे हा गुन्हा संजय दत्तने केला होता. परंतु, न्यायालयाने या गुन्ह्यात त्यास दोषमुक्त केले आणि बेकायदा शस्त्रास्त्र कायद्याखाली शिक्षा ठोठावली. त्यावेळी चांगल्या वर्तणुकीच्या बॉण्डवर आपल्याला सोडावे ही विनंती त्याने केली होती. त्याच्या कबुलीजबाबानुसार, दाऊदचा शार्प शूटर कयूमकडून संजयने विनापरवाना पिस्तूल घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला बॉण्डवर सोडू नये, असा आक्षेप सरकारी पक्षाने घेतला होता. परंतु, कयूमकडून घेतलेल्या या पिस्तूलचा उल्लेखही चित्रपटात नाही.

स्वयं संरक्षणाचा दावा करण्यामागे उद्देश काय?
वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलिस संरक्षण होतेच. मग, संरक्षणाच्या नावाखाली ‘एके ५६’ बाळगणे हा भाबडेपणाचा बचाव आहे की त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे चित्रपटात दाखवणे आवश्यक होते. बॉम्बस्फोटापूर्वी अशी शस्त्रे व हँडग्रेनेड्स घेऊन सालेम आला होता. ही बाब संजयने पोलिसांना कळवली असती तर निरपराध २५६ लोकांची हत्या टाळता आली असती. याबद्दल त्याला आता काय वाटते, हेही चित्रपटात दाखवायला हवे हाेते.

‘दहशतवादी’ नसल्याचे कोर्टाचेच ताेंडी प्रमाणपत्र
कोणत्याही खटल्यात न्यायालय दोषी किंवा निर्दोष, एवढाच निकाल देते. संजय दत्तच्या खटल्यात मात्र ‘तू दहशतवादी नाहीस’ असे ताेंडी प्रमाणपत्र देण्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली. त्याचा पुरेपूर फायदा चित्रपट निर्मात्याने या चित्रपटात करून घेतला. संजय दत्तच्या घरी आरडीएक्स ठेवण्यात आले होते, असा आरोप पोलिसांनी कधीही केला नव्हता, परंंतु त्याचेही मीडियाच्या नावाने या चित्रपटात भांडवल करून सहानुभूती प्राप्त करून घेतली आहे.

सहानुभूती मिळवण्यात यशस्वी
मानसशास्त्रातील अभ्यासक सांगतात, की एखादा गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटला किंवा जामिनावर बाहेर आला तरी तो आपण गुन्हाच केल्या नसल्याचा आभास जनमानसात निर्माण करून आपल्या प्रती जनतेेची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी होतो. याच मानसशास्त्राच्या आधारे चित्रपट निर्मात्याने सदर अभिनेत्याबद्दल सामान्य जनमानसात सहानुभूती मिळवून दिली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

अभिनेत्या सोबत शरीरसंबंध न ठेवल्याने या अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकले होते..

बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवरून वातावरण तापलेले असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचचा खळबळजनक खुलासा केला आहे. ही अभिनेत्री काम करत असलेल्या चित्रपटातील हिरोने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, मात्र तिने नकार दिल्यानंतर तिला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे या अभिनेत्रीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

‘मर्डर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मल्लिका शेरावतने तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच झाल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटात मल्लिकाने बरीचसी प्रणयदृश्ये दिली होती. ‘मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. जर तुम्ही तोकडे कपडे घालता, स्क्रिनवर किसिंग सीन देता म्हणजे तुम्हाला नितीमत्ता सोडलेली महिला म्हणून बघितले जाते. पुरुष आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवायला लागतात. माझ्यासोबतही असे झाले आहे. मी एका हिरोला सेक्ससाठी नकार दिला म्हणून मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. त्या हिरोने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.

जर तू स्क्रीनवर माझ्यासोबत प्रणयदृश्य करू शकतेस तर मग खासगी आयुष्यातही करू शकते अशी मागणी तो करत असल्याचे, तिने सांगितले. पण त्याला मी नकार दिल्यानंतर मला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. हे असेच आपल्या समाजात घडते. आपल्या देशातील महिलांना अशाच गोष्टींना सामोरे जावे लागते, असे मल्लिकाने वृत्तसंस्थेला सांगितले.

बॉलिवूडमधल्या अशा गोष्टींचा आपण विरोध केल्याचे देखील मल्लिकाने सांगितले आहे. ‘मी एक स्वाभिमानी महिला आहे. कुठल्याही परिस्थितीशी मी तडजोड करत नाही. अनेकदा मला चित्रपटाच्याा निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी रात्री भेटायला बोलावले पण मी गेले नाही. जर मी बॉलिवूडमधल्या या प्रवाहासोबत चालले असते तर मी आज बॉलिवूडमध्ये वेगळ्या ठिकाणी असते’, असे देखील मल्लिकाने सांगितले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: ३०८ गर्लफ्रेंड बनवण्यासाठी संजय दत्त ने वापरली हि युक्ती… पहा काय होती आयडिया?
अधिक वाचा: जयडी मामीने केला खुलासा या कारणासाठी लागीर झाल जी मालिका सोडली

या नेत्याला झालंय तरी काय? गटारात लोळून मागतोय मत, वाचा गटारातुन मत मागणारा हा नेता कोण..

निवडणूक म्हणलं की आजकाल प्रचार हा खुप महत्वाचा झाला आहे. प्रचार करताना आपण केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवणे हा नेत्यांचा प्रयत्न आजपर्यंत असायचा. पण आजकाल प्रचाराचं स्वरूप बदलत चाललं आहे. प्रचारात उमेदवार आपण निवडून आल्यावर काय करू शकतो हे लोकांना पटवून देण्याऐवजी निगेटिव्ह गोष्टीचा वापर करून प्रचार करत असताना दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये मोठमोठ्या सेलेब्रिटी मंडळींना प्रचाराला बोलावण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागातील लोकं सुद्धा या प्रचाराला बळी पडल्याचे अनेकदा समोर आले आहे. मत मागण्यासाठी नवनवीन फंडे वापरलेले आजपर्यंत अनेक उदाहरणं आहेत. पण आज आपण अशा एका नेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरलेला फंडा बघून तुम्हाला हसू आवरणार नाही.

निवडणुकीच्या वेळी घरोघरी दारोदारी जाऊन नेते मंडळींना आपण मत मागताना बघतो. पण पाकिस्तानमध्ये एका नेत्याने मत मागण्याचा जो फंडा वापरला आहे तो बघून तुम्हाला हसावं का रडावं समजणार नाही. या नेत्याने चक्क गटाराच्या पाण्यात लोळत मत मागण्याचा प्रताप केला आहे. अयाज मेमन मोतीवाला असं या नेत्याचं नाव आहे. अपक्ष म्हणून मेमनवाला निवडणूक लढवत आहेत.

पाकिस्तान मध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.गगल्लोगल्ली असलेले कचऱ्याचे ढीग, जागोजागी साचणारे नाल्यातील सांडपाणी, पालिकेचे याकडे असलेले दुर्लक्ष यामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष असून जनता सत्ताधाऱ्यांमुळे त्रासली आहे. जनतेला असलेल्या या समस्या आपल्या प्रचारात वापरत त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रचाराच्या या अजबगजब पद्धतीने सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच वायरल झाले आहेत. एकप्रकारे त्यांना हा अजब फंडा वापरून प्रचारात आघाडी घेण्यात यश मिळाले आहे असच म्हणावं लागेल.

मोतीवाला यांनी कधी कचऱ्याच्या ढिगारावरून तर कधी नाल्यामध्ये उतरून भाषणं केले आहेत. त्यांनी प्रचारात ‘वोट दो सफाई लो… पाकिस्तान प्लिज हमे बचालो’ अशी टॅग लाईन वापरली आहे.

बघा मोतीवाला यांचा नाल्यात उतरून भाषण करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

समजावून घ्या सिलिंगचा कायदा आणि त्याबद्दलचे काही मुद्दे..

१) शेतजमिनीची कमाल धारणा ठरवणारा हा कायदा आहे. (शेतीव्यतिरिक्त जमिनींना असा कोणताच कायदा लागू नाही)
२) हा कायदा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे.
3) महाराष्ट्रात, एक पीक (कोरडवाहू) 54 एकर, दोन पीक (बागायत) 18 एकर व बारमाही पाणी 8 एकर, अशी कमाल जमीनधारणा निर्धारित केली आहे.
४) हा कायदा संविधानाच्या परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट केला असल्यामुळे त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही.
५) हा कायदा कंपन्यांवरही लागू आहे.
६) जगातील अपवाद सोडले तर बहुतेक देशात असा कायदा नाही.

७) या कायद्याने शेतकऱयांच्या मालमत्ता धारण करण्याच्या अधिकारावर व व्यवसाय स्वातंत्र्यावर बाधा आणली
८) शेती धंदा तोट्यात ठेवला, वरती सिलिंगचे बंधन यामुळे शेतजमिनीचे विखंडन होत गेले. आज स्थिती बिकट झाली आहे.
९) या कायद्यामुळे कर्तबगार, धाडसी व्यावसायिकांनी शेतीकडे पाठ केली.
१०) शेतीव्ययवसायाचा विकास गोठवणार्या या कायद्यामुळे शेतीत गुंतवणूक कारणाऱयांनी हात आखडता घेतला.
११) जमिनीचे क्षेत्र खूपच लहान झाल्यामुळे नवे तंत्रज्ञान पेलण्याची शक्ती राहिली नाही.
१२) गट शेतीतून जन्माला आलेल्या ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांना’ या कायद्यातून वगळले तरी भारतातील शेतीच्या पुनर्रचनेची सुरुवात होऊ शकते व हा निर्णय राज्य सरकारने करायचा आहे.

सिलिंग कायदा – काही मुद्दे

सिलिंग (1) : पक्षपात करणारा कायदा

बिगर शेतकऱयांना कितीही मालमत्ता बाळगता येते, शेतकऱ्यावर मात्र सिलिंगचे निर्बंध.
कोरडवाहू असाल तर 54 एकर पेक्षा जास्त जमीन बाळगता येत नाही, असा हा कायदा आहे.
1 कोटी रुपये एकरी भाव धरला तरी 54 एकरचे 54 कोटी होतात.(आज 54 एकरचे मालक दुर्मिळ झाले आहेत) या उलट अंबानीची मालमत्ता कित्तेक लाख कोटींची आहे, ती त्यांना खुशाल बाळगता येते!

सिलिंग (२) जमिनीवर नाही, केवळ शेतजमिनीवर आहे.

सिलिंगचा कायदा उठला तर ‘भांडवलदार’ येतील व शेतकऱयांच्या जमिनी काढून घेतील, अशी एक भाबडी समजूत आहे, ही समजुत तपासून घेण्यासाठी हे लक्षात घ्यायला हवे की, सिलिंगचा कायदा हा केवळ शेतजमिनीसाठी लागू होतो. जमिनीसाठी नाही. तथाकथित भांडवलदारांना आजही कोणाचीही व कितीही जमीन विकत घेण्यास मज्जाव नाही. अनेक करखानदाराकडे आजही हजारो एकर जमीन आहे. कोणालाही कितीही जमीन घेता येते फक्त शेतीसाठी मनाई आहे.

सिलिंग (३) भांडवल गुंतवणुकीला अडथळा

आपल्या देशात सरासरी होल्डिंग आता एक हेक्टरच्या आत आहे. ८५ टक्के शेतकरी अल्प भूधारक आहेत. शेती व्यवस्थेचे हे वास्तव भीषण आहे.

सिलिंग (४)- जमीन फेरवाटपाचे गौडबंगाल

स्वातंत्र्याची पहाट होत असतांना जमिनीच्या फेरवाटपाची मागणी पुढे आली. भूमिहीनाना जमिनी मिळाव्यात यासाठी कमाल जमीन धारणा ठरवण्याचा आग्रह सुरु झाला. भूमिहीनाना जमिनी देण्यासाठी शेतकऱ्याकडून जमिनी काढून घेणे आवश्यक होते का? मला वाटते, नाही.

सिलिंग (५) मूळ घटनेची मान्यता नसलेला कायदा

सिलिंग (6) 2 एकर कोरडवाहू जमिनीवर जगून दाखवा.

सिलिंग (7) निरर्थक भीतीचा बागलबुवा

बडे भांडवलदार येऊन गोरगरिब शेतकार्यांच्या जमिनी बाळकावतील मग हा गरीब शेतकरी भूमिहीन होऊन भुकेकंगाल होतील’ असा प्रचार बिगर शेतकरी बुद्धिवंतांकडून केला जातो, तो प्रचार अज्ञानावर आधारित आणि फसवा आहे.

अमर हबीब,
किसानपुत्र आंदोलन
8411909909

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…