बघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…

भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे सुपुत्र गौरव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सांगलीतील स्वरदा केळकर सोबत गौरव हे विवाहबद्ध होणार आहेत. स्वरदा या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या कन्या आहेत तर स्वरदाचे वडील हे सांगलीत व्यावसायिक आहेत.

स्वरदा केळकर या स्वतःही भाजपच्या पदाधिकारी आहेत। त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच स्वरदा या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक आहेत. राज्य सरकारने स्वरदा यांची बाल हक्क आयोगावरही नेमणूक केली आहे.

स्वरदा आणि गौरव यांची पुण्यातील डिईएस लॉ कॉलेजमध्ये ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंब एकाच पक्षाशी बांधिलकी असणारे आहेत त्यामुळे त्यांना घरून विवाहाला लगेच पाठिंबा मिळाला. स्वरदा आणि गौरव या दोघांनीही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदरच दोघांची ओळख होती. आता ही ओळख नात्यामध्ये रूपांतरित होत असल्याने दोन्ही कुटुंबाकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय.

स्वरदा यांच्या आई नीता केळकर यांनी आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. स्वरदाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रगती करत आहेत. स्वरदा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चांगली ओळख आहे. स्वरदा यांनी परदेशातही भाजपकडून विविध सेमिनारमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी थोड्याच कालावधीत भाजपच्या तरुण फळीतील आक्रमक चेहरा अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी कमी वयातच अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमीच स्वरदावर कौतुकाची थाप टाकली. स्वरदा आणि गौरव 25 फेब्रुवारीला पुण्यातील शुभारंभ लॉंन येथे विवाहबद्ध होणार आहेत. राज्याच्या विद्यमान मंत्र्याची सून यामुळे स्वरदा यांची राजकीय कारकीर्द चांगलीच बहरणार यात शंकाच नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

शिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…

नुकताच U-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. भारताने याआधी 2000, 2008 आणि 2012 साली U-19 वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व होते मुंबईच्या प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ कडे. कर्णधार पृथ्वी शॉ याने त्याच्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक अडचणींचा सामना केला आहे. पण त्याला साथ मिळाली होती ती म्हणजे एका शिवसेनेच्या नगरसेवकाची. जाणून घेऊया कोण होता तो शिवसेनेचा नगरसेवक.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर काल भारतीय संघ भारतात दाखल झाला. त्यानंतर पृथ्वी शाॅ याने अाज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पृथ्वी शॉचा मातोश्रीवर आज सत्कार करण्यात आला. पृथ्वी शॉ ला सुरुवातीपासूनच शिवसेनेकडून खूप मदत मिळाली आहे.

पृथ्वी शॉच्या वडिलांची परिस्थिती हालाखीची होती. त्याच्या वडिलांनी मात्र त्याला क्रिकेटचे धडे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पृथ्वी शॉ चे वडील सुरुवातीच्या काळात त्याला घेऊन विरार ते दादर असा प्रवास करायचे. त्यांना यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पृथ्वी आणि त्याचे वडील हा प्रवास करायचे. पृथ्वी शॉ ची मेहनत आणि जिद्द पाहून त्यांच्या मदतीला धावून आले शिवसेनेचे एक नगरसेवक. तत्कालीन नगरसेवक आणि आताचे वाकोल्यातले सेना आमदार संजय पोतनीस यांनी पृथ्वी शॉ चा सर्व खर्च उचलला. एवढेच नव्हे तर त्याला शिवाजी पार्कजवळ राहायला घरही मिळवून दिले. आमदार पोतनीस यांनी केलेली मदत पृथ्वीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

आमदार संजय पोतनीस यांनी केलेल्या या मदतीची जान आजही पृथ्वीला आहे. तो आजही सांगतो की पोतनीस यांनी त्यावेळी मदत केली नसती तर मी आज क्रिकेट खेळताना दिसलो नसतो.

उद्धव ठाकरेंनी दिल घर मिळवून देण्याचं आश्वासन-

उद्धव ठाकरे यांनी आज पृथ्वीचे कौतुक करताना त्याला घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. पृथ्वी, तू घराचं टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. अाम्ही तुला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अस उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

रोहित शेट्टीने खरेदी केली नविन गाडी, बघा किती आहे किंमत…

बॉलीवूडचा सुप्रसिद्ध डायरेक्टर आणि प्रोड्युसर रोहित शेट्टीचे कारप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या जास्तीत जास्त सिनेमात अनेक कठीण स्टंट असतात ज्यामध्ये कारचा खूप जास्त वापर केला जातो. रोहित एक चांगला कार ड्रायव्हर सुद्धा आहे. नुकतेच रोहितने एक महागडी लग्जरी कार खरेदी केली आहे, जी त्याने स्वतःलाच गिफ्ट दिली आहे. रोहितने इटलीच्या प्रसिद्ध कंपनी मासेरातीची ग्रॅण्डटुरिज्मो स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे.

रोहितने खरेदी केलेली गाडी अनेक अत्याधुनिक फीचर्सने सज्ज आहे. ही गाडी तिच्या लुकमुळे अनेकांच्या पसंतीस उतरते. भारतामध्ये अजय देवगन, अर्जुन कपूर, सुशांत सिंग राजपूत आणि सनी लिओनी या सेलेब्रिटी कडे मासेराती कंपनीच्या गाड्या आहेत. रोहित शेट्टी सुद्धा आता या लिस्टमध्ये सामील झाला आहे.

गाडीमध्ये 4.7 लिटरचे दमदार V8 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7000 RPM वर 453 BHP पावर आणि 4750 RPA वर 520 न्यूटन मिटर टॉर्क जनरेट करते. या गाडीची भारतातील एक्स शोरूम किंमत व1.80 कोटी आहे. Maserati GranTusrismo Sport ही कार फक्त 4.8 सेकंदात 0-100 किमी प्रति तासचा स्पीड पकडते. या गाडीचा टॉप स्पीड 299 किमी प्रति तास आहे.

या गाडीमध्ये 8.4 इंचचा मासेराती टच कंट्रोल प्लस इन्फोटेन्मेंट सिस्टम दिली गेलीये. सुरक्षा आणि परफॉर्मन्सच्या दृष्टिकोणाने या गाडीमध्ये अनेक विशेष फीचर्स देण्यात आलेले आहेत. ही गाडी Aston Martin V8 vintage S, Audi R8 V10 plus, Porsche 911 Turbo आणि Jaguar F-Type R या गाड्यांना ही कार टक्कर देणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

३.५ कोटी रुपयाच्या कारमध्ये फिरणारा शेतकरी, वाचा खासरे माहीती…

व्हाट्सएप अन फेसबुकवर सध्या एक फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे. हा फोटो आहे एका शेतकऱ्याचा. हा साधासुधा शेतकरी नाहीये तर हा चक्क 3.5 कोटींच्या गाडीत फिरणारा शेतकरी आहे. सोशल मीडियावर सध्या रोल्स रॉयस या महागड्या कार सोबत उभा राहिलेल्या एका शेतकऱ्याचा फोटो प्रचंड वायरल झाला आहे. जाणून घेऊया कोण हा शेतकरी खासरेवर…

सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले हे व्यक्ती आहेत पुण्यातील कोंढापुरी गावचे शेतकरी आणि उद्योजक विजय गायकवाड. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावचे ते एक अत्यंत प्रगतशील शेतकरी आहेत. विजय गायकवाड यांच्या यशाच्या मागे त्यांच्या वडिलांचे विशेष कार्य आहे. त्यांचे वडील काही वर्षांपूर्वी पुण्यात व्यवसायासाठी गेले. तिथे त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसला. कोंढापुरीच्या एका शेतकऱ्याने पुण्यात येऊन व्यवसायात भरारी घेतली होती. माणिकराव गायकवाड यांनी व्यवसायात घेतलेली भरारी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभराटी साठी कारणीभूत ठरली.

पुणे-नगर रस्त्यावर असलेले हे गाव 20-25 वर्षांपूर्वी फक्त माळराने आणि कोरडवाहू शेतीचे गाव होते. पण इथल्या लोकांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता जवळच असलेल्या पुणे शहरात व्यवसायात पाय रोवले. शेतीबरोबर व्यवसाय करून ही गाव इतरांसाठी प्रेरणा बनले आहे. अनेक शेतकऱ्यांचे स्वतंत्र भव्य बंगले, बंगल्यापुढे चारचाकी गाड्या असा थाट इथल्या शेतकऱ्यांचा आहे.

विजय गायकवाड यांनी आपल्या व्यवसाय आणि शेतीच्या बळावर 3.5 कोटींची रोल्स रॉयस ही भव्य कार घेतली त्यावेळी ते पूजा करण्यासाठी गावात आले होते. पूजेसाठी त्यांनी पारंपरिक शेतकऱ्याचा पायजमा आणि शर्ट घातला होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पूजा करतानाचेच आहेत. विजय गायकवाड यांच्या या गाडीमुळे मात्र कोंढापुर गाव आणि त्यांचे कुटुंबीय चांगलेच चर्चेत आले आहे.

कशाची करतात शेती-

विजय गायकवाड यांच्या यशात महत्वाची भूमिका राहिली आहे ते करत असलेल्या नैसर्गिक शेतीची. नैसर्गिक शेतीमुळेच विजय गायकवाड हे एवढ्या महागड्या गाड्या घेण्यासाठी आणि त्या वापरण्यासाठी सक्षम बनले आहेत. इतर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती करण्यासाठी ते प्रेरणास्रोत बनले आहेत. विजय गायकवाड यांच्याकडे रोल्स रॉयसशिवाय ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज या महागड्या कारसुद्धा आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

शिवस्मारक होणार नाही म्हणणारे राज ठाकरे यांना उदयनराजे यांचे जबरदस्त प्रतीउत्तर..

राज ठाकरे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात होऊ शकत नाही असे वक्तव्य केले होते. त्याचा आज खासदार उदयनराजे यांनी त्याचा समाचार घेतला. ‘डोक्यातून नव्हे हृदयातून करायचं ठरवलं तर का होऊ शकत नाही,’ असे प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा ‘सत्तेत असणाऱ्यांनी शिवाजी महाराजांचे स्मारक होणार असे स्वप्न दाखवले आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही, स्मारकाचे फक्त स्वप्न असल्याचे स्टेटमेंट त्यांनी केले होते. राज ठाकरे सातत्याने शिवस्मारक आणि मराठा आरक्षण याला विरोध करत आले आहेत. यावेळी उदयनराजे यांनी राज ठाकरेंना प्रतिउत्तर दिल्याने त्यांची भूमिका बदलेल अशी अपेक्षा शिवप्रेमीना आहे..

‘राज ठाकरे माझा मित्र आहे पण तो कोणत्या अँगलने बोलला हे माहीत नाही. आपण सारे लोकशाहीतील राजे आहोत. त्यामुळे स्मारक होईलच. अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकते तर शिव स्मारक का होणार नाही, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. शिवाजी महाराज हे स्वराज्यासाठी लढले त्यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये ३५० किल्ले बांधले आपल्याला एक घर बांधायला कसे कष्ट पडतात तर शिवरायांनी त्याकाळात हे किल्ले कसे बांधले असतील .. जगात अनेक योद्धे होऊन गेलेत पण छत्रपती शिवरायांच सर्व लोक देव्हाऱ्यात ठेवून पूजतात.. देवासारखे मानतात..शिवरायांचे भव्य दिव्या स्मारक व्हायलाच हवे ..
काय बोलले उदयनराजे पहा

‘राज ठाकरे माझा मित्र आहे पण तो कोणत्या अँगलने बोलला हे माहीत नाही. आपण सारे लोकशाहीतील राजे आहोत. त्यामुळे स्मारक होईलच. अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकते तर शिव स्मारक का होणार नाही, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

लागीर झालं जी मधील राहुल्याने घेतली महागडी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल…

राहुल्या म्हणजेच राहुल मगदूम हा लागीर झाल जी मालिकेतील विनोदी पात्र म्हणून सर्वपरिचित आहे. ‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. राहुल चा जन्म २१ जानेवारी १९९१ साली उरून तालुका इस्लामपूर येथे झाला. त्याने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून येथून डिग्री घेतली. लागीर झाला जी या मालिकेच्या माध्यमातून राहुल घराघरात लोकप्रिय झाला. पण सध्या राहुल खूप फोर्म मध्ये आहे कारण त्याने भल्या भल्याने जे शक्य होत नाही ते करून दाखवले आहे.

राहुल मगदूम याने नवीन BMWX3 हि कार घेतली आहे. हि खबर लागीर झालं जी मधील आज्या चा दोस्त असणारा विक्या म्हणजेच निखील चव्हाण याने instagram वरून दिली आहे. BMW x3 या कारची किमत तब्बल ५० लाख रुपये आहे. राहुल्याने हि कार घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. BMW कार घेतल्याने राहुल्या सध्या लय फोर्मात आहे असेच बोलल्या जाते आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कसाब विरुद्ध साक्ष दिली म्हणून साधं भाड्याने घरही देत नाहीयेत लोकं…

ज्या धाडसी मुलीच्या साक्षीमुळे मुंबईवरील भ्याड हल्ल्यातील आतंकवादी अजमल कसाबला फाशी झाली, त्याच मुलीला या साक्षीमुळे आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिला एक साधं भाड्याने घर देण्यास सुद्धा लोकं नकार देत आहेत. तिला मुंबईत अक्षरशः घर भाड्याने घेण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. मुंबईची रहिवासी असलेल्या देविका रोटावनला तिने केलेल्या देशसेवेबद्दल मोठी किंमत चुकवावी लागत आहे. या परिवाराला भाड्याने घर दिल्यास त्यांच्या देशभक्तीमुळे आपल्यावर सुद्धा संकट येईल अशी भीती लोकांमध्ये आहे.

आपण केलेल्या देशभक्तीमुळे एवढी मोठी किंमत मोजावी लागेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. मुंबईचा 26/11 हल्ला होऊन नऊ वर्षे लोटली तरी देविका आणि तिच्या वडिलांना या साक्षेची किंमत मोजावी लागत आहे. 26/11 हल्ला झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जेव्हा कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल बेछूट गोळीबार करत होते तेव्हा देविका भाऊ आणि वाडीलांसह तिथे होती. तिच्या पायात कसाबची एक गोळीही लागली होती. यानंतर देविका आणि तिचे वडील सरकारी साक्षीदार बनले होते. यांनातर कसाबला फाशी झाली होती.

अंतर ठेवून आहेत नातेवाईकही-

देविका आणि नटवरलाल यांनी सांगितले की एवढे वर्षे उलटूनही गावकडील नातेवाईक आमच्या सोबत संबंध ठेवल्यास ते सुद्धा आतंकवाद्यांच्या निशाण्यावर येतील या भितीने अंतर ठेवून आहेत. याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने लग्नपत्रिकेत त्यांचे नाव टाकले नाही. नटवरलालमुलगी देविका आणि मुलगा जयेश सोबत बांद्रा मधील भाड्याच्या घरात राहतात. जिथंही ते राहायला जातात तिथे लोकं त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कारण काय तर त्यांनी 26/11 हल्ल्यामुळे कोर्टात साक्ष दिली. पुण्यात राहणाऱ्या देविकाच्या मोठ्या भावानेची त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले आहे. त्याने याना साधं लग्नाला सुद्धा बोलवलं नाही.

मोदींकडून सुद्धा नाही मिळाले उत्तर-

नियमित घर बदलावा लागत असल्याने नटवरलाल यांची इच्छा होती की त्यांना सरकारी कायमस्वरूपी घर मिळावं. या समस्येला कंटाळून देविकाने पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले आहे. पण त्याच अजून काही उत्तर नाही मिळालं. त्यांना मोदींना भेटून ही समस्या मांडायची आहे पण मोदींची भेट काही त्यांना मिळाली नाही. त्यांनी खुप प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालं नाही. सध्या देविका घक्त 19 वर्षाची आहे. पण या हल्ल्यामुळे तिचे शिक्षण प्रभावित झाले आहे. शाळेतील परीक्षा सुद्धा ती नापास झाली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

प्रजासत्ताक दिनाच्या शिवरायांच्या चित्ररथात झाली फार मोठी चुक वाचा लेख..

दिल्ली येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर अवतरला याचा अभिमान वाटला परंतु ज्या राजाने दिल्लीच्या औरंगजेबाला भरल्या दरबारात डोळ्यात डोळे घालून अपमानास्पद वागणूकीबद्दल ठणकावून महाराष्ट्राची अस्मिता जोपासली त्याच दिल्लीवर राजाचा खाली मान झुकलेला अश्वारूढ पुतळा मिरवला गेला. अरे गावात साधं घरात लावायला शिवरायांचे पोष्टर जरी घ्यायचे म्हणले तरी राजाच्या बाणेदार नजरेला आपण महत्व देतो पण ज्या सोहळ्यावर साऱ्या जगाचे लक्ष होते त्या महाराष्ट्राच्या चित्ररथातल्या महाराजांच्या मुर्तीची नजर उंच आणि मान ताठ दाखवणे बंधनकारकच असायला हवे होते.

मी कुणी ईतिहासकार वगैरे अजिबात नाही. परंतु महाराजांच्या विचारावर प्रेम करणारा एक युवक या नात्याने मला एवढं तरी नक्कीच कळतं की माझ्या राजाने दिल्लीत कधीच मान झुकवली नव्हती. मग हा चित्ररथातला पुतळा नेमका असाच का बरं बनवला? तो बनवताना एवढी साधी गोष्ट का बरं कुणाच्या लक्षात आली नाही? एरवी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनवताना उधळलेल्या घोड्यावर बसुन तलवार उंच उगारलेली, मान ताठ ठेवून महाराजांची नजर आभाळाकडे असते मग नेमकं या चित्ररथातल्या दर्शनीय पुतळ्यातच तलवार जमिनीकडे, मान आणि नजर झुकलेली असे का बरे ? हि मुर्ती बनवलेल्या त्या कलाकाराच्या कलेला मी दाद देतो परंतु चित्ररथावरची मुर्ती अशीच असावी अशी संकल्पना मांडलेल्या मेंदुचा मी निषेध करतो.

महाराजांची प्रतिभा, किर्ती, पराक्रम, साहस, आणि अस्मिता या एका चित्ररथामुळेच प्रचंड वाढली किंवा कमी झाली हा विषय नाही परंतु जर दिल्लीत राजाची मुर्ती मिरवायची होती तर नजर आणि मान ताठच असायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळ्या गोष्टींत भव्य दिव्यता नसती तरी चालले असते पण निदाना नजरेत तरी ती दाखवायला हवी होती. आज हा चित्ररथ शेअर करताना करोडो लोकं पाहिली परंतु राजाच्या नजरेकडे कुणाचे लक्ष गेले नाही याचे दुःख वाटले. या चित्ररथातली शिवरायांची झुकलेली नजर पाहुन तो व्हिडीओ शेअर करण्याची माझी ईच्छाच नाही झाली. उलट सकाळपासुनच राजाची ही खिन्न मुद्रा पाहुन माझ्या मनात कालवाकालव सुरू होती. सरतेशेवटी मनातुन उचंबळून बाहेर पडलेला माझा हा वैयक्तिक विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जिवावर आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. अखेरीस एवढंच वाटतं की; महापुरूषांसंदर्भातली कोणतीही गोष्ट बनवताना, दाखवताना, लिहिताना, बोलताना आणि मिरवताना खबरदारी घ्यायलाच हवी अन्यथा विचारांची विटंबना होते जी सहजा सहजी भरून काढता येत नाही.

ज्यांना छत्रपतींचा ईतिहास माहित नाही त्यांनी फक्त कलाकृती पाहुण आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे परंतु ज्यांना माहित आहे त्यांनी तरी निदान विचार करावा. महापुरूष हे मुर्त्यामध्ये जिवंत नसुन ते विचारांनी जिवंत आहेत पण जर मुर्त्यांतून कुणी विचार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.
लेखक : प्रा.विशाल गरड
Source https://vishalgarad.blogspot.in

बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत चंपासिंग थापा `खास माणूस`

बाळासाहेब ठाकरे हे उभ्या महाराष्ट्रातील अनेकांचे गळ्यातील ताईत होते. पण बाळासाहेब यांच्या गळ्यातील ताईत कोणी झालं असेल तर त्यांचे सेवक चंपासिग थापा हे होय. २७ वर्षांपूर्वी ते नेपाळहून मुंबईत आले . गोरेगावात रस्त्यावर काही तरी छोटीमोठी ते कामे करत असत . शिवसेनेचे भांडुपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के . टी . थापा यांच्या संपर्कामुळे ते ` मातोश्री ` त शिवसेनाप्रमुखांचे सेवक म्हणून रुजू झाले. बाळासाहेबांचे जेवण, औषधे अशा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची माहिती थापा यांनी जाणून घेतली . त्यामुळे अल्पावधीतच ते शिवसेनाप्रमुखांच्या गळ्यातील ताईत बनले. थापांचा सेवाभाव , काम करण्याची धडाडी यामुळे शिवसेनाप्रमुख त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करत . मीनाताई ठाकरेंनतर शिवसेनाप्रमुखांची काळजी घेणारी दुसरी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली . बाळासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांची सावली बनून राहिले .

` मातोश्री ` त शिवसेनाप्रमुखांच्या रूमशेजारीच थापा यांची छोटी खोली आहे. बाळासाहेब सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी थापांची धावपळ सुरू असायची. थापा यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. दोन मुलांची नेपाळमध्ये मेडिकलची दुकाने असून एक मुलगा व्यवसायानिमित्त दुबईत असतो. थापांचे कुटुंब नेपाळमध्ये असले तरी त्यांचे सर्वस्व ` मातोश्री ` त आहे. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला दरवर्षी नेपाळमधून रुद्राक्ष आणून त्याने त्यांची तुला करायची आणि ती वाटायची या शिवसनेच्या नेपाळ शाखेच्या उपक्रमात थापा हिरीरीने पुढाकार घेत. नेपाळमधील शिवसैनिकांना थापा हा नेहमीच आधार वाटत राहिला आहे.

बाळासाहेब मुंबईबाहेर दौऱ्यावर जाताना त्यांची बॅग भरण्यापासून त्यांना आवश्यक त्या गोष्टी बॅगेत घेतल्या आहेत की नाही याची खबरदारी थापा घेत. बाळासाहेबांचे आवडते लेखक पु. ल. देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगाच्या कॅसेट्स , सीडी , प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानाच्या सीडी घ्यायला थापा कधीच विसरत नसत. बाळासाहेबांच्या सुरक्षारक्षकांच्या नजरेमधून थापा यांचीही नजर फिरत असे.
शिवसेनाप्रमुखांच्या व्यस्त अशा दैंनदिन कार्यक्रमामुळे थापा यांना सारखे नेपाळला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन वर्षांतून एकदा ते नेपाळला जात असत. शिवसेनाप्रमुखांना भेटायला येणारी मंडळी थापा यांना दिवाळी वगैरे सणात काही भेटवस्तू देत असत. त्या वस्तू साठवून ठेवून नेपाळला जाताना ते घेऊन जात. या भेटवस्तू इतक्या असत की त्यांना एक ट्रेनची अख्खी बोगी बुक करावी लागत असे. या भेटवस्तू ते नेपाळमध्ये जाऊन लोकांना वाटत असत. आपल्या गावचा माणूस शिवसेनाप्रमुखांसारख्या बड्या नेत्याच्या सानिध्यात असतो याचे गावकऱ्यांना खूप कौतुक वाटत असे. त्या प्रेमापोटी त्यांचा गावात ठिकठिकाणी सत्कारही करण्यात येत असे.

पाटील या शब्दाची सुरूवात कोणी व कशासाठी केली?

चछत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्यविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा साम्राज्य उभे केले. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष, कल्याणकारी राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराराज सदैव हिंदवी स्वराज्यातील प्रजेच्या हितासाठी प्रयत्नशील असत. महाराजांकडे अनेक निस्वार्थीपणे सेवा करणारे मावळे होते. महाराजांनी त्याकाळी विविध पदे देऊन मावळ्यांची रयतेच्या सेवेसाठी निवड केलेली होती. त्यापैकी एक म्हणजे पाटील. पाटील या शब्दाची सुरूवात कोणी व कशासाठी केली याविषयी अनेकांना नेहमी प्रश्न पडतो. पाटील या शब्दाची सुरुवात कशी झाली याविषयी आपण जाणून घेऊया…

उत्तर:- पाटील हा नुसता शब्द नसून शिवरायांनी दिलेली एक जबाबदारी आहे. हिंदवी स्वराज्य आकाराने मोठे असल्याने स्वराज्याचा कारभार स्वच्छ व जनहिताचा व्हावा. यासाठी अनेक लहान मोठे प्रांत शिवरायांनी पाडले, अत्ताचे हे “जिल्हे.” रयतेचे प्रश्न सोडवीण्यासाठी हर एक प्रांतावर निस्वार्थी पणाने अहोरात्र अविरत एकनिष्ठे काम करणारे अधिकारी नेमले आणि त्या अधिका-यांना पदे दिली ते म्हणजे पाटील. छत्रपती शिवरायांनी आदेश दिले तुमच्या घरात काहीही शिल्लक नाही राहीले तरी चालेल, परंतू रयतेला (जनतेला) कोणत्याही गोष्टीच कमी पडू देवू नका. स्वराज्यात एकही दिवस कोणी “उपाशी” झोपता कामा नये नाहीतर त्याची गय केली जाणार नाही ‘म्हणून हिंदवी स्वराज्य हे सुराज्य होते.’ या पाटीलकीची सुरवात म्हणजेच स्वराज्याचा पहीला पाटील “”नागनाक”” या मावळ्या पासून केली…
पा – पालन करणारा टी – टिकुन ठेवणारा ल – लक्ष देणारा

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: चिमुकलीच्या पत्राला ९१ वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांनी दिलेले उत्तर नक्की वाचा..
अधिक वाचा: महिला नागा साधूंचे काही धक्कादायक रहस्य, पुरुष नागा साधुपेक्षा वेगळ्या असतात महिला नागा साधू
अधिक वाचा: छत्रपती उदयनराजे भोंसले यांच्या बद्दल ह्या गोष्टी आपणास माहिती आहे का ?
अधिक वाचा: जाणून घ्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हि चिमुरडी आहे तरी कोण?