वयाच्या 21 व्या वर्षी गुगलचा योग्य वापर कसा करतात शिका या तरुणाकडून, वर्षाला कमावतो 2 करोड रुपये..

कॉम्पुटर आणि इंटरनेट ही अशी गोष्ट आहे त्याचा योग्य वापर केला तर आपलं आयुष्य बदलू शकते. पण याचा चुकीचा वापर आयुष्य व्यर्थ घालण्यासाठी पुरेषे आहे. पण कन्नूर केरळ येथील एका अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाने कॉम्पुटर आणि इंटरनेटचा वापर करून आपल्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. या तरुणाचे नाव आहे मोहम्मद जवाद टीएन. जवादला त्याच्या वडिलांनी लहानपणी एक कॉम्पुटर गिफ्ट दिले होते ज्याचा वापर करून त्याने आपलं भविष्य घडवलं आहे. जवाद आता एका वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे.

जवादने आपल्या मेहनतीने खुप कमी वयातच एक यशस्वी इन्ट्रोरप्रिनोर म्हणून ओळख निर्माण केली आहे. आज जवाद हा TNM Online Solutions या इकॉमर्स, वेब डिझायनिंग आणि अँप डेव्हलपमेंट करणाऱ्या MNC कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. जवाद मालक असलेल्या या कंपनीची वर्षाची कमाई तब्बल 2 कोटी आहे. मोहम्मद जवादचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. बघूया त्याच्या यशापर्यंत पोहचण्याचा प्रवास थोडक्यात खासरेवर..

वडिलांनी गिफ्ट दिलेल्या कॉम्पुटरचा जवादने पूर्णपणे योग्य आणि जास्तीत जास्त वापर केला. कॉम्पुटरसोबत त्याला इंटरनेट कनेक्शन सुद्धा वडिलांनी दिले होते. जवादच्या वडिलांनी त्याला जीमेलची आयडी2उघडून दिली होती. TNM Jawad हे युजर नेम उपलब्ध असल्याने तेव्हापासून तो हेच नाव वापरत आला आहे. जवाद तेव्हा शाळेतून आल्यानंतर तासनतास कॉम्पुटरवर घालायचा. त्यावेळी ऑर्कुट हे खूप प्रसिद्ध होते. तो नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करत असे.

त्याने गुगलचा योग्य वापर करत इंटरनेटवरून फ्री मध्ये ब्लॉगिंग आणि वेब डिझायनिंग शिकून घेतले. त्यावेळी तो फक्त 10 वी मध्ये होता. त्याने दहावीत असतानाच आपला मित्र श्रीरंग सोबत एक वेबसाईट लाँच केली. दोघांना वेब डिझायनिंगचे तेंव्हापासूनच खूप वेड लागले. डॉट कॉम डोमेन घ्यायला पैसे देखील त्यांच्याकडे नसायचे, त्यामुळे ते फ्री डोमेनवर काम धकवून न्यायचे. जवादच्या तेव्हाच लक्षात आले की वेब डिझायनिंग मध्ये चांगला स्कोप आहे. त्याने आपले पहिले डोमेन TNM ONLINE SOLUTION रजिस्टर केले आणि एक वर्चुअल कंपनी सुरू केली. फेसबुकचा वापर करून त्याने सुरुवातीला 1000 रुपयात वेबसाईट बनवून देण्यास सुरुवात केली.

पुढे कंपनी वाढत गेली आणि जवादने यशाकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. जवादने 2013 मध्ये साऊथ बाजारात आपले छोटे ऑफिस चालू केले. जवादच्या या यशात वाडीलांप्रमाणे आईचा पण खूप मोठा वाटा आहे. त्याच्या सुरुवातीच्या दिवसात आईने त्याला भक्कम साथ दिल्यानेच इथपर्यंत पोहोचल्याचे तो सांगतो. केरळ मध्ये त्यांच्या कंपनीने हजारहुन अधिक क्लाइन्ट सोबत काम केले आहे. आज 21 वर्षीय जवाद 18 पेक्षा अधिक देशातील क्लाइन्टसोबत काम करतो. नुकतेच त्याने आपल्या कंपनीचे दुबईमध्ये देखील ऑफिस उघडले आहे. गुगलचा आणि इंटरनेटचा योग्य वापर केल्यावर यश मिळवणे कठीण नसल्याचे जवादने दाखवून दिले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सुनिधी चौहानच्या मुलाचा इंटरनेटवरील पहिला फोटो तुम्ही बघितला काय?

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहानने २०१२ मध्ये म्युझिक कंपोजर हितेश सोनिक सोबत लग्न केले होते. सुनिधी यावर्षी जानेवारीत आई बनली, तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिने आपल्या मुलाचे फोटो आजपर्यंत कुठेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकले नव्हते. आता ४ महिन्यांनंतर सुनिधीने आपल्या मुलाचा पहिला फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. सुनिधीने १ जानेवारी २०१८ रोजी एक गोंडस मुलाला जन्म दिला होता. तब्बल चार महिन्यांनी तिने आपल्या चाहत्यांसाठी मुलाचा फोटो पहिल्यांदा शेअर केला आहे. फोटोमुळे माय-लेकाची जोडी खूपच खास दिसत आहे. फोटोमध्ये सुनिधी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहे, तर आईच्या कडेवर असलेल्या मुलाने क्यूट पोज दिली आहे. सुनिधीने हा फोटो शेअर करताच केवळ अर्ध्या तासांतच त्यास १४ हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि शेकडो कॉमेण्ट्स मिळाल्या आहेत.

३४ वर्षीय सुनिधीने २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न केले होते. सुनिधीे लग्न केलेला संगीत दिग्दर्शक हितेश सोनिक हा तिचा लहानपणीचा मित्र आहे. सुनिधीने १ जानेवारी २०१८ रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये सोमवार या दिवशी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुनिधीने मुलाला जन्म दिला होता.

सुनिधीने बॉलीवूडला अनेक हिट गाणे दिले आहेत. ज्यामध्ये रुकी रुकी सी जिंदगी, डांस पे चान्स, देसी गर्ल, कमली या सुपरहिट गाण्याचा समावेश आहे. सुनिधीने हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिला लाखो चाहत्यांचे आणि इंडस्ट्रीमधील सहकाऱ्यांचे फोन आणि मेसेज येत आहेत. सुनिधीने पोस्ट केलेल्या या फोटोवरून वाटते की तिचा मुलगा आतापासूनच पोज देण्यात माहिर आहे.

सुनिधीचे हे दुसरे लग्न असून, पहिले लग्न २००२ मध्ये तिने वयाच्या १८व्या वर्षी कोरिओग्राफर बॉबी खान याच्याशी केले होते. या लग्नासाठी तिच्या घरच्यांचा विरोध होता. परंतु अशातही सुनिधीने बॉबीबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नाही. वर्षभरातच म्हणजे २००३ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. बॉबीशी घटस्फोट घेतल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी सुनिधी लग्नाच्या बंधनात अडकली.

येथे बघा मुलाचा फोटो-

Ready for my first gig as a Mom!

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5) on

नरेंद्र मोदीजींना एका भारतीय नागरिकाचे खुले पत्र लिहून चॅलेंज ! पत्र व्हायरल..

प्रिय मोदीजी,
तुम्ही विराट कोहलीचे फिटनेसचे आव्हान स्वीकारले. तुम्हाला अशा खेळकर मूड मध्ये पाहून आनंद झाला. कदाचित तुमचा फिटनेसचा व्हिडीओ पाहून या देशातील लोक त्या पासून बोध घेऊन आरोग्याच्या दृष्टीने जागरूक होतील.
पण कसे आहे मोदीजी की या फिटनेस सारख्या गोष्टींपेक्षा पण खूप गंभीर आणि महत्वाच्या गोष्टी आपल्या देशात आहेत त्याचे आव्हान स्वीकारून तुम्ही तशी वाटचाल केली तर देशातील जनतेचे जगणे सुसह्य होईल. तुम्हाला आव्हानेच स्वीकारायची आहेत तर-
1. हल्लीच वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करायचे आव्हान स्वीकारा. पेट्रोल आणि डिझेल वर इतके कर का आहेत आणि ते कसे कमी करता येतील ते बघा (फक्त माहितीसाठी सांगतो, दात टोकरून कधी पोट भरत नसते. तसेच कर आकारून देशाची तिजोरी भरणार नाहीय).

2. तुम्ही तुमची शैक्षणिक पदवी दाखवण्याचे आव्हान स्वीकारा आणि तुमच्या पदवीबद्दल जनमाणसांत संशय आहे तो दूर करा.
3. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 2 कोटी रोजगाराचे जे आश्वासन दिले जिथे तुम्ही कसेबसे 2 लाख रोजगार निर्माण केले, ते 2 कोटी रोजगाराचे आव्हान स्वीकारा आणि देशातील तरुणाईच्या हाताला काम द्या.
4. एक पत्रकार परिषद घ्या आणि नोटबंदी आणि जीएसटीच्या यशा-अपयशाबद्दल बोला.
5. भारत देशाचे पंतप्रधान असूनही तुम्ही जास्तीत जास्त वेळ निवडणुकीच्या प्रचारात घालवता. अशा प्रचार सभेत धादांत खोटं न बोलण्याचं आव्हान स्वीकारा. सोबतच जुन्या सरकारांचे अपयश न दाखवता स्वतः काय केले यावरच फक्त भाषण द्यायचे आव्हान स्वीकारा. (एकदा जनतेला कळू देत तरी तुम्ही काय काम केले आणि कशाकशांत तुम्हाला यश मिळाले).

6. तुम्ही एका धर्मनिरपेक्ष आणि प्राचीन परंपरा असलेल्या भारतासारख्या महान देशाचे पंतप्रधान आहात हे लक्षात ठेवून धर्मविरहीत राजकारण करण्याचे आव्हान स्वीकारा. देशाच्या प्रत्येक घटकाला देशात सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करायचे आव्हान स्वीकारा.
7. ज्या रामाचे नाव घेऊन राजकारण करता त्या रामाचा आदर्श घेऊन जशोदाबेनना पत्नी म्हणून देशासमोर स्वीकारायचे आव्हान घ्या.

मी सांगतोय म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारावे असा कुणी महान माणूस नाहीय मी. पण मी जे मुद्दे मांडले आहेत ते देशातल्या प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनातले आहेत. मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात मांडत आहे. ही आव्हाने जर तुम्ही स्वीकारली तर नक्कीच या देशाच्या नागरिकांचे जगणे सुसह्य होईल.

आपलाच,
डॉ. अजित धनवडे
एक जागरूक भारतीय नागरिक

इराणचे ४३ हजार कोटी रुपयांचे तेलाचे कर्ज मोदींनी फेडले म्हणून पेट्रोल महागले ?? वायरल सत्य

सध्या सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या भरमसाट किमती विरोधात सरकारच्या विरोधात सामान्यजनांचा आक्रोश वाढतो आहे.पण या पेट्रोल डिझेलच्या किंमत वाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरत आहेत त्यासाठी मोदी भक्त त्यांच्या बचावासाठीही पुढे सरसावलेत आणि ही दरवाढ यूपीएपेक्षा कशी कमी आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करताहेत. त्यासाठी त्यांनी एक मेसेंज वायरल केला आहे त्यात त्यांनी असा दावा केलाय कि काँग्रेस सरकारने केलेले इराणचे ४३ हजार कोटी रुपयांचं कर्ज मोदी सरकारने फेडले आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. या मेसेंजमागील वायरल सत्य वेगळे आहे ते आम्ही आपल्या समोर आणतो आहोत.

काही पोस्ट आपण हि पाहाव्यात यासाठी खाली एक उदाहरण दिले आहे

कच्च्या तेलासाठी भारत सर्वाधिक अवलंबून आहे, तो सौदी अरेबियावर. त्या खालोखाल नंबर येतो तो इराण आणि इराकचा. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, मेंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन इराणकडून कच्चं तेल विकत घेतात. हे सगळं सुरळीत सुरू असतानाच, २०११ मध्ये अमेरिका आणि अन्य महासत्तांनी अण्वस्त्रबंदी धोरणांतर्गत इराणवर निर्बंध आणले आणि सगळं तंत्रच बिघडलं. इराणकडून भारताला दररोज ४ लाख बॅरल (१ बॅरल म्हणजे १५९ लिटर) तेल पाठवलं जात होतं, ते १ लाख बॅरलवर आलं. त्यासोबतच, या तेलाचे पैसे देण्याच्या प्रक्रियेतही बदल झाला.तुर्कस्तानच्या हल्क बँकेद्वारे ५५ टक्के रक्कम आणि भारताच्या यूको बँकेद्वारे ४५ टक्के रक्कम इराणला दिली जात होती. परंतु, २०१३ नंतर हे निर्बंध वाढले आणि आर्थिक देवाणघेवाणही कठीण होऊन गेली. त्यामुळे भारतीय कंपन्यांचं इराणला ६.४ अब्ज डॉलर्सचं, म्हणजेच सुमारे ४३ हजार कोटींचं देणं शिल्लक राहिलं.

१४ जुलै २०१५ नंतर इराणवरील काही निर्बंध हटवण्यात आले, पण हल्क बँकेद्वारे पैसे देण्यावरील बंधन कायम राहिलं. त्यामुळे भारतीय कंपन्यांना इराणला पैसे देताच येत नव्हते, पण दुसरीकडे रोज १ लाख बॅरल तेलाची खरेदी मात्र सुरूच होती. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेऊन काही महत्त्वपूर्ण करार केले. त्याचवेळी, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इराणचं देणं कसं देता येईल, यादृष्टीने रिझर्व्ह बँकेचेही प्रयत्न सुरू होते.निर्बंध उठवल्यानंतर इराणनेही काही अटींमध्ये, नियमांमध्ये बदल केले होते. ४५ टक्के रक्कम रुपयांमध्ये आणि उर्वरित हल्क बँकेद्वारे घेण्याचं धोरण त्यांनी बदललं. थकित रकमेवर व्याज द्या आणि सगळी रक्कम युरोमध्ये परत करा, अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा, रिझर्व्ह बँक पुढे आली आणि यूको बँकेद्वारे हे पैसे देण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला.

२०१६ मध्ये मोदी इराणला गेले तेव्हा त्यांनी या थकित रकमेतील सुमारे ५००० कोटींचा पहिला हप्ता दिला आणि नंतर सहा हप्त्यांमध्ये संपूर्ण ४३ हजार कोटीचं देणं भारतानं दिलं. त्यामुळे इराणचं कर्ज मोदी सरकारने फेडलं, हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. इराणची थकित रक्कम देण्यासाठी मोदी सरकारने रणनीती, आराखडा आखला, हे योग्य; पण हे पैसे पेट्रोलियम कंपन्यांकडे होतेच. ते मोदींनी फक्त इराणपर्यंत पोहोचवले. दुसरीकडे, या चार वर्षांत पेट्रोल-डिझेलवरील करातून सरकारच्या तिजोरीत सव्वा सात लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या मोदींनी काँग्रेसने केलेले इराणचे कर्ज फेडले यात कोणतेही तथ्य नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणारा डुप्लिकेट विराट कोहली कोण आहे माहीती आहे का?

निवडणूक म्हणलं की मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार हा महत्वाचा असतो. प्रचार चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी उमेदवार विविध प्रकारे नवनवीन संकल्पना वापरून प्रयत्न करत असतो. निवडणुकीच्या मैदानात उभं राहिल्यानंतर मतदारांना कसं अपल्याकडे आकर्षित करता येईल यावर उमेदवार भर देतात. ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी सेलेब्रिटीना बोलावण्याचे खूप आकर्षण असते. मोठमोठे सेलेब्रिटी प्रचारासाठी बोलावले जातात. सेलेब्रिटी ठीक आहे पण विराट कोहली सारखा स्टार खेळाडू जर ग्रामपंचायतच्या प्रचाराला आला तर? होय पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत पॅनलच्या प्रचारासाठी चक्क विराट कोहली आला आहे. सर्व देशभरात याची मागील 2 दिवसांपासून चर्चा होत आहे. पण प्रचाराला आलेला हा कोहली चक्क विराट कोहलीचा हुबेहूब ड्युप्लिकेट आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीतील रामलिंग ग्रामविकास पॅनलने प्रचारात आघाडी घेत विराट कोहलीला प्रचाराला आणणार असल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रामलिंग ग्रामविकास पॅनलच्या पोस्टरवर प्रचार रॅलीचं मुख्य आकर्षण म्हणून खऱ्याखुऱ्या विराट कोहलीचं नाव आणि फोटो या बॅनरवर छापण्यात आला होता. त्यामुळे सगळेच जण चक्रावून गेले होते. पण त्याची पूर्तता करत शिवलिंग पॅनलने प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली म्हणजेच विराटच्या डुप्लिकेटला प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे.

रामलिंग ग्रामविकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करताना दिसत आहे. गावामध्ये त्याची मोठी रॅली काढण्यात आली होती.

आता, ड्युप्लिकेट विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी, विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याच्या सोबतचे सेल्फी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कोण आहे हा डुप्लिकेट विराट कोहली?

हा डुप्लिकेट विराट कोहली देहू गावातील एक सामान्य कुटुंबातील युवक आहे. क्रिकेटची आवड असलेल्या या तरुणाचं नाव आहे सौरभ गाडे. सौरभ गाडेला क्रिकेटशिवाय गाण्याची देखील आवड आहे. त्याच्या विराट कोहली सारखं दिसण्याने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. सौरभ गाडे आता पुणे जिल्ह्यात डुप्लिकेट विराट कोहली म्हणून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. लोकही त्याला बघण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी करत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सीबीएसई टॉपर मेघनाला मिळाले 500 पैकी 499 मार्क्स, कुठे गेला तिचा एक मार्क?

काल सीबीएसईचे 12 वीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये गाजियाबादची रहिवाशी असलेल्या मेघना श्रीवास्तवने कमाल केली आहे. मेघनाने या परीक्षेत 500 पैकी तब्बल 499 मार्क्स मिळवले आहेत. मेघनाने देशभरातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. या परिक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र मेघनाची चर्चा होत आहे. पण यामध्ये अनेकांना अजून एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे मेघनाने एवढे मार्क्स मिळवले तर मग तिचा एक मार्क गेला कुठे?

कुठे गेला एक मार्क?

मेघनाने गौतम बुद्ध नगरमधील स्टेप बाय स्टेप स्कुलमधून(सेक्टर 132) मधून शिक्षण घेतले आहे. 12 च्या वर्गात तिच्याकडे इतिहास, भूगोल, सायकॉलॉजी, इंग्लिश आणि इकॉनॉमिक्स असे पाच विषय होते. यापैकी मेघनाला इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स आणि सायकॉलॉजी मध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळाले आहेत. पण इंग्लिशमध्ये मात्र तिला 100 पैकी 99 मार्क्स मिळाले आहेत. याप्रकारे तिने 500 पैकी 499 मार्क्स मिळवले आहेत. म्हणजेच इंग्लिश विषयात मेघनाचा एक मार्क गेला आहे.

किती अभ्यास करायची मेघना?

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मेघनाने सांगितले की तिला पण विश्वास नव्हता की तिला 500 पैकी 499 मार्क्स मिळतील आणि ती देशात टॉपर येईल. मेघनाच्या मते ती अभ्यास करताना किती टाइमकडे नाही बघायची. ती फक्त सर्व विषयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करायची. याशिवाय तिने परीक्षेच्या दिवसात अभ्यास नाही केला तर वर्षभर अभ्यास केला.

मेघनाला भविष्यात कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून सायकॉलॉजीचे शिक्षण घ्यायचे आहे. याशिवाय तिला समाजसेवा करण्याची देखील आवड आहे. मेघना शिवाय अनुष्का चंद्राने 500 पैकी 498 मार्क्स मिळवले आहेत. अनुष्काला पण इंग्लिश मध्ये 100 पैकी 98 मार्क्स मिळाले आहेत. अनुष्काने गाजियाबाद केसेठ आनंदराम जयपुरिया (एसएजे) शाळेतून शिक्षण घेतले आहे.

सीबीएसईचा रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in वर जा. याठिकाणी होम पेजवर सर्वात वर 12th रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर, सेंटर नंबर आणि शाळेचा क्रमांक टाका. यानंतर लगेचच तुमचा निकाल समोर येईल. यंदा 10 वी आणि 12वी मिळून सीबीएसई बोर्डामार्फत 28 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यात 16 लाख 38 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची तर 11 लाख 86 हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

प्रियाचा वरीअरचा नवीन व्हिडीओ पुन्हा गाजतोय, बघा गहजब माजवतील असे इशारे..

खास अंदाजात डोळा मारून करोडो लोकांना भुरळ घातलेल्या प्रिया वरिअरचा नवीन व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियाने डोळा मारला नसला तरी त्यामध्ये तिने केलेले इशारे गहजब माजवतील असेच आहेत. फेब्रुवारीमध्ये जेव्हा तिचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला होता तेव्हा ती रातोरात स्टार बनली होती. एका रात्रीत सेलेब्रिटी बनलेल्या प्रियाला करोडो फॅन्स भेटले. नवीन व्हिडीओ देखील फॅन्सच्या पसंतीस उतरला आहे. बघा व्हिडीओ..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

बॉलीवूडच्या हिरोईन पेक्षाही सुंदर आहे ही तृतीयपंथी, तिच्या सौंदर्यापूढे सोनम कपूरही आहे फिकी..

तृतीयपंथी म्हणलं की आपल्या डोक्यात वेगळेच विचार येतात. तृतीयपंथीयांची एक वेगळीच इमेज आपल्या मनात बसलेली असते. तृतीयपंथीयांना समाजात मान सन्मान मिळत नाही. त्यांना मान सन्मान मिळवण्यासाठी समाजात झगडावे लागते. त्यांना खालच्या पातळीची वागणूक दिली जाते. पण देवाने माणसाचे तीन रूप बनवले आहेत त्यामध्ये स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी आहेत. पण स्त्री आणि पुरुषांना जेवढा मान सन्मान आणि चांगली वागणूक मिळते तेवढं मात्र तृतीयपंथीयांना मिळत नाही. त्यांचा जन्मही स्त्री आणि पुरुषाने सामान्यपणे संबंध ठेवल्याने होतो. पण ते पूर्णपणे स्त्री सुद्धा नसतात आणि पुरुषही नसतात, यामुळे त्यांना तृतीयपंथी म्हणून ओळखले जाते.

त्यांना आपण बऱ्यापैकी पैसे मागताना बघतो किंवा एखादा कार्यक्रम वगैरे असेल, घरी लग्न समारंभ असेल तर तृतीयपंथीयांना डांस करण्यासाठी गाणे गाण्यासाठी बोलावले जाते. नाचणे हा तर त्यांचा पेशा बनला आहे. यामागे त्यांची आर्थिक परिस्थिती आणि समाजाचे त्यांच्या प्रति असलेले विचार कारणीभूत आहेत. समाजात वागताना स्त्री आणि पुरुषांना मिळणारे हक्क एका तृतीयपंथीला नाही मिळत. समाज तर दूरचा झाला पण त्यांचे आई वडील आणि कुटुंब देखील त्यांना दूर करते.

तृतीयपंथी सुद्धा देवाने बनवलेले जीव असल्याने त्यांना समाजात चांगली वागणूक मिळायला हवी. पण समाज आपले विचार बदलायला तयार नाहीये. जास्तीत जास्त तृतीयपंथी हे आपलं पोट भरण्यासाठी नाचतात आणि गातात. आज आपण अशी एक तृतीयपंथी बघूया ज्यांना बघुन तुम्ही विचारही करणार नाही की ती तृतीयपंथी असू शकते. भारतीय असलेली बिशेष हुईरेम दिसायला हुबेहूब स्त्री दिसते. आणि नुसती स्त्रीच नाही तर तिच्या सौंदर्यापुढे बॉलीवूडमधील अभिनेत्री देखील कमी पडतील.

तो एवढी सुंदर आहे की तिच्या सुंदरतेची चर्चा फक्त भारतातच नाही तर परदेशातही होत आहे. नुकतेच थायलंड मधील चोंबुरी मध्ये होणाऱ्या एका काँटेस्टसाठी निवडण्यात आलेल्या 30 प्रतिस्पर्ध्यांमध्ये बिशेषचं नाव सर्वात वर होतं. एका रिपोर्टनुसार हा काँटेस्ट दरवर्षी तृतीयपंथीयांसाठी आयोजित केला जातो. या काँटेस्टची सुरुवात 2004 मध्ये झाली होती. महत्त्वाचे म्हणजे इतर तृतीयपंथीना कुटुंब जसे वाऱ्यावर सोडते तसे न करता बिशेषच्या आई वडिलांनी तिचा व्यवस्थित सांभाळ केला.

बिशेषचा अगोदर मुलासारखा सांभाळ करण्यात येत होता पण नंतर तिला मुलीसारखे सांभाळण्यात आले. तिच्या सुंदरतेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

…अन अशाप्रकारे अंपायरने सुद्धा लावला चेन्नईच्या विजयात हातभार !

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैद्राबादचा 2 विकेट्सनी पराभव करत आयपीएलच्या फायनल मध्ये एन्ट्री केली. चेन्नईने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. दीपक चहरने पहिल्याच बॉलवर धोनीचा हा निर्णय योग्य ठरवताना शिखर धवनला आऊट केले. पॉवरप्लेय संपेपर्यंत हैद्राबादच्या 45 धावांवर 3 विकेट्स गेल्या होत्या. कर्णधार केन विल्यम्सन अवघ्या 24 धावा करून माघारी परतला. त्यानंतरही हैदराबादची घसरगुंडी सुरूच राहिली. हैदराबादची अवस्था 6 बाद 88 झाली होती. पण या कठीण परिस्थितीत कार्लोस ब्रेथवेटने 29 बॉलमध्ये एक चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 43 धावा करून हैदराबादला चांगल्या स्तिथीत पोहचवले. त्याच्या या खेळीने हैदराबादने चेन्नईला सन्मानजनक 140 धावांचे आव्हान दिले.

हैदराबादची बॅटिंग चालू असताना सहाव्या ओव्हर चालू होती. दीपक चहरच्या हातात बॉल होता. सहाव्या ओव्हरचे 2 बॉल बाकी होते. दीपक चहर ज्यावेळी बॉल टाकायला आला त्यावेळी त्याच्या हातातून बॉल अचानक निसटला. शकीब उल हसन तो बॉल मारायच्या मूडमध्ये होता पण बॉल त्याच्या डोक्यावरून किपरकडे गेला. पण तो बॉल अंपायरने डेड बॉल दिला. शकीब या निर्णयावर नाराज झाला. कारण त्याच्या मते तो बॉल वाईड द्यायला हवा होता. वाईड नाही तर तो बॉल नो बॉल तरी दिला गेला पाहिजे होता. पण अंपायरनी मात्र तो डेड बॉल दिला.

शकीबने अंपायरकडे इशारा करून तो वाईड बॉल असल्याचे खुणावले पण अंपायर मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी तो बॉल डेड ठरवला. अनिस शेवटी हैदराबादला तो एक्स्ट्रा 1 रन नाही मिळाला. अशा अटीतटीच्या सामन्यात एक एक धावेला खुप महत्व असते. अनुभवी अंपायर असताना असा निर्णय दिल्याने त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

चेन्नईच्या संघाची पाठलाग करताना अवस्था बिकट झाली होती. फाफ ड्यु प्लेसिसने निर्णायक 67 धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईची 8 बाद 113 अशी घसरगुंडी झाली होती. पण फाफ ड्यु प्लेसिसने हा सामना चेन्नईला जिंकून दिला.

बघा अंपायरचा निर्णय चुकलेला तो बॉल-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हा फोटो प्रधानमंत्री मोदींना दाखविला तर त्यांना सुध्दा लाज वाटेल नक्की वाचा का ?

वस्तू खराब असली तर चालेल परंतु प्रचार जोरदार असायला हवा. त्यामुळे आजकाल लोक एखादी बेकार वस्तूचाहि जोरदार प्रचार करतात. त्याकरिता विविध माहिती देवाण घेवाण करण्याचे साधने उपयोगात येतात. या गोष्टीला सरकार कुठे मागे राहली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदि देखील आपल्या साधनाचा जोरदार कामाचा जोरदार प्रचार करत आहेत. परंतु त्याची जी यंत्रणा आहे त्यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे. आज बघूया खासरेवर आम्ही हे का सांगत आहोत.

३० एप्रिल रोजी एका मोठ्या पेपरात अशीच एक बातमी आली तीचे उदाहरण घेऊया. आता या फोटोत तुम्हाला चूक दिसणार नाही परंतु जर तुम्ही निरखून बघितल तर तुम्हाला हा घोळ लक्षात येईल कि चूक झाली कुठे आहे. हि दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना ह्या कामाची जाहिरात होती. परंतु बनविणाऱ्याच्या डोळ्यात ज्योती कमी असल्याने हा घोळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज आम्हाला वाटत आहे.

याचा अर्थ असा निघतो कि प्रचारा करिता भरमसाठ पैसा खर्च होतोय परंतु त्यावर कोणीही बघणारे नाही आहे. त्यामुळे अश्या अक्षम्य चुका होत राहतात. आणि नरेंद्र मोदी यांना टीकेचा धनी व्हायचं काम पडते. या अगोदर अनेक फोटोशॉप विषय बीजेपीचे समोर आलेले आहेत. त्यामुळे याही फोटोत तसच काही करून विषय नीपटवायचा असता. टिकली लावणे किंवा एखादा डोक्यावर पदर देणे हे त्यांच्या साठी अतिशय सोपे काम आहे. १२५ करोड लोकसंख्या असलेल्या देशात प्रचार करणाऱ्या टीमवर अशी नामुष्कीची वेळ येणे अतिशय हास्यास्पद आहे. खाली क्लिक करून आपण तो फोटो बघू शकता.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..