स्वांतत्र्य दिनी अमित शाह कडून तिरंग्याचा अपमान, बघा व्हिडीओ

आज स्वतंत्र दिनी अमित शाह बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बीजेपी मुख्य कार्यालयात ध्वजारोहण केले. परंतु ध्वज वर जाण्या एवजी त्यांनी तो खाली खेचला त्यामुळे एक मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ वायरल झाला असून अनेक लोक या कृत्यावर टीका करत आहे. वर आपण हा व्हीडीओ बघू शकता ज्या मध्ये स्पष्ट दिसत आहे कि अमित शाह यांनी चुकीची दोरी खाली ओढली आहे त्यामुळे तिरंगा वर जाण्या एवजी खाली आलेला आहे. देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम शिकविणाऱ्या संघाच्या शिकवणीतील अमित शाह यांच्या कडून अशी चूक अक्षम्य आहे असा सोशल मिडीयावर प्रतिसाद उमटत आहे. आपले मत नक्की या विषयावर शेअर करा.

मुख्यमंत्री राजधर्माचे पालन करीत आहेत का ?? मराठा तरुणाचा मुख्यमंत्र्यास प्रश्न

मराठा क्रांती मोर्चे मूकपणे काढून,प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर लाखोंच्या संख्येने त्यात मराठे सामील होऊन आपल्या मागण्या कायद्याच्या चाकोरीत मांडूनही सत्ताधारी पक्ष मराठ्यांच्या मागण्यांविषयी असंवेदनशील राहिले.तब्बल दोन वर्षे सत्ताधार्यांनी कागदी घोडे नाचवून समाजाच्या संयमाचा अंत बघितला. मूक मोर्चे काढून ही हे सरकार बधेना हे बघून मराठा युवकांनी ठोक मोर्चाचा संकल्प केला,तरीही समाजाने त्याला संयमाचे स्वरूप देऊन ठिय्या आंदोलन करून सत्ताधाऱ्यांचं समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा शांततेत प्रयत्न केला.

सत्ताधाऱ्यांची मराठ्यांच्या समस्यां विषयीची अनास्था,मुख्यमंत्र्यांसहित मोठ्या मंत्र्यांची समाजाप्रती हिणकस वक्तव्य व ह्याने समाज भावना उफाळून समाजाने बंद ची हाक दिली.खरेतर ह्या सत्ताधार्यांनीच ह्या संयमी समाजाला हातात दगड दिले.बंदमध्ये असामाजिक तत्वांचा शिरकाव झाल्याचा दक्ष गुप्तचर खात्याने रिपोर्ट दिला नसेल काय? तसे असूनही प्रत्येक जिल्हा,तालुका व स्थानिक पातळीवरील मोरच्याच्या पदाधिकाऱ्यांना व इतर मराठा बांधवांना अटक करून जाणीवपूर्वक खोट्या अजामीनपात्र केसेस दाखल करून चळवळ दडपण्याचे धोरण ह्या सत्ताधार्यांनी आखले.

प्रत्येक ठिकाणी शांततेत आंदोलन चालू असताना ही एक-दोन ठिकाणच्या हिंसक घटनांवर मीडियातून कायम बातमीपत्र देऊन समाजाची प्रतिमा मालिन करण्याचे ह्यांचे मनसुबे लपून राहिले नाहीत.अशा ह्या परिस्थितीत ह्या असंवेदनशील सत्ताधार्यांना खरोखरच समस्या सोडवायच्या आहेत की भडकवायच्या आहेत व समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे असे वाटते.आणि हे मुख्यमंत्री महाशयही राजधर्माचे पालन करताहेत का ?? हा प्रश्न ही विचारवा वाटतोय.
एक साधारण मराठा तरूण

मराठा क्रांती मोर्चा: उद्याच्या महाराष्ट्र बंदसाठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता..

आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला उद्या दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलं आहे. अगोदरच्या बंदमध्ये नवी मुंबईत परिस्थिती चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील बंद मागे घेण्यात आला आहे. तर मुंबईत स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा असल्यामुळे परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी बंद मागे घेण्यात आला आहे.

उद्या होणारा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीतील बंदबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात येत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणच्या कंपन्या, शाळा, महाविद्यालये, वाहतुक सेवा देणाऱ्या संस्था, इत्यादिंनी 9 ऑगस्टच्या संपाची दखल घेऊन बंद ठेवणार असल्याचे घोषित केले आहे. दवाखाने, मेडिकल, इत्यादि अत्यावश्यक सेवा सुरुच राहतील.

उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. खासरेवर बघूया उद्याच्या बंदची आचारसंहिता..

बंदसाठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता-

1. बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे. 2. मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करावे. 3. कोणत्याही शासकीय व खाजगी मालमत्तेची तोडफोड अथवा मोडतोड करू नये.

4. पोलीस प्रशासनाने मराठा क्रांती मोर्चाला नेहमीच सहकार्य केले आहे. उद्याच्या बंद दरम्यान पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. 5. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. 6. मराठा सेवकांनी शांत राहून ऍक्शन प्लॅन तयार करायचा आहे. 7. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.

8. बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर मराठा क्रांती दिन असं नमूद केलं पाहिजे.
9. सर्वसामान्य लोक, महिला, वृद्ध, मुले यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

दादा कोंडके यांच्या विषयी सामान्यांना माहिती नसलेल्या दहा गोष्टी..

आज दादा कोंडकेची जयंती,
महाराष्ट्रातील ३५ ते ४० वयोगटातील लोक किंवा वयस्कर लोकाकरिता आजही दादा कोंडके एक महान व्यक्तिमत्व म्हणून आहे.
अभिनयाचा हुकमी एक्का, विनोदाचा बादशाह, गीतकार ,लेखक एक मध्यम वर्गीय भोळ्या माणसाला त्यांनी चित्रपटसुष्टीच्या पडद्यावर अनेक काळ रेखाटल. पोट मारून कमाई करणारे आणि त्यानंतर मनोरंजनाकरिता सिनेमा गृहात जाणार्या दर्शकाचे दादा हक्काचा माणूस होता. त्या लोकांना काहीही करून हसवणे हे दादाला चांगल जमत होत. त्यांचे ९ सिनेमे त्या काळात २५ आठवड्यापेक्षा जास्त सिनेमा गृहात चालले. याची गिनीज बुकात नोंद आहे. मराठी सिनेमा अच्युत उंचीवर दादांनी नेला तेच याचे विधाते होते. लक्ष्मीकांत बर्डे हे दादापासूनच प्रभावित होते. हिंदी चित्रपट सृष्टीने हीच चाबी पकडून समोर चालू ठेवली व गोविंदा सुद्धा हीच शैली वापरत होता.

तेव्हा सुद्धा दादांना या विषयी बराच विरोध झाला. स्त्रियांचा अपमान हा मुख्य विषय, पशात्य कपड्यात नाचणाऱ्या नटी समोर दादाचे भोळा मराठी माणूस उठून दिसत होता.द्विअर्थी शब्द हे दादानीच सिनेमात आणले.

त्यांनी महाराष्ट्रात सिनेमामध्ये अनेक कीर्तिमान केले. चला आता बघूया कृष्णा दादा कोंडके उर्फ दादा कोंडके यांच्या बद्दल माहिती..

८ ऑगस्ट १९३२ साली दादा कोंडके यांचा जन्मदिवस त्यांचा पहिला सिनेमा तांबडी माती १९६९ मध्ये प्रदर्शित झाला. चंदू जमादार,राम राम गंगाराम, राम राम अन्थाराम , एकटा जीव सदाशिव, तुमच आमच जमल, अंधेरी रात मी दिया तेरी हात मे या काही प्रसिध्द सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते.
१९९४ मध्ये आलेला सिनेमा सासरच धोतर हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. त्याची निर्मिती दादानेच केली होती.

याच्या व्यतिरिक्त १० गोष्टी ज्या दादा कोंडके विषयी सर्वाना माहिती असायला हव्या

१.मराठी नाटक विच्छा माझी पुरी करा ची सुरवात १९६५ मध्ये झाली या मधूनच दादांना जास्त ओळख मिळाली. या नाटकाला वसंत सबनीस यांनी लिहले होते. Anti Establishment या विषयावर हे नाटक होते. नाटकात राजा,नर्तकी व मूर्ख कोतवाल याच्यात दाखवलेली आहे. या नाटकाचे जवळपास १५०० प्रयोग झाले होते. याचा आखरी प्रयोग मार्च १९७५ मध्ये हैद्राबाद ला झाले.

२.सन १९७५ मध्ये पांडू हवलदार हा सिनेमा आला. यामध्ये त्यांनी पांडू नावच पात्र केल. त्यानंतर महाराष्ट्रात पोलिसांना पांडू लोक संबोधू लागले.

३.दादा व जब्बार पटेल यांचा वाद लोकप्रिय होता कारण दादाची लोकप्रियतेवर हिंदी चित्रपट सृष्टी नेहमी बोटे मोडत.

४.दादाचे वडील गिरणी कामगार होतें, त्यांचे सुरवातीचे जीवन लालबाग मधील चाळीत गेले. दादांची संपूर्ण भागात भिती होती. दादांनी स्वतः सांगितले होते “ लालबाग मध्ये मी दादा होतो, कोणीही दादागिरी केल्यास सोडा बोतल ते गोटे इत्यादी साहित्य मी भांडणात वापरले आहे.”

५.दादा निर्मित पहिला सिनेमा सोंगाड्या १९७१ मध्ये आला. नाम्या नावक युवकाचे पात्र जो कलावतीच्या प्रेमात अखंड बुडाला. सोंगाड्या भयंकर हिट झाला तेव्हापासून भोळा नायक हि मुख्य शैली दादांनी सुरु ठेवली. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा ‘तीन देवियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले…… मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर “राडा” घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले…… पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली.

६.त्यानंतर दादा शिवसेनेच्या सभेत दादा स्टेजवर भाषणे देत. लोक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत व सभेना भयंकर गर्दी होत असे.

७.१९८६ मध्ये आलेला सिनेमा अंधेरी रात मी दिया तेरे हात मै , गुल्लू नावाचा हा मुख्य पात्र सिनेमातील उषा चव्हाण या सिनेमात अभिनेत्रीच्या भूमिकेत होत्या. दादा सोबत जास्तीत जास्त सिनेमात उषा चव्हाण ह्या होत्या. मेहमूद हे खलनायकच्या भूमिकेत या चित्रपटात होते.

८.दादाचे वडील मुळचे मुंबईचे नाही ते कामानिमित्त आले होते. लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.

९.दादांना एका भविष्यावाल्यांनि सांगितले होते तू आयुष्यात कधीही प्रगती करणार नाही परंतु दादा चाळी पासून शिवाजी पार्क मध्ये मोठ्या बंगल्या पर्यंत पोहचले.

१०.त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होते. त्यांनी याची कबुली स्वतः एका मुलाखतीत दिली होती. हे स्वंप्न दादाचे अपूर्णच राहिले. मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.

प्रियांका चोप्राचे क्वान्टिको-3 मधील किसिंग सीन्स व्हायरल..

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सिंगर निक जोनससोबत झालेल्या कथित एंगेजमेंटमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. निक जोनसोबत लग्न करण्यासाठी तिने आपला भारत हा सिनेमा देखील सोडल्याची बातमी नुकतीच आली होती. यावेळी प्रियंकावर चाहत्यांनी टीका देखील केली होती. अशातच अमेरिकन टीव्ही सीरीज ‘क्वान्टिको’च्या तिसऱ्या सीझनमधील किसिंग सीन्समुळे प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

क्वान्टिको-3 मध्ये एलेक्स पॅरिशची भूमिका साकारत असलेली प्रियांका अभिनेता पॉवेलसोबत किसिंग करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवरील प्रियांकाच्या फॅन पेजवर या किसिंग सीन्सचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

💠 Quantico ~ Season 3 Episode 12 ➳ Ghosts💠

A post shared by Myla ~ 🕉 PC Maniac Forever 🕉 (@xxpriyankachopraxx) on

यांनी सेव्ह केला तुमच्या मोबाईल मध्ये UIDAI नंबर .. चिंता करू नका हा खुलासा वाचा

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचा (यूआयडीएआय) हेल्पलाईन क्रमांक मोबाईलमध्ये ऑटोसेव्ह होऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांनी हा सायबर हल्ला असल्याचे म्हटले होते. तसेच हा नंबर आपण सेव्ह केला नसल्याचे युआयडीएआयने स्पष्ट केल्यानंतर हॅकर्सनी डेटा चोरीसाठी असे केले असल्याचीही चर्चा सुरु होती. व देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या मनात एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. पण हा नंबर कसा काय सेव्ह झाला याबद्दलचा खुलासा आता समोर आला आहे त्यामुळे मोबाईलधारकांनी चिंता करू नये.

गेल्या काही दिवसांपासून 18003001947 असा आधारचा हेल्पलाईन नंबर अचानक कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसू लागला. त्यानंतर हा नंबर हॅकर्सनी सेव्ह केला असल्याचेही म्हटले जात होते. मात्र, गुगलने सुरुवातीलाच २०१४ मध्ये त्यांच्या सेटअप विझार्डमध्ये आधार क्रमांक समाविष्ट केला होता. फोन बदलल्यानंतरही तो नव्या फोनमध्ये ट्रान्सफर झाला असल्याचे गुगलेन जाहीर केले आहे. २०१४ मध्ये OEM (स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना दिला जाणारा प्रोग्रॅम) ना दिला होता. ॲड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम गुगलने तयार केली आहे. याचा वापर स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्ये केला जातो.

गुगलने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आम्ही अंतर्गत परिक्षण केले असता २०१४ मध्ये भारतातील स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना दिलेल्या सेटअप विझार्डमध्ये आधारचा हेल्पलाईन क्रमांक आणि आपत्कालिन मदत क्रमांक ११२ यांचा समावेश केला होता. तेव्हापासून हे नंबर फोनमध्ये सेव्ह होत आहेत. यामुळे काही समस्या निर्माण झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच यामुळे कोणाचाही फोन, डिव्हाईस अनधिकृतपणे वापरले नसून हा नंबर डिलिट करता येत असल्याचेही गुगलने सांगितले.नव्या अपडेटमध्ये सध्याच्या त्रुटी काढून टाकल्या जातील. येत्या काही आठवड्यांमध्ये स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना नवीन सेटअप विझार्ड उपलब्ध करुन दिले जाईल असे गुगलने स्पष्ट केले.

गुगलच्या या खुलाश्या नंतर चिंता करावयाचे कोणतेही कारण नाही आहे.कारण हा नंबर कोणत्याही अनधिकृत मार्गाने आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह नाही झाला. आणि आपण हा नंबर आपल्या मोबाईल मधून डिलीट सुद्धा करू शकतो. तसेच अनेक आयफोन वापरकर्त्यांच्या मोबाईल मध्ये हि हा नंबर मिळाला होता त्याबद्दल त्यांच्या मनात चिंता आहे. आयफोन आयओएस वर चालतात तर त्यामध्ये आधार नंबर कसा सेव्ह झाला असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्यांनी आयफोन वापरण्यापूर्वी ॲड्रॉईड फोन वापरले आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आधीच ॲड झालेला नंबर फोन बदलल्यानंतर दुसऱ्या फोनमध्येही ट्रान्सफर झाला. त्यामुळे कोणतीही चिंता करायचे कारण नाही.

यांनी सेव्ह केला तुमच्या मोबाईल मध्ये UIDAI नंबर .. चिंता करू नका हा खुलासा वाचा

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचा (यूआयडीएआय) हेल्पलाईन क्रमांक मोबाईलमध्ये ऑटोसेव्ह होऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांनी हा सायबर हल्ला असल्याचे म्हटले होते. तसेच हा नंबर आपण सेव्ह केला नसल्याचे युआयडीएआयने स्पष्ट केल्यानंतर हॅकर्सनी डेटा चोरीसाठी असे केले असल्याचीही चर्चा सुरु होती. व देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या मनात एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. पण हा नंबर कसा काय सेव्ह झाला याबद्दलचा खुलासा आता समोर आला आहे त्यामुळे मोबाईलधारकांनी चिंता करू नये.

गेल्या काही दिवसांपासून 18003001947 असा आधारचा हेल्पलाईन नंबर अचानक कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसू लागला. त्यानंतर हा नंबर हॅकर्सनी सेव्ह केला असल्याचेही म्हटले जात होते. मात्र, गुगलने सुरुवातीलाच २०१४ मध्ये त्यांच्या सेटअप विझार्डमध्ये आधार क्रमांक समाविष्ट केला होता. फोन बदलल्यानंतरही तो नव्या फोनमध्ये ट्रान्सफर झाला असल्याचे गुगलेन जाहीर केले आहे. २०१४ मध्ये OEM (स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना दिला जाणारा प्रोग्रॅम) ना दिला होता. ॲड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम गुगलने तयार केली आहे. याचा वापर स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्ये केला जातो.

गुगलने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आम्ही अंतर्गत परिक्षण केले असता २०१४ मध्ये भारतातील स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना दिलेल्या सेटअप विझार्डमध्ये आधारचा हेल्पलाईन क्रमांक आणि आपत्कालिन मदत क्रमांक ११२ यांचा समावेश केला होता. तेव्हापासून हे नंबर फोनमध्ये सेव्ह होत आहेत. यामुळे काही समस्या निर्माण झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच यामुळे कोणाचाही फोन, डिव्हाईस अनधिकृतपणे वापरले नसून हा नंबर डिलिट करता येत असल्याचेही गुगलने सांगितले.नव्या अपडेटमध्ये सध्याच्या त्रुटी काढून टाकल्या जातील. येत्या काही आठवड्यांमध्ये स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना नवीन सेटअप विझार्ड उपलब्ध करुन दिले जाईल असे गुगलने स्पष्ट केले.

गुगलच्या या खुलाश्या नंतर चिंता करावयाचे कोणतेही कारण नाही आहे.कारण हा नंबर कोणत्याही अनधिकृत मार्गाने आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह नाही झाला. आणि आपण हा नंबर आपल्या मोबाईल मधून डिलीट सुद्धा करू शकतो. तसेच अनेक आयफोन वापरकर्त्यांच्या मोबाईल मध्ये हि हा नंबर मिळाला होता त्याबद्दल त्यांच्या मनात चिंता आहे. आयफोन आयओएस वर चालतात तर त्यामध्ये आधार नंबर कसा सेव्ह झाला असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्यांनी आयफोन वापरण्यापूर्वी ॲड्रॉईड फोन वापरले आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आधीच ॲड झालेला नंबर फोन बदलल्यानंतर दुसऱ्या फोनमध्येही ट्रान्सफर झाला. त्यामुळे कोणतीही चिंता करायचे कारण नाही.

आपल्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये हा नंबर सेव्ह झाला असेल तर सावधान !

आधार कार्डच्या नंबर वरून माहिती चोरल्या जाऊ शकत नाही असे म्हणत ट्राय चे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी ट्विटर वर हकेर्स ना चालेंज दिले होते आणी त्यात त्यांची सर्व माहिती सार्वजनिक झाल्याने भारतीय जनमानसात आधार बद्दल एक भीतीचे वातावरण तयार झाले होतेच कि एक नवीन प्रकार सध्या समोर आला आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया च्या UIDAI या नावाने 18003001947 हा हेल्पलाईन क्रमांक बहुसंख्याच्या मोबाईल मध्ये सेव्ह झाला आहे. हा क्रमांक तुमच्या मोबाईल कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह झाला असेल तर सावधान. कारण हा क्रमाक UIDAI शी संबधित नाही आहे.

हा क्रमाक मोबाईल मध्ये सेव्ह होण्याची घटना अत्यंत धोकादायक आहे कारण आपल्या परवानगी शिवाय आपल्या लिस्ट मध्ये हा नंबर सेव्ह झाला आहे. या प्रकाराने आपल्या मोबाईलची गुप्तता धोक्यात आली आहे. या घटनेनंतर UIDAI ने आपल्या आधिकारिक ट्विटर खात्यावर जाहीर केले आहे कि त्यांचा 18003001947 हा क्रमांक टोलफ्री क्रमांक नाही आहे त्यांचा 1947 हा टोलफ्री क्रमांक आहे. त्यांच्या खुलाशा नंतर मोबाईल धारकांच्या मनात आणखी भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

आपण जर मोबाईल मध्ये सेव्ह झालेल्या 1800300194 या क्रमांकावर फोन करून पाहिला तर हा नंबर लागत नाही. या नंबर बाबत एक अजून धक्कादायक प्रकार काहींच्या म्हणण्यानुसार उघडकीस आला कि हा क्रमांक आपल्या मोबाईल मधून डिलीट करावयाचा प्रयत्न केला तर तो डिलीट होत नव्हता.त्यामुळे गोंधळ उडाला. ट्विटर वर अनेकांनी या बाबत आपली काळजी चिंता व्यक्त केली आहे. अनेक संस्था व तज्ञांनी या प्रकाराला आपल्याला मोबाईलच्या गुप्ततेचे उलंघन झाले आहे असे म्हटले आहे. एकूणच हा क्रमांक कसा काय आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह झाला आहे याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कशी असते आमदारकीचा राजिनामा देण्याची संपूर्ण प्रक्रिया?

58 मुकमोर्चे शांततेत काढूनही पदरी काही पडलं नाही अशी भावना झाल्याने मराठा समाज अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको व बंद पुकारण्यात येत आहेत. राज्यभरात मागील 2-4 दिवसात अनेक ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. कायगाव टोका येथील तरुण काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेऊन बलिदान दिल्याने मराठा समाज अधिकच आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन चिघळल्यानंतर याचा फटका विविध लोकप्रतिनिधीना देखील बसला. विशेष करून मराठा समाजातील आमदारांना आरक्षण मंजूर करून घेता येत नसेल किंवा समाजासाठी काही योगदान देता येत नसेल तर राजीनामे द्या असे आवाहन करण्यात येत होते.

कन्नड सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा म्हणून प्रथम आपला राजीनामा दिला. या नंतर राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. मागील 2 दिवसात विविध पक्षाच्या तब्बल 10 आमदारांनी राजीनामे दिले. पण सर्वाना हा प्रश्न पडला आहे की खरंच या आमदारांचे राजीनामे स्वीकारले जातील का? अनेक आमदारांनी लेटरपॅड वर राजीनामे दिल्याने शंका व्यक्त केली जात आहे. आज खासरेवर बघूया कशी असते आमदारकीचा राजिनामा देण्याची संपूर्ण प्रक्रिया?

आमदारकीचा राजीनामा देण्याची प्रक्रिया-

मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या सर्व आमदारांचा राजीनामा पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत स्वीकारणे शक्य नसल्याने त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. 19 नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनापर्यंत हे राजीनामे स्वीकारले जाऊ शकत नाही असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले आहे.

आमदारांनी राजीनामा देताना कोणत्याही कारणाविना किंवा अटी आणि शर्थीविना देणे बंधनकारक आहेत. पण आमदारांनी त्याचे उल्लंघन केल्यास राजीनामे फेटाळले जाऊ शकतात. राजीनामा देताना प्रत्येकाने प्रत्यक्षात विधानसभेच्या अध्यक्षांकडे एका ठरलेल्या फॉरमॅट मध्ये द्यायचा असतो.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा सभागृहात वाचून दाखवला जातो. त्यानंतर कारण नमूद करून तो स्वीकारला किंवा फेटाळला जातो. राजीनामा स्वीकारल्यास रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाते.

आमदारकीचा राजीनामा देण्याचा अधिकृत फॉरमॅट-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

आरक्षण वादावर विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल..

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाने शांततेत 58 मूक मोर्चे काढल्यानंतरही समाजाच्या पदरी काहीच पडलं नाही अशी भावना झाल्याने मराठा समाज आता अधिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक जेष्ठ अभ्यासकांचे काय म्हणणे आहे हे विविध माध्यम दाखवत आहेत. पण 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे एक भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहे. ABP MAJHA च्या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांनी आरक्षणावर तोडगा सांगितला होता. बघा काय म्हणाले होते विलासराव देशमुख..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…