सर्वत्र चर्चा फक्त स्मिता दीदी आर आर पाटील यांच्या लग्नपत्रिकेचीच..

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर आर (आबा) पाटील यांची राजकीय वारसदार असलेली त्यांची कन्या स्मिता पाटील या साखरपुडा पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी झाला आहे. या साखरपुडा समारंभाला मोठी गर्दी झाली होती. स्मिता पाटील आणि आनंद थोरात हे १ मे २०१८ ला विवाहबंधनात अडकणार आहेत. हे लग्न जमविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता.

हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात मगरपट्टा येथे येत्या १ मे ला पार पडेल अशी थोरात यांनी माहिती दिली आहे. आणि विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याचे संपूर्ण देखरेख शरद पवार करणार आहेत त्यामुळे या विवाह सोहळ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परंतु हे लग्न चर्चेत आले आहे सध्या लग्नपत्रिके मुळे अगदी साधी लग्नपत्रिका या लग्नासाठी छापण्यात आली आहे.

ही लग्नपत्रिका एखाद्या सामान्य कुटुंबांतील विवाह सोहळ्याची असावी असे पाहताक्षणीच वाटते. पण हातात घेतल्यानंतर ती माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांची कन्या स्मिता हिच्या विवाह सोहळ्याची असल्याचे लक्षात येते. पत्रिकेवरून नजर फिरत असताना वाचणा-यांच्या डोळ्यासमोर आबांचे साधेपण चटकन तरळून जाते. आबांच्या साधेपणाला साजेशी वाटावी अशीच ही निमंत्रण पत्रिकाही साधीच छापण्यात आली आहे.

येत्या मे महिन्यात स्मिता व आनंद यांच्या लग्नाचा बार पुण्यात उडणार आहे. हा विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटी या ठिकाणी होणार आहे. पत्रिकेत निमंत्रक म्हणून कै. आर. आर. आबांच्या आई भगिरथी, पत्नी आमदार सुमनताई, बंधू सुरेश इत्यादींची नावे आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पवार यांचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्र आबाला चाहत होता आणि स्मितामध्ये आबालाच बघतात चाहते. हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
बघा स्मिता दीदी आर आर पाटील यांच्या साखरपुड्याचा विडीओ खासरेवर..

डोळ्यातील माती किंवा कचरा काढण्याची जुनी पद्धत एकदा बघाच…

डोळे हे माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहेत. त्यांना काही इजा झाली तर माणूस अधू होऊन जातो. डोळ्यात कधी काही गेले कचरा वगैरे तर खूप त्रास होतो. डोळ्यात कचरा गेला की आपण स्वाभाविकपणे सर्वात अगोदर डोळा रगडायला सुरू करतो. पण हे धोकादायक ठरू शकते. रगडल्याने डोळ्यातील कचरा हा कार्निया मध्ये जाऊन काही गंभीर इजा होण्याचा धोका संभवतो. यामुळे तुमचा त्रासही वाढेल आणि डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असतो. पण तुम्ही म्हणाल मग कचरा नेमका काढायचा कसा. तर त्यासाठी हा व्हिडीओ बघुन तुम्ही प्राचीन काळातील डोळ्यातील कचरा काढायची पद्धत बघू शकता.काही वेळा कचरा हा डोळ्यात जाऊन जमा राहतो व या. मातीचे खडे बनतात. ते जमत राहतात आणि याचा त्रास नेहमी जाणवतो परंतु डोळ्यात काही दिसत नाही. या करीता हि पध्दत वापरल्या जाते. व्हिडीओ नक्की बघा, पण हि पद्धत घरी ट्राय करू नका.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सेकंदात जळतो मृतदेह, बघा अंत्यविधीची नवीन मशीन
जमिनीखाली पाणी शोधण्याची प्राचीन पद्धत, बघा व्हिडीओ…
होस्टेल मधील मुलींची एक वेळा हि मस्ती बघाच…

सेकंदात जळतो मृतदेह, बघा अंत्यविधीची नवीन मशीन

आजकालच्या धावपळीच्या काळात अंत्यविधी ही फास्ट झालेला आहे. जळतणाचा पुरवठा शहरात फार गंभीर समस्या आहे. यावर मात करायला आता चक्क अंत्यविधी करीता विद्युत पुरवठ्यावर चालणारी अंत्यसंस्कार मशीन बनविण्यात आलेली आहे. या मशीनचे वैशिष्टय़ हे की एका मिनटात मृतदेहावर अंत्यसंस्कार होते आणी तुरंत आपल्याला त्या आप्तजनाची शेवटचे अवशेष मिळतात. या मशिनचा विडीओ युट्यूब वर उपलब्ध करण्यात आला. २ महिन्यात करोडो लोकांनी हा विडीओ बघितला व शेअर केला. यावरुन आपल्या हे लक्षात येते की लोक या नविन प्रकारास पसंदी देत आहे. यापासून पर्यावरणाचा – हास होणार नाही व वृक्षतोड ही कमी आवाक्यात येणे शक्य आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

होस्टेल मधील मुलींची एक वेळा हि मस्ती बघाच…

अनेकांना प्रश्न पडतो कि होस्टेल मध्ये चालते काय ? मुली कशा वेळ घालवितात इत्यादी प्रश्न पडतात परंतु हा विडीओ एकदा बघाच तुम्हाला धक्का बसेल आपल्या एकांताला या मुलीनी किती चांगल्या प्रकारे नवीन पद्धती आणि सोशल मिडीयाचा वापर करत एक वेगळ्या प्रकारे संपूर्ण होस्टेलचे दर्शन घडविले एकवेळा हा विडीओ बघाच हसून हसून परेशान होणार हे नक्की आहे. मुली दिसते तेवढ्या शांत आणि सोज्वळ असतात का ? हा विडीओ बघून तुम्हाला प्रश्न पडला तर फार मोठे आश्चर्य नाही आहे. आम्ही सुध्दा हा विडीओ पहिल्या वेळेस बघून हसून हसून परेशान झालो. आता तुमची वेळ आहे हि मजा घेण्याची नक्की बघा हा विडीओ आणि आवडल्यास शेअर करा.. आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

या प्रसंगामुळे कळेल कि धोनीची नाळ आजही कशाप्रकारे मातीशी जुळून आहे…

महेंद्रसिंग धोनी उर्फ माही प्रतिकूल परिस्थिती मधून धोनीने हे विश्व निर्माण केलेले आहे. पाठीशी कुठलेही पाठबळ नसताना महेंद्रसिंग धोनीने शून्यातून आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. भारताला विश्व विजेता बनविणारा माही आजही मातीशी जुळून आहे. त्याच्या वागण्या बोलण्यात कुठलाही अहंकार नाही. आज खासरेवर असेच काही प्रसंग बघूया ज्यामुळे तुम्हाला महेंद्रसिंग धोनी बद्दल अजून आदर निर्माण होईल..

एक दिवशी अचानक धोनी आपल्या हमर या कारने फिरत असल्यावर लक्षात आले कि त्याच्या गाडीचा पाठलाग कोणीतरी करीत आहे. ती धोनीची चाहती आपल्या स्कुटीने धोनीच्या पाठीमागे होती तिला फक्त एक सेल्फी हवा होता. माहीच्या हे लक्षात येताच त्याने गाडी थांबवून तिच्या सोबत सेल्फी घेतला आणि हा फोटो सोशल मिडीयावर भयंकर वायरल झाला होता.

विजय हजारे करंडका करिता धोनीची निवड झारखंडच्या कप्तान पदावर करण्यात आली होती. तो आरामात विमानाने प्रवास करू शकला असता परंतु धोनीने झारखंडच्या टीम सोबत रेल्वेने प्रवास केला. आणि त्याचा हा प्रसंग इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला होता.

अजून महेंद्र सिंग धोनी बद्दल एक विशेषतः हि आहे कि कधीही भारताने कुठलीही मालिका जिंकल्यास तो चषक धरून समोर मिरवत नाही. आपल्या साथीदारांना तो हा मान देतो आपण बघू शकता अनेक फोटोत तो मागे असेल आणि साथीदार पुढे, उदाहरणा करिता टी२० वर्ल्ड कपचा फोटो, आशिया कपचा फोटो बघा धोनी मागे उभा आहे आणि टीम पुढे आहे.

धोनीच्या स्वभावातील अजून एक खुबी बघायला मिळाली साउथ आफ्रिकेचा फलंदाज फिलीप डूप्लेसीस याला खेळता खेळता इजा झाली आणि तो पिचवर पडला. धोनीने क्षणाचा विलंब न करता त्याच्या मदती करिता पुढे आला. प्रतिस्पर्ध्याला मदत करणारा धोनीच आहे.

जेवढा मोठा सेलिब्रिटी तेवढे मोठे शोक परंतु धोनीच वेगळच आहे त्याने कुठल्या महागड्या सलून मध्ये न जाता आपल्या गावातील जुन्या केस कारागीरा कडून घरात कटिंग करून घेणे. त्याचा हा फोटो सोशल मिडीयावर वायरल झाला आणि त्याच्या साधेपणाची सर्वजण चर्चा करू लागले.

धोनी ज्या काळात खरगपूरला टीसीचे काम करत होता त्या काळात तो ज्या चहा टपरी वर चहा पियाचा त्या व्यक्तीला तो आजही विसरला नाही आहे. त्याने मागे थोमसच्या त्या चहा टपरीवर चहा घेतला आणि थोमसला एका महागड्या हॉटेलमध्ये जेवणाला हि घेऊन गेला. हा प्रसंग सोशल मिडीयावर बराच गाजला होता.

असा सेलिब्रिटी भूतो ना भविष्य होणे नाही. खासरे तर्फे धोनीला सलाम आणि तो नेहमीच असा राहो..

मुलाच्या जीवावर बेतली सापा सोबत मस्ती, घटना स्थळावरील लोकांनी घेतली बघ्यांची भुमिका…

बऱ्याचदा आपल्याला रस्त्यावर सापाचे खेळ करणारे लोक नजरेस पडतात. या लोकांना आपण गारुडी किंवा मदारी म्हणून ओळखतो. साप आणि नाग पकडून त्यांचे खेळ करणे हा त्यांचा व्यवसायच आहे. वेगवेगळ्या गावात जाऊन तेथे मोकळ्या जागेत ढोल वगैरे वाजूवन लहान मुलांना आणि मोठ्या व्यक्तींना जमा करून त्यांना सापाचे वेगवेगळे खेळ करून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम हे गारुडी करतात.

ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात सुद्धा लोकांना हे खेळ बघायला आवडतात. लोकं गारुड्याना या बदल्यात पैसे देतात. पण हे गारुडी हे या मध्ये परिपक्व झालेले असतात. आणि सहसा त्यांच्याकडे असणारे साप किंवा नाग हे विषारी नसतात.

पण सध्या सोशल मीडियावर 2 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये एक छोटा मुलगा पहिल्या व्हिडीओ मध्ये सापासोबत मस्ती करताना दिसत आहे. हा मुलगा सापासोबत मस्ती करत आहे आणि इतर लोकं त्याकडे मनोरंजन म्हणून बघून त्याचा आनंद घेत आहेत. लोकं एवढ्यावरच न थांबता त्याला पैसेही काढून देताना दिसत आहेत. पण कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. या मुलाला दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हा मुलगा ज्या सापासोबत मस्ती करत होता तोच साप त्या मुलाला चावला आहे.

या मुलाला साप चावला आहे आणि खाली पडल्याचे व्हिडीओ मध्ये दिसते. तो मुलगा त्यावेळी जिवंत असल्याचे स्पष्ट दिसते. पण कोणीही व्यक्ती त्याला दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे दिसते. या व्हिडीओ मध्ये लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची दिसते. जर लोकांनी बघ्याची भूमिका न घेता त्या मुलाला दवाखान्यात हलवले असते तर कदाचित तो वाचला असता.

बघा व्हायरल झालेले धक्कादायक व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कॅमेऱ्यात कैद झाली खेकडे पकडण्याची जुनी पद्धत, ही पध्दत बघुन तुम्ही हैराण व्हाल…

पावसाळा आला की नदी, नाल्यातून पाणी वाहू लागते. पावसाळ्यात खेकड्याचा हंगामही सुरू होतो. अनेकांना खेकडे खायला खूप आवडतात. खेकडे खाण्यासाठी तसे चविष्ट असतात. खेकड्यांचे दोन प्रकार सहसा आपल्याकडे बघायला मिळतात, एक म्हणजे समुद्रात आढळणारे सागरी खेकडे आणि गोड्या पाण्यात आढळणारे खेकडे. सागरी खेकड्यात सुद्धा अनेक जातीही आहेत. त्यापैकी फक्त 10-15 जाती या खाण्यासाठी वापरल्या जातात. काळसर, तपकिरी रंगाचे आणि सपाट पाठ असलेले खेकडे खायला खूप चवदार असतात. नांगी मोठी असलेले आणि छोटी नांगी असलेले खेकडे असेही प्रकार आपल्याला बघायला मिळतात.

पाण्याची जागी खेकड्याचे प्रमाण अधिक असते. खेकड्यांना बाजारात 50 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत डजण असा भाव सहज मिळतो. पूर आला की बांबूच्या काठ्यापासून बनवलेले गडदे खेकडे पकडण्यासाठी पिंजऱ्याचे काम करतात. पावसाळ्यात पाणी खेकड्याचा बिळात सुद्धा शिरते त्यामुळे खेकडे सहजासहजी बिळाच्या बाहेर येतात. पण हेच जर उन्हाळ्यात असेल तर खेकडे नेमके कसे पकडायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघूया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली खेकडे पकडण्याची एक जुनी पद्धत.

खेकडे पकडण्याची जुनी पद्धत-

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये 3 महिला या एका कोरड्या छोट्या नाल्यात खेकडे पकडताना दिसत आहेत. शहापूर जवळील वांद्रे या गावातील या महिला असल्याचे कळते. आपल्याला प्रश्न पडू शकतो की उन्हाळ्यात इतक्या सहजासहजी त्या बिळात लपलेले खेकडे कसे पकडत आहेत? तर त्यांनी यामागचं रहस्य या व्हिडीओ मध्ये उलगडलं आहे. यासाठी त्यांनी एक जुनी पद्धत अवलंबली आहे. ज्यामध्ये त्या दगडावर दगड घासत बसल्या आहेत. दगडावर दगड घसल्यावर पाणी वाहत असल्याचा आवाज होतो. यामुळे खेकड्यांना पाणी आल्याचा आभास होतो आणि ते बिळातून बाहेर पडतात. लगेच त्या महिला त्यांना पकडून घेतात.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

ही मुलगी होणार मुकेश अंबानी यांची सुनबाई, बघा कोण आहे ती?

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागली आहे. आकाश सध्या 4G कंपनी जिओ चा संपुर्ण कारभार सांभाळतात. या वर्षाच्या शेवटी आकाश अंबानी हे विवाहबंधनात अडकू शकतात अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोण होणार अंबानी कुटुंबाची सुनबाई?

सूत्रांच्या मते आकाश अंबानी हे हिऱ्याचे प्रसिध्द व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. श्लोका ही हिरे व्यापारी रसेल मेहता यांनी सर्वात छोटी मुलगी आहे. श्लोका ही कनेक्टफॉर या संस्थेची संस्थापक सुद्धा आहे. त्यांची ही संस्था NGO ना मदत करते. दोन्ही कुटुंबाकडून मात्र या विषयावर अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाली नाहीये. पण सूत्रांच्या माहितीप्रमाणे लवकरच याविषयी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. रसेल मेहता यांचे कुटुंब दक्षिण मुंबईत राहते. यावर्षी डिसेंबर मध्ये हे लग्न होऊ शकते.

आकाश आणि श्लोका यांनी सोबत घेतले आहे शिक्षण-

अंबानी आणि मेहता कुटुंबाचा अगोदरपासून चांगला परिचय आहे. आकाश आणि श्लोका यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल मध्ये सोबत शिक्षणही घेतले आहे. दोन्ही कुटुंबाकडे मीडियाने याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजून पर्यंत कोणतेही उत्तर अंबानी आणि मेहता कुटुंबाकडून आलेले नाहीये. श्लोकाने 2009 मध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रिंस्टन विद्यापीठातून अंतरोपोलॉजि मधून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर तिने लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधून लॉ मध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

24 मार्चला साखरपुडा?

सूत्रांनी दिलेली माहिती खरी असेल तर आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा येत्या 24 मार्चला साखरपुडा होणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

2017 वर्षात सर्वात जास्त वेळा बघितलेल्या या डान्सचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

2011 साली आलेल्या धनुषच्या कोलावरी डी गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर बरीच गाणी आली पण ज्याप्रकारे या गाण्याचा ट्रेंड तयार झाला होता तो खासच होता. पण 2017 मध्ये एक असे गाणे आपल्याला बघायला मिळाले ज्याने कोलावरी डी ला सुद्धा मागे टाकले. ते म्हणजे मल्याळम गाणे जिमकी कमल या गाण्याने. कोलावरी डी नंतर जिमकी कमल या गाण्याने जगाला अक्षरशः वेड लावले होते. या गाण्याने 2017 वर्षात युट्युबवर रेकॉर्ड सुद्धा केला होता. युट्युबच्या 2017 मध्ये सर्वात जास्त बघितलेल्या व्हिडीओच्या यादीत या गाण्याने दुसरा क्रमांक पटकावला होता.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका असलेल्या वेलीपडीनेट पुष्ठकम या सिनेमातलं हे गाणं आहे. या गाण्याला युट्युबवर सर्च केल्यावर लाखो व्हीव्हज असलेले व्हिडीओ तुम्हाला दिसतील.ऑगस्टमध्ये अपलोड केलेल्या ऑफिशियल व्हिडीओला आतापर्यंत 6 कोटी पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

पण सर्वाना आवडलेला व्हिडीओ म्हणजे या गण्यावरील केरलमधल्या स्कुल ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांचा डान्स. पारंपरिक साडी नेसून केलेल्या या नृत्याला लाखो लोकांची पसंती मिळाली. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हीही डान्स करायचा मोह आवरू शकणार नाही.

बघा या डान्सचा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

श्रीदेवीच्या मृतदेहावर का लावण्यात आला लेप?

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री उशिरा दुबईत निधन झाले. सुरुवातीला त्यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने नाही तर बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांकडून सांगण्यात आले. श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यांचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

दुबई पोलिसांनी काळ त्यांच्या सर्व कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर मृतदेह कुटुंबाला सुपूर्द केला. त्यानंतर तो काल भारतात आणण्यात आला. पण ते भारतात आणण्याअगोदर त्यांच्या मृतदेहावर एक विशिष्ट लेप लावण्यात आला. या मृतदेहाला लेप लावण्याच्या प्रक्रियेला एम्बॉमिंग म्हंटल जातं. खासरेवर जाणून घेऊया का लावण्यात आला श्रीदेवीच्या मृतदेहावर हा लेप…

मृतदेह हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना ही प्रक्रिया केली जाते. हे करण्यामागे अनेक कारणं असतात. खासकरून मृतदेह नेआण करताना त्याची दुर्गंधी येऊ नये, कोणाला त्यापासून काही त्रास होणार नाही, यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. या प्रक्रिया दोन प्रकारे केल्या जातात. अरटेरिअल प्रक्रियेत शरीरात रक्ताऐवजी एम्बोमिंग द्रव्य भरले जाते तर कॅव्हिटी प्रक्रियेत पोट आणि छातीचा भाग रिकामा करून त्यात द्रव्य भरले जाते.

एम्बोमिंग नंतर मृतदेह हा कॉस्मेटिक प्रक्रिया करून तयार केला जातो ज्यामध्ये मृतदेहाला अंघोळ घातली जाते, कपडे, केस ठीकठाक केले जातात. यामुळे लोकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी शक्य होते. एम्बोमिंग प्रक्रियेअगोदर मृतदेहाचे डोळे, तोंड बंद करून खालचा जबडा नीट ठेवला जातो.

ही प्रक्रिया केली नाही तर मृतदेह हाताळणाऱ्यांना त्रासदायक ठरू शकते. मृतदेहातून दुर्गंधी येऊ शकते. तसेच काही घातक वायुसुध्दा बाहेर पडतात.

अधिक वाचा: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा…
अधिक वाचा: श्रीदेवी विषयी कदाचितच तुम्हाला ह्या दहा गोष्टी माहिती असेल..
अधिक वाचा: दुबईतील लग्नात कॅमेऱ्यात कैद झाले श्रीदेवीचे शेवटचे क्षण, बघा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…