या प्रसंगामुळे कळेल कि धोनीची नाळ आजही कशाप्रकारे मातीशी जुळून आहे…

महेंद्रसिंग धोनी उर्फ माही प्रतिकूल परिस्थिती मधून धोनीने हे विश्व निर्माण केलेले आहे. पाठीशी कुठलेही पाठबळ नसताना महेंद्रसिंग धोनीने शून्यातून आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. भारताला विश्व विजेता बनविणारा माही आजही मातीशी जुळून आहे. त्याच्या वागण्या बोलण्यात कुठलाही अहंकार नाही. आज खासरेवर असेच काही प्रसंग बघूया ज्यामुळे तुम्हाला महेंद्रसिंग धोनी बद्दल अजून आदर निर्माण होईल..

एक दिवशी अचानक धोनी आपल्या हमर या कारने फिरत असल्यावर लक्षात आले कि त्याच्या गाडीचा पाठलाग कोणीतरी करीत आहे. ती धोनीची चाहती आपल्या स्कुटीने धोनीच्या पाठीमागे होती तिला फक्त एक सेल्फी हवा होता. माहीच्या हे लक्षात येताच त्याने गाडी थांबवून तिच्या सोबत सेल्फी घेतला आणि हा फोटो सोशल मिडीयावर भयंकर वायरल झाला होता.

विजय हजारे करंडका करिता धोनीची निवड झारखंडच्या कप्तान पदावर करण्यात आली होती. तो आरामात विमानाने प्रवास करू शकला असता परंतु धोनीने झारखंडच्या टीम सोबत रेल्वेने प्रवास केला. आणि त्याचा हा प्रसंग इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला होता.

अजून महेंद्र सिंग धोनी बद्दल एक विशेषतः हि आहे कि कधीही भारताने कुठलीही मालिका जिंकल्यास तो चषक धरून समोर मिरवत नाही. आपल्या साथीदारांना तो हा मान देतो आपण बघू शकता अनेक फोटोत तो मागे असेल आणि साथीदार पुढे, उदाहरणा करिता टी२० वर्ल्ड कपचा फोटो, आशिया कपचा फोटो बघा धोनी मागे उभा आहे आणि टीम पुढे आहे.

धोनीच्या स्वभावातील अजून एक खुबी बघायला मिळाली साउथ आफ्रिकेचा फलंदाज फिलीप डूप्लेसीस याला खेळता खेळता इजा झाली आणि तो पिचवर पडला. धोनीने क्षणाचा विलंब न करता त्याच्या मदती करिता पुढे आला. प्रतिस्पर्ध्याला मदत करणारा धोनीच आहे.

जेवढा मोठा सेलिब्रिटी तेवढे मोठे शोक परंतु धोनीच वेगळच आहे त्याने कुठल्या महागड्या सलून मध्ये न जाता आपल्या गावातील जुन्या केस कारागीरा कडून घरात कटिंग करून घेणे. त्याचा हा फोटो सोशल मिडीयावर वायरल झाला आणि त्याच्या साधेपणाची सर्वजण चर्चा करू लागले.

धोनी ज्या काळात खरगपूरला टीसीचे काम करत होता त्या काळात तो ज्या चहा टपरी वर चहा पियाचा त्या व्यक्तीला तो आजही विसरला नाही आहे. त्याने मागे थोमसच्या त्या चहा टपरीवर चहा घेतला आणि थोमसला एका महागड्या हॉटेलमध्ये जेवणाला हि घेऊन गेला. हा प्रसंग सोशल मिडीयावर बराच गाजला होता.

असा सेलिब्रिटी भूतो ना भविष्य होणे नाही. खासरे तर्फे धोनीला सलाम आणि तो नेहमीच असा राहो..

जाणून घ्या उदयनराजे भोसले यांच्याकडे किती आहे एकूण संपत्ती…

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचा एक वेगळाच अंदाज आहे. त्यांना प्रेमाने लोक महाराज साहेब म्हणतात. आजही बरेचसे लोक त्यांना(अर्धवट) मुजरा करतात. सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी असलेल्या उदयनराजे भोसले यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात.

‘मला हवं तसं राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसं राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही’, असे महाराज साहेब नेहमी ठणकावून सांगतात. महाराजांचा सातारा लोकसभा मतदारसंघात नेहमीच दबदबा राहिला आहे. उदयनराजेंनी 1996 ला सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पण त्यांच्या वाट्याला त्यावेळी पराभव आला होता. त्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि 1998 ला सातारा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री पद देण्यात आले होते. 1999 आणि 2004 मध्ये 2 वेळा पराभूत झाल्यानंतर महाराजांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथेही त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पण निवडणुकांचा विषय आला की एक चर्चेचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे महाराजांची संपत्ती. खासरेवर जाणून घेऊया उदयनराजेंची संपत्ती…

उदयनराजे भोसले यांनी संपत्ती-

उदयनराजे भोसले यांची एकूण संपत्ती किती हा प्रश्न अनेकांना पडतो. उदयनराजेंनी 2009 च्या लोकसभा निवडणूकीत अर्ज भरताना दिलेल्या संपत्तीच्या तपशीलानुसार उदयनराजेंची संपत्री त्यावेळी 12 कोटीच्या आसपास होती. पुढे 2014 साली अर्ज भरताना यामध्ये वाढ होऊन महाराजांची संपत्ती ही 14 कोटी झाली. उदयन महाराजांना गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे जिप्सी, अंबेसिडर, स्कोडा आणि अनेक त्यांच्या आवडत्या कार आहेत.

महाराजांच्या संपतीमध्ये 4 कोटी रुपये किंमत ही जागा आणि शेतीची आहे तर 3 कोटी रुपये हे ज्वेलरीचे आहेत. शिवरायांचे तेरावे वंशज असल्याने त्यांचे जवळपास 11 हजार 470 एकर जमिनीवर भोगवटादार म्हणून नाव आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

उस एक पेड़ की वजह से गाव का किसान बना रातोरात करोड़पति…

पेड़ भगवान है ऐसा बुजुर्ग कहते है.वही बात आज सच साबित हुई है.ऐसेही बुजुर्गोंने लगाया एक पेड़ भगवान के रूप में सामने आया है.आत्महत्या और आकाल की वजह से विदर्भ का किसान परेशान है.पर पंजाबराव शिंदे हर्षी जिल्हा पुसद यवतमाल का किसान कैसे एक पेड़ की वजह से रातोरात करोड़पति बना ये जानेंगे खास रे पर…

लालूप्रसाद यादव के कार्यकाल 2007 में वर्धा-नांदेड़ रेल्वे मार्ग को मंजूरी मिली.अब 10 साल के बड़े इंतजार के बाद रेल्वे मार्ग के लिए भूसंपादन का काम शुरू है.भूसंपादन के काम के दौरान अधिकारियों का ध्यान एक पेड़ ने आकर्षित कर लिया.ये पेड़ रक्तचंदन का है ऐसा बताया गया.ये रेल्वे मार्ग पंजाबराव शिंदे के खेत से जानेवाला है और ये पेड़ उनके खेत मैं है उसी वजह से पंजाबराव शिंदे करोड़पति बननेवाले है.ये पेड़ आम पेड़ नही है बल्कि रक्तचंदन का पेड़ है.उनके परिवार को भी मालूम नही था कि आपने खेत मे जो बुजुर्गोंने लगाया हुआ पेड़ है वो रक्तचंदन का है.इस पेड़ की अन्तराष्ट्रीय बाजार में करोड़ों रुपये कीमत है.ये पेड़ रक्तचंदन का है या नही ये सत्यपित करने के लिए ज़िला स्तरीय समिति के तरफ से इस पेड़ के अलग अलग नमूने लेकर प्रयोगशाला में भेज दिए गए.

वैसे तो रक्तचंदन का पेड़ महाराष्ट्र में नहीं पाया जाता.ये पेड़ आंध्रप्रदेश में पाया जाता है.इसी लिए उस बात की पुष्टि करने के लिए इस पेड़ का रिपोर्ट आंध्रप्रदेश भेजा गया.इस पेड़ का वजन लगभग आधा टन है.बाजार में रक्तचंदन बड़ी कीमत में बेचा जाता है.शायद ही दिखने वाले इस पेड़ को देखने के लिए आस पास के गांववालों ने काफी भीड़ लगी हुई है.

अंतरास्ट्रीय बाजार में रक्तचंदन को बड़ी माँग है और बहुत कीमती भी दी जाती है.ये पेड़ कोई काँट ना ले इसकेलिए पंजाबराव शिंदे ने एक सुरक्षा योजना भी बनाई है.और इस पेड़ से उनको आर्थिक लाभ भी मिलेगा ऐसा उन्होंने बताया है. मिंग वंश और उसके बाद के शासकों के बीच लाल चंदन की लकड़ी के प्रति दीवानगी का पता इस बात से चलता है कि वहां ‘रेड सैंडलवुड म्यूज़ियम’ नाम का एक विशेष संग्रहालय है जहां लाल चंदन से बने अनगिनत फर्नीचर और सजावटी सामान संजोकर रखे गए हैं.

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..

जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानने गोळीबार करत थेट मिसाईलने हल्ला केला आहे. यात एका कॅप्टनसह 4 जवान हुतात्मा झाले. 2 स्थानिकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या मिसाईल हल्ल्यात वयाची 23 वर्ष पूर्ण होण्यास अवघे 5 दिवस असताना कॅप्टन कपिल कुंडू यांना वीरमरण आले. हरियाणाचे (गुरुग्राम) सुपुत्र असलेले कॅप्टन कपिल हे 10 फेब्रुवारीला वयाची 23 वर्ष पुर्ण करणार होते.

कॅप्टन कपिल यांनी मृत्यूअगोदर त्यांच्या बहिणीसोबत whatsapp वर पाठविलेला विडीओ सध्या वायरल झाला आहे. ज्यामध्ये कॅप्टन कपिल हे आपल्या बहिणी सोबत बोलत आहेत आणि सोबत मांजर हि आहे. या विडीओ मध्ये कॅप्टन अतिशय खुश आहे. मृत्युपूर्वी त्यांनी हा विडीओ आपल्या बहिणी सोबत शेअर केला होता.

कॅप्टन कपिल यांनी फेसबुकवर ‘लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीइंग लाँग’ हे याच आशयाचं लिहिलेलं स्टेटस याची प्रचिती देतं. याच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिले. ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए,’ असं कॅप्टन कुंडू नेहमी म्हणायचे आणि त्यानुसारच ते जगलेही. ‘आनंद’ सिनेमातील त्यांचा हा आवडता डायलॉग होता. हा डायलॉग त्यांनी त्यांच्या फेसबुक स्टेटसवरही ठेवला होता.

2012 मध्ये कॅप्टन कपिल कुंडू एनडीएमध्ये रुजू झाले. एनडीएच्या माध्यमातून ते सैन्यात दाखल झाले. सैन्याच्या 15 जॅकलाई युनिटमध्ये असलेले कॅप्टन कुंडू राजौरीमध्ये तैनात होते. ते मूळ हरियाणातील गुरुग्रामचे रहिवासी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिल हे आई सुनिता यांचा आधार झाले. त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली आहेत. कपिल यांना काळाने हिरावल्यामुळे कुंडू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानानं गोळीबाराबरोबरच थेट मिसाईलनं हल्ला चढवला. यात कॅप्टन कपिल कुंडूंसह चार जवान शहीद झाले आहेत. तर दोन स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार झाला. 2017 साली पाकिस्तानने तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते.
कॅप्टन कपिल कुंडू यांना खासरे तर्फे मनाचा मुजरा…

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच

जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानने गोळीबार करत थेट मिसाईलने हल्ला केला आहे. यात एका कॅप्टनसह 4 जवान हुतात्मा झाले. 2 स्थानिकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या मिसाईल हल्ल्यात वयाची 23 वर्ष पूर्ण होण्यास अवघे 5 दिवस असताना कॅप्टन कपिल कुंडू यांना वीरमरण आले. हरियाणाचे (गुरुग्राम) सुपुत्र असलेले कॅप्टन कपिल हे 10 फेब्रुवारीला वयाची 23 वर्ष पुर्ण करणार होते.

कॅप्टन कपिल यांनी फेसबुकवर ‘लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीइंग लाँग’ हे याच आशयाचं लिहिलेलं स्टेटस याची प्रचिती देतं. याच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिले. ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए,’ असं कॅप्टन कुंडू नेहमी म्हणायचे आणि त्यानुसारच ते जगलेही. ‘आनंद’ सिनेमातील त्यांचा हा आवडता डायलॉग होता. हा डायलॉग त्यांनी त्यांच्या फेसबुक स्टेटसवरही ठेवला होता.

2012 मध्ये कॅप्टन कपिल कुंडू एनडीएमध्ये रुजू झाले. एनडीएच्या माध्यमातून ते सैन्यात दाखल झाले. सैन्याच्या 15 जॅकलाई युनिटमध्ये असलेले कॅप्टन कुंडू राजौरीमध्ये तैनात होते. ते मूळ हरियाणातील गुरुग्रामचे रहिवासी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिल हे आई सुनिता यांचा आधार झाले. त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली आहेत. कपिल यांना काळाने हिरावल्यामुळे कुंडू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानानं गोळीबाराबरोबरच थेट मिसाईलनं हल्ला चढवला. यात कॅप्टन कपिल कुंडूंसह चार जवान शहीद झाले आहेत. तर दोन स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार झाला. 2017 साली पाकिस्तानने तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते.
कॅप्टन कपिल कुंडू यांना खासरे तर्फे मनाचा मुजरा…

या महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..

इतिहासात अनेक महिलांवर अन्याय झालेल्या घटना आहे अनेक कुप्रथेचा महिलांना सामना करावा लागला. मग ते राजाचे शासन असो का लोकशाही आजही महिला त्यांच्या अधिकाराकरिता लढत आहेत. महिलांना आपल्या हक्क आणि अधिकारा करिता अनेक संघर्ष करावे लागली. आज आपन २१व्या शतकात आहो. परंतु भूतकाळात बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल कि महिलांना अधिकार मिळविण्याकरिता किती संघर्ष करावा लागला. अशीच एक गोष्ट स्वतंत्र पूर्व काळातील केरळ मधील आज खासरेवर तो प्रसंग आणि तो क्रूर नियम बघूया..

महिलांना शरीर पूर्ण झाकण्याचा अधिकार नव्हता. तीरुवंतपूरम येथे त्रावणकोर ब्राम्हण राजाचे राज्य होते. त्यांनी लागू केलेल्या नियमानुसार दलित महिलांना स्तनाचा कर द्यावा लागत असे. जर कर दिला तरच त्यांना राहण्याचा अधिकार होता. आणि स्तनाच्या आकारावरून हा कर ठरविल्या जात असे. या नियमानुसार स्त्रियांना आपले स्तन हे उच्चवर्णीय लोक समोर झाकण्याचा अधिकार नव्हता. दलित महिलांना दागिने घालण्याचा अधिकार नव्हता. आणि दलित पुरुषांना मिश्या ठेवण्याची परवानगी नव्हती. हा नियम फक्त दलित समाजास राजांनी लागू केला होता. या नियमामुळे स्त्रियांना जागोजागी अपमानित होण्याची वेळ येत असे.

या नियमाच्या विरोधार नागेली नामक एका महिलेने आवाज उठविला. नागेली तीरुवंतपूरम येथील चरथला येथील एक दलित स्त्री तिने उचललेल्या साहसी पावलामुळे हा नियम बंद करण्यात आला. तिचे कुटुंब गरीब असल्यामुळे तिला स्तनाचा कर देणे शक्य नव्हते. प्रांत अधिकारी जेव्हा स्तनाचा कर घेण्यास तिच्या घरी आला तेव्हा तिने यास विरोध केला आणि आपले स्तन एका झटक्यात कापून केळाच्या पानात प्रांत अधिकार्यास दिले. हे बघून अधिकारी पळून गेले आणि नागेलीचा मृत्यू रक्तस्त्रावामुळे जागेवरच झाला. तिच्या मृत्यूची बातमी सगळीकडे वणव्याप्रमाणे पसरली आणि सुरु पेटला वणवा त्रावणकोर राजा विरुद्ध आणि त्याच्या या निर्दयी नियमाविरुद्ध या घटनेनंतर नागेलीच्या नवऱ्याने तिच्या चितेत उडी मारून जीव दिला.

ह्या सर्व प्रकारामुळे राजा हादरला आणि त्याने मुकुट, त्रावणकोर या भागातील स्तनावरील कर रद्द केला. आजही या भागास नागेलीच्या नावावरून ओळखतात. नागेलीच्या या क्रांतिकारी पाउलास खासरेचा सलाम…
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

शिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…

नुकताच U-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. भारताने याआधी 2000, 2008 आणि 2012 साली U-19 वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व होते मुंबईच्या प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ कडे. कर्णधार पृथ्वी शॉ याने त्याच्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक अडचणींचा सामना केला आहे. पण त्याला साथ मिळाली होती ती म्हणजे एका शिवसेनेच्या नगरसेवकाची. जाणून घेऊया कोण होता तो शिवसेनेचा नगरसेवक.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर काल भारतीय संघ भारतात दाखल झाला. त्यानंतर पृथ्वी शाॅ याने अाज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पृथ्वी शॉचा मातोश्रीवर आज सत्कार करण्यात आला. पृथ्वी शॉ ला सुरुवातीपासूनच शिवसेनेकडून खूप मदत मिळाली आहे.

पृथ्वी शॉच्या वडिलांची परिस्थिती हालाखीची होती. त्याच्या वडिलांनी मात्र त्याला क्रिकेटचे धडे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पृथ्वी शॉ चे वडील सुरुवातीच्या काळात त्याला घेऊन विरार ते दादर असा प्रवास करायचे. त्यांना यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पृथ्वी आणि त्याचे वडील हा प्रवास करायचे. पृथ्वी शॉ ची मेहनत आणि जिद्द पाहून त्यांच्या मदतीला धावून आले शिवसेनेचे एक नगरसेवक. तत्कालीन नगरसेवक आणि आताचे वाकोल्यातले सेना आमदार संजय पोतनीस यांनी पृथ्वी शॉ चा सर्व खर्च उचलला. एवढेच नव्हे तर त्याला शिवाजी पार्कजवळ राहायला घरही मिळवून दिले. आमदार पोतनीस यांनी केलेली मदत पृथ्वीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

आमदार संजय पोतनीस यांनी केलेल्या या मदतीची जान आजही पृथ्वीला आहे. तो आजही सांगतो की पोतनीस यांनी त्यावेळी मदत केली नसती तर मी आज क्रिकेट खेळताना दिसलो नसतो.

उद्धव ठाकरेंनी दिल घर मिळवून देण्याचं आश्वासन-

उद्धव ठाकरे यांनी आज पृथ्वीचे कौतुक करताना त्याला घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. पृथ्वी, तू घराचं टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. अाम्ही तुला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अस उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

शिक्षिकेने विचारलेल्या “सर्वात मोठी इच्छा” प्रश्नाचे विद्यार्थ्याचे अप्रतिम उत्तर

ती एका प्राथमिक शाळेची शिक्षिका होती. सकाळीच तिने मुलांची परिक्षा घेतली होती. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या. उत्तरपत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले.तिचा नवरा तिथेच पडून मोबाईल बघत होता. त्याने रडण्याचं कारण विचारलं. ती म्हणाली, सकाळी मी मुलांना “माझी सर्वात मोठी इच्छा” या विषयावर लिहिण्यास सांगितले होते. एका मुलाने इच्छा व्यक्त केली आहे की, देवा मला मोबाईल बनव. हे ऐकून नवरा हसू लागला.

शिक्षिका म्हणाली, पुढे ऐका तर, मुलाने लिहिलय, जर मी मोबाईल बनलो तर घरात माझी एक खास जागा असेल आणि सगळेजण माझ्या आजूबाजूला असतील. जेंव्हा मी बोलेन तेंव्हा सगळेजण मला लक्ष देवून ऐकतील. मला कुणी उलट बोलणार नाही, प्रश्न विचारणार नाही. जेंव्हा मी मोबाईल बनेन, तेंव्हा पप्पा ऑफिस मधून आल्यावर थकले असले तरी माझ्यासोबत बसतील. आई चिडली असली तरी मला रागावणार नाही, उलट माझ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेल. माझ्या मोठ्या भावाच्यात आणि बहिणीच्यात माझ्याजवळ राहण्यावरुन भांडण होईल. एवढच काय मी (मोबाईल) बंद असलो तरी माझी चांगली काळजी घेतली जाईल. आणि हो, मोबाईलच्या रुपात मी सगळ्यांना आनंद सुध्दा देवू शकेन.

हे सगळे ऐकल्यावर नवरा सुध्दा थोडा गंभीर होवून म्हणाला, हे देवा… बिचारा मुलगा, त्याच्यावर त्याचे आई-वडील जरासुध्दा लक्ष देत नाहीत. शिक्षिका पत्नीने पाणावलेल्या डोळ्याने नव-याकडे पाहिले आणि म्हणाली, माहित आहे, तो मुलगा कोण आहे, आपला स्वतःचा मुलगा आपला चिंटू.

विचार करा, हा चिंटू तुमचा तर मुलगा नाही ना?
मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांसाठी आपल्याला वेळ मिळत नाही. आणि जो मिळतो तो सुध्दा आपण टी.व्ही. पाहणे आणि मोबाईल वर खेळण्यात घालवणार असू तर नात्यांचे महत्व आणि त्यापासून मिळणारे प्रेम आपण कधीच समजू शकणार नाही.

Moral : Please spare some of your valuable time for your FAMILY

३.५ कोटी रुपयाच्या कारमध्ये फिरणारा शेतकरी, वाचा खासरे माहीती…

व्हाट्सएप अन फेसबुकवर सध्या एक फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे. हा फोटो आहे एका शेतकऱ्याचा. हा साधासुधा शेतकरी नाहीये तर हा चक्क 3.5 कोटींच्या गाडीत फिरणारा शेतकरी आहे. सोशल मीडियावर सध्या रोल्स रॉयस या महागड्या कार सोबत उभा राहिलेल्या एका शेतकऱ्याचा फोटो प्रचंड वायरल झाला आहे. जाणून घेऊया कोण हा शेतकरी खासरेवर…

सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले हे व्यक्ती आहेत पुण्यातील कोंढापुरी गावचे शेतकरी आणि उद्योजक विजय गायकवाड. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावचे ते एक अत्यंत प्रगतशील शेतकरी आहेत. विजय गायकवाड यांच्या यशाच्या मागे त्यांच्या वडिलांचे विशेष कार्य आहे. त्यांचे वडील काही वर्षांपूर्वी पुण्यात व्यवसायासाठी गेले. तिथे त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसला. कोंढापुरीच्या एका शेतकऱ्याने पुण्यात येऊन व्यवसायात भरारी घेतली होती. माणिकराव गायकवाड यांनी व्यवसायात घेतलेली भरारी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभराटी साठी कारणीभूत ठरली.

पुणे-नगर रस्त्यावर असलेले हे गाव 20-25 वर्षांपूर्वी फक्त माळराने आणि कोरडवाहू शेतीचे गाव होते. पण इथल्या लोकांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता जवळच असलेल्या पुणे शहरात व्यवसायात पाय रोवले. शेतीबरोबर व्यवसाय करून ही गाव इतरांसाठी प्रेरणा बनले आहे. अनेक शेतकऱ्यांचे स्वतंत्र भव्य बंगले, बंगल्यापुढे चारचाकी गाड्या असा थाट इथल्या शेतकऱ्यांचा आहे.

विजय गायकवाड यांनी आपल्या व्यवसाय आणि शेतीच्या बळावर 3.5 कोटींची रोल्स रॉयस ही भव्य कार घेतली त्यावेळी ते पूजा करण्यासाठी गावात आले होते. पूजेसाठी त्यांनी पारंपरिक शेतकऱ्याचा पायजमा आणि शर्ट घातला होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पूजा करतानाचेच आहेत. विजय गायकवाड यांच्या या गाडीमुळे मात्र कोंढापुर गाव आणि त्यांचे कुटुंबीय चांगलेच चर्चेत आले आहे.

कशाची करतात शेती-

विजय गायकवाड यांच्या यशात महत्वाची भूमिका राहिली आहे ते करत असलेल्या नैसर्गिक शेतीची. नैसर्गिक शेतीमुळेच विजय गायकवाड हे एवढ्या महागड्या गाड्या घेण्यासाठी आणि त्या वापरण्यासाठी सक्षम बनले आहेत. इतर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती करण्यासाठी ते प्रेरणास्रोत बनले आहेत. विजय गायकवाड यांच्याकडे रोल्स रॉयसशिवाय ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज या महागड्या कारसुद्धा आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

उदयनराजे भोसले यांचा जीवनपट व्हिडीओ स्वरुपात पहिल्यांदाच बघा फक्त खासरेवर

‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही.’ अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्‍या सातार्‍यातल्या पत्रकारांचीही नाही!

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी क्षणाक्षणाला जाणवते. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात. लोक त्यांना थोडे घाबरूनच असतात. थोडं अंतरही ठेवतात. पण मध्येच अचानक उदयनराजेंचा मूड बदलतो आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडतात. लोकांना धक्का द्यायला उदयनराजेंना खूप आवडतं. उदयनराजेंबद्दल सातार्‍यातच नव्हे तर राज्यभर अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. सातार्‍यातील पत्रकारांमध्ये तर या आख्यायिका मोठया चवीने चघळल्या जातात. पत्रकार परिषद असो वा राजकीय मेळावा; उदयनराजे नेहमीच मद्यधुंद अवस्थेत असतात, किंवा त्यांच्या जलमंदिर वाडय़ावर त्यांना आड जाणार्‍यांना ते चाबकाने फोडून काढतात, या अशाच काही आख्यायिका. त्या खोटया असतील, कदाचित खर्‍याही असतील. पण त्यामुळे उदयनराजेंच्या इतर चांगल्या-वाईट गुणांकडे दुर्लक्ष करायचं काही कारण नाही.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘थेट’ तेरावे वंशज असलेल्या उदयनराजेंविषयी सातारकरांच्या हृदयात एक वेगळीच आदराची जागा आहे. लोक त्यांना प्रेमाने ‘महाराज साहेब’ म्हणतात. आजही बरेचसे लोक त्यांना (अर्धवट) मुजरा करतात. खासदार म्हणून उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभेत त्यांचं पहिलं भाषण इंग्रजीत केलं, याचं सातारकरांना भयंकर कौतुक वाटलं होतं.

बघा उदयनराजे भोसले यांचा व्हिडीओ जीवनपट-