महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल खासरे माहिती..

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला 20 मे ला 130 वर्षे पूर्ण झाले. या रेल्वे स्टेशनला अगोदर व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) नावाने ओळखले जायचे. स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत मुंबईच्या सौंदर्यात भर घालते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात ताज महाल नंतर सर्वात जास्त फोटो या इमारतीचे काढले जातात. या इमारतीचे डिझाइन फ्रेडरिक स्टीवेन्सने तयार केले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल 1 दशक कालावधी लागला होता.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीचे बांधकाम 1978 मध्ये सुरू झाले होते आणि ते 1987 मध्ये पूर्ण झाले. महाराणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून इमारतीला व्हिक्टोरिया टर्मिनस नाव देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला बनवण्याकरीता 16,13,863 रुपये खर्च झाला होता. स्टीवेन्स यांनी डिझाइन केलेल्या या वास्तूला त्याकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी वास्तू म्हणून ओळख होती. 1996 मध्ये या वास्तूचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे ठेवण्यात आले होते. जुलै 2017 ला पुन्हा यामध्ये बदल करून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. 2004 मध्ये युनेस्कोने या भवनाला वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जागतिक वारसा यादीत स्थान दिले होते.

पूर्ण इमारतीचा सर्वोत्कृष्ट बिंदू हा मुख्य घुमट आहे. त्यावर महिलेचा एक विशाल पुतळा आहे ज्याची उंची 16 फूट 6 इंच आहे. डाव्या हातात एक ज्वलंत मशाल आहे आणि उजव्या हातात एक चाक आहे जे प्रगतीचे प्रतीक आहे. या इमारतीचे डिझाइन हे गॉथिक शैलीचे आहे ज्याला भारतीय संदर्भानुसार बांधण्यात आले.

1029 मध्ये या स्टेशनवर 10.4 लाख रुपये खर्चून 6 प्लॅटफॉर्म बनवण्यात आले होते. नंतर पुनर्निर्माण केल्यानंतर इथे 13 प्लॅटफॉर्म झाले. यार्ड आणि स्टेशन मध्ये त्यावेळी काही बदल करण्यात आले होते. 1994 मध्ये येथील प्लॅटफॉर्मची संख्या 15 झाली. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18 प्लॅटफॉर्म आहेत. पूर्वेकडून प्रवेश करण्यासाठी मोकळी जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शताब्दी निमित्ताने एक डाक तिकीट देखील प्रकाशित करण्यात आले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

तब्बल १० लाख दारूच्या बॉटल वापरून बनविले मंदिर वाचा खासरेवर

मंदिर आणि दारू हे दोन शब्द एकमेका पासून वेगवेगळे आहे. परंतु तुम्हाला असे सांगितले कि एक मंदिर असे आहे जे फक्त दारूच्या बॉटल पासून बनविले आहे तुम्हाला धक्का बसेल ना ? हो अगदी खरे आहे वाद्य पा महा शिदी कावू हे बौध्द मंदिर बनविले आहे केवळ दारूच्या बॉटल पासून बनले आहेत. वाचूया या मंदिराची संपूर्ण माहिती खासरेवर थायलंडमधील सिसाकेट राज्यात हे मंदिर आहे. खुन हान हे या जिल्ह्याचे नाव आहे. नुकतेच हे मंदिर बनविण्यात आलेले आहे. लोकल बियर कंपनी आणि हेन्किन या बियर कंपनीच्या सयुंक्त मदतीने हे मंदिर बनविण्यात आलेले आहे. वरील माहिती स्कूपव्हूप या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे. मंदिर बनवायच्या मागेही एक भन्नाट कथा आहे. १९८४ साली समुद्रात फेकल्या जाणाऱ्या बॉटल मुळे एका भिक्खूने ह्या बॉटल जमा करण्यास सुरवात केली. आणि त्यावेळेस त्याने ठरविले कि ह्या बॉटलचे मंदिर बनविण्यात यावे.

बाथरूम, झोपण्या करिता बनविण्यात आलेल्या खोल्या सर्व काही या बॉटल पासून बनविण्यात आलेल्या आहे. telegraph ने दिलेल्या माहिती नुसार बुद्धाची मूर्ती देखील बियरच्या फेकल्या गेलेल्या झाकणापासून बनविण्यात आलेली आहे. मंदिरातील बांधकाम क्षेत्रात १.५ दशलक्ष बॉटल वापरण्यात आलेल्या आहे. मंदिरात हिरव्या रंगाची बॉटल हि हेन्किन कंपनीची आहे. आणि तपकिरी रंगाची बॉटल Changbottles स्थानिक कंपनीची आहे.

जवळपास २० इमारती या परिसरात बियर बॉटल पासून बनविल्या आहेत. दसलक्ष बॉटलचे मंदिर म्हणून हे मंदिर ओळखण्यात येत आहे. या आगळ्या वेगळ्या मंदिरास नक्की कधी भेट द्या. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य आमचे पेज लाईक करा व पोस्ट शेअर करायला विसरू नका.

जंगलातील आदिवासींची जमिनीखालील पाणी शोधण्याची ही खासरे प्राचीन पद्धत..

महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ जमाती आहेत. यापैकी २०११ च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी, वारली, कोकणा आणि ठाकूर यांची संख्या महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे. आदिवासींमधे असलेल्या प्रथा या अनुकरण करण्यासारख्या असतात. सामुहिक जीवनपद्धती, सामुहिक निर्णय, आवश्यक तेवढेच पिकवणे, जंगलाचे संरक्षण करणे, अशा अनेक गोष्टी आदिवासींकडून शिकण्यासारख्या आहेत.

सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात आदिवासींना पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगत असल्याने ते या समस्येवर मात करतात. आदिवासी विहीर खोदण्यापूर्वी जमिनीखालील पाणी कसे शोधतात हा एक उत्सुकतेचा विषय आहे. आपण आज खासरेवर बघूया आदिवासींची जमिनीखालील पाणी शोधण्याची खासरे प्राचीन पद्धत..

अशी लावणी तुम्ही कधी बघितलीच नसेल ! एकदा क्लिक करून बघाच..

आजपर्यत आपण अनेक लावण्या बघितल्या असेल. लावणीचे वेगवेगळे प्रकार असतात. महाराष्ट्राला लावणिची परंपरा ब-याच काळापासून लाभलेली आहे. बैठकिची लावणी यातली एकच पध्दत यामध्ये मुख्य आहेत ति अदाकारी म्हणजे हावभाव…
सोशल मीडिया वर असाच एक विडीओ वायरल झाला आहे ज्यामध्ये आपण अदाकारी बघितल्यास नक्की घायाळ होसाल. या रावजी बसा भावजी या सुरेखा पुणेकरच्या गाण्यावर ही लावणी घरात कोणीतरी शुट केलेली आहे. सध्या हि लावणी वर उत्कृष्ट अदाकारी देणारे कोण याबाबत माहीती भेटली नाही आहे. परंतु ही लावणी एकदा बघाच..

आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जमिनीखाली पाणी शोधण्याची प्राचीन पद्धत, बघा व्हिडीओ…

खरा खजाना जमीनीवर नसून जमिनीखाली आहे, तो म्हणजे पाणी. आपण सर्वच जण पाण्याचे महत्व चांगल्या प्रकारे जाणतो. सध्याच्या काळात पाणी शोधण्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात. पण प्राचीन काळात मात्र जमिनीखालील पाणी तपासण्यासाठी काही विशेष पद्धती वापरल्या जायच्या. त्यामध्ये प्रामुख्याने नारळ, काठी आणि अंड्याचा वापर करून पाणी शोधले जायचे. नारळ घेऊन आपण जिथे पाणी तपासायचे आहे तिथे जायचं आणि नारळ आपल्या हातावर ठेवायचं. त्यानंतर जिथे पाणी आहे तिथे नारळ आपल्या हातावर हलायला लागते. अंड्याचा वापर करूनही तुम्ही अशाप्रकारे पाणी शोधु शकता. हा व्हिडीओ बघून तुम्हाला कल्पना येईलच.

होस्टेल मधील मुलींची एक वेळा हि मस्ती बघाच…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कॅमेऱ्यात कैद झाली खेकडे पकडण्याची जुनी पद्धत, ही पध्दत बघुन तुम्ही हैराण व्हाल…

पावसाळा आला की नदी, नाल्यातून पाणी वाहू लागते. पावसाळ्यात खेकड्याचा हंगामही सुरू होतो. अनेकांना खेकडे खायला खूप आवडतात. खेकडे खाण्यासाठी तसे चविष्ट असतात. खेकड्यांचे दोन प्रकार सहसा आपल्याकडे बघायला मिळतात, एक म्हणजे समुद्रात आढळणारे सागरी खेकडे आणि गोड्या पाण्यात आढळणारे खेकडे. सागरी खेकड्यात सुद्धा अनेक जातीही आहेत. त्यापैकी फक्त 10-15 जाती या खाण्यासाठी वापरल्या जातात. काळसर, तपकिरी रंगाचे आणि सपाट पाठ असलेले खेकडे खायला खूप चवदार असतात. नांगी मोठी असलेले आणि छोटी नांगी असलेले खेकडे असेही प्रकार आपल्याला बघायला मिळतात.

पाण्याची जागी खेकड्याचे प्रमाण अधिक असते. खेकड्यांना बाजारात 50 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत डजण असा भाव सहज मिळतो. पूर आला की बांबूच्या काठ्यापासून बनवलेले गडदे खेकडे पकडण्यासाठी पिंजऱ्याचे काम करतात. पावसाळ्यात पाणी खेकड्याचा बिळात सुद्धा शिरते त्यामुळे खेकडे सहजासहजी बिळाच्या बाहेर येतात. पण हेच जर उन्हाळ्यात असेल तर खेकडे नेमके कसे पकडायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघूया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली खेकडे पकडण्याची एक जुनी पद्धत.

खेकडे पकडण्याची जुनी पद्धत-

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये 3 महिला या एका कोरड्या छोट्या नाल्यात खेकडे पकडताना दिसत आहेत. शहापूर जवळील वांद्रे या गावातील या महिला असल्याचे कळते. आपल्याला प्रश्न पडू शकतो की उन्हाळ्यात इतक्या सहजासहजी त्या बिळात लपलेले खेकडे कसे पकडत आहेत? तर त्यांनी यामागचं रहस्य या व्हिडीओ मध्ये उलगडलं आहे. यासाठी त्यांनी एक जुनी पद्धत अवलंबली आहे. ज्यामध्ये त्या दगडावर दगड घासत बसल्या आहेत. दगडावर दगड घसल्यावर पाणी वाहत असल्याचा आवाज होतो. यामुळे खेकड्यांना पाणी आल्याचा आभास होतो आणि ते बिळातून बाहेर पडतात. लगेच त्या महिला त्यांना पकडून घेतात.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

डच चित्रकाराने काढलेल्या शिवरायांच्या अस्सल फोटो मागील वायरल सत्य.. नक्की वाचा

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत. या गोष्टीचा फायदा घेत मागील काही दिवसापासून एक फोटो सोशल मिडीयावर वायरल झालेला आहे. शिवरायांचा अस्सल फोटो म्हणून हा फोटो शेअर करण्यात येतो वाचा काय आहे फोटो मागील सत्य..

तर याबाबत मागील काही दिवसा अगोदर वासुदेव कामत यांनी एक लिहलेला आहे त्यामधील सारांश आपल्या समोर सादर करत आहोत त्यावरून आपल्या लक्षात येईल चित्र अस्सल आहे कि खोटे, सदर चित्र हे डच चित्रकाराकडून काढण्यात आले असे वायरल करण्यात आले आहे. तर झाले असे कि वासुदेव कामत यांचे मित्र एका चित्रप्रदर्शनात गेले तिथे शिवरायांचे अस्सल चित्राची प्रत म्हणून हा फोटो विकायला ठेवण्यात आली होती. शिवगौरवच्या कार्यक्रमाला गेलेल्या त्यांच्या चित्रकार मित्राने तिथे चित्राची प्रत विकत घेतली आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी वादही घातला. हे चित्र डच चित्रकाराचे नाही तर कामत यांचे आहे, हे त्यांनी सांगितले. तर त्यावर कार्यकर्त्यांपैकी एकाने त्यांना सांगितले की, तुमच्या सरांनी रशियात जाऊन मूळ चित्र पाहून ते काढले असेल. त्यावर तो मित्र म्हणाला, आमचे सर कुठे कुठे गेले हे आम्हाला पक्के ठाऊक आहे. तुम्ही चित्रचोरी केली आहे. त्यानंतर खिलारे यांनी सारवासारव करणारा फोन केला, तेव्हा कामत सरांनी त्यांना सांगितले की, ‘माझे चित्र तुम्ही डच चित्रकाराचे चित्र म्हणून विकणे ही माझीच नव्हे तर शिवप्रेमींचीही घोर फसवणूक आणि विश्वासघात आहे.’ त्यावर ते म्हणाले की, ‘आम्ही चित्रविक्रीमध्ये नफा कमवत नाही.’ ‘पण तुम्ही माझे चित्र डच चित्रकाराचे म्हणून विकणे ही फसवणूकच आहे’

मधातील फोटो वासुदेव कामत यांनी रेखाटलेला आणि बाजूचे फोटो बनविलेले.

प्रत्यक्षात डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र हे एकाच बाजूचा चेहरा दिसणारे आहे. म्हणून तर आजवर कोणत्याही चित्रकाराने समोरून दिसणारे महाराजांचे चित्र काढलेले नाही. दुसरा एक बदल या चित्रामध्ये करण्यात आला होता तो म्हणजे यावर महाराजांची स्वाक्षरी आहे, असे भासविण्यासाठी मोडीमधील एक शब्द त्यावर टाकण्यात आला. पण इथे मोडी येते कुणाला? अनेकांनी ती महाराजांची मोडीमधील स्वाक्षरीच आहे, असे समजून ते चित्र विकतही घेतले. त्यात एका चित्रकार मित्राचाही समावेश होता. त्याला तर हे सारे पाहून धक्काच बसला होता. कारण हे डच चित्रकाराचे नाही तर कामत सराचे चित्र आहे, हे त्याला ठाऊक होते. कार्यक्रमाच्या उद्घोषणेतही वारंवार हाच डच चित्रकाराचा उल्लेख सुरू होता. लोक तर केवळ शिवप्रेमापोटी चित्र विकत घेतात. लोकांची चूक काहीच नाही. पण हा चित्रकार आणि शिवप्रेमी या दोघांचाही त्या संस्थेने आणि संबंधितांनी केलेला विश्वासघातच होता. आता तर हेच चित्र कृष्णधवल करण्यात आले असून त्याला थोडा सेपिआ टोन देण्यात आला आहे. कारण जुनी चित्रे-फोटो अशा सेपिआ टोनमध्ये असतात. आणि आता तेच माझे चित्र कृष्णधवल रूपात डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र म्हणून विक्रीही होते आहे. आणि व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांतूनही फिरते आहे. अशाच प्रकारे लोकांच्या मनातील श्रद्धेचा गैरवापर करून मग प्रगत टेक्नॉलॉजीच्या आधारे त्या शिवप्रेमींच्या श्रद्धेचे अंधश्रद्धेमध्ये रूपांतर केले जाते.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

या महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..

इतिहासात अनेक महिलांवर अन्याय झालेल्या घटना आहे अनेक कुप्रथेचा महिलांना सामना करावा लागला. मग ते राजाचे शासन असो का लोकशाही आजही महिला त्यांच्या अधिकाराकरिता लढत आहेत. महिलांना आपल्या हक्क आणि अधिकारा करिता अनेक संघर्ष करावे लागली. आज आपन २१व्या शतकात आहो. परंतु भूतकाळात बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल कि महिलांना अधिकार मिळविण्याकरिता किती संघर्ष करावा लागला. अशीच एक गोष्ट स्वतंत्र पूर्व काळातील केरळ मधील आज खासरेवर तो प्रसंग आणि तो क्रूर नियम बघूया..

महिलांना शरीर पूर्ण झाकण्याचा अधिकार नव्हता. तीरुवंतपूरम येथे त्रावणकोर ब्राम्हण राजाचे राज्य होते. त्यांनी लागू केलेल्या नियमानुसार दलित महिलांना स्तनाचा कर द्यावा लागत असे. जर कर दिला तरच त्यांना राहण्याचा अधिकार होता. आणि स्तनाच्या आकारावरून हा कर ठरविल्या जात असे. या नियमानुसार स्त्रियांना आपले स्तन हे उच्चवर्णीय लोक समोर झाकण्याचा अधिकार नव्हता. दलित महिलांना दागिने घालण्याचा अधिकार नव्हता. आणि दलित पुरुषांना मिश्या ठेवण्याची परवानगी नव्हती. हा नियम फक्त दलित समाजास राजांनी लागू केला होता. या नियमामुळे स्त्रियांना जागोजागी अपमानित होण्याची वेळ येत असे.

या नियमाच्या विरोधार नागेली नामक एका महिलेने आवाज उठविला. नागेली तीरुवंतपूरम येथील चरथला येथील एक दलित स्त्री तिने उचललेल्या साहसी पावलामुळे हा नियम बंद करण्यात आला. तिचे कुटुंब गरीब असल्यामुळे तिला स्तनाचा कर देणे शक्य नव्हते. प्रांत अधिकारी जेव्हा स्तनाचा कर घेण्यास तिच्या घरी आला तेव्हा तिने यास विरोध केला आणि आपले स्तन एका झटक्यात कापून केळाच्या पानात प्रांत अधिकार्यास दिले. हे बघून अधिकारी पळून गेले आणि नागेलीचा मृत्यू रक्तस्त्रावामुळे जागेवरच झाला. तिच्या मृत्यूची बातमी सगळीकडे वणव्याप्रमाणे पसरली आणि सुरु पेटला वणवा त्रावणकोर राजा विरुद्ध आणि त्याच्या या निर्दयी नियमाविरुद्ध या घटनेनंतर नागेलीच्या नवऱ्याने तिच्या चितेत उडी मारून जीव दिला.

ह्या सर्व प्रकारामुळे राजा हादरला आणि त्याने मुकुट, त्रावणकोर या भागातील स्तनावरील कर रद्द केला. आजही या भागास नागेलीच्या नावावरून ओळखतात. नागेलीच्या या क्रांतिकारी पाउलास खासरेचा सलाम…
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

काय असतो नागमणी ? जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…

काही दिवस अगोदर युट्यूबवर एक विडीओ वायरल झाला ज्यामध्ये सापाच्या डोक्यातुन एक खडा काढण्यात येतो. तथाकथित विडीओ मधे त्या खड्यास नागमणि सांगण्यात आले आहे. युट्यूब वर वेगवेगळ्या लोकांनी हा विडीओ अपलोड केला जवळपास १ करोड लोकांनी हा विडीओ बघितला व लाखो लोकांनी हा विडीओ शेअर केला आहे. आज खासरे वर बघुया काय आहे या विडीओची सत्यता…

विकीपेडीयाच्या माहितीनुसार या खड्याचा उपयोग सर्पदंश झाल्यावर उपचारासाठी करण्यात येतो. परंतु या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक दुजोरा दिलेला नाही आहे. दक्षिण भारतात हा काळसर रंगाचा खडा कोब्रा सापाच्या डोक्यावरील भागात सामान्यतः आढळून येतो. हा खडा थोडाफार चमक ही देतो. खड्याचा रंग सापानुसार वेगवेगळा असतो. परंतु हा खडा नाही हा नागमणि नसुन सापाने न वापरलेले विष काही दिवसाने स्थायु स्वरूपात रुपांतरीत होते त्यामुळे हा खडा तयार होतो. हा खडा काढल्यामुळे सापाचा मृत्यू होत नाही याला चमक असण्याचे खास कारण हे आहे की या चमकदार पणामुळे अनेक जिव त्याकडे आकर्षित होतात व साप आपला भक्ष पकडू शकतो.

काही देशात सर्पदंश झालेल्या ठिकाणावर हा खडा ठेवल्या जातो असे म्हटल्या जाते की हा खडा विष ओढुन घेतो. तसेच काही जागेवर दुध व पाण्यात हा खडा टाकुन काही वेळ ठेवल्या जातो व नंतर खडा बाहेर टाकुन पाणि पिल्याने विष शरीरातुन निघुन जातो असा समज आहे परंतु यास वैज्ञानिक मान्यता नाही. हा खडा जवळ असल्यावर साप जवळ येत नाही असाही समज आहे. परंतु हिंदू पुराणानुसार १०० वर्ष पूर्ण झालेला साप जो कोणालाही चावला नाही त्याच्या डोक्यावर खरा नागमणी तयार होतो व हा आकाराने मोठा व अंधारात प्रकाशमय असतो. कदाचीत औषधी कंपन्यांना हे सत्य समोर येऊ द्यायचे नसल्याने या खड्या विषयी सर्वाना अज्ञात ठेवले असेल.

आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका

जाणून घ्या काय आहे रहस्य ७८६ या आकड्यामागे…

मुस्लीम समाजात ७८६ हा आकडा जास्त प्रमाणात आढळतो. मोबाइल नंबर, गाडीचा नंबर हा ७८६ घेण्याकरिता स्पर्धा लागलेली असते परंतु तुम्हाला माहिती आहे का या ७८६ नंबर मागे काय रहस्य आहे ? चला तर आज खासरे वर बघूया ७८६ या नंबर मागील रहस्य..

मागे ebay वर एकच खळबळ उडाली होती जेव्हा नवीन २००० ची नोट मार्केटमध्ये आली आणि ७८६ नंबरची नोट हि तब्बल १५ लाख रुपयात विकल्या गेली. खरेदी करणारा मुस्लीम होता परंतु त्याने या नंबर करिता एवढे पैसे का मोजले असावे ? ७८६ नंबर असलेले सीम कार्ड हि मोठ्या भावात विकल्या जाते. आशिया खंडात ७८६ या आकड्यास जास्त महत्व दिल्या जाते. अरबी बाराखडीत २८ अक्षरे आहेत आणि प्रत्येकास एक वेगवेगळी संख्या देखील दिलेली आहेत. खालील फोटोत आपण ह्या अक्षराच्या संख्या बघू शकता.

जर ७८६ नंबर आपण एकत्र मिळविला तर बिस्मिल्लाह उर रहमान ए रहीम हे वाक्य तयार होते. हे नाव अल्लाहचे आहे त्यामुळे ७८६ हा आकडा मुस्लीम समाजात पवित्र मानल्या जातो. परंतु हि संख्या भारत आणि पाकिस्तानात जास्त प्रसिद्ध आहे करणा उचारातील फरक असा आहे भारता बाहेर अल्लाह चे नाव Bismillah ir-Rahman ir-Rahim असा केला जातो. खालील फोटोत आपण बघू शकता ७८६ हि बेरीज कशी येते.

वरील सर्व अंकाची बेरीज हि ७८६ एवढी येते त्यामुळे मुस्लीम लोकात ७८६ हा आकडा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.ह्या सर्व कारणामुळे नोट,मोबाइल नंबर किंवा गाडीचा नंबर हा अल्लाह सोबत जुळलेला असावा याकरिता मुस्लीम लोक ७८६ या संख्येस मोठ्या प्रमाणात पसंदी देतात.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..