या गावात पिकते लाल सोने, गावाची वर्षाची कमाई आहे 1 अरब..

महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव आपल्या वेगळ्या ओळखीसाठी सर्वाना परिचित आहे. कारण या गावातील घरांना दरवाजे आणि लॉक लावलेच जात नाहीत. कर्नाटक मध्ये देखील मुत्तुरु या गावाची अशीच वेगळी ओळख आहे. कारण या गावाची मातृभाषा ही संस्कृत आहे. आशियातील सर्वात स्वच्छ गाव मेघालयातील मावल्यानांगला देवाचा बाग म्हणून ओळखले जाते. राजस्थान मधील जैसलमेर जिल्ह्यातील कुलधरा गाव मागच्या 170 वर्षांपासून मनुष्यहीन आहे. या गावात1 दिवासाच्या वर कोणीच राहत नाही. अशीच एका नवीन ओळख निर्माण केलेल्या गावाबद्दल माहिती बघूया.

एखाद्या गावात लाल सोने पिकते म्हणलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण उत्तर प्रदेशातील एका गावात लाल सोनं पिकवलं जात असून या गावातील लोकं यामधून करोडो रुपये कमवत आहेत. सलारपूर खालसा या गावातील लोकं टोमॅटोला लाल सोनं म्हणतात. कारण टोमॅटोच्या उत्पन्नाने त्यांचं आयुष्य पालटून गेले आहे. सोनं म्हणू पण का नाही कारण अवघ्या 4-5 महिन्यातच ते करोडो रुपये यामधून कमावतात. अगोदर हे गाव कुस्ती अंक पैलवानांसाठी ओळखले जायचे. पण इथल्या लाल सोन्याने गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

या गावात मागच्या 5 महिन्यात तब्बल 60 कोटी रुपयांचा टोमॅटोचा व्यवसाय झाला आहे. या गावात टोमॅटोच्या उत्पादनास सुरुवात 1998 मध्ये झाली होती. त्यावेळी अमरोहा निवासी अब्दुल रऊफ यांनी टोमॅटोची शेती केली होती. या गावापासून प्रेरणा घेत अनेक गावांनी टोमॅटोची शेती करण्यास सुरुवात केली आहे. या गावातील शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणाहून टोमॅटो लागवडीसाठी ट्रेनिंग घेतली आहे. यातून ते आता यामध्ये पारंगत झाले असून ते आता नावासोबत चांगला पैसा देखीक कमवत आहेत.

अमरोहा जिल्ह्यात जवळपास 1200 हेक्टर टोमॅटोची शेती केली जाते. या गावातील लोकं आता फक्त टोमॅटोची विक्री न करता त्याचे बियाणे विकून देखील चांगली कमाई करतात. पूर्ण उत्तर प्रदेशातून दीड क्विंटल बियानाची विक्री झाली तर त्यातून 80 किलो वाटा हा एकट्या सलारपूर गावाचा होता. गावात पैलवानी करून पोट भरण्यास अडचणी येत असल्याने गावात टोमॅटोची शेती करण्यास सुरुवात झाली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

इराणचे ४३ हजार कोटी रुपयांचे तेलाचे कर्ज मोदींनी फेडले म्हणून पेट्रोल महागले ?? वायरल सत्य

सध्या सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या भरमसाट किमती विरोधात सरकारच्या विरोधात सामान्यजनांचा आक्रोश वाढतो आहे.पण या पेट्रोल डिझेलच्या किंमत वाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरत आहेत त्यासाठी मोदी भक्त त्यांच्या बचावासाठीही पुढे सरसावलेत आणि ही दरवाढ यूपीएपेक्षा कशी कमी आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करताहेत. त्यासाठी त्यांनी एक मेसेंज वायरल केला आहे त्यात त्यांनी असा दावा केलाय कि काँग्रेस सरकारने केलेले इराणचे ४३ हजार कोटी रुपयांचं कर्ज मोदी सरकारने फेडले आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. या मेसेंजमागील वायरल सत्य वेगळे आहे ते आम्ही आपल्या समोर आणतो आहोत.

काही पोस्ट आपण हि पाहाव्यात यासाठी खाली एक उदाहरण दिले आहे

कच्च्या तेलासाठी भारत सर्वाधिक अवलंबून आहे, तो सौदी अरेबियावर. त्या खालोखाल नंबर येतो तो इराण आणि इराकचा. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, मेंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन इराणकडून कच्चं तेल विकत घेतात. हे सगळं सुरळीत सुरू असतानाच, २०११ मध्ये अमेरिका आणि अन्य महासत्तांनी अण्वस्त्रबंदी धोरणांतर्गत इराणवर निर्बंध आणले आणि सगळं तंत्रच बिघडलं. इराणकडून भारताला दररोज ४ लाख बॅरल (१ बॅरल म्हणजे १५९ लिटर) तेल पाठवलं जात होतं, ते १ लाख बॅरलवर आलं. त्यासोबतच, या तेलाचे पैसे देण्याच्या प्रक्रियेतही बदल झाला.तुर्कस्तानच्या हल्क बँकेद्वारे ५५ टक्के रक्कम आणि भारताच्या यूको बँकेद्वारे ४५ टक्के रक्कम इराणला दिली जात होती. परंतु, २०१३ नंतर हे निर्बंध वाढले आणि आर्थिक देवाणघेवाणही कठीण होऊन गेली. त्यामुळे भारतीय कंपन्यांचं इराणला ६.४ अब्ज डॉलर्सचं, म्हणजेच सुमारे ४३ हजार कोटींचं देणं शिल्लक राहिलं.

१४ जुलै २०१५ नंतर इराणवरील काही निर्बंध हटवण्यात आले, पण हल्क बँकेद्वारे पैसे देण्यावरील बंधन कायम राहिलं. त्यामुळे भारतीय कंपन्यांना इराणला पैसे देताच येत नव्हते, पण दुसरीकडे रोज १ लाख बॅरल तेलाची खरेदी मात्र सुरूच होती. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेऊन काही महत्त्वपूर्ण करार केले. त्याचवेळी, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इराणचं देणं कसं देता येईल, यादृष्टीने रिझर्व्ह बँकेचेही प्रयत्न सुरू होते.निर्बंध उठवल्यानंतर इराणनेही काही अटींमध्ये, नियमांमध्ये बदल केले होते. ४५ टक्के रक्कम रुपयांमध्ये आणि उर्वरित हल्क बँकेद्वारे घेण्याचं धोरण त्यांनी बदललं. थकित रकमेवर व्याज द्या आणि सगळी रक्कम युरोमध्ये परत करा, अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा, रिझर्व्ह बँक पुढे आली आणि यूको बँकेद्वारे हे पैसे देण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला.

२०१६ मध्ये मोदी इराणला गेले तेव्हा त्यांनी या थकित रकमेतील सुमारे ५००० कोटींचा पहिला हप्ता दिला आणि नंतर सहा हप्त्यांमध्ये संपूर्ण ४३ हजार कोटीचं देणं भारतानं दिलं. त्यामुळे इराणचं कर्ज मोदी सरकारने फेडलं, हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. इराणची थकित रक्कम देण्यासाठी मोदी सरकारने रणनीती, आराखडा आखला, हे योग्य; पण हे पैसे पेट्रोलियम कंपन्यांकडे होतेच. ते मोदींनी फक्त इराणपर्यंत पोहोचवले. दुसरीकडे, या चार वर्षांत पेट्रोल-डिझेलवरील करातून सरकारच्या तिजोरीत सव्वा सात लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या मोदींनी काँग्रेसने केलेले इराणचे कर्ज फेडले यात कोणतेही तथ्य नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

बॉलीवूडच्या हिरोईन पेक्षाही सुंदर आहे ही तृतीयपंथी, तिच्या सौंदर्यापूढे सोनम कपूरही आहे फिकी..

तृतीयपंथी म्हणलं की आपल्या डोक्यात वेगळेच विचार येतात. तृतीयपंथीयांची एक वेगळीच इमेज आपल्या मनात बसलेली असते. तृतीयपंथीयांना समाजात मान सन्मान मिळत नाही. त्यांना मान सन्मान मिळवण्यासाठी समाजात झगडावे लागते. त्यांना खालच्या पातळीची वागणूक दिली जाते. पण देवाने माणसाचे तीन रूप बनवले आहेत त्यामध्ये स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी आहेत. पण स्त्री आणि पुरुषांना जेवढा मान सन्मान आणि चांगली वागणूक मिळते तेवढं मात्र तृतीयपंथीयांना मिळत नाही. त्यांचा जन्मही स्त्री आणि पुरुषाने सामान्यपणे संबंध ठेवल्याने होतो. पण ते पूर्णपणे स्त्री सुद्धा नसतात आणि पुरुषही नसतात, यामुळे त्यांना तृतीयपंथी म्हणून ओळखले जाते.

त्यांना आपण बऱ्यापैकी पैसे मागताना बघतो किंवा एखादा कार्यक्रम वगैरे असेल, घरी लग्न समारंभ असेल तर तृतीयपंथीयांना डांस करण्यासाठी गाणे गाण्यासाठी बोलावले जाते. नाचणे हा तर त्यांचा पेशा बनला आहे. यामागे त्यांची आर्थिक परिस्थिती आणि समाजाचे त्यांच्या प्रति असलेले विचार कारणीभूत आहेत. समाजात वागताना स्त्री आणि पुरुषांना मिळणारे हक्क एका तृतीयपंथीला नाही मिळत. समाज तर दूरचा झाला पण त्यांचे आई वडील आणि कुटुंब देखील त्यांना दूर करते.

तृतीयपंथी सुद्धा देवाने बनवलेले जीव असल्याने त्यांना समाजात चांगली वागणूक मिळायला हवी. पण समाज आपले विचार बदलायला तयार नाहीये. जास्तीत जास्त तृतीयपंथी हे आपलं पोट भरण्यासाठी नाचतात आणि गातात. आज आपण अशी एक तृतीयपंथी बघूया ज्यांना बघुन तुम्ही विचारही करणार नाही की ती तृतीयपंथी असू शकते. भारतीय असलेली बिशेष हुईरेम दिसायला हुबेहूब स्त्री दिसते. आणि नुसती स्त्रीच नाही तर तिच्या सौंदर्यापुढे बॉलीवूडमधील अभिनेत्री देखील कमी पडतील.

तो एवढी सुंदर आहे की तिच्या सुंदरतेची चर्चा फक्त भारतातच नाही तर परदेशातही होत आहे. नुकतेच थायलंड मधील चोंबुरी मध्ये होणाऱ्या एका काँटेस्टसाठी निवडण्यात आलेल्या 30 प्रतिस्पर्ध्यांमध्ये बिशेषचं नाव सर्वात वर होतं. एका रिपोर्टनुसार हा काँटेस्ट दरवर्षी तृतीयपंथीयांसाठी आयोजित केला जातो. या काँटेस्टची सुरुवात 2004 मध्ये झाली होती. महत्त्वाचे म्हणजे इतर तृतीयपंथीना कुटुंब जसे वाऱ्यावर सोडते तसे न करता बिशेषच्या आई वडिलांनी तिचा व्यवस्थित सांभाळ केला.

बिशेषचा अगोदर मुलासारखा सांभाळ करण्यात येत होता पण नंतर तिला मुलीसारखे सांभाळण्यात आले. तिच्या सुंदरतेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नीचा तुफान डान्स व्हायरल..

जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी हे सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एच डी कुमारस्वामी यांनी यापूर्वीही कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्या पत्नीसोबतचे फोटो ट्रेंडिंग ला आहे होते. कुमारस्वामी यांच्या पत्नी राधिका कुमारस्वामी या कन्नड अभिनेत्री आहेत. राधिका यांनी अनेक कन्नड सिनेमात काम केले आहे. राधिका कुमारस्वामी यांचा एक डान्सचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. गणेशोत्सव दरम्यानचा हा डान्स आहे. बघा व्हिडीओ..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

पंक्चर काढणाऱ्याने कशी खरेदी केली दीड कोटींची जगुआर आणि 16 लाखाचा नंबर?

RJ 45 CG 1 हा कर्नाटकमधील सर्वात महागडा गाडीचा व्हीआयपी नंबर आहे. या नंबरच्या किमतीमध्ये एक मोठी सेदान कार येऊ शकते. पण बापाची अमाप संपत्ती म्हणल्यावर असा व्यर्थ पैसे खर्च केले तर नवल वाटत नाही. कितीही खर्च केले तर संपणार नाहीत एवढे पैसे. मग एका नंबरसाठी 16 लाख खर्च केल्याने काय फरक पडणार. हे श्रीमंतासाठी ठीक आहे, पण जर हे ज्याने केलंय तो तरुण आहे राहुल तनेजा. या नावाचा व्यक्ती गरीब असेल असं नाव ऐकून वाटणारही नाही.

राहुल तनेजाचं कुटुंब मूळचे सिहोर मध्य प्रदेशातील आहे. राहुल आपल्या बहीण भावांमध्ये सर्वात लहान आहे. त्याच्या कुटुंबात त्याच्यापेक्षा मोठे चार बहीण भाऊ आहेत. राहुलचे वडील पंक्चर काढण्याचे काम करायचे. राहुलही त्यांना या कामात मदत करायचा. त्यालाही पुढे हेच करायचे आहे हे तो ओळखून होता.

पण राहुल तनेजा काही तरी मोठं करायचं या उद्देशाने मोठं शहर असलेल्या जयपूरला आला. इथे आल्यानंतर अनेक छोटेमोठे काम केले. सोबतच आपला अभ्यासही त्याने सुरू ठेवला. त्याने सुरवातीला पतंग विकले, धाब्यावर जेवण सर्व करायचं काम केलं, पेपर वाटले, होळीला रंग विकला तर दिवाळीला फटाक्यांचे स्टॉल लावले. पण काम छोटं मोठं समजणे हे आपल्यावर निर्भर असते. पण कोणतच काम हे छोटं मोठं नसतं.

राहुलने परीक्षा चांगल्या मार्कने पास केल्या. फक्त अभ्यासावर लक्ष ने देता त्याने सोबत मॉडेलिंग मध्ये सुद्धा आपलं नशीब अजमावलं. यातून यश मिळायला सुरुवात साली आणि पुढे त्याने लाईव्ह क्रिएशन्स नावाची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. त्याने एवढं यश मिळवलं की त्याच्याकडे आता मध्य प्रदेशातील सर्वात महाग नंबर असलेली कार आहे. राहुलकडे 3 महागड्या कार आहेत. त्याने जगुआर गाडीच्या नंबरसाठी तब्बल 16 लाख रुपये मोजले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कुत्रे चालत्या गाड्यांच्या मागे का धावतात? गाड्यांच्यामागे धावून कुत्र्यांना काय मिळते?

कुत्रा हा पाळीव प्राणी अनेकांना आवडतो. पण तो जेव्हा आपल्या चालत्या गाडीच्या मागे लागतो तेव्हा मात्र डोक्यात प्रचंड संताप येतो. गाडीच्या मागे धावणे कुत्र्याला जरा जास्तच आवडते. एवढ्या रागाने गाडीमागे धावतात की त्यांना असं वाटत असावे आपण पूर्ण गाडी ओढून खाली पाडून ड्रायव्हरला चावू. दुचाजीच्या मागे धावणे कधी कधी साहजिक वाटते पण चारचाकीच्या मागे पण ते धावतात. चारचाकी मागे धावून त्यांना काहीच मिळणार नसते. कधी कधी तर ते एकाच गाडीचा पिच्छा पकडतात. खासरेवर जाणून घेऊया कुत्रे नेहमी चालत्या गाड्यांच्या मागे का धावतात. Qoura या प्रसिद्ध साईटवर याबद्दल काही उत्तरे देण्यात आली आहेत. इथे देण्यात आलेली उत्तरे खूप मजेशीर आहेत..

1. आपण नेहमी बघतो की कुत्र्यांना गाडीच्या चाकावर सुसू करायची सवय असते. कुत्रे जेव्हा असं करतात तेव्हा ते आपला एरिया ठरवून घेतात आणि त्या गाडीवर हक्क जमवतात. पण तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काही कामानिमित्त गेलात तर तिकडचा कुत्रा चाकावर सुसु करतो. मग गाडी जेव्हा वापस येते तेव्हा तुमच्या गल्लीतल्या कुत्र्याच्या लक्षात ही गोष्ट येते. तेव्हा तो तुमच्या गाडीच्या मागे लागतो आणि भुंकतो. खरं बघायला गेलं तर तो तुम्हाला याबद्दल जबाब मागत असतो.

2. कुत्रे हे फक्त कार आणि बाईकच्या मागेच धावतात असे नाही तर ते मुलांच्या माणसाच्या पण मागे लागतात. कारण ते शिकारी प्राणी आहेत. त्यामुळे शिकारी करने त्यांना आवडते. ते फक्त मनोरंजनासाठी असे करत असतात, माणसाला चावण्याचा आणि इजा करण्याचा कोणताही त्यांचा हेतू नसतो. पण आपल्या मागे लागण्यानंतर आपण घाबरतो आणि त्यांना मारतो.

3. एकाने दिलेले उत्तर तर खूपच मजेशीर आहे. कुत्रे स्वतःच खूप घाबरतात. गाडी आली की त्यांना जास्त भीती वाटते. त्यामुळे ते स्व बचावासाठी गाडीच्या मागे धावतात.

4. आपण नेहमी बघतो की कुत्रे गाडीच्या खाली झोपतात. त्यांना वातते गाडी त्यांच्या मालकीचीच आहे. लन जेव्हा गाडी जाते तेव्हा ते नाराज होतात आणि गाडीवर हल्ला करतात.

5. अनेकदा गाडीखाली चिरडले जाऊन कुत्रे मरतात. मोठे कुत्रे वाचून पळतात पण छोटे पिल्ले मात्र गाडीखाली येतात. अशावेळी बाकी कुत्र्यांच्या डोक्यात गाडीचा फोटो बसतो आणि ते कोणतीही गाडी दिसली की तिच्यामागे धावतात. बदला घेण्याचा त्यांचा हेतू असतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

या 9 पाकिस्तानी जाहिराती बघितल्यावर हसून हसून पोट दुखेल..

पाकिस्तान नेहमी चर्चेत राहतो त्याच्या केलेल्या वेडेपणामुळे देशा प्रमाणे येथील टीव्ही इंडस्ट्री देखील वेडी आहे आज खासरेवर बघा काही अश्या जाहिराती आहेत. आम्ही नक्की सांगतो कि या 9 पाकिस्तानी जाहिराती बघितल्यावर हसून हसून पोट दुखेल. मजा आली असल्यास आमची हि पोस्ट नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. लवकरच आणखी नवीन पोस्ट घेऊन येऊया पोस्ट शेअर करायला विसरू नका. A cryptocurrency (or crypto currency) is a controversial digital asset designed to work as a medium of exchange that uses cryptography to secure its transactions, to control the creation of additional units, and to verify the transfer of assets.Cryptocurrencies are a type of digital currencies, alternative currencies and virtual currencies. Cryptocurrencies use decentralized control as opposed to centralized electronic money and central banking systems

पाणी पिताना हा पक्षी स्वतःचा चेहरा पंखाने का झाकुन घेतो वाचा कारण

निसर्ग विविध चमत्कार दाखवतो आणि प्रत्येक पशु पक्षी आपआपली वेगवेगळी वैशिष्ट घेऊन या भूतलावर आहे. मोराचे मोरपीस, वाघाचे पट्टे तर कोकिळेचा आवाज प्रत्येक पक्षी किंवा प्राणी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवतो. असाच एक पक्षी या पृथ्वीवर आहे जो पाणी पिताना स्वतःचा चेहरा झाकून घेतो. एवढा लाजाळू पक्षी किंवा नखरा असलेला पक्षी कोण व कुठे आढळतो चला बघूया आज खासरेवर

या पक्षाचे नाव Black Heron आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ अचानक वायरल झाला आहे कि या पक्षाचा व्हिडीओ काढायला ७ दिवस व १९ फोटोग्राफर लागले. त्यामुळे आम्ही या संबंधी अधिक माहिती घेतली. सदर पोस्ट मध्ये लिहण्यात आले होते कि हा पक्षी १९ लाख रुपये किंमतीचा आहे. सदर पक्षाची अधिक माहिती घेतली असता हा पक्षी दुर्मिळ आहे हे सत्य आहे परंतु या पोस्ट मध्ये लिहलेली सर्व माहिती सत्य नाही आहे. ७ दिवस व १९ फोटोग्राफर फोटो काढण्या करिता हि माहिती योग्य नाही आहे त्या संबंधी कुठलाच पुरावा नाही आहे आणि पक्ष्याची विक्री हि कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे वरील माहिती असत्य आहे. आता बघूया का झाकून घेतो हा पक्षी चेहरा,

हा पक्षी आफ्रिका खंडात आढळतो. सुदान ते दक्षिण आफ्रिका असा तो दरवर्षी प्रवास करतो. ग्रीस मध्ये देखील हा पक्षी आढळतो. गोड पाण्याचे तलाव अथवा नदी जवळ हा राहतो. हा पक्षी मुख्य करून किडे आणि छोटे मासे खाऊन जगतो. आणि त्याचे पंख झाकायचे कारण हि त्याच्या शिकारी सोबत जुळलेले आहे. खालील विडीओ मध्ये आपण बघा तो कसा चेहरा झाकून घेतो.

यावरून आपल्याला हे लक्षात येईल कि हा पक्षी शिकारी करिता पंखाने चेहरा झाकून घेतो व चोचीने मासे पकडतो. त्याचा पाणी पिण्यासोब्त कुठलाही संबंध नाही. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी तुम्ही बघितली का?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला तर भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल यांच्याकडे केली होती. राज्यपालांनी ही मागणी मान्य करत आज बीएस येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. जेडीएस कडून मुख्यमंत्री पदासाठी एच डी कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. कुमारस्वामी यांची संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्याबद्दल व8विविध माहिती आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कोण आहेत एच डी कुमारस्वामी यांच्या पत्नी जाणून घेऊया खासरेवर..

हरदनहाली मध्ये जन्मलेले एच डी कुमारस्वामी हे भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी यांचे दोन लग्न झालेले असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अनिता आहे. अनिता आणि कुमारस्वामी यांना निखिल नावाचा मुलगा आहे जो कन्नड फिल्म स्टार आहे.

कुमारस्वामी यांचे ज्या पत्नीसोबत फोटो व्हायरल झाले आहेत त्या त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहेत. कुमारस्वामी यांनी 2006 मध्ये कन्नड अभिनेत्री राधिका सोबत दुसरं लग्न केलं होतं.

राधिकाने आपल्या अभिनयास सुरुवात 2002 साली कन्नड सिनेमा नीला मेघा शामा मधून केली. तेव्हा ती फक्त 9 वी पास झाली होती. 2000 च्या सुरुवातीला राधिका कन्नड फिल्म इंडस्ट्री मधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. राधिका ही अभिनेत्री सोबत प्रोड्युसर देखील आहे. राधिका आणि कुमारस्वामी यांचा विवाह कातील मधील दुर्गा परमेश्वरी मंदिरात 26 नोव्हेंबर 2000 ला झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कुठे लपलाय विरप्पनचा 30 हजार कोटींचा खजिना, बघा व्हिडीओ..

विरप्पन हा एक कुख्यात डाकू म्हणून ओळखले जायचे. विरप्पन ला आपल्या वाटेल आलेल्या कोणाच्याही हत्या करणारा एक डाकू म्हणून ओळखले जायचे. पण खूप कमी लोकांना माहिती असेल की विरप्पन हा एक निर्दयी गुन्हेगार सोबत एक अट्टल दरोडेखोर सुद्धा होता. विरप्पनने केलेल्या चोऱ्या आणि इतर तस्करीचा सर्व खजिना तो जंगलात लपवून ठेवत असे. त्याच्या मृत्यूनंतर 17 वर्षांनी सुद्धा त्याचा खजिना शोधण्यास पोलिसांना अपयश आले आहे. अजूनही तेथील गावातील लोक हा खजिना शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात. विरप्पनचं एन्काऊंटर केलेले पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकात विरप्पनच्या 30 कोटींच्या खजिन्याचं रहस्य सांगितले आहे. वरील व्हिडीओ बघून तुम्हाला हे रहस्य समजेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…