RSS च्या पैलवान महिलेने पाकिस्तानी पैलवानाला धो धो धुतले? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागची सत्यता..

सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही खऱ्या असतात तर अनेकदा खोट्या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. व्हाट्सएपवर तर कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता माहिती फॉरवर्ड करण्याची सवय भारतीयांना मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या असच काहीसं देशभक्तीचं कॉकटेल सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. कुस्तीचा एक सामना घेऊन एक माहिती व्हायरल करण्यात आली आहे.

याचे झाले असे की एक व्हिडिओ समोर आला आहे. असे व्हिडीओ एखादं सर्क्युलर असल्यासारखे समोर येतात. हा व्हिडीओ व्हाट्सएपवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. देशभक्त हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

या व्हिडीओ सोबत एक मॅसेज फॉरवर्ड केला जात आहे ज्यामध्ये सांगितले जात आहे की, ‘ मुंबईत एक पाकिस्तानी कुस्तीपटू महिला रिंग मध्ये उभा राहून भारतीय महिलांना शिव्या देत होती आणि तिच्या सोबत कुस्ती खेळण्यास चॅलेंज देत होती. हे चॅलेंज तिथे उपस्थित असलेली RSS च्या दुर्गा वाहिनीची महिला संध्या फडके मैदानात उतरली आणि पुढे काय झाले तुम्हीच बघा’.

या व्हिडीओची सत्यता तपासली असता हा खोटा असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओ मधील जी कुस्तीपटू चॅलेंज देते ती भारताची पहिली प्रोफेशनल कुस्तीपटू बीबी बुल बुल आहे. तसेच तिचे चॅलेंज स्वीकारून जी महिला आखाड्यात उतरते ती कविता आहे जी हरियाणामधील माजी पोलीस अधिकारी आणि एमएमए चॅम्पियन आहे. ही मॅच जालंधरमध्ये झालेली आहे. कविताला बुल बुल अगोदर एक चापट मारते त्यानंतर कविता बुल बुल वर तुटून पडते. या व्हिडीओ मधील कविता भगवे कपडे घातल्याने त्याला हिंदुत्वाचा रंग देऊन व्हाट्सएपवर शेअर केलं जात आहे.

बघा याचा खरा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

…असा लागला दम बिर्याणी चा शोध?

नवाब आसिफउद्दौला, बडा इमामबाडा आणि दम बिर्याणी !

बिर्याणी भारतीय उपमहाद्वीप मधील तांदुळासोबत भाज्या आणि मांसाच्या मिश्रणापासून बनलेला लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. जगभरातील भारतीयांना बिर्याणी खूप आवडते. बिर्याणी मध्ये प्रामुख्याने तांदुळ, मसाले, मसूर दाळ, मांस किंवा भाज्या असतात. बिर्याणी हा शब्द मुळात फारशी भाषेतुन आलेला आहे. फारशी भाषेतून आलेला बिर्याणी हा उर्दू शब्द आहे. तांदुळासाठी वापरला जाणारा शब्द ब्रिज पासून याचा शोध लागल्याचे मानले जाते. भारतामध्ये बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार राज्यांनुसार प्रसिद्ध आहेत. हैद्राबादी बिर्यानी खासकरून मोठा बिर्याणीचा प्रकार भारतात आहे. मद्रास मधील बुहारी बिर्याणी देखील प्रसिद्ध आहे. दम बिर्याणी भारतात खूप आवडीने खाल्ली जाते.

भारतामध्ये मटन अथवा चिकन वापरून तयार केलेली बिर्याणी स्थानिक नावावरून ओळखली जाते. उदा- हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी इत्यादी. या सर्व बिर्याणी मध्ये तांदुळाचे प्रकार, मसाले आणि पाकशैली याचा फरक असतो. महाराष्ट्रात शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.

कसा लागला दम बिर्याणी चा शोध?

मांसाहार प्रेमींसाठी दम बिर्याणी म्हणजे मोठी पर्वणीच, या दम बिर्याणीचा शोध मात्र मोठा रंजक आहे. अवध नवाब असिफउद्दोला यांनी साधारण १७८४ साली बडा इमामबाडा या इमारतीचे निर्माण सुरू केले, या इमारत बांधणीच्या समयी कामगारांच्या जेवण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतः कामगार आपले जेवण तयार करत असत. बिर्याणी हा पदार्थ तसा जुनाच पण या बडा इमामबाडा बांधकामावरील कामगारांनी मात्र वाफेचा प्रयोग करून या दम बिर्याणीचा शोध लावला.

नवाब आसिफउद्दोला हे बडा इमामबाडाच्या बांधकामाच्या पाहणीसाठी गेले असता ते या बिर्याणीच्या नुसत्या वासाने प्रभावित झाले. नवाब आसिफउद्दोला यांनी लागलीच आपल्या दरबारातील खानसामा म्हणजे राजांचे स्वयंपाकी ( अवधी बावर्ची ज्यांना रकबदार म्हटले जायचे ), यांना या दम बिर्याणीची पाकविधी जाणून घेऊन, काही बदल सुचवून ही दम बिर्याणी वेगळ्या राजेशाही पद्धतीने बनवण्याचा आदेश दिला. साध्या बांधकाम कामगारांचा खाद्य पदार्थ सरळ नवाबाच्या स्वयंपाकघरात पोहचला, आजही अवध किंवा लखनऊची दम बिर्याणी जगप्रसिद्ध आहे..
-राज जाधव

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

भैय्यूजी महाराज यांनी का केली आत्महत्या ?? सुसाईड नोट मध्ये काय सांगितले वाचा?

पोलिसांना भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केलेल्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट सापडले आहे. पोलिसांना सापडलेली सुसाइड नोट इंग्रजीत लिहिलेली होती. आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे तणाव निर्माण झालेले आहेत. ते सहन होत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे भय्यूजी महाराजांनी लिहिले होते. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे.

भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली. मध्यप्रदेश सरकारने काही महिन्यांपूर्वी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्ये मागे घरगुती कारण आहे असे मध्यप्रदेश मधील स्थानिक न्यूज पेपर दैनिक भास्कर ने न्यूज दिली आहे कि त्यांची दुसरी पत्नी व मुलगी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरु होते त्याचा तणाव त्यांना होता. आत्महत्या पूर्वी पण मुलगी आणि दुसरी पत्नी यांच्यात कुर कुर झाली होती तेव्हा त्यांनी स्वतःला एका रूम मध्ये बंद केले होते आणि तिथेच त्यांनी आत्महत्या केली.

थोडक्यात जाणून घ्या भैय्यूजी महाराज बद्दल: भय्यूजी महाराजांचा जन्म 1968 मध्ये मध्यप्रदेशात झाला होता. मध्यप्रदेशातील शुजालपूर येथील जमीनदार कुटुंबातील ते होते. त्यांचे मुळ नाव उदयसिंह देशमुख होते.कधीकाळी त्यांनी एका कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडलिंग केले होते. त्यानंतर मुंबईत नोकरीही केली होती. नोकरीचा राजीनामा देऊन भय्यूजी महाराज यांनी सदगुरु दत्त धार्मिक ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम सुरु होते. इंदूरमधील बापट चौकात त्यांचा आश्रम आणि ट्रस्ट आहे. येथूनच त्यांचे सामाजिक कार्य चालत होते.भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव माधवी निंबाळकर होते, त्यांचे माहेर मराठवाड्यातील होते. माधवी यांच्या निधनानंतर भय्यूजी महाराज यांनी 30 एप्रिल 2017 रोजी ग्वाल्हेर येथील डॉ. आयुषी शर्मासोबत दुसरे लग्न केले होते. पत्नी आयुषी सोबत ते आश्रमात राहात होते. पहिली पत्नी माधवीपासून त्यांना कुहू नावाची मुलगी आहे. ती सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे.

FacebookTwitterGoogle+EmailWhatsAppShare

दिल्ली कोठा नंबर ६४ छुप्या कॅमेरातून नक्की बघा हा व्हिडीओ

चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय. दिल्लीचा जीबी रोडवरील हा कोठा याच कामा करिता प्रसिद्ध आहे नक्की बघा येथे मध्ये काय चालते वरील व्हिडीओ मध्ये

अंबानीच्या मुलाची साखरपुड्याची पत्रिका बघून तुम्ही नक्की अवाक होणार

आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा २८-३० जूनला होणार आहे. मुकेश अंबानींचं घर एंटिलियामध्ये हा सोहळा पार पडेल. या दोघांच्या साखरपुड्याच्या पत्रिका पाठवायला आता सुरुवात झाली आहे. पहिले ऑनलाईन आणि मग वैयक्तिकरित्या भेटून साखरपुड्याचं आमंत्रण देण्यात येत आहे. आकाश आणि श्लोकाचं लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. हे लग्न भारतीय परंपरेला अनुसरून असेल. मुंबईत होणाऱ्या या लग्नाची तयारी अंबानी कुटुंबियांनी सुरू केली आहे. याआधी गोव्याच्या एका रिसॉर्टमध्ये आकाश आणि श्लोकाची प्री-एंगेजमेंट सेरिमनी झाली होती. या सोहळ्यामध्ये आकाशनं श्लोकाला प्रपोज करून हिऱ्याची अंगठी घातली होती.

शिवरायांनी राज्याभिषेकासाठी ६जुन हीच तारीख का निवडली ?

● आपल्या कर्तृत्वाची जाणीव दाही दिशांना आणि आलम दुनियेला व्हावी आणि त्याचवेळी मोगलांना ह्या देशात स्वतंत्र स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना झाली हे कळावे यासाठीच कोणत्याही मुहुर्ताची वाट न बघता महाराजांनी ६ जुन ही तारीख जाणीवपुर्वक राज्याभिषेकासाठी निवडली.
मोगलांना त्यांच्या ढासळत्या डोलाऱ्याची जाणीव करुन दिली.त्यांचा तिळपापड केला.
● महाराजांच्या राज्यभिषेकास त्याकाळी धर्मविधी करणाऱ्या सर्वच पुरोहीत ब्राह्मण वर्गाने जाहीर विरोध केला आणि महाराज वैदिक धर्मानुसार शुद्र असल्यामुळे राज्याभिषेकास पात्र नाहीत असेच सगळे ब्राह्मण पुरोहीत सांगत होते.यामुळे महाराजांनी राज्यभिषेकासाठी काशीवरुन भरमसाठ लाच देऊन गागाभटासारख्या पुरोहीताला आणावे लागले.
● ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस.कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस.
देशात मृग नक्षत्र ७ जुनलाच सुरु होते.त्यात काहीच बदल नाही.महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात.म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासून सुरु होतात.शेतकऱ्यांना सोयीचे जावे व शेतकऱ्यांचाच एक आनंदाचा क्षण ठरावा,म्हणुन त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणुन ६ जून हा दिवस निवडला गेला.

● त्याकाळी ६ जून १६७४ रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते,पाऊस नव्हता,शेतकऱ्यांनापण सोयीचे होते.हे सुध्दा महत्वाचे कारण आहे.
● जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता त्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता.
कारण दक्षिणायण-उत्तरायण भानगड.
परंतु महाराजांना वेगेवेगळ्या शत्रुंच्या हालचालींवर लक्ष देणे आवश्यक होते.लोक दक्षिणायन वर्ज्य मानतात.परंतु महाराज आवर्जुन दक्षिणायनातील जुन महिना निवडतात,कारण शत्रुला चकमा देण्यासाठी.
राज्य राहिले तर राज्याभिषेक होईल,म्हणुन राज्य-रयत ह्यांची काळजी अगोदर.
● मुहूर्त पंचांग आणि योग्य संधी याचा काही संबंध नसतो हे महाराजांनी अनेक मोहिमा आणि त्यातच राज्यभिषेक या सर्वात मोठ्या प्रसंगीही सिद्ध करून दाखविले.

● ६ जुन तारीख निवडण्यामागे आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता. औरंगजेबाचा सिंहासनरोहणाचा खास कार्यक्रम ५ जुन १६५९ या दिवशी झाला होता.
आता तुमच्या मोगलाईचा अस्त होऊन स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितीजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी ५ जुनच्या मध्यरात्रीपासुन राज्यभिषेक प्रक्रिया सुरु करुन ६ जुन १६७४ रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक केला.
महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब हताशपणे उद्गारला…………
” या खुदा । अब तो हद हो गई । तू भी उस सिवा के साथ हो गया ! सिवा “छत्रपती ” हो गया ।”
|| काळजात वाजली एकच धुन || || चलो रायगड ६ जुन ||

महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल खासरे माहिती..

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला 20 मे ला 130 वर्षे पूर्ण झाले. या रेल्वे स्टेशनला अगोदर व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) नावाने ओळखले जायचे. स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत मुंबईच्या सौंदर्यात भर घालते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात ताज महाल नंतर सर्वात जास्त फोटो या इमारतीचे काढले जातात. या इमारतीचे डिझाइन फ्रेडरिक स्टीवेन्सने तयार केले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल 1 दशक कालावधी लागला होता.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीचे बांधकाम 1978 मध्ये सुरू झाले होते आणि ते 1987 मध्ये पूर्ण झाले. महाराणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून इमारतीला व्हिक्टोरिया टर्मिनस नाव देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला बनवण्याकरीता 16,13,863 रुपये खर्च झाला होता. स्टीवेन्स यांनी डिझाइन केलेल्या या वास्तूला त्याकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी वास्तू म्हणून ओळख होती. 1996 मध्ये या वास्तूचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे ठेवण्यात आले होते. जुलै 2017 ला पुन्हा यामध्ये बदल करून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. 2004 मध्ये युनेस्कोने या भवनाला वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जागतिक वारसा यादीत स्थान दिले होते.

पूर्ण इमारतीचा सर्वोत्कृष्ट बिंदू हा मुख्य घुमट आहे. त्यावर महिलेचा एक विशाल पुतळा आहे ज्याची उंची 16 फूट 6 इंच आहे. डाव्या हातात एक ज्वलंत मशाल आहे आणि उजव्या हातात एक चाक आहे जे प्रगतीचे प्रतीक आहे. या इमारतीचे डिझाइन हे गॉथिक शैलीचे आहे ज्याला भारतीय संदर्भानुसार बांधण्यात आले.

1029 मध्ये या स्टेशनवर 10.4 लाख रुपये खर्चून 6 प्लॅटफॉर्म बनवण्यात आले होते. नंतर पुनर्निर्माण केल्यानंतर इथे 13 प्लॅटफॉर्म झाले. यार्ड आणि स्टेशन मध्ये त्यावेळी काही बदल करण्यात आले होते. 1994 मध्ये येथील प्लॅटफॉर्मची संख्या 15 झाली. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18 प्लॅटफॉर्म आहेत. पूर्वेकडून प्रवेश करण्यासाठी मोकळी जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शताब्दी निमित्ताने एक डाक तिकीट देखील प्रकाशित करण्यात आले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

11 प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व जी एकेकाळी शाळा कॉलेज मध्ये झाली होती नापास

कोणीही शिक्षणाचे महत्त्व कधीच सोडत नसतो, पण परिस्थिती कधी कधी अशी पावले उचलायचा लावते की ती गोष्ट सामाजिक दृष्टीने यशस्वी होण्यास बाधक ठरू शकते.या गोष्टींना न जुमानता तुम्ही जर अथकपणे कठोर परिश्रम घेत राहिलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही. या सर्व गोष्टी या काही प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या ख्याती आणि संपत्तीद्वारे सिद्ध केल्या आहेत.

1.मुकेश अंबानी- मुकेश अंबानी हे त्यांच्या MBA च्या अभ्यासक्रमामध्ये नापास झाले होते, तरीही ते रिलायन्स डिजिटल चे मॅनेजिंग डायरेक्टर बनले आहेत. फॉर्ब्स मॅगझीन नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये मुकेश अंबानी हे 9 व्या स्थानी आहेत.

2.कपिल देव- पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे सर्वात प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूपैकी एक असले तरीही,एकेकाळी त्यांना कॉलेज मधून बाहेर काढून टाकण्यात आले होते. त्यांनी मिळविलेल्या यशासह त्यांना शिक्षण हर नेहमीच महत्वाचे वाटते.

3.स्मृती इराणी- तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारताच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी फक्त 12 वि पर्यंत शिकलेल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचं एवढ कमी शिक्षण होऊनही त्या भारताच्या शैक्षणिक विभागात कार्यरत आहेत.मध्यंतरी 2013 मध्ये त्यांनी कॉमर्स कोर्स केलेला आहे अशा बातम्या आल्या होत्या.

4.सचिन तेंडुलकर- क्रिकेटचा देव अशी ळ्याती असलेला आपला लाडका सचिन तेंडुलकर फक्त 10 वि पर्यंत शिकलेला आहे हे वाचून आश्चर्यचकित होऊ नका. कारण सचिन च्या क्रिकेट मध्ये असणाऱ्या विलक्षण कौशल्यामुळे तो लहान वयातच पूर्णवेळ क्रिकेटकडे वळला.फील्डवर त्याचे विलक्षण कौशल्य खूप आधीच स्पष्ट झाले होते.

5.अझीम प्रेमजी- विप्रो या नावजलेल्या आयटी कंपनी चे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी हे कॉलेजमध्ये असताना ड्रॉप झाले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी विप्रो या कंपनीची स्थापना केली.कंपनीच्या 11 अब्ज डॉलर च्या निव्वळ उलाढालीमुळे त्यांनी शिक्षण सोडून स्वतःच नुकसान करून घेतले असे काही दिसत नाही.

6.अमीर खान- बॉलीवूड जगतातील सर्वात जास्त प्रशंसनीय अभिनेत्यांपैकी एक असणारा अमीर खान अजून एक उदाहरण आहे की ज्याने कॉलेज मध्ये असतानाच ठरवले की कॉलेज हे आपल्यासाठी नाहीये.त्याने आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व नंतर तो आपल्या आवडत्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून एक यशस्वी अभिनेता बनून दाखवले. अमीर खान आम्हाला आपला अभिमान वाटतो.

7.मेरी कॉम- भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कॉम ने आपले शिक्षण शाळेत असतानाच सोडले होते,त्यानंतर तिने भारताची अव्वल बॉक्सर बनून बॉक्सिंग मध्ये आपले करियर नावारूपाला आणले.तिने अलीकडेच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तीने शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यामुळे ती आता बॉक्सिंग मधून बाहेर पडल्याचे जवलपास सिद्ध झाले आहे.

8.गौतम अदानी- वाणिज्य शाखेचे डिग्री चे शिक्षण घेत असतानाच गौतम अदानी यांनी आपले शिक्षण सोडले. त्यानंतर ते व्यवसायाकडे वळले,त्यांनी स्वतःची अदानी ग्रुप नावाने हिऱ्यांची ब्रोकरेज कंपनी चालु केली. त्यांच्या कंपनीची उलाढाल जवळपास 6 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे.एकदा त्यांना अनिस इब्राहिम ने 3 कोटी रुपये खंडणीसाठी कीडनॅप केले होते.

9.ऐश्वर्या राय बच्चन- मुंबई मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऐश्वर्या राय यांनी आर्किटेक्टर कोर्स ला प्रवेश घेतला,पण ती कॉलेजमधून ड्रॉपआऊट झाली. ऐश्वर्या त्या नंतर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली व मिस वर्ल्ड हा किताब जिंकून तिने आपल्या नावाची छाप पाडली. बॉलीवूड मधेही आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला.

10.सलमान खान- सलमान खान हा बॉलीवूडचा बडा भाई म्हणून ओळखला जातो.आपल्या एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमुळे सलमानने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव घट्ट केलेले आहे. पण सलमान ने फक्त शाळेपर्यंत चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. सल्लू आणि त्यांच्या भावांनी शालेय शिक्षणानंतर त्यांच्या आवडत्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

11.अक्षय कुमार- बॉलीवूड चा खिलाडी अशी ओळख असलेला अक्षय कुमार हा मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट झालेला आहे.त्याच्या अभिनय कौशल्यामुळे तो खूप कमी शिकेलला आहे हे कदापिही वाटणार नाही.पण अक्षय कुमार ने आपले पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण होण्याआधीच कॉलेजला रामराम ठोकला.

हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व हे सिद्ध करतात की यश हे फक्त शिक्षणाने मिळत नसते तर त्यासाठी गरज असते ती प्रचंड इच्छाशक्ती व मेहनतीची. आपल्या स्वप्न साकार करण्यावर आपण ठाम राहिलो तर ते पुर्ण करण्यापासून कोणीही रोकू शकत नाही.स्वप्न पूर्ण होतील हा विश्वास फक्त माणसाच्या मनात असायला हवा.

बारावीचा निकाल आज, दुपारी 1 वाजता या वेबसाईटवर बघा निकाल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याविषयी अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. हि उत्सुकता संपली असून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून निकालाची प्रिंट घेता येणार आहे.

बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल. आज वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. यावर्षी 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना तो करता येणार आहे. हा अर्ज करण्यासाठी 31 मे ते 9 जून अशी मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनाही जुलै-ऑगस्ट 2018 व फेब्रुवारी 2019 या पुढील परीक्षांमध्ये संधी मिळणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागात बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मोबाईलवर निकाल कसा मिळवाल?

बारावीचा हा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटशिवाय मोबाईलवर देखील एसएमएस द्वारे मिळणार आहे. एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल. बघा कशाप्रकारे मिळवायचा निकाल..

MHHSC हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

या वेबसाईटवर बघू शकता निकाल-

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.knowyourresult.com

www.hscresult.mkcl.org

किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?

यावर्षी राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विदयार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यर्थिनी होत्या. यामध्ये विज्ञान शाखेचे 5 ,लाख 80 हजार 820 विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख 79 हजार 863 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 693 विद्यार्थी समाविष्ट आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

तब्बल १० लाख दारूच्या बॉटल वापरून बनविले मंदिर वाचा खासरेवर

मंदिर आणि दारू हे दोन शब्द एकमेका पासून वेगवेगळे आहे. परंतु तुम्हाला असे सांगितले कि एक मंदिर असे आहे जे फक्त दारूच्या बॉटल पासून बनविले आहे तुम्हाला धक्का बसेल ना ? हो अगदी खरे आहे वाद्य पा महा शिदी कावू हे बौध्द मंदिर बनविले आहे केवळ दारूच्या बॉटल पासून बनले आहेत. वाचूया या मंदिराची संपूर्ण माहिती खासरेवर थायलंडमधील सिसाकेट राज्यात हे मंदिर आहे. खुन हान हे या जिल्ह्याचे नाव आहे. नुकतेच हे मंदिर बनविण्यात आलेले आहे. लोकल बियर कंपनी आणि हेन्किन या बियर कंपनीच्या सयुंक्त मदतीने हे मंदिर बनविण्यात आलेले आहे. वरील माहिती स्कूपव्हूप या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे. मंदिर बनवायच्या मागेही एक भन्नाट कथा आहे. १९८४ साली समुद्रात फेकल्या जाणाऱ्या बॉटल मुळे एका भिक्खूने ह्या बॉटल जमा करण्यास सुरवात केली. आणि त्यावेळेस त्याने ठरविले कि ह्या बॉटलचे मंदिर बनविण्यात यावे.

बाथरूम, झोपण्या करिता बनविण्यात आलेल्या खोल्या सर्व काही या बॉटल पासून बनविण्यात आलेल्या आहे. telegraph ने दिलेल्या माहिती नुसार बुद्धाची मूर्ती देखील बियरच्या फेकल्या गेलेल्या झाकणापासून बनविण्यात आलेली आहे. मंदिरातील बांधकाम क्षेत्रात १.५ दशलक्ष बॉटल वापरण्यात आलेल्या आहे. मंदिरात हिरव्या रंगाची बॉटल हि हेन्किन कंपनीची आहे. आणि तपकिरी रंगाची बॉटल Changbottles स्थानिक कंपनीची आहे.

जवळपास २० इमारती या परिसरात बियर बॉटल पासून बनविल्या आहेत. दसलक्ष बॉटलचे मंदिर म्हणून हे मंदिर ओळखण्यात येत आहे. या आगळ्या वेगळ्या मंदिरास नक्की कधी भेट द्या. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य आमचे पेज लाईक करा व पोस्ट शेअर करायला विसरू नका.