अबब! एकाच वेळी तीन लाख भाविकांची पंगत, चक्क ट्रॅक्टरद्वारे वाढल्या पंगती…

आज पर्यंत अनेक पंगती बघितल्या असेल परंतु अशी पंगत कधी नसेल बघितली. दरवर्षी ४००० हून अधिक सेवक या ठिकाणी निःस्वार्थ भावनेने या दिवशी सेवा देतात. गेल्या 51 वर्षापासून जन्मोस्तव साजरा केला जातो. तब्बल तीन लाखाच्या वर लोक या पंगतीत बसली होती कशी केली असेल त्यांची व्यवस्था आणि काय होता प्रसंग आज खासरेवर बघूया…

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे ५३ वर्षाची परंपरा लाभली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाचे रूप मोठे होत आहे यावर्षी तब्बल ५० एकरमध्ये हि पंगत बसविण्यात आली. आणि वाढायला हात नाही तर ट्रॅक्टरचालले एक दोन नाहीतर तब्बल २०० ट्रॅक्टर या करिता कामी आले. विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजतादरम्यान तब्बल तीन लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. या महापंगतीने सामूहिक महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यात सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवीत सोमवारी ५० एकर परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुमकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी दर वर्षी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. महाप्रसादाने सांगता होणारा हा उत्सव तीन दिवस चालतो.

यामध्ये ५०० क्विंटलचा महाप्रसाद बनवला गेला. ज्यामध्ये पुरी आणि वांग्याची भाजी असा बेत होता. यंदा या महाप्रसादाला ५० हजार महिला आणि मुलींनी महाप्रसाद वाढण्याचे काम केले, तर जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. २०० क्विंटल गव्हाची पुरी व १५१ क्विंटल वांग्याच्या भाजीच्या महाप्रसादाचे ५० एकराच्या परिसरात सुमारे तीन लाख भाविकांना २०० ट्रॅक्टर्सद्वारे वाटप करण्यात आले. त्यासाठी परिसरातील साडेतीनशे गावातील चार हजार स्वयंसेवकांसह विवेकानंद शैक्षणिक संकुलातील विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले. महाप्रसाद स्थळावरील मनोऱ्यावरून वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री हे सूत्रसंचलन करीत होते.

बुद्धिवंतांच्या कपाटात बंदिस्त असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांना व्यावहारिक पातळीवर आणून सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी विवेकानंद आश्रमाची स्थापना झाली. प.पु. शुकदास महाराज विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्वामी विवेकानंदांची जयती अत्यंत भव्य स्वरुपात साजरी केली. अंधश्रद्धेला नाकारुन विवेकाची पेरणी इथे केली जाते. गेल्या 50 वर्षांपासून विवेकानंद यांचा जन्मोत्सव हिवरा येथे साजरा करत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी अशाच प्रकारे लाखो भाविकांना महाप्रसदाच्या रुपाने जेवण दिले जाते.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

अरुणाचल प्रदेश : शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग

अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उद्घाटन करण्यात आले. तसेच तवांग ते बुम्ला या २२ किमी मार्गाला छत्रपती शिवाजी मार्ग असे नावही देण्यात आले. तवांगमधल्या स्मारकातील शिवछत्रपतींची नजर चीनच्या दिशेने आहे. म्हणजेच राजे आपल्या करड्या नजरेतुन शत्रुकडे लक्ष ठेऊन आहेत.

कर्नल संभाजी पाटील निवृत्तीनंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला
“जय हिंद सर, दोरजी खांडु बोल रहा हुँ सर…”

कर्नल साहेब एकदम २५ वर्षं मागे गेले. त्यांना आठवला तो अरुणाचल प्रदेश आणि तिथला सकाळी सूर्याच्या किरणांनी सोनेरी होणारा हिमालय. कर्नल संभाजी पाटील हे १९८३-८४ मध्ये २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटचे कमांडर म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी तवांग ते बुम्ला हा रस्ता तयार करण्याची कामगिरी त्यांनी पार पडली.

हा रस्ता म्हणजे भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा आहे. संरक्षणदृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुप महत्व आहे. सीमेवरील सैनिकांना जलद रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात आला होता. मराठा लाईट इंफंट्रीच्या २००० जवानांनी उणे ३०℃ तापमानात काम करुन केवळ पाच महिन्यात हा बावीस किमीचा मार्ग तयार करुन दाखवला.

तवांग येथील शिवस्मारक व छत्रपती शिवाजी मार्ग (तवांग-बुम्ला)
समुद्र सपाटी पासुन तब्बल १२४०० फुट उंचीवर असणारा अरुणाचल प्रदेशातील हा अतिशय दुर्गम असा भाग. अशा भागात काम करणे खुपच अवघड. रस्ता बांधण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेणे खुपच आवश्यक होते. या सगळ्या कामात कर्नल संभाजी पाटलांची ओळख दोरजी खांडु या तवांग भागातील एका उत्साही युवा नेतृत्वासोबत झाली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

दोरजी खांडु नित्यनेमाने मराठा लाईट इंफंट्री युनिटला भेट देत असत व युनिटला काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत. या काळातच त्यांना मराठा लाईट इंफंट्रीच्या बेळगाव येथील मुख्यालयात खास प्रशिक्षणासाठी सुद्धा पाठवण्यात आले होते. दोरजी खांडु व मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांमध्ये एक खुप चांगले नाते निर्माण झाले होते. हेच खांडु नंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

मराठा लाईट इंफंट्री युनिटने बांधलेला हा २२ किलोमीटरचा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव आणि २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांचे देशासाठी दिलेले खुप मोठे योगदान होते. हा रस्ता केवळ कर्नल संभाजी पाटील व दोरजी खांडु यांच्या मैत्रीचेच प्रतिक नाही, तर पश्चिमेकडील मराठी आणि अतिपुर्वेकडील अरुणाचली नागरिकांच्या मैत्रीचेही ते प्रतिक आहे.

दोरजी खांडु यांनी या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर स्थानिक अरुणाचली बांधवांच्या वतीने २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसाठी एका मेजवानीचे आयोजन केले होते. इंफंट्रीच्या सर्व जवानांचा त्यात गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी काही रोख रक्कम बक्षीस म्हणुन २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटसाठी देऊ केली. परंतु इंफंट्रीच्या सर्व जवानांनी ती रक्कम साभार परत केली आणि अरुणाचली बांधवांना विनंती केली की “हा रस्ता महाराष्ट्र-अरुणाचल मधील बांधवांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. या रस्त्याला तमाम महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे. तसेच या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दोन स्मारके उभी करावीत. त्यातले एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरे या रस्त्यातील एखाद्या महत्वाच्या ठिकाणी असावे.”

दोरजी खांडु आणि स्थानिक अरुणाचली बांधवांनी कसलाही वेळ न लावता तात्काळ ही मागणी मान्य केली. मराठा लाईट इंफंट्रीने निर्माण केलेला तवांग-बुम्ला रस्ता आज छत्रपती शिवाजी मार्ग या नावाने ओळखला जातो. पुढे दोन महिन्यातच अरुणाचल बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अर्धाकृती स्मारक तवांग-बुम्ला रस्त्यावरील एका महत्वाच्या जागी उभे केले. तसेच तवांग येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा ही उभा केला.

अरुणाचल गव्हर्नमेंट प्रेसनोट, शिवस्मारक व छत्रपती शिवाजी मार्ग
शिवछत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसोबत दोरजी खांडु यांना मराठा लाईट इंफंट्रीचे स्फुर्तीगीत खड्या आवाजात गाताना बघुन अनेकजणांना आश्चर्य वाटले.

मर्द आम्ही मराठे खरे, शत्रुला भरे कापरे ।
देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे ।। धृ ।।

वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो ।
मराठा कधी न संगरातुनी हटे, मारुनी दहास एक मराठा कटे ।
सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ।।१।।

व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती ।
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पुर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी ।
घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी, मृत्यु अम्हा पुढे घाबरे ।।२।।

भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो ।
राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा ।
ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, अमुची वीर गाथा उरे ।।३।।

बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की …जय !

अशा विजयाच्या घोषणांनी तवांग-बुम्ला परिसराचा आसमंत दुमदुमुन गेला.

संदर्भ..
The Governor of Arunachal Pradesh :: Press Release : Governor

साभार- लोकराज्य टीम

भाई ‘राजीव दीक्षित’ यांच्याविषयी काही खासरे गोष्टी नक्की वाचा..

आज खासरेवर माहिती बघूया राजीव दीक्षित Rajiv Dikshit यांच्या विषयी यांना परिचयाची गरज नाही. रामदेव बाबा यांच्या अगोदर पासून स्वदेशीचा प्रचार करणारे राजीव दीक्षित यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला परंतु त्यांनी दिलेले स्वदेशी करिता योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नसानसात स्वदेशी अभिमान जागृत होता. आज बघूया खासरेवर राजीव दीक्षित यांच्या विषयी काही खासरे गोष्टी..

जर आज राजीव दीक्षित जिवंत असते तर निश्चितच स्वदेशी आणि आयुर्वेद हा ब्रांड पतंजलीच्या पुढे असता. त्यांचे कार्य आज रामदेव बाबा पुढे चालवत आहेत. राजीव दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९६७ रोजी राधेश्याम आणि मिथिलेश कुमारी यांच्या घरी अलिगढ उत्तर प्रदेश येथे झाला. राजीव दीक्षित यांनी IIT येथून M.Tech. ची पदवी प्राप्त केलेली आहे. राजीव दीक्षित यांनी महान शास्त्रज्ञ मा. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या सोबतहि काम केलेले आहे. राजीव दीक्षित यांची सर्दी ठीक करण्याची पद्धत तर अगदी भन्नाट होती हाताच्या अंगठ्यावर मेथीचा दाना बांधून ते सर्दी ठीक करत असे. लोक सांगतात कि आयुष्यातील शेवटच्या २० वर्षात ते कधीही बिमार पडले नाहीत. राजीव दीक्षित यांना लहानपणापासून वाचनाचा छंद होता लहानपणी त्याचे मित्र सांगतात कि ते निव्वळ दर महिन्याला ८०० रुपये पुस्तकाकरिता खर्च करीत होते. त्या काळात ८०० रुपये हि खूप मोठी रक्कम आहे. लहानपणापासून देशातील समस्याच शोध घेण्यात त्यांना रुची होती. त्यांनी स्वदेशीच्या प्रचाराकरिता आयुष्य वाहून दिले होते. त्यांना देशातून इतर उत्पादनांना हद्दपार करायचे होते. भारताची प्रगती स्वदेशीमध्ये आहे हे त्यांचे ठाम मत होते.

भारताचे मेडिकल सिस्टीम आयुर्वेद आधारित असावे हे त्यांचे ठाम मत होते. राजीव दीक्षित यांनी संपूर्ण आयुष्यात देशभरात १३ हजार व्याख्याने केली आहे. आजही आपण त्यांची व्याख्याने युट्युबवर बघू शकता. राजीव दीक्षित यांचा जवाहरलाल नेहरू यांना प्रखर विरोध करत असे. आयुष्यभर राजीव दीक्षित अविवाहित राहिले त्यांच्या मते १९८४ साली झालेला भोपाल वायू दुर्घटना हि अमेरिकन लोकांनी भारतातील गरिबावर केलेले परीक्षण होते. एवढेच नाहीतर त्यांच्या मते ९/११ अमेरिकेचा हल्ला हा अमेरिकेने स्वतः केलेला होता त्यांचे हे भाषण आपण युट्युबवर बघू शकता. इंटरनेटवरील माहिती नुसार राजीव दीक्षित आणि रामदेव बाबा यांची पहिली ओळख १९९९ साली झाली. त्यांनी रामदेव बाबांना काळे धन इत्यादी विषयी माहिती दिली आणि बाबा रामदेव त्यांच्या कार्यात जुळले. २००९ साली बाबा रामदेव आणि राजीव दीक्षित यांनी भारत स्वाभिमान आंदोलन सुरु केले. २०१४ साली नवीन पार्टीची घोषणा करायची त्यांचा मानस होता. राजीव दीक्षित यांचा जन्म आणि मृत्यू ३० नोव्हेंबर या एकाच दिवशी झाला आहे.

राजीव दीक्षित यांचा मृत्यू कुठल्याही पेपरची मुख्य बातमी बनू शकली नाही. त्यांचा मृत्यूवर मिडीयाने देखील मौन बाळगले. मृत्यू नंतर त्यांचे पोस्टमार्टम देखील झाले नाही त्यामुळे संशायची सुई आणखी बळकट होते. राजीव दीक्षित यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या घरी सेवाग्राम येथेन करता पतंजली हरिद्वार येथे करण्यात आला. आणि मृत्युनंतर त्यांचे शरीर निळे पडले होते. अनेक प्रश्न आहेत परंतु उत्तर नाही आपणच कमेंट करून आपली प्रतिक्रिया यावर नोंदवा..

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

छत्रपती उदयनराजे भोंसले यांच्या बद्दल ह्या गोष्टी आपणास माहिती आहे का ?

‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही.’ अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्‍या सातार्‍यातल्या पत्रकारांचीही नाही!

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी क्षणाक्षणाला जाणवते. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात. लोक त्यांना थोडे घाबरूनच असतात. थोडं अंतरही ठेवतात. पण मध्येच अचानक उदयनराजेंचा मूड बदलतो आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडतात. लोकांना धक्का द्यायला उदयनराजेंना खूप आवडतं. उदयनराजेंबद्दल सातार्‍यातच नव्हे तर राज्यभर अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. सातार्‍यातील पत्रकारांमध्ये तर या आख्यायिका मोठया चवीने चघळल्या जातात. पत्रकार परिषद असो वा राजकीय मेळावा; उदयनराजे नेहमीच मद्यधुंद अवस्थेत असतात, किंवा त्यांच्या जलमंदिर वाडय़ावर त्यांना आड जाणार्‍यांना ते चाबकाने फोडून काढतात, या अशाच काही आख्यायिका. त्या खोटया असतील, कदाचित खर्‍याही असतील. पण त्यामुळे उदयनराजेंच्या इतर चांगल्या-वाईट गुणांकडे दुर्लक्ष करायचं काही कारण नाही.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार बनलेल्या उदयनराजे भोसले यांचा सातार्‍यातला दबदबा वाढला आहे. याचा अर्थ त्यापूर्वी त्यांचा दबदबा नव्हता असा नाही. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘थेट’ तेरावे वंशज असलेल्या उदयनराजेंविषयी सातारकरांच्या हृदयात एक वेगळीच आदराची जागा आहे. लोक त्यांना प्रेमाने ‘महाराज साहेब’ म्हणतात. आजही बरेचसे लोक त्यांना (अर्धवट) मुजरा करतात. भले मग उदयनराजेंचं त्यांच्याकडे लक्ष असो वा नसो. सातारा शहराच्या मधोमध वसलेल्या जलमंदिर या भोसले घराण्याच्या परंपरागत वाडय़ापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘हॉटेल राजकुमार रिजन्सी’मध्ये उदयनराजे भेटले तेव्हा असे अनेक अनुभव आले. ‘महाराज साहेबां’मधल्या सामान्य माणसाला जाणून घेता आलं. उदयनराजे म्हणजे एकदम रांगडा गडी! फर्स्ट इम्प्रेशनच झक्कास. त्यात तुमच्या नशिबाने महाराज साहेबांचा मूड असेल तर बातही क्या! ‘माझ्या आईवडिलांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी मला अगदी पहिलीपासूनच शिक्षणासाठी हॉस्टेलवर ठेवलं. त्यामुळे राजघराण्याच्या वारशाचं ओझं मला लहानपणी कधी जाणवलंच नाही. मी इतरांपेक्षा वेगळा आहे असंही कधी वाटलं नाही. शाळेत जो मला चॉकलेट द्यायचा तो माझा मित्र! राजेशाहीपासून मी खूपच लांब होतो,’ उदयनराजे सांगत होते.

शालेय शिक्षण डून स्कूलमधून पूर्ण केल्यानंतर उदयनराजेंनी पुण्यात इंजिनीअरिंग केलं. तिथेही भरपूर दंगा-मस्ती केली. त्यावेळी आपण कधीतरी राजकारणात पडू असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांचं स्वप्न होतं ‘फॉर्मुला वन रेस’मध्ये भाग घ्यायचं. खरं तर त्यात त्यांना करीअरच करायचं होतं. आपल्या या स्वप्नाविषयी बोलताना ते हरखून गेल्यासारखे वाटले. ते म्हणाले, ‘मला वेगाचं प्रचंड वेड आहे. त्यामुळेच असेल कदाचित, राजकारणात पडण्यापूर्वी मी रेसिंगमध्येच करीअर करायचा विचार खूप गंभीरपणे केला होता. पण ते काही जमून आलं नाही.’ ‘फॉर्मुला वन’मध्ये सहभागी होता आलं नाही म्हणून वेगवान ड्रायव्हिंगची आवड कमी झाली नाही. पुणे-सातारा मेगाहायवेच्या रूपाने त्यांना नवा ट्रॅक सापडला. सातारा-पुणे हे ११० किमीचं अंतर उदयनराजेंनी फक्त ३५ मिनिटांत पार केल्याची आख्यायिका सातार्‍यात ऐकायला मिळते. उदयनराजेंनीही हे खरं असल्याचं सांगितलं. (वर, खोटं वाटत असेल तर पुण्यात सोडू का; म्हणूनही विचारलं. आता बोला!) फेरारी किंवा बुगाटीसारखी एखादी चांगली रेसिंग कार घेण्याची बर्‍याच दिवसांपासून इच्छा आहे, असं मनमोकळेपणाने सांगत ‘हॉर्स रायडिंगही मी चांगलं करतो, पण आता पूर्वीसारखा वेळ मिळत नाही,’ अशी खंत ते व्यक्त करतात.

हॉर्स रायडिंग, कार ड्रायव्हिंग अशा आवडी असलेले उदयनराजे म्हणजे एकदम हाय-फाय माणूस, असं एखाद्याला वाटेल, पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. फॉर्मल क्लोथचा त्यांना तिटकारा. मग राजेशाही वेशभूषेची बातच सोडा. राजकीय सभांच्या वेळी अगदी नाइलाज म्हणून ते सदरा लेंगा घालतात. त्याला ते ‘पांढरी गोणी’ म्हणतात. ‘जीन, त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल’ हा महाराज साहेबांचा फेवरेट ड्रेसकोड! दिनचर्येचा विषय निघाला तेव्हा ‘राजकारण करायचं असेल तर सकाळी लवकर उठावं लागतं, हा पवार्रफुल अलार्म आठवला. रात्री झोपायला कितीही उशीर झाला (उशीर होण्यासाठी अनेक कारणं आहेत) तरी महाराज साहेब सकाळी साडेसहा वाजताच उठतात! (असं त्यांनी सांगितलं.) त्यानंतर व्यायाम असतोच. त्यांच्या शब्दात भरपूर व्यायाम. जॉगिंग दररोजचं.

‘पूर्वी मी कराटेसुध्दा शिकलो होतो. अधूनमधून बॉक्सिंग खेळतो. आजही मी एका मुठीत तीन विटा तोडतो,’ हे सांगताना उदयनराजेंना स्वतचाच अभिमान वाटतो. त्यानंतर एक मोठा ग्लास मोसंबी ज्यूस पिऊन महाराज साहेब ऑफिसमध्ये पोहोचतात तोवर साडेआठ वाजलेले असतात. मग लोकांच्या गाठीभेटी. अनेक लोक आपल्या तक्रारी घेऊन किंवा कामं करून घेण्यासाठी त्यांची वाट पाहत असतात. काम करण्याची महाराज साहेबांची एक विशेष पद्धत आहे, अगदी राजाला शोभेल अशीच. आलेल्या माणसाने आपली समस्या काय आहे आणि ती सोडवण्यासाठी काय करावं लागेल; इतकंच महाराज साहेबांना सांगायचं. जास्त काथ्याकूट करायचा नाही. ‘काम होईल,’ म्हणून महाराज साहेब सांगतात, तेव्हा तो गरजवंत आश्चर्यचकीत झालेला असतो. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून.

दुपारी कोल्हापुरात असतील तर महाराज साहेब जेवायला घरी म्हणजे वाडय़ावर परततात. ‘मी शाकाहारी आहे. कारलं सोडून सगळ्या भाज्या खातो. नॉनव्हेजचं म्हणाल तर क्वचित मटण खातो. पण मला ते फारसं आवडत नाही.’ लोकांमध्ये सहजतेने मिसळणारा आणि त्यांच्यातच राहायला आवडणारा हा राजामाणूस देवधर्म, आणि त्यानुषंगाने येणारी कर्मकांडे यांबाबत उदासीन, म्हटलं तर पुरोगामी आहे. ‘माझा फक्त पंचतत्त्वांवर विश्वास आहे. पण कर्मकांडे मला पटत नाहीत,’ असं ते स्पष्टपणे सांगतात. पण लगेचच ‘राजघराण्यातील परंपरा-रूढी पटो न पटो त्या पाळल्याच पाहिजेत,’ असंही ते स्पष्ट करतात. त्यांच्या मते या रूढी-परंपराच आपली (म्हणजे त्यांची) ओळख आहे. ही त्यांची भूमिका थोडी सोयीस्कर वाटते. पण त्यावर महाराज साहेबांकडे वाद किंवा चर्चा होऊ शकत नाही. पुढच्या पिढीनेही रूढी-परंपरा पाळून बेधडक लोकांची सेवा करत जगायला हवं, इति उदयनराजे.

उदयनराजेंची पुढची पिढी- त्यांचा मुलगा वीरप्रतापसिंहराजे पुण्यात त्याच्या आई कल्पनाराजेंसोबत असतो. उदयनराजेंच्या आई अर्थात श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले सातार्‍याच्या जलमंदिर वाडय़ात राहतात. उदयनराजे लोकांमध्ये मिसळतात, तर कल्पनाराजे त्यांच्या नेमक्या विरुद्ध. लोक आजही त्यांना घाबरतात. जलमंदिरात त्यांच्याशी तब्बल दोन तास गप्पा मारण्याची संधी मिळाली. पण ऑफ द रेकॉर्ड! घराण्यातलं द्वेषाचं राजकारण, संधिसाधूपणा, विश्वासघात, अवहेलना (संदर्भ: अभयसिंह आणि शिवेंद्रराजे भोसले) याविषयी त्यांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शेक्सपिअरने लिहिलेली सगळी नाटकं त्या दोन तासांत समजली. घराणेशाहीतल्या कलहामुळे मधली बरीच वर्ष कल्पनाराजेंना बरंच सोसावं लागलं. त्याचा राग त्यांच्या मनात आजही आहेच. मध्यंतरी निवडणुकीच्या राजकारणातही त्यांनी उतरून पाहिलं. पण नशिबाने काही त्यांना साथ दिली नाही. आता वय झाल्यानंतर उदयनराजेंच्या राजकीय कारकीर्दीवरच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलंय. पण तिथेही स्वत:च्या मुलाच्या कार्यपद्धतीशी त्यांची नाळ जुळत नाही. त्याचंही दुख आहेच. उदयनराजेंचे वडील म्हणजे प्रतापसिंहमहाराज यांचे धाकटे बंधू अभयसिंहराजे भोसले यांनीच घराण्याच्या नावाचा आणि समाजावरील प्रभावाचा फायदा घेत स्वतची राजकीय पोळी भाजली, असं कल्पनाराजेंचं स्पष्ट मत आहे.

खुद्द उदयनराजेंच्या विरोधातही अभयसिंहराजे आणि त्यांचा मुलगा शिवेंद्रराजे (म्हणजे उदयनराजेंचे चुलतबंधू) यांनी निवडणुकीचं राजकारण केलं. १९९६ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उदयनराजेंनी निवडणूक लढवली, पण त्यांच्या वाटय़ाला पराभव आला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि १९९८ च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजे निवडून आले, आणि त्या वेळी युतीच्या सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं. पण १९९९च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजेंच्या विरोधात उदयनराजेंना पुन्हा पराभूत व्हावं लागलं. तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, पण कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं.

कल्पनाराजे हा अपमानास्पद भूतकाळ विसरलेल्या नाहीत. आज उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार बनले आहेत, आणि जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पूर्ण पकड आहे. शिवेंद्रराजे यांनीही त्यांच्याशी पॅच-अप केलंय. पण राजमातांना ही गोष्ट पटलेली नाही. राजमातांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी राजघराण्याच्या अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार केलेला आहे. आज जलमंदिर म्हणून प्रसिध्द असलेल्या वाडय़ातली बहुतेक बांधकामंही त्यांनीच करून घेतली आहेत. त्याचा त्यांना अभिमान वाटतो. कल्पनाराजेंना मराठीत संवाद साधणं मात्र कठीण जातं. बोलताना अनेकदा मराठी शब्द न सुचल्याने त्या इंग्रजी शब्द, सराईतपणे वापरतात. आपला साडेचार वर्षांचा नातू म्हणजे श्रीमंत छत्रपती वीरप्रतापराजे फ्ल्यूएंट इंग्रजी आणि हिंदीत बोलतो, याचं त्यांना अपार कौतुक! विशेष म्हणजे, राजमाता कल्पनाराजे आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे सुध्दा बहुतेकदा एकमेकांशी अस्खलित इंग्रजीतच संवाद साधताना दिसतात!

खासदार म्हणून उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभेत त्यांचं पहिलं भाषण इंग्रजीत केलं, याचं सातारकरांना भयंकर कौतुक वाटलं होतं. भारावलेल्या सातारकरांनी उदयनराजेंचा लोकसभेत भाषण करतानाचा फोटो संपूर्ण जिल्ह्यात होर्डिगवर लावला. शिवाय, स्थानिक लोकल चॅनल्सने त्याची व्हिडिओ टेप वारंवार दाखवली होती. आपले महाराज साहेब इंग्रजीत बोलतात यावरच सातार्‍यातली प्रजा खूष आहे. मग असंतोषाला जागा राहतेच कुठे?

धुमधडाका’ या सुपरहिट मराठी चित्रपटातील ‘वख्खा विख्खी वुख्खू” फेम या अभिनेत्रीवर का आली ही वेळ

काल मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासच्या लिफ्ट शेजारी एक म्हातारी बसलेली दिसली. मला वाटलं, कदाचित गोंधळून म्हातारी पत्ता विसरली असेल म्हणून तिला काही मदत करता येईल यासाठी तिच्याकडे चौकशी केली. परंतु ज्यावेळी तिच्याबद्दल माहिती जाणून घेतली त्यावेळी आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण ती म्हातारी कोणी साधारण व्यक्ती नव्हती तर, ‘धुमधडाका’ या सुपरहिट मराठी चित्रपटातील ‘वख्खा विख्खी वुख्खू” फेम ‘अशोक सराफ’ यांची प्रियत्तमा (नायिका) होती. काहीवेळ माझा विश्वास बसला नाही, म्हणून आणखी खोलात चौकशी केली, परंतु म्हातारी पण भारीच हुशार मी ‘सांगलीचा’ आहे, म्हटल्यावर ‘सांगली’ परिसरात त्यांच्या चित्रपटाचे शुटिंग झालेल्या वसंतदादा साखर कारखाना, नृसिंहवाडी भागाची खडान् खडा माहिती सांगू लागली. मध्येच फाड-फाड इंग्रजी बोलत मराठी चित्रपटांपासून पासून बॉलीवूड पर्यंत, दुबई पासून ब्रिटन पर्यंत केलेल्या प्रवासाची वर्णने मनमोकळेपणाने सांगू लागली.

“सुरेखा’ उर्फ ऐश्वर्या राणे असं त्याचं नाव. अशोक सराफ यांच्या समवेत धुमधडाका, ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांच्या समवेत ‘भटक भवानी’ या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिका म्हणून काम केले आहे. तसेच शराबी, नमक हलाल यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली आहे. अमिताभ बच्चन, परबीन बाबी, निळू फुले, जयश्री गडकर यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. परंतु दुर्दैवाने त्यांची कारकिर्द ऐन बहरात असताना अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान घोड्यावर पडून त्यांचा मोठा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पाठीचे हाड मोडल्याने कारकिर्दीला ब्रेक लागला. त्या उपचारासाठी त्यांना मुंबईतील त्यांची संपत्ती विकावी लागली. पुढे हाती काम न राहिल्याने आणि नातेवाईकांनीही पाठ फिरविल्याने नियतीने त्यांच्यावर हालाकीची परिस्थिती आणली आहे. खरं तर एवढी मोठी कलाकार असताना आज त्यांच्यावर शासकीय मदतीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजविण्य़ाची वेळ आली आहे. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती कुमकुवत झाल्याने त्या पुर्णतः हतबल झालेल्या आहेत. त्यांचा सांभाळ करणारे जवळ कोणीही नातेवाईक नाही. कोकणातील सावंतवाडी येथे भाड्याच्या घरात त्या राहतात. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने C ग्रेड कलाकारांना मिळणारी पेन्शन मिळते. चार दिवसापुर्वी त्या हयात आहेत का ? याची माहिती घेण्यासाठी त्यांना मंत्रालयातून फोन आला होता. आपली पेन्शन बंद होईल या भितीने, आपण अजून हयात आहोत हे सांगण्यासाठी त्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटायला आल्या होत्या.

वास्तविक A ग्रेड कलाकारांना असणारी २१०० रुपये पेन्शन मिळावी अशी त्यांची मागणी आहे, परंतु सरकारने त्यांना C ग्रेड कलाकारांना दिली जाणारी १५०० रुपये पेन्शन दिली आहे. त्यामुळे A ग्रेडची पेन्शन मिळावी म्हणून त्या सरकारकडे हेलपाटे मारत आहेत. या व्यतिरिक्त त्यांना संजय गांधी निराधार योजनेची ६०० रुपये पेन्शन मिळते,परंतु या अल्प पेन्शनवर त्यांचा उदर्निवाह चालत नाही. सरकारमधील एका मंत्र्याने गेल्यावर्षी त्यांची ही पेन्शन एक हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ग्लॅमरची रंगेरी दुनिया म्हणून फिल्म इंडस्ट्रीकडे पाहिले जाते, या रंगेरी दुनियेच्या नादाने अनेक कलाकार मुंबईच्या दिशेने ओढले जातात. परंतु या पडद्यावरील आभासी दुनियेत ग्लॅमर घेऊन वावरणाऱ्या कलाकारांचे पदड्यामागील आयुष्य मात्र किती भयंकर आहे याचे वास्तव उदाहरण सुरेखा राणे यांच्या निमित्ताने पहायला मिळाले..खरं तर आज शासनाने आणि समाजातील चांगल्या लोकांनी या ज्येष्ठ अभिनेत्रीला मदत करण्याची गरज आहे जेणे करुन त्यांचे उर्वरित आयुष्य समाधानाचे जावू शकेल.

( 8605988321 हा मोबाईल क्रमांक सुरेखा राणे यांचा आहे. जर कोणास त्यांना सढळ हाताने मदत करायची असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क करु शकता )

साभार- अभिजित झांबरे

पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वे आणि नाना पाटेकर यांच्यात काय नाते आहे?

नाना पाटेकर यांच्याबद्दलची ही माहिती आज पर्यंत बऱ्याच जणांना माहिती नाही आहे.नाना पाटेकर यांचा गुन्हेगारी जगताशी काय संबंध आहे? तर चला पाहूया खासरेवर आपण काय संबंध आहे त्यांचा मन्या सुर्वेशी..

नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांच्‍या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे. रमण सुर्वे हा त्‍यांचा सख्खा धाकटा मामा. मुंबईतील कुख्‍यात गुंड मन्या सुर्वे हा त्‍यांचा मामेभाऊ. नानांवर त्याचे सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुंबईतून मुरूड-जंजिर्‍यास राहण्यास नेले. नानांचे बालपण अत्‍यंत प्रतिकुल परिस्थितीत गेले. त्‍यांचे वडील मुंबईला होते आणि नाना शिकायला गावाला. याला कारणही तसेच होते. त्‍यांची सख्‍खे भाऊ भार्गव आणि मन्‍या ही दोघे मुंबईतील कुख्‍यात डॉन. त्‍यामुळे ओघानेच नानांचाही त्‍यांच्‍यासोबत संपर्क यायचा. त्‍यामुळे नानाही त्‍यांच्‍या नांदी लागेल, ही भीती त्‍यांच्‍या आईला कायम होती. त्‍यातूनच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुरूड जंजिऱ्याला शिकायला नेले. खालील विडीओमध्ये बघा मन्या सुर्वेचा पूर्ण जीवनपट

मन्या कसा झाला गँगस्टार ?
मनोहर ऊर्फ मन्‍या सुर्वे हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन होता. त्‍याच्‍या आयुष्‍यावर ‘शुट आऊट अॅट वडाळा’ हा हिंदी चित्रपटही आला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्‍याचा जन्‍म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले. मात्र, आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्‍हेगारी जगतात आला. त्‍याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामिल करून घेतले. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती.

अवती भोवती गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असताना नाना मात्र संस्‍कारी झाले. त्‍यांना साधी चोरीही करावीशी वाटली नाही. ते केवळ त्‍यांच्‍या आईच्‍या संस्‍कारामुळेच नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय तीनदा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘अग्निसाक्षी’ या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 2013 मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

मुस्लीम धर्म स्वीकारणारे काही प्रसिद्ध चेहरे नक्की बघा…

धर्मांतराचे अनेक प्रकरण आपल्याला माहिती असेल परंतु काही असे प्रसिध्द चेहरे आहेत ज्यांनी इस्लामचा स्वीकार काही कारणास्तव केलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल कि यापैकी अनेक चेहरे कधीही विचार केला नसेल कि यांनी धर्मांतर केले आहे. आज खासरेवर काही असे चेहरे बघूया..

ए.आर.रेहमान प्रसिद्ध संगीतकार, गायक इत्यादी ए.आर.रेहमानला संपूर्ण जग ओळखतो परंतु ए.आर.रेहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्याचे नाव होते दिलीप कुमार तमिळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला परंतु त्यांनी धर्मांतर करून अल्लाह रखा रेहमान असे नाव ठेवले.
धर्मेंद्र चित्रपट सृष्टीतील सदाबहार हसरा चेहरा यांनी सुध्दा धर्मांतर केले होते कारण त्या काळात पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट झाल्याशिवाय दुसर्या लग्नाला परवानगी मिळत नसे त्याकरिता धर्मेंद्र यांनी मुस्लीम धर्म स्वीकारून हेमा मालिनी यांच्या सोबत लग्न केले.
अमृता सिंघ सैफ आली खान यांच्या सोबत लग्न करण्या करिता अमृता सिंघ यांनी धर्मांतर केले होते आणि या दोघाच्या लग्नाची विशेष बाब म्हणजे अमृता हि सैफ पेक्षा १४ वर्षाने मोठी आहे. त्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला दोघांना २ अपत्य हि आहे. सध्या सैफ करीना सोबत आहे दोघाचा तैमुर हा मिडिया करिता चर्चेचा विषय आहे.

ममता कुलकर्णी एके काळी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेक हृदयावर राज्य करणारी ममता कुलकर्णी हिने सुध्दा इस्लाम स्वीकारला होता कारण होते तिचा प्रियकर जो दुबई मध्ये राहत होता. मागे ड्रग्स केस मध्येही ममता कुलकर्णी यांचे नाव आले होते.
हेमा मालिनी ड्रीमगर्लनि आपले प्रेम धर्मेंद्र मिळविण्याकरिता धर्म बदलविला होता हेमा मालिनी यांनी धर्मांतर केल्यानंतर स्वतःचे नाव आयशा बी. आर. चक्रवर्ती असे केले होते आणि त्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा विवाह झाला.
महेश भट्ट बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते महेश भट्ट यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. परंतु महेश भट्ट यांची आई गुजराती मुस्लीम होत्या. आणि कालांतराने महेश भट्ट यांनी सुध्दा मुस्लीम धर्म स्वीकारला.
शर्मिला टागोर अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी नवाब मन्सूर आली खान पतौडी यांच्या सोबत लग्न करण्याकरिता इस्लाम स्वीकारला होता आणि त्यानंतर त्यांचे नामकरण आयशा सुलताना असे करण्यात आले होते.

मायकल जैक्सन किंग ऑफ पॉप याने सुध्दा इस्लाम धर्म स्वीकारला होता. आणि स्वतःचे नाव मिकाईल असे त्यांनी धर्मांतरा नंतर ठेवले होते. परंतु त्यांचा मृत्यू लवकरच झाल्याने ह्या गोष्टीवर पडदा पडला..
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जाणून घ्या बॅटवर स्टीकर लावण्याचे किती पैसे घेतात स्टार क्रिकेटर ?

क्रिकेट मध्ये व्यावसायीकरण मोठ्या प्रमाणात आहे आणि हा प्रचंड लोकप्रियतेचा खेळ बनलेला आहे. परंतु आपण कधी विचार केला का कि एक क्रिकेटर एक वर्षात किती कमाई करतो. यांचे आकडे आहे करोडोत हे सर्वाना माहित आहे. BCCI कडून मिळणारी फी तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु मोठमोठ्या ब्रॅडची जाहिरात करून सुध्दा क्रिकेटर फीपेक्षा अधिक पैसा कमवितात. खेळाडूची लोकप्रियता बघून मोठ मोठ्या कंपनी त्यांच्या सोबत करार करतात. जेव्हा ते मैदानात उतरणार तेव्हा त्यांच्या बॅटवर कंपनीचे स्टीकर लावून तर प्रचार करायचा. रन सोबत पैश्याचाही पाउस पाडायचा असतो त्यांना आज खासरेवर बघूया कोण खेळाडू आपल्या बॅटवर स्टीकर लावायचे किती पैसे घेतो…

एम एस धोनी
सर्व जाहिरातदारांची दोन नंबरची पसंद आहे एम एस धोनी, धोनीच्या अगोदर सर्वात लोकप्रिय विराट कोहली हा आहे. धोनीची एका स्पोर्ट कंपनी सोबत डील झालेली आहे. धोनीच्या बॅटवर स्पार्टन या कंपनीचे स्टीकर आहे. तो हे स्टीकर लावण्याकरिता ६ करोड रुपये एवढी रक्कम घेतो.
शिखर धवन
भारतीय क्रिकेट संघाचा गब्बरसिंघ उर्फ शिखर धवन यांची MRF सोबत डील झालेली आहे आणि याच बॅटने तो रनसोबत पैसा हि कमावतो. तो आपल्या बॅटवर MRFचे स्टीकर लावायचे ३ करोड रुपये घेतो.

रोहित शर्मा
भारतीय टीमचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याची २०१५ साली CEAT सोबत डील झालेली आहे. रोहित आपल्या बॅटवर CEAT या प्रसिध्द कंपनीचे स्टीकर लावतो त्याला याकरिता कंपनीतर्फे ३ करोड रुपये मिळतात. परंतु रोहित शर्माचा सध्याचा फॉर्मबघता त्याची रक्कम वाढणार हे नक्की आहे.
युवराज सिंघ
युवराज सिंघ आपल्या बॅटवर प्युमाचे स्टीकर लावतो. प्युमा हि नामांकित स्पोर्ट कंपनी आहे. या करिता युवराजला तब्बल ४ करोड रुपये मिळतात. या सोबतच ते प्युमाचा शूज आणि व्रीस्टबैडची देखील जाहिरात करतो.

विराट कोहली
सर्वाना उस्तुकता असेल कि विराट कोहली किती रक्कम घेतो त्याच्या या डील करिता. विराटचे स्टार देखील यशाच्या शिखरावर आहे. त्याची MRF सोबत १०० करोडची डील झालेली आहे. विराट कोहलीची किंमत सध्या २०१७मध्ये सर्वात जास्त आहे.
क्रिस गेल
क्रिस गेल देखील धडाकेबाज फलंदाज आहे क्रिस गेलचा करार स्पार्टन या कंपनी सोबत झालेला आहे त्याला या डीलनुसार स्टीकर करिता ३ करोड रुपये मिळतात.

एबी डी विलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डी विलियर्स चा करार MRF कंपनी सोबत झालेला आहे. त्याला या करारानुसार ४ ते ४.५ करोड रुपये मिळतात.
अश्या पद्धतीने सर्व फलंदाज आपल्या बॅटने फक्त रनच नाहीतर पैश्याचा पाउस देखील पाडतात. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

शाहिद होण्यापूर्वी मेजर प्रफुल्ल यांच्या वायरल झालेल्या व्हीडीओची धक्कादायक सत्यता

सोशल मीडिया आपली भूमिका किंवा माहिती अगदी कमी वेळात पूर्ण जगासमोर मांडायचं साधन बनला आहे. परंतु काही लोकं याचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी करत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ताजी गोष्ट म्हणजे शनिवारी जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकने शास्त्रसंधी करून केलेल्या गोळीबारात शहिद झालेले मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचा एक शहिद होण्यापूर्वीचा शेवटचे क्षण म्हणून व्हिडीओ वायरल होत आहे.

या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता की कथितरित्या मेजर प्रफुल्ल जखमी असताना सुद्धा शत्रूवर हल्ला करण्याच्या सूचना आपल्या सहकाऱ्यांना देत आहेत आणि आपल्या तुकडीला सुद्धा तिथून सुरक्षित बाहेर काढण्यास सांगत आहेत. परंतु या व्हिडिओची सत्यता ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही या व्हिडीओ मध्ये बघू शकता की जखमी असताना सुद्धा मेजर प्रफुल्ल सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर पडण्याच्या सूचना देत आहेत. व्हिडीओ मध्ये मेजर प्रफुल्ल यांचे इतर सहकारी त्यांना आराम करण्यास आणि शांत राहण्यास सांगत आहेत. पण यानंतरही मेजर प्रफुल्ल त्यांना विरोधी शत्रूवर हल्ला चढवण्याच्या सूचना देताना दिसत आहेत.

सोबतच या व्हिडीओच्या शेवटी मेजर प्रफुल्ल आपल्या सहकाऱ्यांना आग लावण्यास सांगत आहेत जेणेकरून हेलिकॉप्टर त्यांना बघू शकेल. परंतु धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले आहे. तुम्ही बातम्या बघितल्या असतील की मेजर प्रफुल्ल शनिवारी शहीद झाले आहेत पण हा व्हिडीओ युट्युबवर तब्बल सात वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेला आहे.

याशिवाय हा व्हिडीओ खोटा असण्याचा दुसरा पुरावा म्हणजे याला जानेवारी 2017 मध्ये एका सीआरपीएफने ऑफिशियल ट्विटर हँडल वर ट्विट करून सांगितले होते की हा व्हिडीओ 8 जून 2009 चा आहे.

मेजर प्रफुल्ल यांचे नाव या व्हिडीओ सोबत कसे जोडले जाणून घेऊया. काही दिवसांपूर्वी माजी सेना प्रमुख जनरल व्हीके सिंह यांनी फेसबुक पोस्टवर व्हिडीओ शेअर करत भारतीय सैन्याच्या युवा सैनिकांचे कौतुक केलं होतं.

लोकांनी व्हीके सिंह यांच्या या पोस्टला मेजर प्रफुल्ल यांच्या सोबत जोडून व्हिडीओ वायरल करण्यास सुरुवात केली. या पोस्टद्वारे तुम्हाला या व्हीडीओची सत्यता करावी हा उद्देश आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हमालाचा मुलगा ते महाराष्ट्र केसरीचा उपविजेता किरण भगत

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या अंतिम सामन्यानंतर उपविजेता ठरलेल्या किरण भगत ने सर्व महाराष्ट्रातील जनतेचे हृदय जिंकले.तो जरी महाराष्ट्र केसरी झाला नाही पण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी तोच आहे.

किरण भगत हा अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा मोहेगाव जिल्हा सातारा हे त्याचे गाव वडील मुंबई मध्ये हमालीचे काम करतात. किरण ला एक भाऊ आहे तो सैन्यात आहे. किरणच्या वडिलांची इच्छा होती की दोन मुलांपैकी एकाने कुस्ती करावी.किरण ची ओढ कुस्तीकडे दिसल्याने वडिलांनी त्याला आटपाडी येथील नामदेव बडरे यांच्या तालमीत टाकले.तिथे किरण चे कुस्तीचे प्राथमिक शिक्षण झाले. या तालमीत पाया पक्का केल्यानंतर त्याला पुढे कुस्ती शिकण्यासाठी पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात अर्जुनवीर काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीत प्रवेश घेतला.

वयाच्या 15 व्या वर्षी किरण पुणे येथील काका पवार यांच्या तालमीत जॉईन झाला. तिथे त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. किरणच्या वडिलांनी हमाली केली लोकांची ओझी वाहून आपल्या मुलाच्या कुस्तीच्या शिक्षणासाठी पैसे पाठवले. आपल्या मुलाला त्यांनी काहीच कमी पडू दिले नाही. किरणनेही वडिलांच्या विश्वासाला कुठेही खाली पडू दिले नाही प्रचंड मेहनत घेऊन त्याने आज मोठे यश मिळवले.
महाराष्ट्रात सोबतच किरण ने आपले नाव देशभर गाजवले आहे. हरियाणा पंजाब मधील अनेक कुस्त्यांचे मैदाने किरण ने मारली आहेत. महाराष्ट्रातही किरण ने शेकडो मैदाने मारली आहेत. किरण चा स्वभाव अत्यंत शांत आणि संयमी आहे.

महाराष्ट्र केसरी च्या स्पर्धेत किरणने माती मधील कुस्ती खेळत दमदार कामगिरी केली. त्याने अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली. किरणच्या खेळाने संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केले. अंतिम सामन्यात त्याच्या हाताला दुखापत झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एक आपल्या घरातीलच व्यक्तीला दुखापत झाली अशी भावना तयार झाली होती.

अंतिम सामना जरी अभिजित कटके यांनी जिंकला असला तरी खऱ्या अर्थाने कुस्ती प्रेक्षकांच्या मनातील किरण भगत हा महाराष्ट्र केसरी ठरला. सामना जरी अभिजित कटके यांनी जिंकला असला तरी लोकांची मने मात्र किरण भगत यांनी जिंकली.
किरणच्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !!

आपल्याला ही माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका..