हंपी कर्नाटक येथील विठ्ठल मंदीर…

पंढरपूर च्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवरायानी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले व अशी अख्यायिका आहे की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ति हंपीला घेऊन या रथामध्ये स्थापन केली …परंतु स्वप्नात विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला व परत पंढरपूररात ठेवण्याची आदेश दिला…नाराज झालेल्या कृष्णदेवरायानी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही आजही पंढरपूर च्या विठ्ठलाच्या प्रतिक्षेत हे मंदिर उभं आहे सोलापूर शहरापासून फक्त 350 कि मी वर हंपी शहर आहे

कानडाऊ विठ्ठलु.. कर्नाटकु.. तेणे मज लावियाला वेडु…’ १५ व्या शतकातील या मंदिराला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळाला आहे. विठ्ठल मंदिराचे म्युझिक स्तंभ… पोकळ नसून त्यातून आजही ‘सरगम’चा निनाद हे विठ्ठल मंदिर “कर्नाटकाच्या हम्पी या गावात आहे ..अतिशय सुंदर आणि हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.तुंगभद्रेच्या काठावर वसलेल्या कर्नाटकातील हंपीतील विठ्ठल मंदिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना आहे
विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिराचे बांधकाम द्रविडी शैलीतील आहे. मंदिराच्या चाहु बाजूंना उंच तटबंधी आहे. त्यामध्ये एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडून प्रवेश करताच आपण वेगळ्याच जगात पोहोचल्याचा भास होतो.

मंदिरात एकामागे एक चार पीठ आहेत. रथ पीठ, ध्वज पीठ, ज्योती पीठ, डाली पीठ आणि तुळशी वृंदावन. आपली घरात पूर्वीच्या काळी तुळशी वृंदावन असायचे ते कदाचित याच द्रविडी शैलीचा एक भाग होते. रथ पीठ म्हणजे दगडी रथ. त्यात विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहेत. हा रथ म्हणजे हंपीमधील केंद्रबिंदू आहे. या दगडी रथाची चाके फिरून त्यामधून भगवान गरुड विष्णूला वंदन करायला जातात,

मंदिरात चारही बाजूंना चार मंडप आहेत पाकगृह मंडप, भजनगृह मंडप, पांडुरंग-रखुमाई कल्याण मंडप आणि मध्यभागी महामंडप. कल्याण मंडपात विठ्ठल रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जाई. त्या मंडपात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. संपूर्ण विठ्ठल मंदिरातील स्तंभ, संगीत-स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे स्तंभ पोकळ नाहीत. असे अजूनही त्या स्तंभांमधून आजही ‘सारेगामापाधानिसा’चा निनाद ऐकू येतो.
मध्यभागी असलेल्या महामंडपात विठ्ठल मंदिर आहे. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात पूर्वी विठ्ठलाची मूर्ती होती. आज ती तिथे नाही. आता ती मूर्ती महाराष्ट्रातील पंढरपुरात आहे असे तेथील लोकांनी सांगितले. मूर्ती तेथे नसली तरी मंदिराचे पावित्र्य आजही जपलेले आहे. ‘पांडुरंग कांती दिव्या तेज झळकती’ या ओवीची प्रचीती आजही त्या महामंडपात येते. मुख्य गाभाऱ्याच्या बाजूने एक छुपा प्रदिक्षणा मार्ग आहे. तो केवळ राज घराण्यातील लोकांसाठी मर्यादित होता.

कृष्ण देवा रायाच्या वर्षातून एकदा विठ्ठलाची महा पूजा होत असे. त्यावेळी राजा कृष्ण देवारायाची राणी चेन्नम्मा या महामंडपात नृत्य सादर करत असे. त्या वेळेस दूर देशीतून कलाकार आपली कला सादर करण्यास यायचे. महामंडपात चीनी सुमो करताना कोरलेले आढळतात. मंडपाबाहेर पोर्तुगीज, चीनी अशा परदेशी लोकांची शिल्पे आहेत. म्हणजे १५ व्या शतकात सुद्धा इतक्या दूर लोक येत असत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही महिला फौजींची शिल्पे आहेत, एक महिला वाघाशी लढत आहे तर दुसऱ्यात युद्धात लढणारी स्त्री दिसते. विजयनगरच्या सैन्यात स्त्रियांनाही प्रवेश होता हे पाहून आश्चर्य वाटते.

महामंडपाच्या मागील बाजूस देवी लक्ष्मीचे मंदिर आहे. हिंदू पुराणाप्रमाणे माता लक्ष्मी ही भगवान विष्णुंची सहचारणी होती. मंदिर परिसरात कित्येक शीला लेख आढळतात. मंदिरात वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही.आपल्या विठोबासाठी बांधलेले इतके उत्कृष्ट मंदिर पाहून डोळे धन्य होतात. आपल्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या विठ्ठलावर कर्नाटकामध्येही पूर्वीपासून असलेली श्रद्धा, भक्ती पाहून डोळे पाणावतात. आणि नकळत ओळी आठवतात ‘कानडाऊ विठ्ठलु.. कर्नाटकु.. तेणे मज लावियाला वेडु

पोस्ट साभार – माझं पान

उन्हाळा असो का पावसाळा आंब्याची तहान भागवणारा माझा कसा बनतो बघितला का ?

आंबा हे प्रत्येकाच्या आवडीचे फळ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अनेकजण आंबा तर आवडीने खातातच पण त्यापेक्षा जास्त पसंती त्यांची आंब्याच्या रसाला असते. एप्रिल-जून सहसा आंब्याचं सिजन असते. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, रायवळ अशा अनेक जाती आढळतात.

आंबा हे मोसमी फळ असल्याने ते 12 महिने आपल्याला भेटणे शक्य नाही. पण कोका कोला कंपनीने यावर उपाय म्हणून आंब्याच्या रसाची बॉटल मार्केटमध्ये आणली आणि लोकांची ही समस्या सोडवली. माझा मुळे आपल्याला 12 महिने आंब्याचा आनंद घेता येतो. ही माझाची बॉटल कशी बनते हे बघूया खासरेवर.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जगातील सर्वात महागडी दारु व त्यांच्या किमती तुम्हाला माहिती आहेत का?

आनंदाचे क्षण असो दुःखाचे माणसाच्या दोन्ही क्षणाला आजकाल एक गोष्ट सोबत असते, ती म्हणजे दारू. माणूस मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दारू पितो किंवा काही दुःख विसरायचे असेल तरी दारू पितो. असे बोलले जाते की दारू जितकी जुनी असेल तितकीच ती महाग असते. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या दारूविषयी आणि त्यांच्या किमतीविषयी माहीती देणार आहोत. काहींच्या किमती लाखामध्ये तर काहींच्या कोटीमध्ये आहेत, हे ऐकून आश्चर्य वाटू देऊ नका.

जगातील सर्वश्रेष्ठ व्हिस्की अनेक दशकांपासून जपून ठेवण्यात आल्या आहेत ज्या की सध्याच्या काळात सर्वात महागड्या आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही व्हिस्कीबद्दल सांगणार आहोत ज्या फक्त मोठ्या मोठ्या पार्टीमध्ये, किंवा व्यावसायिक घरांचे वैभव वाढवतात.

1. ईसोबेलाज इसले- 4 कोटी रूपये
ही आहे जगातील सर्वात महागडी व्हिस्की. या व्हिस्कीची किंमत 6.2 मिलियन डॉलर किंवा 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या व्हिस्कीची बॉटल खूपच आकर्षक असते. ईसोबेलाज इसले ची बॉटल 8500 हिऱ्यांनी सजलेली आहे. या बॉटलमध्ये पांढऱ्या सोन्याच्या कारागीरिसह 300 रुबलसुद्धा जोडलेले आहेत. यावरून तुम्हाला कळलेच असेल की ना तरी बाटली दुकानात मिळते ना सामान्य माणूस हे मद्य पिऊ शकतो.”

2. मैक्लेन 1946- 2 कोटी 89 लाख रुपये
मैक्लेन 1946 ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी व्हिस्की आहे. सध्या या व्हिस्कीची किंमत 460000 डॉलर म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा हि जास्त आहे. ही व्हिस्की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी बनवण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस कोळशाच्या किंमतीवर लागलेल्या बंदीमुळे व्हिस्कीची निर्मिती जो ला हरवून करण्यात आली होती. याच कारणामुळे ही व्हिस्की सर्वात महागड्या व्हिस्कीपैकी एक म्हणून ओळखले जाते.

3.डेल्मोर (62 वर्ष जुनी)- 1 कोटी रुपये
डेल्मोर ही जगातील सर्वात मोठ्या लक्झरी ब्रँड पैकी एक आहे. डेल्मोर 2011 सली चर्चेचा विषय होती कारण डेल्मोर ने आपली एक 62 वर्षे जुनी बाटली 200000 डॉलर म्हणजेच जवळपास 1 कोटी 32 लाख रुपयांस विकली होती.

4. मास्टर ऑफ मॉल्ट ( 105 वर्षे जुनी)- 92 लाख रुपये
स्कॉटलंड च्या डाल्मोर डिस्टलरी मध्ये बनणारी मास्टर ऑफ मॉल्ट ही एक खूप जुनी आणि महागडी व्हिस्की आहे. 105 वर्षे जुनी असलेल्या या व्हिस्कीला 17 फेब्रुवारी 1906 ला हायलेंड मधल्या ईस्ला टोरटेन डिस्टलरी मध्ये बनवण्यात आले होते. सध्याच्या घडीला तिची किंमत 1.4 मिलियन डॉलर म्हणजेच 92 लाखापेक्षा जास्त आहे.

5. गेनफिडीच जेनेट शीड रॉबर्ट रिजर्व (1955)- 62 लाख रुपये
गेनफिडीच जेनेट शीड रॉबर्ट रिजर्व (1955) ही महागड्या व्हिस्कीच्या लिस्ट मध्ये सामील आहे. सध्या तिची किंमत 94000 डॉलर म्हणजेच जवळपास 62 लाख रुपये आहे. या व्हिस्की ला 1955 च्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन च्या दरम्यान बनवण्यात आले होते. ही व्हिस्की तिच्या फ्लोरल, फ्रुटी आणि गोड चवीसाठी विशेष प्रसिध्द आहे.

6. डालमोर 62 सिंगल हायलेंड मॉल्ट स्कॉच मैथेसन- 40 लाख रुपये
डालमोर 62 सिंगल हायलेंड मॉल्ट स्कॉच मैथेसन मध्ये 4 वेगवेगळ्या व्हिस्कीचे मिश्रण आहे. सध्या तिची किंमत 58000 डॉलर म्हणजेच जवळपास 40 लाख रुपये आहे. 1942 मध्ये ही व्हिस्की बनवण्यात आली होती. या व्हिस्कीचे नाव डालमोर राज्याचे मालक अलेक्झांडर मैथेसेन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 2005 साली या व्हिस्कीची निलामी करण्यात आली.

माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जाणारे कोडवर्ड तुम्हाला माहिती आहे का ?

संपूर्ण जगभरात माफिया डॉन त्यांच्या रोजच्या व्यवसायात कोडवर्ड वापरत असतात.सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यासाठी कोडवर्ड ची भली मोठी लिस्टच डि-कंपनी ने बनवलेली आहे. पूर्वीच्या काळात अंडरवर्ल्ड मध्ये खोका आणि पेटी हे प्रचलित शब्द होते. काळ बदलला तसा शब्द ही बदलत गेलेत.जगभरात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात हे कोडवर्ड खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. जाणून घेऊया सध्याच्या काळात वापरले जाणारे काही प्रचलित कोडवर्ड खासरे वर बघुया…

1.फाईल- दैनंदिन जिवनात फाईल म्हणजे कागदपत्रे ठेवण्याची वस्तु परंतु अंडरवर्ल्डचे शब्दच वेगळे त्यांच्या भाषेत फाईल म्हणजे हत्यार होतो.फाईल लाओ म्हटल की समजायच हत्यार येणार. फाईल हा अंडरवर्ल्ड मध्ये सर्रासपणे वापरला जाणारा एक महत्वाचा शब्द मानला जातो.

2.पेशंट- हा शब्द वाचताच आपल्या डोक्यात विचार येतो तो दवाखाना आणि आजारपणाचा. पण पेशंट हा दाऊद चा सर्वात मोठा शत्रू होता. एकेकाळी दाऊद चा जिगरी दोस्त असणारा मुंबईचा डॉन छोटा राजन नंतरच्या काळात दाऊदचा कट्टर दुश्मन बनला. या दुष्मनीमुळे दाऊद ने नंतर छोटा राजनचे नाव पेशंट असे ठेवले. दाऊद चा खास शूटर असणाऱ्या जुनेद ला ऑगस्ट महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर या कोडवर्ड चा पर्दाफाश झाला.

3.एम्स हॉस्पिटल- ‘पेशंट एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट है’ आपल्यासाठी हा संवाद खूप कॉमन आहे पण डि-गॅंग च्या भाषेत या शब्दांचा अर्थ म्हणजे ‘छोटा राजन तिहार जेलमध्ये आहे’. हे अशे फसवे कोडवर्ड वापरून अंडरवर्ल्ड नेहमीच सुरक्षा यंत्रणांना हुलकावणी देत आले आहे. एम्स हॉस्पिटल हा कोडवर्ड तिहार जेलसाठी वापरला जातो. सर्वसामान्य व्यक्ती विचारही करू शकत नाही की एखाद्या हॉस्पिटलचे नाव हे जेलसाठी वापरले जाऊ शकते.

4.डॉक्टर- डॉक्टर म्हणजे सर्वांना मदतीसाठी धावून येणारा देवदूतच. पण अंडरवर्ल्ड मध्ये एखाद्या खबरी किंवा गुप्तहेराला डॉक्टर नावाने ओळखले जाते.

5.इंग्लिश वाली- या शब्दांचे अनेक अर्थ निघतात. मद्यपानाशी निगडित वाटणाऱ्या या शब्दाला अंडरवर्ल्ड मध्ये खूप महत्व आहे. कारणही तसेच आहे इंग्लिश वाली हा कोडवर्ड वापरलो जातो ‘ऑटोमॅटिक पिस्टल’ साठी. ‘साहब आज इंग्लिश वाली लाया हु’ हे वाक्य ऐकून कोणी विचारही करणार नाही की हे हत्यारांच्या तस्करीसाठी वापरले जात आहे.

6.हिंदी वाली- इंग्लिश वाली प्रमाणे हिंदी वाली हा कोडवर्ड देशी हत्यारांसाठी (कट्टा) वापरला जातो. दाऊद कंपनी नेहमीच भारतीय सुरक्षा यंत्रणांना डोळ्यासमोर ठेवून या कोडवर्ड ची लिस्ट बनवत असे.

7.महाराज- महाराज हा शब्द ऐकताच आपल्याला देवधर्माशी निगडित व्यक्ती आठवतात, पण माफिया हा कोडवर्ड एका नावाजलेल्या पोलीस ऑफिसर साठी वापरत असत. ते पोलीस अधिकारी होते एन्काऊंटर स्पेसिएलिस्ट विजय साळसकर.

8.बावा- विजय साळसकर प्रमाणे प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांच्यासाठी माफिया बावा हा कोडवर्ड वापरत असत. प्रदीप शर्मा हे परत ड्युटीवर आले आहे त्यामुळे त्यांची हि इनिंग पाहण्यालायक राहीलच.

9.अण्णा- आपल्या गावात शाळा करण्यासाठी 1 करोड रुपये जमा करण्यावरून विवादात सापडलेले दया नायक हे करोडपती म्हणून ओळखले जातात. ते दक्षिण भारतीय असल्यामुळे काही गॅंग त्यांच्यासाठी अण्णा हा कोडवर्ड वापरत असत.

10.बिडी- पूर्वीच्या काळात पोलिसांना पांडू आणि ठुल्ला या नावाने माफिया जगतात ओळखले जायचे.पण आता पोलिसांसाठी बिडी हा कोडवर्ड अंडरवर्ल्ड मध्ये वापरला जातो.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सामान्य माणसांना नाटक व चित्रपटामध्ये वापरले जाणारे कोडवर्ड माहिती असतात. त्यामुळे हे नवीन शब्द अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जात आहेत व हे कोडवर्ड प्रत्येक 3-4 वर्षाला बदलले जातात.

11.गिटार- संगीत क्षेत्राशी निगडित वाटणाऱ्या या शब्दाला माफिया जगतात एका हत्यारासाठी कोडवर्ड म्हणून वापरले जाते. एक-47 बंदुकीसाठी गिटार हा नवीन कोडवर्ड माफिया जगतात तयार झाला आहे. एके-47 साठी पूर्वी झाडू हा कोडवर्ड माफिया लोक वापरत असत.

12.लॉटरी- अंडरवर्ल्ड मध्ये फोनवर बोलताना कधीच कॅश,करन्सी व पैसे हे शब्द वापरले जात नाहीत. पैशासाठी आगोदर कागद हा कोडवर्ड वापरला जायचा पण आता कागदाची जागा घेतलीये लॉटरी या कोडवर्ड ने.

ड्रग तस्करीसाठी कोडवर्ड म्हणून अंडरवर्ल्ड माफिया वापरतात बॉलीवूड सेलिब्रिटी चे नावे,
1.रणवीर सिंग- रणवीर सिंग च्या नावामागे एक खास सिक्रेट कोडवर्ड दडलेला आहे. अंडरवर्ल्ड माफिया ड्रग विक्रेत्याला रणवीर सिंग म्हणून ओळखतात.

2.आलिया भट्ट- कोकेन सारख्या खतरनाक ड्रग ची तस्करी करण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतात कोकेन या शब्दाऐवजी आलिया भट्ट चे नाव सिक्रेट कोडवर्ड म्हणून वापरला जातो.

3.रणवीर कपूर- ड्रग तस्करी करताना जो होस्ट असतो त्याच्यासाठी रणवीर कपूर चे नाव वापरले जाते.

4.कंगना राणावत- अफीम या ड्रग ची तस्करी करण्यासाठी कंगना राणावतचे नाव वापरले जाते. सेलेब्रिटी चे नाव वापरल्यामुळे डील मध्ये गडबड होण्याचा धोका कमी असतो व सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यास ही मदत होते.

5.कतरीना कैफ- Smack साठी माफिया जगतात बॉलीवूड ची सुपरस्टार कतरीना जैफ चे नाव सिक्रेट कोडवर्ड म्हणून वापरले जाते. तर हि आहेत काही अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जाणारे गुप्तशब्द माहिती आवडल्यास शेअर करा…

एक करोड रुपयाला विकली जाते ही पाल, जाणून घ्या का होते यांची शिकार आणि कुठे सापडते ही पाल..

भारतामध्ये पाल ही एक खूप सामान्य प्राणी आहे. आपल्याकडे घरात पाल दिसताच तिला पळवून लावले जाते किंवा मारण्याचा प्रयत्न केला जातो. पाल ही भारतामध्ये सहसा प्रत्येक घरामध्ये आढळते म्हणलं तरी हरकत नाही. सहसा पाल कोणालाच आपल्या घरात आवडत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादी तुमच्या घरातील पाल ही तब्बल 1 कोटी रुपयांची असू शकते? तुम्हाला ऐकून धक्का बसू शकतो पण होय तब्बल एक कोटी रुपयांची पाल देखील आहे. तुम्हाला या पालीविषयी माहिती नसेल तर जाणून घेऊया खासरेवर एक कोटीच्या पालीविषयी माहिती…

आपण सर्व जण जाणतो की पाल ही एक सरपटणारा प्राणी आहे. प्राण्यांच्या विविध प्रजाती भारतात आढळतात. पाल सहसा कधी काही उपयोगात येईल असा विचारही आपण करत नाही. पण पश्चिम बंगाल मध्ये चक्क पालीची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगाल मधील नॉर्थ 24 परगना जिल्ह्यातून एका तस्कराला अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालीच्या Gekko नावाच्या जातीच्या Tokay Gekko या प्रजातीची पाल हा अटक झालेला तस्कर विकण्याच्या तयारीत होता.

अतिउल्लाह नावाचा हा तस्कर ही पाल बांगलादेश मार्गे आंतरराष्ट्रीय बाजारात नेऊन विकणार होता. जीची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे. पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. मागील 2 वर्षांपासून तो हा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे.

कुठे आढळते ही पाल?

ही पाल सहसा आशिया आणि पॅसिफिक आयलेंड मध्ये आढळते. आशियात खासकरून भारत, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश मध्ये ती आढळते. ग्रे कलरच्या या पालीच्या अंगावर लाल कलरचे ठिपके असतात. या पालींचे पाय मजबूत असतात.

एवढी महाग विकण्याचे कारण काय?

साऊथ ईस्ट आशियात Tokay Gekko ही पाल भाग्य, समृद्धीचे आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. आशियात यांची सर्वात जास्त तस्करी काही औषधी बनवण्यासाठी देखील होते. ही पाल किडनी आणि फुफुस मजबूत बनवते असं मानलं जातं. या पालीचे तेल त्वचेवर देखील लावले जाते. फिलीपाईन्स मध्ये तर या पालीची तस्करी कारण

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जगातील सर्वात महागड्या कार च्या मेकिंग चा व्हिडीओ प्रसिद्ध, अशी बनली ही महागडी कार

रोल्स रॉयस ही जगात सर्वात शानदार आणि लक्झरी कार तयार करणारी कंपनी म्हणून लोकप्रिय आहे. या कंपनीने जगातील सर्वात महागडी कार बनवली आहे जीची किंमत आपण जाणून घेतली तर आपल्याला धक्का बसेल.. अजून ही कार भारतात कोनाकडेही नाही. या कार ची किंमत तब्बल भारतीय चलनात 84 कोटी रुपये इतकी आहे आणि या कारचा मेकिंग चा व्हिडीओ कंपनीने प्रसिद्ध केला आहे तो आपण पाहून ही कार किती खास आहे ते पाहावे..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

बघा कश्या प्रकारे करतात या महिला चोरी… व्हायरल झाला आहे व्हिडीओ

आज पर्यंत अनेक पूरषांचे विडीओ आपण बघितले असेल ज्यामध्ये चोर हा CCTV कॅमेरा मध्ये कैद झाला व त्याची चोरी सापडली. परंतु महिला देखील चोरी करण्यात पूरषांच्या दोन हात पुढे निघाल्या आहेत. वरील विडीओ मध्ये आपण बघू शकता कि महिलांनी कश्या प्रकारे सफाईदार पद्धतीने कोणालाही न कळता चोरी केली आहे. त्यामुळे पुढील वेळेस सावधान कदाचित आपल्या दुकानात आलेले गिर्हाईक चोर असू शकेल. हा सर्व प्रकार CCTV मुळे उजेडात आलेला आहे नाहीतर कोणी विचार हि करणार नाही कि अश्या प्रकारे चोरी केल्या जाते. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आपल्या लोकांना सावध करा. वरील विडीओ मध्ये अनेक विडीओ एकत्र करून आपल्याला हि माहिती पोहचवली आहे. आमचे पेज आवडल्यास अवश्य लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

संजू फिल्म च्या परवानगी साठी संजय दत्त ने घेतले इतके कोटी रुपये

संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. गत ९ दिवसांत ‘संजू’ने २३४ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पण मेकर्सला ‘संजू’च्या या कमाईतील काही हिस्सा अभिनेता संजय दत्त यालाही द्यावा लागणार आहे. होय, कारण आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची परवानगी देण्यासाठी संजयने कोट्यवधी रूपये घेतले. शिवाय चित्रपटाच्या नफ्यातील काही वाटाही त्याने घेतला, ताज्या माहितीनुसार, संजय दत्तने या चित्रपटासाठी ९ ते १० कोटी रूपये घेतले. शिवाय चित्रपटाच्या कमाईचा काही भागही त्याने मागितला. याच अटीवर त्याने आपले आयुष्य पडद्यावर साकारण्यास परवानगी दिली आहे.

बॉक्स आॅफिसवरील कलेक्शनबदद्ल सांगायचे तर पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने एकूण २०२. ५१ कोटी रूपये कमावले. यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी १२.५० कोटी, दुस-या शनिवारी २१.२५ कोटींचा गल्ला जमवला. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘रेस3’ आणि ‘बागी2’ या चित्रपटांना धूळ चारली. या चित्रपटाचा बजेट १०० कोटी रूपये होता. हे १०० कोटी चित्रपटाने कधीचेच वसूल केले आहेत.

किती झाली संजूची कमाई?

“संजू” चित्रपटाने 3 इडियट्स चित्रपटाचा रेकोर्ड तोडला आहे. ‘संजू’ने 8 दिवसात 200 कोटींच्यावर कमाई केली असून सध्याचे संकलन 202.51 कोटी रुपये आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर रेकॉर्ड मोडत आहे. सात दिवसांत ‘संजू’ने २०२.५१ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

रणबीरच्या करिअरमधील हा सर्वांधिक गाजलेला चित्रपट ठरला आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमसुद्धा ‘संजू’ने मोडला आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणबीरसोबतच विकी कौशल, परेश रावल, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, जिम सर्भ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

अभिनेत्री रेखा खरोखरच संजय दत्तच्या नावाचे कुंकू लावते का? काय आहे सत्यता

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या संजू सिनेमाने बॉक्स ऑफीसवर विक्रमी गल्ला जमा केला आहे. 2018 मधील सर्व रेकॉर्ड मोडत हा सिनेमा सुपरहिट सिनेमाच्या यादीत पोहचला आहे. संजय दत्तच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून समजत आहेत. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील चढ उतार सिनेमात दर्शविण्यात आले आहेत.

संजय दत्तच्या आयुष्यात किती गर्लफ्रेंड होत्या याबाबत सिनेमात एक संवाद आहे. जो प्रेक्षकांमध्ये हशा पिकवतो. कारण या प्रश्नाचे उत्तर संजय दत्त 308 देतो. संजय दत्तच्या गर्लफ्रेंडच्या यादीत काही सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नावं देखील आहेत. संजय दत्तने रॉकी या सिनेमाद्वारे बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमातील अभिनेत्री टीना मुनीम सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. पुढे अभिनेत्री ऋचा शर्मा सोबत तर संजय दत्तने लग्नही केले. ऋचाचे ब्रेन कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर माधुरी दीक्षित, रिया पिल्लई, लिजा रे या अभिनेत्रीसोबत देखील संजय दत्तचे प्रेमसंबंध होते.

संजय दत्त एकेकाळी अभिनेत्री रेखासोबत देखील रिलेशनशिप मध्ये होता. जमीन आसमा सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिघांचे प्रेमसंबंध जुळले. संजय दत्त आणि रेखा यांना काही खाजगी कार्यक्रमात सोबत बघितले गेले. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. रेखा संजय दत्तच्या नावाचे कुंकू लावते अशी देखील लोकांमध्ये चर्चा आहे. जाणून घेऊया काय आहे यामागची सत्यता खासरेवर..

यासीर उस्मान यांच्या पुस्तकात रेखा आणि संजय दत्त यांचे गुपचूप लग्न झाल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. संजय दत्त व्यतिरिक्त रेखाचे नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील नेहमी जोडले जाते. अमिताभ यांच्या नावाचे कुंकू लावते असं बऱ्याचदा बोललं जातं. पन यासीर उस्मान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ही अफवा आहे. अशा प्रकारची कुठलीही माहिती पुस्तकात छापण्यात आलेली नाहीये. लोकांनी वाचताना चुकीचा अर्थ काढल्याचे त्यांनी सांगितले होते. संजय दत्तने देखील याबाबत अधिकृत स्टेटमेंट देत रेखासोबत लग्न न झाल्याचे सांगितले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कसा बनवला जातो अफु? वाचा फायदे व तोटे…

अफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो. हेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते.

गांजाप्रमाणे अफू हेही मुळात एक औषध म्हणून उपयुक्त आहे. ते गांजापेक्षा जास्त प्रभावी आहे. अफूची झाडे उत्तर भारतात जास्त आहेत. याच्या बोंडापासून निघालेला चीक सुकल्यानंतर अफू होते. बोंडेपण वापरली जातात, तसेच त्यातले बी (खसखस) खूप वापरले जाते. अफूपासून मॉर्फीन, कोडीन, नार्कोटीन, पॅपॅव्हरीन, थेबाइन वगैरे अल्कलॉइड्स व त्यांची संयुगे प्राप्त होतात. ही रसायने वेदनाशामक आहेत. मात्र हल्ली त्यांचा मादक पदार्थ म्हणून जास्त उपयोग होतो. आणि त्यामुळेच अफूच्या शेतीला सरसकट परवानगी नाहीये.

अफू हि पॅपॅव्हेरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक मादक विषारी पदार्थ मिळतो. तो अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून मिळवला जातो. चिरा पाडल्यावर फळातून रस पाझरतो आणि हा रस वाळवून घट्ट केला की अफू हा मादक पदार्थ मिळतो. या अफूची लागवड प्राचीन काळापासून होत आली आहे.

अफू हे तीन महिन्यांचे पीक आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर मध्ये ही लागवड केली जाते.कांद्याच्या बियाण्यात मिसळून अफूचे बी जमिनीवर फेकले जाते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या पिकाला फुले येतात. फुले गळून पडल्यानंतर त्यापासून बोंड तयार होते. या हिरव्या दिसरणाऱ्या बोन्डाला चिरा मारून त्यातून द्रव्य पदार्थ एकत्र केला जातो. याच द्रव्य पदार्थापासून अफू आणि चरस तयार केला जातो. त्यामुळे या अफूचा वापर बोंडापासून हेरॉइन, चरस आणि गांजा बनवण्यासाठीच केलां जात असल्याचं नार्कोटिक्स विभागाचं म्हणणं आहे.

आज जगात अफूचं सर्वाधिक उत्पादन अफगाणिस्तानामध्ये होतं. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफूचे शुध्दीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात. भारत हा जगातील एकमेव मान्यता प्राप्त अफू निर्माण करणारा देश आहे.

अफूमध्ये वेदनाशामक आणि तापशामक अशी दोन द्रव्ये असतात. यांतील पहिले द्रव्य(मॉर्फिन) हे अत्यंत उपयुक्त आहे. याने मेंदूवर सुरुवातीस उत्तेजन पण नंतर निद्रा आणणारा परिणाम होतो. एकूण वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. उत्साह,कामवासना, विचारशक्ती इ. वाढतात पण हे सगळे कमी मात्रा दिल्यावर. जास्त मात्रा दिल्यावर श्वसनक्रिया, हृदयक्रिया बंद पडून मृत्यू येण्याचा संभव असतो, कारण यामुळे मुख्य म्हणजे मेंदूचे काम थंडावते. औषध म्हणून अफू पचनसंस्थेच्या अनेक आजारांवर उपयुक्त आहे. जुलाब उलटी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो पण आतडयाचे चलनवलन थंडावणे ही त्याच्या कामाची पध्दत आहे, यामुळे दुष्परिणामही होतात. अफूमुळे मलावरोधाचा परिणाम होतो. अफूने कोरडा खोकला कमी होतो. अफू सर्व इंद्रियांमध्ये दाह विरोधी काम करते, त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…