बघा कश्या प्रकारे करतात या महिला चोरी… व्हायरल झाला आहे व्हिडीओ

आज पर्यंत अनेक पूरषांचे विडीओ आपण बघितले असेल ज्यामध्ये चोर हा CCTV कॅमेरा मध्ये कैद झाला व त्याची चोरी सापडली. परंतु महिला देखील चोरी करण्यात पूरषांच्या दोन हात पुढे निघाल्या आहेत. वरील विडीओ मध्ये आपण बघू शकता कि महिलांनी कश्या प्रकारे सफाईदार पद्धतीने कोणालाही न कळता चोरी केली आहे. त्यामुळे पुढील वेळेस सावधान कदाचित आपल्या दुकानात आलेले गिर्हाईक चोर असू शकेल. हा सर्व प्रकार CCTV मुळे उजेडात आलेला आहे नाहीतर कोणी विचार हि करणार नाही कि अश्या प्रकारे चोरी केल्या जाते. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आपल्या लोकांना सावध करा. वरील विडीओ मध्ये अनेक विडीओ एकत्र करून आपल्याला हि माहिती पोहचवली आहे. आमचे पेज आवडल्यास अवश्य लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

ज्या पिस्तुलातून भगतसिंगांनी ब्रिटिश अधिकारी जॉन साँडर्सवर गोळी झाडली, ते पिस्तूल..

‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर चढलेले शहीद भगतसिंग यांनी आपल्या लढ्यात वापरलेला एक अमूल्य ठेवा तब्बल ९० वर्षांनंतर जगापुढे आला आहे. ज्या पिस्तुलातून भगतसिंगांनी ब्रिटिश अधिकारी जॉन साँडर्सवर गोळी झाडली, ते पिस्तुल इंदूरमधील एका प्रदर्शनात मांडण्यात आलं आहे. त्याच्याकडे पाहून प्रत्येक देशभक्ताचा ऊर अभिमानानं भरून येतोय.

‘सायमन कमिशन’ला विरोध करणाऱ्या निदर्शकांवर स्कॉट आणि जॉन साँडर्स या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला होता. त्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी १७ डिसेंबर १९२८ रोजी साँडर्सला ठार मारलं होतं. या गोळीनं ब्रिटिशांची झोप उडवली होती आणि स्वातंत्र्यलढ्याला नवं बळ मिळालं होतं. या क्रांतिकारी घटनेचे साक्षीदार असलेले; किंबहुना ही क्रांती घडवण्यात योगदान देणारं पिस्तुल आता प्रकाशझोतात आलं आहे. हे पिस्तुल भगतसिंग यांचंच असल्याचं तब्बल ९० वर्षं कुणालाच ठाऊक नव्हतं. परंतु, इंदूरमधील शस्त्रसंग्रहालयानं केलेल्या संशोधनातून हे अभिमानास्पद वास्तव समोर आलंय.

पंजाब पोलीस अकादमीमध्ये ऑक्टोबर १९६९ पर्यंत एक पिस्तुल होतं. तिथून ते इंदूर येथील बीएसएफच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स (सीएसडब्ल्यूडी) म्युझियममध्ये नेण्यात आलं होतं. पण, हे पिस्तुल कुणाचं, कुठलं, इथे कसं आलं याची नोंद सापडत नव्हती. मात्र, सीएसडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच वर्षांनंतर पिस्तुलचा अभ्यास केला आणि त्यांना सुखद धक्का बसला. पिस्तुलावरील काळा रंग काढून आम्ही त्याचा सिरिअल नंबर तपासला.

त्यावरून हे पिस्तुल कुणाचं असावं याचा शोध घेत असताना, साँडर्स खटल्यातील पिस्तुलशी हा नंबर जुळला. त्यावरून, हे पिस्तुल भगतसिंग यांचं असल्याची माहिती समोर आली, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. त्यानंतर, हे .३२ एमएम कोल्ट ऑटोमॅटिक पिस्तुल जनतेपुढे आणण्याच्या हेतूने ते प्रदर्शनात मांडण्यात आलंय. या पिस्तुलची महती कळताच, सगळ्यांचेच डोळे चमकतात आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी केलेला पराक्रम डोळ्यांसमोर तरळतो.

साभार : राहुल कराळे

तुमच्या सरपंचाने कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला?

खेड्यागावांमध्ये गावाचा कारभार बघण्यासाठी ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या नियंत्रणाखाली हा कारभार चालतो. गावांमधील सर्व समस्या या ग्रामपंचायत च्या माध्यमातून सोडवल्या जातात. रस्ते, पाणी, नाल्या अशी बरीच काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी ग्रामपंचायतकडे उपलब्ध करून दिला जातो. पण खेड्यागावांमध्ये लोकांना याविषयी जास्त माहिती नसते. ही कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो याबद्दल खूप कमी जणांना माहिती असते. आज आपण खासरेवर बघूया याची सविस्तर माहिती कशी बघायची.

तुम्ही दर पाच वर्षांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देता. मात्र गावासाठी ते किती निधी आणतात आणि काय कामं करतात, याची कल्पनाही ग्रामस्थांना नसते. यामुळं ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आता गावामध्ये कामांसाठी किती निधी आला हे पाहणे आता सोपे झाले आहे. सर्व निधीची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती आता वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला आणि तो कशासाठी खर्च केला, याची सविस्तर माहिती आता आपण बघू शकतो.

माहिती कशी मिळवाल?

या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पंचायत राज मंत्रालयाच्या प्लॅन प्लस या वेबसाईटशी जोडले जाल. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा तपशील हवा आहे ते वर्ष टाकून तुम्ही माहिती बघू शकता.

त्यानंतर तुम्हाला तिथे राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर तुम्हाला नेमकी कशाची माहिती बघायची आहे, तो पर्याय निवडा, जसं की ग्रामपंचायतीची माहिती हवी असेल तर ग्रामपंचायत निवडा आणि जिल्हा परिषदेची माहिती पाहिजे असेल तर जिल्हा परिषद हा पर्याय आहे.

यानंतर जिल्हा निवडण्याचा पर्याय वेबसाईटवर दिसेल. जिल्हा निवडल्यानंतर पुढे तालुका निवडायचा आहे. तालुक्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची यादी तुमच्यासमोर येईल. ग्रामपंचायत निवडून गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतची सर्व माहिती सविस्तर मिळेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

उन्हाळा असो का हिवाळा आंब्याची तहान भागवणारा माझा कसा बनतो बघितला का ?

आंबा हे प्रत्येकाच्या आवडीचे फळ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अनेकजण आंबा तर आवडीने खातातच पण त्यापेक्षा जास्त पसंती त्यांची आंब्याच्या रसाला असते. एप्रिल-जून सहसा आंब्याचं सिजन असते. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, रायवळ अशा अनेक जाती आढळतात.

आंबा हे मोसमी फळ असल्याने ते 12 महिने आपल्याला भेटणे शक्य नाही. पण कोका कोला कंपनीने यावर उपाय म्हणून आंब्याच्या रसाची बॉटल मार्केटमध्ये आणली आणि लोकांची ही समस्या सोडवली. माझा मुळे आपल्याला 12 महिने आंब्याचा आनंद घेता येतो. ही माझाची बॉटल कशी बनते हे बघूया खासरेवर.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सिविल ड्रेस मध्ये तक्रार करायला गेले एसपी, स्टेशनमध्ये मिळालेले उत्तर बघून हैराण व्हाल..

‘सर मला हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली आहे, मी इथे नवीन आहे आणि हॉटेलमध्ये थांबलो आहे. तुम्ही लवकर माझ्यासोबत हॉटेलमध्ये चला’ असे म्हणत एक युवक मंगळवारी अत्यंत साध्या कपड्यात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. 1 मे ला तो दुपारी 2 वाजता तो ठाण्यात आला होता. ठाण्यात हजर असलेल्या पप्पू कुमार या कॉन्स्टेबलला त्याने घटनेची माहिती दिली.

त्या कॉन्स्टेबलने युवकास कोणत्या ठिकानी मारहाण झाली? हॉटेलचे नाव काय? असे प्रश्न विचारले. पण युवकाला हॉटेलचे नाव आणि पत्ता माहिती नव्हता. तो फक्त मला मारहाण झाली आहे, माझ्यासोबत हॉटेलला चला असा हट्ट करत होता. यानंतर त्या कॉन्स्टेबलने त्याला थोडं शांत राहण्यास सांगितले आणि खुर्चीवर बसण्यास सांगितले.

‘तुम्ही बसा आणि अगोदर व्यवस्थित मला माहिती द्या घटना नेमकी कुठे घडली आहे. त्यानंतर मला कळेल की घटना आमच्या ठाण्याच्या हद्दीत घडली आहे की दुसऱ्या ठाण्याच्या हद्दीत.’ असे तो कॉन्स्टेबल तरुणाला म्हणाला.

यानंतरही तरुण सोबत चला असा आग्रह त्यांना करत होता. तिथे बसलेल्या अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी थोडं रागात त्याला व्यवस्थितपणे माहिती देण्यास सांगितलं. एक पथक बाहेर गेलेले आहे जर तुम्ही माहिती बरोबर दिली तर ते पथक तिथे जाईल, असे ते पुढे म्हणाले.

कॉन्स्टेबलने नंतर युवकास एक कागद देऊन झालेली घटना कागदावर लिखित स्वरूपात देण्यास सांगितली. जर माहितीच नसेल तर पथक येत आहे ते आले की त्यांना सोबत पाठवण्यात येईल आणि चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले.

पुढे त्या युवकाने त्या कागदावर दोन ठिपके काढले आणि तो जाण्यास निघाला. ठाण्याच्या पायऱ्या उतरताना त्याने त्या पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की ‘मी गौरव मंगला तुनचा नवा एसपी’. तेथील पोलिसांना तर धक्काच बसला. पण मंगेर पोलिसांची चांगली कार्यशैली आणि कोतवाली ठाण्याचे प्रमुख राजेश शरण यांच्या चांगल्या पोलिसिंगमुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी फिर्यादी सोबत चांगले वागतात. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सेकंदात जळतो मृतदेह बघा, बघा अंत्यविधीची नवीन मशीन

आजकालच्या धावपळीच्या काळात अंत्यविधी ही फास्ट झालेला आहे. जळतणाचा पुरवठा शहरात फार गंभीर समस्या आहे. यावर मात करायला आता चक्क अंत्यविधी करीता विद्युत पुरवठ्यावर चालणारी अंत्यसंस्कार मशीन बनविण्यात आलेली आहे. या मशीनचे वैशिष्टय़ हे की एका मिनटात मृतदेहावर अंत्यसंस्कार होते आणी तुरंत आपल्याला त्या आप्तजनाची शेवटचे अवशेष मिळतात. या मशिनचा विडीओ युट्यूब वर उपलब्ध करण्यात आला. २ महिन्यात करोडो लोकांनी हा विडीओ बघितला व शेअर केला. यावरुन आपल्या हे लक्षात येते की लोक या नविन प्रकारास पसंदी देत आहे. यापासून पर्यावरणाचा – हास होणार नाही व वृक्षतोड ही कमी आवाक्यात येणे शक्य आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वे आणि नाना पाटेकर यांच्यात काय नाते आह?

नाना पाटेकर यांच्याबद्दलची ही माहिती आज पर्यंत बऱ्याच जणांना माहिती नाही आहे.नाना पाटेकर यांचा गुन्हेगारी जगताशी काय संबंध आहे? तर चला पाहूया आपण काय संबंध आहे त्यांचा मन्या सुर्वेशी. नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांच्‍या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे. रमण सुर्वे हा त्‍यांचा सख्खा धाकटा मामा. मुंबईतील कुख्‍यात गुंड मन्या सुर्वे हा त्‍यांचा मामेभाऊ. नानांवर त्याचे सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुंबईतून मुरूड-जंजिर्‍यास राहण्यास नेले. नानांचे बालपण अत्‍यंत प्रतिकुल परिस्थितीत गेले. त्‍यांचे वडील मुंबईला होते आणि नाना शिकायला गावाला. याला कारणही तसेच होते. त्‍यांची सख्‍खे भाऊ भार्गव आणि मन्‍या ही दोघे मुंबईतील कुख्‍यात डॉन. त्‍यामुळे ओघानेच नानांचाही त्‍यांच्‍यासोबत संपर्क यायचा. त्‍यामुळे नानाही त्‍यांच्‍या नांदी लागेल, ही भीती त्‍यांच्‍या आईला कायम होती. त्‍यातूनच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुरूड जंजिऱ्याला शिकायला नेले.

मन्या कसा झाला गँगस्टार ?

मनोहर ऊर्फ मन्‍या सुर्वे हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन होता. त्‍याच्‍या आयुष्‍यावर ‘शुट आऊट अॅट वडाळा’ हा हिंदी चित्रपटही आला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्‍याचा जन्‍म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले. मात्र, आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्‍हेगारी जगतात आला. त्‍याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामिल करून घेतले. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती.

अवती भोवती गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असताना नाना मात्र संस्‍कारी झाले. त्‍यांना साधी चोरीही करावीशी वाटली नाही. ते केवळ त्‍यांच्‍या आईच्‍या संस्‍कारामुळेच नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय तीनदा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘अग्निसाक्षी’ या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 2013 मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

एकाच मंडपात युवकाने केला दोन बहिणींशी विवाह, वाचा या अजबगजब लग्नाचे कारण

एका युवकाने दोन मुलीसोबत विवाह केला हे लग्नपत्रिका व फोटो भयंकर वायरल झाले आहे. बघितल्या नंतर हे लक्षात येईल कि हि घटना महाराष्ट्रातील आहे. परंतु असे का झाले असेल याचा शोध घेण्याचा आम्ही पर्यंत केला आणि सत्य आपल्या समोर देत आहोत.

तर झाले असे कि हि घटना बिलोली तालुक्यातील कोटगयाळ येथील आहे बुधवारी हा विवाह सोहळा येथे पार पडला आहे. दोन्ही वर्हाडी मंडळीसह पालकांनाहि विवाह मंजूर असल्याने माजी आ. रावसाहेब अंतापुरकर यांनी ह्या प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास आशीर्वाद दिला. कोटगयाळ येथील गंगाधर शिरगीरे यांना चार मुली ज्यात पहिली अंशतः मतीमंद आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मुलीचे लग्न झाले. चौथी राजश्री लग्नाला आली. मोठी धुरपताबाई मतीमंद असल्याने तिच्याशी कोण विवाह करणार ?

असे विचार शीरगिरे कुटुंबियात सुरु झाले. यादरम्यान राजश्री हिला स्थळ येऊ लागले त्यावर लहान बहिणीने अभिमानास्पद भूमिका घेतली आहे कि, माझ्याशी विवाह करायचा असेल तर मोठ्या बहिणीला स्वीकारावे लागेल. समराळा ता. धर्माबाद येथील सायन्ना उरेकर यांचा साईनाथ नावाचा मुलगा विवाहास तयार झाला. दोन्ही पालक व नातेवाइकाच्या मर्जीनुसार पत्रिकाही छापण्यात आली आहे.दोन वधू व एक वर अशी पत्रिका पहावयास मिळाली. २मे बुधवारी सकाळी ११ वाजता धूरपताबाई व राजश्री यांचा विवाह साईनाथसोबत पार पडला.

दोन्ही गावच्या निमंत्रित गावकऱ्यासह हा विवाह सोहळा पार पडला. मोठी बहिण मतीमंद त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यास कुणी तयार होत नाही. हे बघत असलेली छोटी बहिण समोर आली. खाली क्लिक करून आपण लग्नातील फोटो बघू शकता.

माझ्याशी लग्न करायचे असेल तर मोठ्या बहिणीशी लग्न करावे लागेल. अशी अटच तिने टाकत एक मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. गरीब कुटुंबातील मुलीने सर्वासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

हज येथे कापल्या जाणारे लाखो जनावरे कोठून येतात व कुठे जाते एवढे मास नक्की वाचा

हज मुसलमानाच्या जीवनामधील आवश्यक काम आहे. इस्लामच्या नियमानुसार प्रत्येक मुसलमानाला हज यात्रा जीवनात एकदा तरी करावी लागते जर ते हे करण्यास समर्थ असतील तरच, हज ‘काबा’ ची तवाफ़ (परिक्रमा) करून पूर्ण होतो. हि जागा सौदी अरब मध्ये मक्का या शहरात आहे. जगातील सर्व मुस्लीम येथे येतात हज पूर्ण व्हायला ५ दिवस लागतात. या दरम्यान अनेक प्रथा असतात ज्यापैकी एक कुर्बानीची परंपरा आहे.

पूर्ण इबादत झाल्यानंतर जनावराची कुर्बानी दिल्या जाते. हे प्रत्येक हाजीला करावे लागते. कुर्बानी देणाऱ्या जनावरात बकरा, मेंढी आणि उंटाचा समावेश असतो. ज्या दिवशी हि कुर्बानी दिल्या जाते तो दिवस ईद-उल-अज़हा बकरी ईद हा दिवस असतो. २०१६ साली १५ लाख हाजी मक्का येथे गेले आणि १६ लाख जनावराची कुर्बानी देण्यात आली होती.

या वर्षी जवळपास २० लाख जनावराची कुर्बानी देण्यात येणार असा अनुमान बांधण्यात आलेला आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येत जनावरे कापल्या जातात परंतु याच्या मासाचे काय होत असेल ? इस्लाम नुसार कुर्बानी देण्यात आलेल्या जवनावाराचे तीन हिस्से करण्यात येते व २ हिस्से गरीब लोकांना वाटावे लागतात. आणि एक भाग तो स्वतः खाऊ शकतो परंतु हज ला जाणारे लोक स्वतः हा हिस्सा खाऊ शकत नाही व गरिबांना हि वाटू शकत नाही.

जेव्हा मास बाहेर पाठवायची व्यवस्था नव्हती त्या काळात हे मास गाडून टाकल्या जात होते. कारण सौदी मध्ये असलेले तापमान त्यामुळे हे मास जास्त काळ टिकू शकत नाही. हज मध्ये तापमान ४०च्या वर राहते. परंतु आता या मासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सौदी अरबची सरकार हे मास बाहेर पाठवत आहे जिथे गरीब मुसलमान राहतात. २०१३ साली मासाचा मोठा हिस्सा सिरीया येथे पाठवण्यात आला.

२०१२ साली ९ लाख ९३ हजार जनावरे कुर्बानी नंतर २४ देशात पाठवण्यात आले होते. २०१३ मध्ये २८ देशात मास पाठवण्यात आले होते. या देशात सोमालिया. इंडोनेशिया, सीरिया या देशांचा समावेश आहे. ‘यूटिलाइजेशन ऑफ़ हज मीट’ हा प्रोजेक्ट सौदी सरकारने सुरु केला होता. हे जनावर घेण्य करिता सौदी मध्ये इस्लामिक डेवलपमेंट बैंक आहे ज्यामधील कुपन घ्यावी लागतात ते स्वतः जनावरे घेऊन कुर्बानी देतात.

जेव्हा कुराबानी दिली जाते तेव्हा SMS द्वारे हाजी ना कळवण्यात येते. सौदी मध्ये हे सर्व जनावरे अफ्रीका येथील सोमालीलैंड येथून बोलावल्या जाते. जहाजाद्वारे हे जनावरे आणले जातात उरुग्वे, पाकिस्तान, तुर्की आणि सोमालिया करत हे जनावरे सौदी येथे पोहचतात.

ATM मधून फाटकी किंवा रंग लागलेली नोट निघाली तर काय करावं? जाणून घ्या उत्तर..

आपल्याला बऱ्याचदा ATM च्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी पैसेच नसतात तर कधी ATM मध्ये बिघाड या तर खूप सामान्य अडचणी आहेत. कधी काही महत्त्वाचे काम असेल आणि वेळेवर पैसे नाही निघाले तर माणसाचा पारा चढतो. या समस्येत अजून एक भर पडली आहे. ती म्हणजे ATM मधून फाटलेल्या, रंग लागलेल्या किंवा काही लिहिलेल्या नोटा निघणे. अशा नोटा निघाल्यास त्या बाहेर चलनात स्वीकारल्या नाही जात. मग अशावेळी खूप अडचण निर्माण होते. खासरेवर आज जाणून घेऊया अशा समस्या तुम्हाला आल्यास त्यावर काय उपाय आहे…

अनेक जणांना मागे अशा नोटा मिळाल्यास त्या कुठेच चलनात येत नव्हत्या. RBI कडे याविषयी बऱ्याच तक्रारी गेल्यानंतर RBI कडून बँकांना काही सूचना देण्यात आल्या होत्या. तुम्हाला ATM मधून फाटलेली, रंग लागलेली किंवा काही लिहिलेली नोट मिळाली तर तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन बदलून घेऊ शकता. यासाठी RBI ने सर्व बँकांना तसे आदेशच दिलेले आहेत. बँकेत तुमच्या अशा नोट स्वीकारण्यास नकार दिला तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार करू शकता.

यानंतर तुम्हाला कधीही ATM मधून किंवा कोणाकडून चुकून रंग लागलेली, फाटलेली किंवा काही लिहिलेली नोट आल्यास तुम्ही ती जवळच्या शाखेत जाऊन बदलून घ्या. 2014 मध्ये याविषयी RBI ने सांगितले होते की लिहिलेल्या नोटा स्वीकारल्या जातील. पुढे 2017 मध्ये लोकांनी अफवा पसरवली की फाटलेल्या आणि लिहिलेल्या किवा काही तरी लिहिलेल्या नोटा बँक स्वीकारत नाहीयेत.

पण त्यावर RBI ने स्पष्ट केले आहे की कोणतीही फाटलेली किंवा लिहिलेली नोट बँक नाकारू शकत नाही. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.