का राहिले अटल बिहारी वाजपेयी आयुष्यभर अविवाहित ?

अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनातील काही घटना अशा आहेत कि त्या आजपर्यंत एक गुपित म्हणूनच राहिल्या आहेत. त्यातील एक महत्वाचा प्रश्न सर्वाना आजपर्यंत पडत असतो कि अटलजी यांनी लग्न का केले नाही. ते आयुष्यभर अविवाहित का राहिले ?? या गुपितामागील सत्य आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

अटल बिहारी वाजपेयींचा जन्म ग्वाल्हेर येथे एका शिक्षकाच्या घरात २५ डिसेंबर १९२४ ला जन्म झाला. त्यांच्या वडिलाचे नाव कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आईचे नाव कृष्णा देवीं होते. अटलजी यांचे बालपण मध्यमवर्गीय वातावरणात गेले आहे . वाजपेयीजी ग्वॉल्हेरच्या त्यावेळच्या व्हिक्टोरिया कॉलेजात शिक्षण घेतले. याच कॉलेज मधील एक घटना आहे कि त्यामुळे अटल जी यांनी लग्न नाही केले असे म्हटले जाते. पण वास्तवात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ स्वयंसेवक व प्रचारक राहिल्याने त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जाते. पण अटलजी यांनी एका मुलाखती मध्ये ते आयुष्यभर अविवाहित का राहिले याबद्दल भाष्य केले आहे.

एका पत्रकाराने मुलाखती दरम्यान त्यांना प्रश्न विचारला होता कि आपण अविवाहित का राहिलात तर त्या प्रश्नाला अटळ बिहारी वाजपेयी यांनी उत्तर दिले कि .. त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत गेल्या कि त्यांना लग्न करण्यासाठी वेळच मिळाला नाही. आणि त्यांना अविवाहित राहिल्यामुळे एकटेपणा जाणवतो असेही त्यांनी त्या मुलाखती दरम्यान कबूल केले होते. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या लग्नाबद्दल असे सांगितले जाते कि ग्वालेर च्या व्हिटोरीया कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री राजकुमारी यांच्या सोबत झाली होती. त्याकाळात मुलगा मुलगी बोलणे हि समाजात चुकीचे समजले जात असे. अटलजी च्या शिक्षणानंतर त्यांचा व राजकुमारी यांचा संपर्क तुटला व विषय पुढे गेला नाही.

पण हे दोघेही एकमेकाला विसरले नव्हते. राजकुमारी यांनी प्राध्यापक बी जी कौल यांच्याशी लग्न करून दिल्ली येथे स्थायिक झाल्या. काही वर्षांनी अटलजी आणि राजकुमारी यांचा संपर्क झाला. राजकुमारी यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या अटलजी यांच्या कडे राहायला आल्या . अटलजींनी राजकुमारी यांच्या मुलीला दत्तक घेतले व त्यांनी २० वर्षाहून अधिक वर्ष एकत्रित जीवन व्यथित केले. राजकुमारी यांनी २०१४ पर्यंत अटलजी यांची मनोभावे सेवा केली. व २०१४ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने अटल जी यांना एकांकीपणा आला.

या दोघांचे नाते काय होते याबद्दल कधीच दोघांनीही काही एक वाच्यता केली नव्हती. तसेच लोकांच्या बोलण्याकडे हि लक्ष दिले नाही. त्यामुळे आज हि या बाबतीत एक गूढ तसेच राहिले आहे.
Source:- सामना

अटल बिहारी वाजपेयी यांचे भाजपा करिता योगदान नक्की वाचा

अटल बिहारी वाजपेयींची तब्बेत अत्यंत चिंताजनक आहे. संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष त्यांच्याकडे लागून आहे यावरून आज हि देशातील जनता अटलजी यांच्यावर किती प्रेम करते हे दिसून येते. आपण अटलजी यांच्या जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

अटल बिहारी वाजपेयींचा जन्म ग्वाल्हेर येथे एका शिक्षकाच्या घरात २५ डिसेंबर १९२४ ला जन्म झाला. त्यांच्या वडिलाचे नाव कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आईचे नाव कृष्णा देवीं होते. अटलजी यांचे बालपण मध्यमवर्गीय वातावरणात गेले आहे . वाजपेयीजी ग्वॉल्हेरच्या त्यावेळच्या व्हिक्टोरिया कॉलेजात शिक्षण केले . आता लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून हे कॉलेज ओळखलं जातं. पुढे कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून वाजपेयी राज्य शास्त्रात एम ए झाले. आयुष्यभर अविवाहित राहिलेले वाजपेयी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पांचजन्य, स्वदेश आणि वीर अर्जुन या दैनिकांचं संपादन वाजपेयींनी केलं होतं.

पुढे १९५१ ला स्थापन झालेल्या भारतीय जन संघाचे वाजपेयी संस्थापक सदस्य होते. वाजपेयींचा राजकारणातला सुरुवातीचा काळ खडतर होता. सुरवातीला लखनौतून लोकसभेची पोट निवडणूक वाजपेयी हरले होते. १९५७ मध्ये वाजपेयींना भारतीय जनसंघानं लखनौ, मथुरा आणि बलरामपूर अशा तीन मतदार संघांमधून मैदानात उतरवलं होतं. लखनौतून वाजपेयींचा पराभव झाला. मथुरा मतदारसंघात तर त्यांची जमानत रक्कमच जप्त झाली. पण बलरामपूर लोकसभा मतदार संघातून विजयी होत वाजपेयी १९५७ मध्ये पहिल्यांदा संसदेत पोहोचले. वाजपेयींच्या चार दशकांपेक्षा जास्त काळाच्या संसदीय कारकिर्दीची ही सुरुवात होती.

फक्त संसदेतच नव्हे तर पक्षबांधणीतही वाजपेयींनी आपलं कर्तृत्व गाजवलं. १९६८ ते १९७३ या काळात ते भारतीय जन संघाचे अध्यक्ष होते. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणी विरोधात अटल बिहारी वाजपेयी खंबीरपणे उभे राहिले. आणीबाणीच्या काळात वाजपेयींनी तुरुंगवासही भोगला. पण पक्ष कार्यात खंड पडला नाही.

पुढे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून १९७७ ते १९८० या काळात वाजपेयींनी पक्षबांधणीचे काम केलं. २०१४ मध्ये पूर्ण बहुमतात सत्तेत आलेल्या भाजपच्या सुरुवातीच्या दिवसांची पायाभरणी करण्यात वाजपेयींचा मोलाचा वाटा होता. १९८० ते १९८६ या अवघड काळात वाजपेयींनी भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. भाजप संसदीय पक्षाचं नेतेपदही वाजपेयींनी १९८० ते १९९६ या काळात वेळोवेळी प्रभावीपणे सांभाळलं.

अकराव्या लोकसभेत वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्षात असताना वाजपेयी सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर धारेवर धरत, दुसऱ्या लोकसभेपासून तेराव्या लोकसभेपर्यंत वाजपेयी खासदार होते. उत्तम संसदपटू अशी ओळख असलेले वाजपेयी थोडा वेळ संसदेबाहेरही होते. १९८४ मध्ये ग्वॉल्हेर मतदारसंघात वाजपेयींचा माधवराव शिंदेंनी पराभव केला होता. त्याकाळात संसदेच्या चर्चांदरम्यान वाजपेयींची अनुपस्थिती विशेष करुन जाणवत असे. मात्र पुढे पुन्हा वाजपेयी संसदेत परतले आणि पंतप्रधानही झाले.

जन संघ आणि पुढे भारतीय जनता पार्टीला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रचंड मेहनत घेतली. या दोन्ही पक्षांच्या जडणघडणीत आणि विस्तारात वाजपेयींच्या नेतृत्वाचा मोठा हात आहे.

स्वांतत्र्य दिनी अमित शाह कडून तिरंग्याचा अपमान, बघा व्हिडीओ

आज स्वतंत्र दिनी अमित शाह बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बीजेपी मुख्य कार्यालयात ध्वजारोहण केले. परंतु ध्वज वर जाण्या एवजी त्यांनी तो खाली खेचला त्यामुळे एक मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ वायरल झाला असून अनेक लोक या कृत्यावर टीका करत आहे. वर आपण हा व्हीडीओ बघू शकता ज्या मध्ये स्पष्ट दिसत आहे कि अमित शाह यांनी चुकीची दोरी खाली ओढली आहे त्यामुळे तिरंगा वर जाण्या एवजी खाली आलेला आहे. देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम शिकविणाऱ्या संघाच्या शिकवणीतील अमित शाह यांच्या कडून अशी चूक अक्षम्य आहे असा सोशल मिडीयावर प्रतिसाद उमटत आहे. आपले मत नक्की या विषयावर शेअर करा.

ऑलिंपिकमध्ये भारताला सर्वात पहिले पदक मिळवून देणारे मराठी मल्ल खाशाबा जाधव यांच्या विषयी खासरे माहिती

स्वतंत्र भारताचे नाव ऑलिंपिकच्या तक्त्यावर (वैयक्तिक क्रीडाप्रकारात) प्रथम कोरणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब उर्फ के. डी. जाधव यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्र्वर या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये १९४०-४७ या दरम्यान झाले. त्यांचे आजोबा नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू असल्याने घरातील वातावरणही कुस्तीमय होते. शालेय जीवनातच त्यांनी कुस्तीबरोबरच भारोत्तोलन(वेटलिफ्टिंग), जलतरण, धावणे, जिम्नॅस्टिक, मल्लखांब आदी खेळांतही यश मिळविले होते. वडील दादासाहेब हे कुस्तीचे प्रशिक्षक असल्याने त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडून मिळू लागले. घरची परिस्थिती बेताचीच होती. साधा,शांत,विनम्र,मितभाषी व कोणत्याही गोष्टीची तक्रार न करण्याचा आईचा स्वभाव त्यांच्या अंगी उतरला होता. गावागावांत भरणार्‍या उरुस, जत्रांमध्ये कुस्तीचे फड पाहण्यासाठी ते वडिलांबरोबर जात. एप्रिल, १९३४ मध्ये रेठरे गावात भरलेल्या कुस्ती स्पर्धेत अवघ्या दोन मिनिटांतच प्रतिस्पर्धी मल्लास चीत करून वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली कुस्ती जिंकली. कुस्तीचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना टिळक विद्यालयामध्ये मिळाले. मोठे कुस्तीपटू बनायचे हा निर्धारही त्यांनी तेव्हाच केला. कुस्तीबरोबरच शिक्षणातही त्यांनी अव्वल स्थान राखले होते. टिळक विद्यालयात खाशाबांना बाबुराव वळवडे व बेलापुरे गुरूजींनी कुस्तीविषयक मार्गदर्शन केले होते. दरम्यान १९४२ च्या चलेजाव आंदोलनातही ते काही काळाकरिता सहभागी झाले. भूमिगतांना वसतिगृहातील आपल्या खोलीत लपवणे; ब्रिटिशविरोधी पत्रके वाटणे ही कामे त्यांनी केली. १९४८ ते १९५४ या काळात कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या कुस्तीच्या कारकीर्दीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. आपल्या अफाट कुस्ती कौशल्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेप्रमाणेच आंतरविद्यापीठ स्पर्धेतहीत्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. जिद्दीने व चिकाटीने त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही विजेतेपद मिळविले. त्यायोगे ते ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरले. १५ ऑगस्ट, १९४७ या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनीच भारताचा तिरंगा ऑलिंपिकमध्ये फडकविण्याचा निश्चय त्यांनी केला.

त्या काळी खेळाचे व्यावसायिकीकरण झालेले नसल्याने पुरस्कर्ते ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. तसेच खेळ,देशासाठी पदक यांबाबत शासन, तत्कालीन लोक आग्रही नव्हते, जागरुक नव्हते. त्यामुळे ऑलिंपिकला स्वखर्चाने जाण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मित्र, कुस्तीप्रेमी शिक्षक, टिळक हायस्कूलचे विद्यार्थी, गोळेश्र्वर गावातील लोक व कोल्हापूरचे छत्रपती यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून त्यांनी ऑलिंपिकला जाण्यासाठी रक्कम उभी केली.१९४८ व १९५२ या दोन्ही स्पर्धांत सहभागी होण्यासाठी त्यांनी स्वत: घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.१९५२ मध्ये तत्कालीन सरकारनेही खाशाबांना विशेष सहकार्य केले नव्हते. या प्रतिकूल परिस्थितीतही कुस्तीची तयारी, मॅटवरील सराव करणे, परदेशी जाण्यासाठीच्या प्रशासकीय पूर्तता करणे, त्यांना ऑलिंपिकला पाठवण्यास विरोध करणार्‍या यंत्रणांचा-घटकांचा विरोध मोडून काढणे आणि शिवाय निधी गोळा करणे – अशा अनेक आघाड्यांवर खाशाबा लढत होते. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन मल्लाला पहिल्या काही मिनिटांतच चीतपट करून प्रेक्षकांना त्यांनी अचंबित केले आणि ५२ किलो फ्लायवेट गटात सहावे स्थान मिळविले. वैयक्तिक क्रीडाप्रकारात ऑलिंपिकमध्ये १९४८ पर्यंत इतक्या वरचा क्रमांक मिळविणारे ते पहिले भारतीय क्रीडापटू ठरले. संपूर्ण देशात मॅटवरची कुस्ती माहीत नसताना त्यांनी मॅटवर हे यश मिळवले हे विशेष ! या कामी त्यांना त्यांचे गुरू,राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापक गोविंद पुरंदरे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागूनही निराश न होता पुढील हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेसाठी खाशाबांनी जय्यत तयारी सुरू केली.

हेलसिंकीमध्ये खाशाबा १२५ पौंड बॅटमवेट गटात सहभागी झाले होते. या गटात २४ देशांतील मल्लानी भाग घेतला होता. कॅनडा, मेक्सिको, जर्मनी या देशांच्या मल्लाचा पराभव करत, अखेर २३ जुलै, १९५२ रोजी या स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले कास्यपदक मिळवून दिले, एक अभूतपूर्व इतिहास घडवला. भारतीय क्रीडा-इतिहासात ऑलिंपिकमध्ये अजोड कामगिरी करणारे खाशाबा जाधव हे पहिलेच ऑलिंपिकवीर ठरले.(याच स्पर्धेत वेगळ्या वजन-गटात खाशाबांचे सहकारी कृष्णराव माणगावे सहभागी झाले होते.यांचेही कास्यपदक अवघ्या एका गुणाने हुकले होते.) ऑगस्ट, १९५२ मध्ये मायदेशी परतल्यावर; गोळेश्र्वर, कराड व कोल्हापूर येथील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. १०१ बैल जोडलेल्या गाडीतून त्यांची जंगी मिरवणूक कराड ते गोळेश्र्वर या मार्गावर काढण्यात आली. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोल्हापुरातील सर्व तालमींनी एकत्र येऊन त्यांचा व कृष्णराव माणगावे यांचाही मिरवणुकीसह गौरव केला. कोल्हापुरातील शहाजी लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य दाभोळकर यांनी खाशाबांना ऑलिंपिकला जाण्याकरीता सहकार्य करण्यासाठी स्वत:चा बंगला गहाण टाकला होता. खाशाबा हे उपकार विसरले नाहीत. यशस्वी होऊन परतल्यानंतर त्यांनी कुस्त्यांची दंगल (स्पर्धा) भरवली. कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील दंगलीत त्यांनी स्वत: बर्‍याच कुस्त्या जिंकून बक्षिसाची रक्कम मिळवली. हीच रक्कम त्यांनी प्रा. दाभोळकरांना (ते पैसे घेण्यास तयार नसताना) आग्रहाने बंगला सोडवण्यासाठी दिली. हा प्रसंग सचोटी, खेळावरची निष्ठा, सहकार्याची भावना व प्रामाणिकपणा या मूल्यांवर प्रकाश टाकतो, तसेच तत्कालीन व्यवस्थेवरही प्रकाश टाकतो.

१९५३ मध्ये जपानी मल्ल भारताच्या दौर्‍यावर आले होते. या वेळी झालेल्या कुस्त्यांत खाशाबांनी युनोमोरी या जागतिक विजेत्या जपानी मल्लाचा चितपट करून पराभव केला आणि आपली विजयी घोडदौड कायम राखली. पुढे १९५५ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. पोलीस खात्याच्या अनेक क्रीडास्पर्धा त्यांनी गाजवल्या. राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही भूमिका बजावली. १९८२ च्या दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांना क्रीडाज्योत थोडा वेळ हाती घेऊन वाहण्याचा सन्मान मिळाला. पण त्यांच्या परक्रमाचे महत्त्व समजून त्यांना मानसन्मान दिला गेला नाही एवढे नक्की. त्यांनी सुमारे २७ वर्षे पोलीस दलात नोकरी केली. साहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून, मुंबईतून ते निवृत्त झाले. अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केलेल्या खाशाबांना आपले निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. ‘पहिल्या ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूला अशी वागणूक’ हे आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव होय! एक-दोन संस्थांनी मात्र त्यांना पुरस्कार दिले, शासनाने त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिले. फाय फाउंडेशन जीवन गौरव पुरस्कार (मार्च, १९८३) , १९९० साली मेघनाथ नागेश्वर पुरस्कार(मरणोत्तर), १९९३ साली शिवछत्रपती पुरस्कार(मरणोत्तर), २००१ मध्ये केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार (मरणोत्तर) या पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले. खाशाबांच्या विजयाची आठवण म्हणून कोल्हापूरला ‘विजयी मल्लाचे’ एक शिल्प घडवण्यात आले. १९६० मध्ये हे शिल्प कोल्हापूरच्या भवानी मंडपात स्थापन करण्यात आले. या शिल्पासह गोळेश्र्वर गावातील एका तालमीच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. वैयक्तिक क्रीडाप्रकारात ऑलिंपिक पदकाच्या इतिहासाचा भारतासाठी श्रीगणेशा करणार्‍या या ऑलिंपिकवीराचे कराड येथे अपघाती निधन झाले. ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडाप्रकारात पुढील पदक मिळण्यास सुमारे ५० वर्षे जावी लागली व कुस्तीत पदक मिळवण्यासाठी ५६ (१४ स्पर्धा) वर्षे जावी लागली, यावरून खडतर परिस्थितीतही खाशाबांनी मिळवलेल्या पदकाचे महत्त्व लक्षात येते.

साभार- पै.गणेश मानुगडे

खऱ्या आयुष्यातील या द्रौपदीविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

महाभारतात द्रौपदीचे पात्र सर्वाना माहिती आहे तिने पाच पांडवा सोबत विवाह केला होता. इंग्रजीत या संकल्पनेस polyandry म्हणजे एका स्त्रीला अनेक पती असा अर्थ होतो. परंतु हे सर्व दंतकथेतील पात्र आहे तुम्हाला खऱ्या आयुष्यात अस होत नाही असे वाटणार परंतु आजही आधुनिक द्रौपदी अस्तित्वात आहे. या विषयी आपण संपूर्ण माहिती बघूया

हिमाचल प्रदेशात आजही काही भागात हि प्रथा आहे जिथे एका स्त्रीने अनेक पुरषासोबत लग्न करणे हे मानाचे मानले जाते. परंतु कालानुरूप हि प्रथा कमी होत आहे. आज आपल्या कथेतील मुख्य पात्र आहे “राजो वर्मा” देहरादून जवळ एका छोट्या खेड्यात ती , तिचा लहान मुलगा व ५ नवरे यांच्या सोबत ती राहते. तिचे ५ पती हे सग्गे भाऊ आहेत आणि रोज रात्री ती एका भावा सोबत झोपते. तिच्या लहान १८ महिन्याच्या मुलाचा खरा बाप कोण या विषयी गोंधळ तिच्या मनात नेहमी असतो. परंतु प्रत्येक पुरुष मुलाला आपला मुलगा म्हणून सांभाळतो त्यामुळे तिला हे सुरक्षित वाटते.

हि परंपरा तिच्या घरात पिढ्यान पिढ्या सुरु आहे. तिच्या आईने ३ पुरुषा सोबत लग्न केले होते. राजोच्या नवऱ्याचे नाव पुढील प्रमाणे आहे. शांत राम वय २८ वर्ष, बज्जू ३२ वर्ष, गोपाल २६ वर्ष, गुड्डू २१ वर्ष आणि दिनेश १९ वर्ष आहे. गुड्डू हा कागदोपत्री पद्धतीने तिचा अधिकृत नवरा आहे. तिची शेजारी सुनिता कुमारी ती देखील दोन नवर्या सोबत राहते.

ती सांगते कि या भागात असे १५ कुटुंब आहे जे या जुन्या प्रथेस टिकवून ठेवून आहे. अजब गजब भारतातील ह्या अजब गजब प्रथा आहेत. तुम्हाला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

मेजर कौस्तुभ राणे यांची वायरल ऑडीओ क्लीप विषयी काय आहे सत्य ?

काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मीरा रोडचे मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीची ऑडीओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात वायरल झालेली आहे. परंतु समाजात एवढ्या खालच्या पायरीवर जाऊन लोक काम करतील हे आपल्याला या प्रकरणातून समजेल. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे हि म्हण गावाकडे प्रसिद्ध आहे तसाच हा प्रकार घडलेला आहे. आज बघूया काय आहे संपूर्ण प्रकरण..

मेजर राणे यांच्या पत्नीचे मनोगत सांगणारी एक ध्वनिफीत सोशल मिडीयावर वायरल आहे. मात्र या ध्वनिफितीमधील आवाज मेजर राणे यांच्या पत्नीचा नसून या ध्वनिफितीमुळे मेजर राणे यांच्या पत्नीला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यामुळे आम्हाला त्रास होईल असे वर्तन करू नये अशी कळकळीची विनंती राणे कुटुंबीयांनी केली आहे तसेच या प्रकरणी त्यांनी सायबर सेलकडे तक्रारदेखील दाखल केली आहे.

सदर क्लिप मध्ये मेजर राणे यांच्या पत्नी कणिका अत्यंत भावनाविवश होऊन आपले मनोगत व्यक्त करीत आहे. मेजर राणे कश्मीर मध्ये घुसखोरां सोबत लढताना शहीद झाले. परंतु त्यांच्या या वीरमरणाची पर्वा न करता काही समाजकंटक हे काम करत आहे हि अतिशय दुखद गोष्ट आहे. या सर्व प्रकारांमुळे राणे कुटुंब अतिशय व्यथित झाले आहे. या ध्वनिफितीमुळे मेजर राणे यांच्या पत्नीला दु:ख आणि मनस्ताप झाला आहे. वीरपुत्राच्या हौतात्म्याचा आदर करण्याऐवजी काही मंडळी या परिस्थितीचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न करत असल्याची व्यथा कौस्तुभ यांच्या मामी वर्षां नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे. अश्या लोका पासून सावध रहा. खाली क्लिक करून आपण हा व्हिडीओ बघू शकता.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मदत करायची आहे असे सांगून निधी जमविण्यासदेखील सुरुवात केली आहे याचा देखील राणे कुटुंबाला मनस्ताप होत आहे.

भारतातील या गावात विवाहीत स्त्रीला 5 दिवस राहावे लागते नग्न.. काय आहे परंपरा?

भारतातील पहाडी भागात वेगवेगळ्या प्रथा आहे आणि आजही ह्या प्रथा इथे सुरु आहेत. अशीच एक आगळीवेगळी प्रथा भारतातील हिमाचल प्रदेश मध्ये सुरु आहे. कुलू भागातील खेड्यात आजही विवाहीत स्त्रीला ५ दिवस नग्न रहावे लागते. भारतातील हि विविधता भारतास एक वेगळे स्थान मिळून देते. वाचा संपूर्ण माहिती या प्रथेविषयी..

हि आगळी वेगळी प्रथा स्त्रिया पूर्ण करतात. पिढ्यान पिढ्या हि प्रथा हिमाचल प्रदेश मध्ये काही समाजात सुरु आहे. मनीकर्निका नावाच्या खेड्यात आजही नग्न ५ दिवस राहावे लागते. ती तिचे शरीर लोकराच्या धाग्याने झाकून ठेऊ शकते. या ५ दिवसात पती व पत्नीस एकमेकासोबत बोलायला जमत नाही. एकमेकापासून दोघांना दूर ठेवण्यात येते. विवाहीत स्त्री जेव्हा हि प्रथा पूर्ण करत असते तेव्हा तिच्या पतीस हि दारू अथवा कुठलाही अमली पदार्थ सेवन वर्ज्य आहे.

हे लोक ह्या प्रथेस काळा महिना म्हणतात आणि हि प्रथा १७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान पूर्ण केली जाते. या काळा दरम्यान महिला ह्या प्रजननक्षम नसतात असा त्यांचा समज आहे. ह्या प्रथेमुळे देव कृपा करतात आणि दैत्य किंवा राक्षसी शक्ती आपल्या पासून दूर राहतात असा त्यांचा समज आहे. घरातील प्रत्येक काम या महिलांना अश्या अवस्थेत करावे लागते.अजब गजब भारतातील हि अजब गजब प्रथा आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

४८ पाकिस्तान्यांना मारणारे “महावीर दिगेंद्र सिंग” यांची अंगावर काटा आणणारी कथा एकदा बघाच…

४८ पाकिस्ताने मारून पाकिस्तानी मेजरची सरळ मान कापून आणणारे दिगेन्द्र सिंग हे आहे. त्यांना सरकारने महावीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते. याची हि संपूर्ण घटना अंगावर नक्की काटा आणणारच. चार्ली कंपनीचे हे जवान १ जून ते १२ जून पर्यंत हे अभियान चालले ६०० मिटर पुढे क्षत्रू आणि १२ तारखीला हा हल्ला सुरु झाला. त्यांचे हे अनुभव चित्रपट कथे पेक्षाही रोमांचक आहे. नक्की बघा आणि शेअर करायला विसरू नका.. आपल्याला हि माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका व आमचे पेज नक्की लाईक करा..

१५ वर्षाचा मुलगा संपत्ती एवढी कि घरी पाळतो वाघ, सिंह…बघा आहे कोण हा मुलगा?

सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे वाघ सिंह पाळणारा दिसायला अगदी सर्वसामान्य मुलासारखा असणारा हा मुलगा. तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटमुळे चर्चेत आला. तो वाघ, सिंहासोबत खेळतानाचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर करत असतो. सुप्रसिद्ध कलाकार व खेळाडूंचीही नेहमी त्याच्या अवतीभोवती मांदियाळी असते. त्यामुळे या मुलाबद्दल जाणून घेण्याचं अनेकांमध्ये कुतूहल आहे. दुबईमधील अब्जाधीश व्यावसायिक सैफ अहमद यांचा तो मुलगा आहे.

त्याचं नाव रशीद बेल्हसा असून, तो १५ वर्षाचा आहे. त्याला दुबईत ‘मनी किक्स’ म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या आलिशान लाइफस्टाइलमुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. रशीदच्या वडिलांकडे २ डॉलर्सपेक्षा जास्त संपती आहे. एक अब्जाधीश घरात जन्माला येऊनही रशिदला स्वताच वेगळं स्थान निर्माण करण्यात जास्त विश्वास आहे.

कसे कमावतो रशीद एवढे पैसे? महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि वाघ, सिंह पाळण्याची रशीदला हौस आहे. यो अवघ्या वयाच्या 15 व्या वर्षीच अब्जाधीश आहे. रशीदचं स्वतःच ऑनलाईन स्टोअर आहे. स्निकर आणि बॅगची विक्री तो करतो. यातून तो महिन्याला कोट्यवधी रुपये कमावतो.

रशीदला आहे वाघ आणि सिंह पाळण्याची हौस- रशीदला वाघ आणि सिंह पाळण्याची प्रचंड हौस आहे. त्याच्या स्वतःच्या फार्महाऊस वर त्याने बरेच वाघ आणि सिंह पाळलेले आहेत. यासाठी त्याची एक व वेगळी ओळख दुबईमध्ये बनलेली आहे.

रशीद आहे महागड्या गाड्यांचा शौकीन- रशीद हा महागड्या गाड्यांचा खूप शौकिन आहे. त्याच्याकडे फेरारी, बेंटले, एझदी सारख्या आलिशान गाड्या आहेत. काही दिवसांपूर्वी आपली कोट्यवधी किंमतीची फेरारी त्याने लुई व्हिटॉन च्या प्रिंटने सजवली होती. सलमान खान त्याच्या फरारी गाडीच्या प्रेमात पडलेला आहे. रशीदच्या कुटुंबाकडेही रॉल्स रॉयस, मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्या आहेत.

रशीदच्या अवतीभोवती नेहमी असते कलाकारांची मांदियाळी- रशीदला सेलेब्रिटीचं आदरातिथ्य करायला फार आवडते. त्याचं एक फार्म हाऊसदेखील आहे. त्याच्या या फार्महाऊस वर दरवर्षी अनेक सेलेब्रिटी येत असल्याचे रशीद ने सांगितले. सलमान खान,शाहरुख खान, शिल्पा शेट्टीपासून ते जॅकी चॅन ,लिओनल मेस्सी, विझ खलीफापर्यंत अनेक मोठ्या सेलेब्रिटी, खेळाडूंची मांदियाळी त्याच्या अवतीभवती असते.

त्याच्या एकंदर आलिशान लाइफस्टाइलमुळे प्रभावित होऊन एका चॉकलेट बारने त्यांच्याकडील सर्वात महागड्या मिल्कशेकला त्याचं नाव देखील दिले आहे.

माहिती अवडल्यास शेअर करायला विसरू नका.

मराठा क्रांती मोर्चा: उद्याच्या महाराष्ट्र बंदसाठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता..

आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला उद्या दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलं आहे. अगोदरच्या बंदमध्ये नवी मुंबईत परिस्थिती चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील बंद मागे घेण्यात आला आहे. तर मुंबईत स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा असल्यामुळे परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी बंद मागे घेण्यात आला आहे.

उद्या होणारा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीतील बंदबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात येत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणच्या कंपन्या, शाळा, महाविद्यालये, वाहतुक सेवा देणाऱ्या संस्था, इत्यादिंनी 9 ऑगस्टच्या संपाची दखल घेऊन बंद ठेवणार असल्याचे घोषित केले आहे. दवाखाने, मेडिकल, इत्यादि अत्यावश्यक सेवा सुरुच राहतील.

उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. खासरेवर बघूया उद्याच्या बंदची आचारसंहिता..

बंदसाठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता-

1. बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे. 2. मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करावे. 3. कोणत्याही शासकीय व खाजगी मालमत्तेची तोडफोड अथवा मोडतोड करू नये.

4. पोलीस प्रशासनाने मराठा क्रांती मोर्चाला नेहमीच सहकार्य केले आहे. उद्याच्या बंद दरम्यान पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. 5. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. 6. मराठा सेवकांनी शांत राहून ऍक्शन प्लॅन तयार करायचा आहे. 7. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.

8. बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर मराठा क्रांती दिन असं नमूद केलं पाहिजे.
9. सर्वसामान्य लोक, महिला, वृद्ध, मुले यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…