भारतातील सर्वात मोठी दहा धरणं बघितली आहेत का? बघा व्हिडीओ…

धरण बांधण्याचा निसर्गावर आणि पर्यावरणावर आघात होतोच. पण मोठी आणि उथळ धरणं एका परीने पाणथळ जागा निर्माण करून निसर्ग वाढीला हातभारच लावतात. धरणांमुळे शेतीला पाणी, पेयजल, विद्युतनिर्मिती यांच्यासारखे अनेक लाभ मिळतात. भारतातील अनेक धरणं स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना आहेत. उत्तराखंडमधील टिहरी, पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर सतलज नदीवर असलेले भाक्रा धरण हे भारतातील सर्वात मोठे धरणं आहेत. तर हिराकुंड हा स्वतंत्र भारतातील हा पहिला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होता. बघूया भारतातील १० सर्वात मोठी धरणं व्हिडीओमधून…

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

फेसबुकचा शोध लावणारा खरा मालक मार्क झुकरबर्ग नसुन हा भारतीय आहे…

फेसबुक ही जगातील सर्वात प्रसिध्द सोशल नेटवर्किंग साईटपैकी एक साईट आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही आपल्या परिवारातील सदस्य, मित्र आणि अनेक लोकांशी जोडलेले राहू शकता. आपण सर्व जाणतो की फेसबुकची सुरुवात मार्क झुकरबर्ग याने केली होती. पण प्रत्यक्षात मात्र फेसबुकच्या शोधाची कहाणी खूप वेगळी आहे. फेसबुकचा शोध लावणारा खरा मालक हा मार्क झुकरबर्ग नसून एक भारतीय व्यक्ती आहे. चला तर मग आज खासरेवर जाणून घेऊया फेसबुकच्या शोधाची खरी कहाणी…

दिव्य नरेंद्र हे नाव खूप कमी भारतीयांना माहिती असेल. ते एक अमेरिकेचे नागरिक आहेत पण ते मूळचे भारतीय आहेत. त्यांचे आईवडील अडचणीच्या काळात भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. दिव्य नरेंद्र यांचं शिक्षण बालपण अमेरिकेतच झाले. दिव्य नरेंद्र यांचे आई वडील हे पेशाने डॉक्टर आहेत.स्वतासारखं दिव्यला सुद्धा डॉक्टरच करावं असं त्यांचं स्वप्न होतं. पण दिव्यला काही हे मान्य नव्हते. त्यांच्यामध्ये इंटरप्रिन्योर बनण्याची जिद्द होती, त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षाला यशही आले, कारण जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकची आयडिया ही त्यांची होती. लन त्यांना हे सिद्ध करण्यासाठी 2008 पर्यंत कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी लागली.

फेसबुकची खरी आयडिया ही दिव्य, त्याचा मित्र विंकलवास आणि इतर मित्रांची होती. पण मार्क झुकरबर्गने यामध्ये काही बदल करून ही आयडिया चोरली. दिव्यने 2004 मध्ये अमेरिकेत एका न्यायालयात मार्क विरुद्ध कायदेशीर केस दाखल केली. त्यांना यामध्ये यश आले, न्यायालयात सिद्ध झाले की फेसबुकची खरी आयडिया ही दिव्य आणि त्याच्या इतर मित्रांचीच आहे. यासाठी न्यायालयाने मार्क झुकरबर्ग याला 650 लाख डॉलर्सचा दंड ठोठावला. परंतु दिव्य याने समाधानी नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की शेअर बाजारात जशी फेसबुकच्या शेअरची किंमत आहे त्याप्रकारे त्यांना पैसे नाही मिळाले.

दिव्य यांनी पुन्हा एकदा न्यायालयात याविरुद्ध दाद मागितली मात्र न्यायालयात यावेळी दिव्य याना हार पत्करावी लागली. मात्र कोर्टाने 2008 सालीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. फेसबुकचा मालक आणि शोध लावणारा व्यक्ती म्हणून भलेही दिव्य याला कोणी ओळखत नसेल पण जेव्हा फेसबुकच्या शोधाची कहाणी लिहिली जाईल तेव्हा दिव्य यांची नक्कीच आठवण काढली जाईल.

फेसबुकच्या शोधाची खरी कहाणी-

फेसबुकचा शोध हार्वर्ड कनेक्शन सोशल साईटच्या निर्मिती प्रक्रियाच्या वेळी झाला. दिव्य हार्वर्ड कनेक्शन प्रोजेक्टवर खूप पुढेपर्यंत पोहचला होते. त्यानंतर बऱ्याच अवधीनंतर मार्क हा त्या प्रोजेक्टमध्ये सामील झाला होता. मार्कने यानंतर या प्रोजेक्टवर ताबा मिळवला आणि फेसबुक या नावाने एक डोमेन रजिस्टर करून त्याने तो जगासमोर आणला. दिव्य आज अमेरिकन बिझनेसमन म्हणून ओळखले जातात. 18 मार्च 1982 साली जन्मलेल्या दिव्य यांचे शिक्षण हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून झालेले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

एम्सच्या डॉक्टरांनी अटलजींना वाहिली श्रद्धांजली म्हणून व्हायरल झालेल्या या फोटोची सत्यता आहे मात्र वेगळीच..

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्यासाठी लोकांनी प्रार्थना देखील केली. पण 16 ऑगस्ट ला संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये होता. त्यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत होते. त्यांचे अनेक भाषणांचे कवितांचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. पण यामध्ये खोटी माहिती पसरवणारे देखील अनेकजण सक्रिय झालेले दिसले.

एम्सच्या इतिहासात डॉक्टरांनी पहिल्यांदाच कोण्या पेशंटला मृत्यू झाल्यानंतर श्रद्धांजली वाहिली म्हणून एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो एवढा व्हायरल झाला की मोठ्या मीडिया हाऊसने त्यावर चक्क स्टोरी करून टाकली. त्यांनी नंतर त्यांची चूक सुधारली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट-

फोटोची सत्यता काय आहे?

या फोटोची सत्यता तपासली असता हा, या फोटोत एम्सचे डॉक्टर तर सोडा पण हा फोटो भारतामधील देखील नाहीये. हा फोटो चीनमधील आहे. 22 नोव्हेंबर 2012 ला एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यु झाला होता. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला श्रद्धांजली वाहिली होती. त्या मुलीने अवयव दान केले होते त्यामुळे डॉक्टरांनी तिला श्रद्धांजली वाहिली होती. एवढ्या कमी वयात माणुसकी म्हणून अवयव दान आणि तिच्या विचारांना सलाम म्हणून डोकं खाली वाकवून उभे आहेत. पण नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर हा फोटो खोट्या महितीसोबत व्हायरल करण्यात आला.

चीनमध्ये असे अनेकदा घडले आहे. एखाद्या मृत व्यक्तीने अवयव दान केल्यानंतर त्याला डॉक्टरांच्या टीमने श्रद्धांजली वाहिली आहे. अश्याप्रकारे श्रद्धांजली वाहतानाचे अजून काही फोटो देखील सापडले आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

कोण आहे ही लाखो भक्त असलेली 21 वर्षीय युवा साध्वी, जिच्या सौंदर्यापूढे बॉलीवूड अभिनेत्रीही आहेत फिक्या..

भारतीयांना भक्ती दान धर्म करण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे इथे असलेल्या साधू साध्वीना चांगलच महत्व आहे. अनेक साधू साध्वीना लाखो करोडो भक्त आहेत. भारतीय त्यांच्या आयुष्यात भक्तीभावाला चांगलेच महत्व देतात. सहसा साधू साध्वी हे जेष्ठ असतात. पण आज आपण अशा साध्वी विषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे वय अवघे 21 वर्षे आहे आणि भक्तांची संख्या मात्र लाखोंमध्ये आहे. बघूया या साध्वी विषयी माहिती…

या 21 वर्षीय साध्वी आहेत जया किशोरी. जया किशोरी यांचे वय अवघे 21 वर्षे आहे. जया किशोरी या राजस्थानच्या सुजानगढ येथील आहेत. जया यांचा जन्म 1996 साली गौड ब्राम्हण परिवारात झाला. जन्मच गौड ब्राहन परिवारात झाल्याने घरात लहानपणी पासून जया याना सुद्धा भक्तीची आवड लागली. जयाचा कल हा लहानपणी पासून कृष्ण भक्तीकडे होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच जया संस्कृत मध्ये लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्रम, रामाष्टकम आदी स्रोत गायच्या. दहाव्या वर्षी एकटीने सुंदर कांड चे पाठ केला. तेव्हापासून जयाला एक वेगळी ओळख मिळायला सुरुवात झाली. पण जयाने शिक्षणही सुरु ठेवले. जयाने कोलकता येथील महादेवी बीडला वर्ल्ड अकॅडमी मधून शिक्षण घेतले.

जयाने सुरुवातीला दीक्षा पंडित गोविंदराम मिश्र यांच्याकडून घेतली. पंडित मिश्र जयाला राधा म्हणून बोलवायचे. त्यांनीच जयाचे कृष्ण प्रेम बघून तिला किशोरी जी अशी उपाधी दिली होती. आता जयाला भक्त किशोरी जी म्हणूनच ओळखतात.

जयाचे ‘नानी बाई का मायरा, नरसी का भात’ हे सत्संग खूप प्रसिद्ध आहे. जयाच्या या सत्संगाला लाखो भक्तांची गर्दी होते. जया सोशल मीडियावर पण चांगलीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फेसबुक पेजला तब्बल 8 लाख लाईक्स आहेत.

जयाच्या सत्संगामधून जो पैसा जमा होतो तो नारायण सेवा ट्रस्ट, उदयपूरला दान केला जातो. या दानातून ट्रस्ट अपंगांना मदत करते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

अटलजीच्या मृत्यू नंतर नरेंद्र मोदी यांचा हसताना वायरल फोटोचे काय आहे सत्य..

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा १६ ऑगस्ट ला मृत्यू झाला. त्यानंतर लगेच नेटीजनकडे एक फोटो आला ज्यामध्ये मोदीजी हे ४ डॉक्टरासोबत उभे आहे आणि बोलताना हसताना दिसत आहे. आणि त्या नंतर सोशल मिडीयावर हि फोटो मोदी विरोधकांनी पसरवली आणि या फोटो वर टीका होण्यास सुरवात झाली. ज्यामध्ये लिहण्यात येत आहे कि अटलजीच्या मृत्युनंतर नरेंद्र मोदी हसत आहे. किती असवेदनशील आहे देशाचे प्रधानमंत्री जे आपल्या नेत्याच्या मृत्युनंतर हसत आहे, अश्या प्रकारे टीका करण्यात आली. आणि या फोटोस सोशल मिडीयावर हजारो शेअर मिळाले आहे.

सोशल मिडीयावर हा फोटो शेअर होत होता त्यामध्ये कांग्रेस नेता बृजेश कलप्पा यांनी हा फोटो twitter वर शेअर केला आणि पुढील प्रकारे टिपणी केली- “दुख से ग्रस्त पीएम नरेंद्र मोदी भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी की मौत पर दिल्ली के एम्स अस्पताल में शोक प्रकट करते हुए” या प्रकारा नंतर नरेद्र मोदीच्या बचावात काही लोक नाराज झाले आणि त्यांनी बचावात सांगितले कि हा फोटो जुना १० एप्रिल २०१६चा आहे एम्स मधील नाही आहे. हा दावा रिषी बाग्री आणि अंकुर सिंह या दोन twitter युजरनि सर्वप्रथम केला आहे.

या नंतर आम्ही १६ ऑगस्टचा तो व्हीडीओ शोधला ज्यामध्ये नरेंद्र मोदी हे अटल जिना भेटायला जात आहे. एम्स बाहेरील हा व्हीडीओ आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी फुल स्लीव कुर्ता घालून आहे जसा वायरल फोटो मध्ये आहे. या नंतर जो बॉडीगार्ड नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे तो सुध्दा फोटो मध्ये आहे. खाली आपण व्हीडीओ बघू शकता.

नरेद्र मोदि यांचा बॉडीगार्डचा फोटो आपण बघू शकता दोन्ही हि फोटो मध्ये दिसणारे बॉडीगार्ड सारखे आहेत.

अजून हि विश्वास ज्यांना होत नाही त्यांच्या करिता वायरल फोटो मध्ये जे डॉक्टर आहे त्यांचे नाव डॉ. शिवकुमार चौधरी हे आहे. आणि ते एम्स मध्ये कार्डियोथोरैकिक सर्जरी चे प्राध्यापक आहे.

आणि काही युजर जे सांगत आहेत कि फोटो एप्रिल २०१६चा आहे. त्यांच्या करिता आम्ही जुना फोटो देत आहो ज्यामध्ये मोदीजी यांनी फुल स्लीवचा कुर्ता घातलेला नाही आहे. वायरल फोटोत फुल स्लीवचा कुर्ता आहे.

हि गोष्ट सत्य आहे कि फोटो एम्स मधील आहे. नरेंद्र मोदी अटल जी यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले होते तेव्हाचा आहे. परंतु खोट हे सांगण्यात येत आहे कि हा फोटो अटल जी च्या मृत्यू नंतरचा आहे. हि गोष्ट अतिशय खोटी आहे कारण नरेंद्र मोदी २:४५ ला एम्स मधून चालले गेले होते आणि अटलजी चा मृत्यू सायंकाळी ५:०५ ला झाला. हा फोटो अटलजी च्या मृत्यू अगोदरचा आहे. हे फोटो राजकीय फायद्या करिता अनेक लोक शेअर करतात आणि सामान्य व्यक्ती या खोट्या गोष्टीत फसला जातो. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

काय आहे या फोटो मागील सत्य, कोण आहे हा सच्चा देशभक्त ?

सोशल मीडियावर अनेक गोष्टी वायरल होतात काही चांगल्या काही वाईट तर काही फसव्या अनेक प्रकारच्या गोष्टी वायरल होत असतात. आताच १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभर एक फोटो वायरल झाला होता तो फोटो खरंच खूप सुंदर असा होता. त्या फोटोच्या मागील भावना सर्वाना देशप्रेम दाखवणारी होती. काही लोक झेंडा वंदन करत असताना एक कळकट मळकट कपड्यातील माणूस देशाच्या आपल्या राष्ट्रध्वजाला चप्पल काढून वंदन करत होता. हा फोटो प्रत्येक भारतीयांना आवडला. त्यामुळे देशात मोठ्याप्रमाणावर शेअर झाला. आता हा माणूस कोण आहे याबद्दल सर्वाना उत्सुकता लागलीय तर आम्ही आपल्यासाठी या फोटो मागील सत्य शोधले आहे.

मित्रानो अनेक जणांनी हा फोटो आमचा आहे आमच्या भागातच हि घटना घडली म्हणून आपआपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करून वायरल केला. आपल्याला माहिती आहे का हा फोटो कुठला आहे ते ?? तर या फोटो बद्दल सर्व माहिती समोर आली आहे. हा फोटो सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील व्यक्तीने काढला आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे अनिल घाटगे. अनिल घाटगे हे कोरेगाव स्टेशन वरून येत असताना त्यांना एक व्यक्ती पायातील चप्पल काढून आपल्या राष्ट्रध्वजाला सलाम करत होती हे पाहिले आणि हा काही तरी खास फोटो आहे म्हणून त्यांनी तो फोटो काढला आणि सर्व मित्रांना फेसबुकवर त्यांनी पाठवला. त्या फोटो मधील भावना सर्वाना स्पर्शून गेल्याने फोटो प्रचंड वायरल झाला.

कोरेगाव रेल्वेस्टेशन परिसरात ऑटो चालक आणि रेल्वे कर्मचारी यांनी मिळून १५ ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम ठेवलेला तो कार्यक्रम होत असताना वरील फोटो मधील कृती घडली. या फोटो मधील सलामी देणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती घेतली असता त्यांचे नाव संतोष माने असे असून ते मनोरुग्ण आहेत. ते कराडच्या बुरूडगल्ली मध्ये राहणारे आहेत. त्यांचा हा फोटो वायरल झाल्यानंतर रत्नागिरीच्या एका संस्थेने त्यांच्यावर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे. संतोष माने सारख्या एका मनोरुग्णांच्या देशभक्तीमुळे हा फोटो खरा आहे हे दिसून आले . संतोष माने यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत हीच सर्वांची इच्छा आहे … आणि संतोष माने यांच्या देशभक्तीला सलाम…

आज या अवस्थेत आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या परिवारातील हे सदस्य..

माननीय माजी प्रधानमंत्री अटल जी वाजपेयी यांच्या परिवाराबद्दल जास्त कोणाला काही माहिती नाही आहे. आज आपण अटलजींच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेणार आहोत. अटलजी यांचे वडील पंडित कृष्णबिहारी वाजपेयी शिक्षक होते तर अटलजींच्या आई कृष्णा वाजपेयी या गृहिणी होत्या. अटलजींना ३ मोठे भाऊ अवध बिहारी, सदा बिहारी और प्रेम बिहारी हे होते तर ३ बहिणी असा एकूण त्यांचा ७ बहीण भावंडांचा परिवार होता. अटल जी यांचे जीवन सामान्य राहणीमानात गेले आहे. त्यांचे कुटुंबीय हि अत्यंत सामान्य जीवन आज हि जगते.

अटल जी यांचे पुतणे रमेशचंद्र वाजपेयी हे आजही त्यांच्या पूर्वजांच्या बटेश्वर या गावी राहत आहेत. अटलजी यांची जुनी हवेली याच गावात आहे. रमेशचंद्र वाजपेयी हे प्रधानमंत्री अटलजी यांचे पुतणे आहेत ते रिटायर्ड शिक्षक आहेत. त्यांनी सांगितले कि त्यांच्या म्हाताऱ्या पत्नीला आज या वयात स्वतःला हापशाचे पाणी स्वतः भरून आणावे लागते. अटलजी वाजपेयी यांच्या त्या सून बाई होत. एका माजी प्रधानमंत्र्यांच्या सुनबाईला सार्वजनिक पॅम्पवरील पाणी स्वतः घेऊन यावे लागते यावरून त्यांचे कुटुंबीय किती सामान्य आहे हे आपण पाहू शकतात.

त्यांचे गाव बटेश्वर हे फतेश्वरी शिक्री या लोकसभा मतदारसंघात येते या गावात अटलजी राजकारणात असे पर्यंत रौनक होती पण जेव्हा अटलजी आजारी पडले तेव्हा पासून या गावाची रौनक निघून गेली. या गावातील विकासकामे हि थांबल्या गेली गावात ६ पम्प (हापशें) आहेत त्यावरून गावकऱ्यांना पाणी घ्यावे लागते. अटलजी यांच्या निधनानंतर आता गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. अटलजी यांचे सर्व नातेवाईक त्यांच्या अंत्यविधी साठी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. आज हि त्यांचे सर्व नातेवाईक सामान्य आयुष्य जगत आहेत. अटलजी यांनी नेहमी देशाचा विकास चिंतिला कुटुंबीय नातेवाईक यांच्यात ते गुंतले नाहीत.

ते सध्या काय करतात ? अटलजीच्या परिवाराविषयी संपूर्ण माहिती

एखाद्या नेत्याचा नातेवाईक किंवा जवळील व्यक्ती त्याची हवा काय असते हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु अटलजीच्या परिवाराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे आणि त्यांनी आपल्या परिवाराचा स्वार्थ कधी बघितला पण नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. अटलजी प्रमाणे त्यांचे कुटुंब काय करतात हे एक गूढच आहे. परंतु आम्ही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याकडे हि माहिती देत आहोत.

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म एका मोठ्या सयुंक्त कुटुंबात झाला आहे. त्यांना ३ भाऊ व ३ बहिणी आहेत. त्यांचे भाऊ आणि बहिण काय करतात ह्या विषयी माहिती आता आपण बघूया, १) अवध बिहारी यादव हे त्यांचे भाऊ मध्य प्रदेश सरकार मध्ये उप सचिव होते. त्यांचा जन्म ग्वालीअरला झाला आणि त्यांचा मृत्यू फेब्रुवरी १९९८ मध्ये झाला. २) सदा बिहारी यादव हे पुस्तक प्रकाशनचा व्यवसाय करतात. जन्म ग्वालीअरचा असून त्यांची मुलगी करुणा शुक्ला हि रायपुर येथून आमदार सुध्दा राहलेली आहे. ३) प्रेम बिहारी वाजपेयी मध्य प्रदेश राज्य सहकारी संस्थेत लिपिक होते. त्यांचा मुलगा नवीन वाजपेयी हा मेडिकल चालवितो आणि दुसरा मुलगा दीपक वाजपेयी हा बीजेपीचा पदाधिकारी आहे.

४) उर्मिला मिश्रा त्यांची बहिण गृहिणी आहे. जन्म १९३१ साली आणि मृत्यू ९ मे २००३ला झाला. त्यांचा मुलगा अनुप मिश्र हा माजी आमदार आहे. ५) विमल मिश्रा ह्या सुध्दा गृहिणी आहेत. त्यांचा मुलगा अरुण हा सार्वजनिक बांधकाम विभागात काम करतो. ६)कमला देवी ह्या सर्वात लहान बहिण त्यांच्या बद्दल आम्हाला जास्त माहिती उपलब्ध होऊ शकली नाही परंतु त्या गृहिणी आहेत. आणि आपल्या परिवारासोबत आजही असतात.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

अटलजी कडे किती आहे संपत्ती ? आणि कोण आहे या संपत्तीचे वारसदार..

देशाचे लाडके प्रधानमंत्री म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करू शकतो अशा अटल बिहारी वाजपेयी यांच्या बद्दल आज हि प्रत्येकांच्या मनात उत्सुकता आहे. सर्वाना अटलजी यांनी मृत्यू पश्चात किती संपत्ती सोडली व त्यांचे वारसदार कोण असतील याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपल्याकरिता आम्ही या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत.

२००४ सालच्या त्यांच्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही ५८ लाखांच्या आसपास होती. वाजपेयी यांचे स्टेट बँकमध्ये दोन अकाऊंट होते. त्यातील एका अकाऊंटमध्ये २० हजार रुपये तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ३ लाख ८२ हजार ८८६ रुपये ४२ पैसे एवढी रक्कम होती. याच बँकेच्या अजून एका अकाऊंटमध्ये २५ लाख ७५ हजार ५६२ रुपये ५० पैसे एवढी रक्कम होती.त्यांच्याकडे १ लाख २० हजार ७८२ रुपयांचे २,४०० युनिट बॉण्डही होते. हे यूनिट यूटीआय-१९९१ आणि १९९३ च्या नॅशनल सेव्हिंग योजनेअंतर्गत देण्यात आले होते. तसेच वाजपेयी यांच्याकडे २२ लाख रुपये एवढी किंमत असलेलं एक घर दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलाश येथे होते. तसेच ग्वालियरमधील त्यांच्या मूळ घराची किंमत ६ लाख रुपयांपर्यंत होती.

आजच्या बाजारभावानुसार अटलजी यांची एकूण संपत्ती हि किती जाते याचा शोध घेतला असता celebritynetworth.com या वेबसाईटच्या दाव्यानुसार अटलजी ची आजची संपत्ती १४ कोटीच्या दरम्यान जाते. त्यांना २० हजार रुपये पेन्शन सुरु होती तसेच त्यांना एक सचिव देण्यात आला होता. तर त्यांच्या कार्यालयाच्या खर्चासाठी त्यांना ६ हजार रुपये देण्यात यायचे. अटलजींनी लग्न केले नव्हते हे आपण सर्वाना माहिती आहेच. पण शेवटच्या काळात ते आपली कॉलेज मत्रीण राजकुमारी कौल यांच्यासोबत राहत असत. त्यांनी राजकुमारी यांची कन्या नमिता हिला दत्तक घेतले आहे. आणि कायद्यानुसार अटलजी यांच्या संपत्तीचे वारसदार हे त्यांची मुलगी नमिता व जावई असतील.

अटलजी यांनी सुरुवातीच्या काळात अनेक हाल अपेष्टा सहन केल्या आहेत त्याबाबत अनेक किस्से समोर आले आहेत. त्यात ते जेव्हा जनसंघाचे कार्य करत असायचे तेव्हा प्रचाराला अनेक ठिकाणी जात असत एकदा मुंबई येथे आले असताना त्यांच्याकडे दोन शर्ट होते पण त्यातील एक शर्ट कॉलर साईडला फाटले होते तर दुसरले खालील बाजूला. दोन्ही शर्ट फाटलेले होते आणि अशा परिस्थिती मध्ये भाषण कसे द्यायचे याचा विचार आला मग त्यांनी आपल्या जवळील जॅकेट शर्टवर घालून वेळ निभावून नेली. मुंबई शहरात किती गर्मी असते याची आपल्याला कल्पना आहे अटलजी यांनी तो दिवस तसाच जॅकेट घालवून नेला. तर १९८७ साली त्यांच्या गुडग्याच्या ट्रीटमेंट साठी त्यांना राजीव गांधी जी यांनी मदत केली होती आणि त्यांनी जाहीररीत्या त्याबाबत आभारही मानले आहेत.

अपहरण केलेल्या विमानातून अशा प्रकारे अटल वाजपेयी यांनी ४८ प्रवाशांची केली सुखरूप सुटका.. वाचा हा शौर्यदायी किस्सा

अटल वाजपेयी यांच्या साहसाचा एक किस्सा कधीच समोरआला नाही. हा किस्सा अटलजी वाजपयी किती शौर्यवान होते हे दाखवून देतो. लालजी टंडन या प्रसिद्ध व्यक्तीने हा किस्सा आज तक या वाहिनीच्या पत्रकाराला सांगितला आहे. लालजी टंडन यांनी काय किस्सा सांगितला आहे तो त्यांच्याच शब्दात अवश्य वाचा.

२२ जानेवारी १९९२ साली लखनो वरून दिल्ली येथे जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक केले होते. त्या विमानात एकूण ४८ व्यक्ती होते. विमान नेमकेच उडालेच कि त्या प्रवाशाने आपल्याकडे केमिकल बॉम्ब असून जर विमान पुन्हा लखनौ ला वळवले नाही तर बॉम्बचा स्फोट करायची धमकी दिली. हि धमकी ऐकून विमानाच्या पायलट ला धक्का बसला तसेच विमानातील सर्व प्रवाशी घाबरलेल्या अवस्थेत राहिले. लागलीच पायलट ने विमानतळ ऍथॉरिटी ला विमानात एका प्रवाशाकडे बॉम्ब असून त्याने विमान हायजॅक केल्याची गोष्ट कळवली. काही वेळातच विमान ४८ प्रवाशांसह खाली लखनौ विमानतळावर उतरवले.

विमान उतरल्यावर विमानाला एका बाजूला नेण्यात आले आणि अजून हि त्या हायजॅकर ला काय हवंय याची माहिती कोणाला नव्हती कि त्यांनी काही बोलणे केले होते. त्या काळात उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रपती शासन लागलेले होते. विमानातील प्रवाशी भीतीने थरथरत होते. त्या दिवशी अटल वाजपेयी लखनौ मध्ये होते. ते सर्किट हाऊस वर आपल्या कार्यकर्त्यांसह जेवण करायला बसलेले होते. अटल वाजपेयी तेव्हा विरोधी पक्षातील एक तागडे व्यक्तिमत्व होते. जेवण करणार तेव्हाच तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक प्रियदर्शी व लाल जी टंडन हे भयभीत होऊन जोराचा सुस्कारा टाकत आले आणि त्यांनी अटलजी ना सांगितले कि लखनौ विमानतळावर एकाने विमान हायजॅक केले आहे आणि तो आपल्याशी बोलण्याची मागणी करतोय. ४८ प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. अटलजीने जेवण तसेच टाकून विमानतळ गाठले.

विमानतळावर पोहचल्यावर अटलजी यांनी हायजॅकर सोबत संभाषण करायचा प्रयत्न केला पण हायजॅकर ला हे अटलजी बोलत आहेत असा विश्वास आला नाही. त्यामुळे तो विमान बॉम्ब ने उडवण्याची धमकी देत होता. तेव्हा मोठ्या ध्येयाने अटलजी यांनी परिस्थिती सांभाळत हायजॅकर च्या जवळ जाण्याची तयारी केली. पण प्रशासनाने परवानगी दिली नाही पण अटलजी वाजपेयी यांनी मोठा धोका पत्करत त्या हायजॅकरला भेटून बोलू असे कालवून प्रशासनाचे मन वळवले.

अटलजी वाजपेयी यांच्या मागणी बाबत प्रशासन सहमत झाले आणि त्यांच्या सोबत सुरक्षा रक्षक देऊन त्यांना हायजॅकर च्या विमानापासीं जायची परवानगी दिली. अटलजी वाजपेयी विमानतळावर ज्या ठिकाणी हायजॅक विमान आहे तिथे गेले त्यांच्या सोबत अशोक प्रियदर्शनी व लाल जी टंडन हे होते. विमानाजवळ गेल्यावर अशोक प्रियदर्शी यांनी विमानात जाऊन हायजॅकरला सांगितले कि अटलजी वाजपेयी येथे आले आहेत त्यांच्या शी बोल तर त्याला त्याच्यावर विश्वास नव्हता तर शेवटी आपल्या जीवाची चिंता ना करता अटलजी ने विमानात जाण्याचा निर्णय घेतला.

अटलजी ने अत्यंत धाडस केले व हायजॅकर असलेल्या विमानात धडक मारली ते हायजॅकर ला भेटले व त्याच्याशी संभाषण सुरु केले तेव्हा लाल जी टंडन यांनी हायजॅकर ला सांगितले कि एवढा मोठा तुला भेटायला आला आहे त्यांच्या पायाशी लागायला हवे व तुझ्या मागण्या कळवायला हव्यात तर हायजॅकर त्यांच्या पायाशी लागलाच कि सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून त्याच्या जवळील वस्तू हिसकावून घेतली. शेवटी त्याच्याकडे बॉम्ब नव्हता पण अटलजी यांनी जी समयसूचकता दाखवली धाडस दाखवले त्याचे सर्वत्र कौतुक झाले. विमानातील सर्व प्रवाशाने त्यांचा जयजयकार केला.

हि घटना आता जेष्ठ नेते लाल जी टंडन यांनी सांगितली आहे. या घटनेवरून अटलजी चे एक वेगळे स्वरूप आपल्याला पाहायला मिळाले . आपल्याला हा किस्सा आवडला तर नक्की शेअर करा