बापरे बाप प्रियंकाच्या एंगेजमेंटच्या रिंगची किंमत ऐकून तुम्ही नक्की हैराण होणार..

प्रियंका चोप्रा व निक जोन्स या जोडप्या बद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. आज या जोडप्यांची एंगेजमेंट होत आहे. त्यामुळे प्रियंकाच्या फॅन्स मध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रियंका चोप्रा हिचे अमेरिकन टीव्ही वाहिनी वरील सिरीज मुळे जगभरात फॅन्स तयार झाले आहेत. त्यांच्यासाठी हि प्रियंकाच्या एंगेजमेंट ची बातमी आनंददायी आहे. सध्या सर्वाना एक उत्सुकता लागली आहे कि प्रियंकाच्या हातात असणाऱ्या रिंग ची किंमत किती ??

प्रियंकाच्या रिंग ची किंमत तिने कुठे उघड केली नाही पण harpersbazaar.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल २०० हजार डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय किंमत १ कोटी ४० लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय जेमोलोजिस्टनुसार, ही ५ कॅरेटची रिंग आहे. रिंगमध्ये असलेल्या डायमंडला कुशन कट डायमंड म्हटले जाते. हा डायमंड सर्वात महागड्या डायमंडपैकी एक आहे. निक ने आपल्या लाडक्या प्रियंका साठी हि रिंग दिली आहे. मुंबईमध्ये अधिकृतरीत्या हे दोघेजण पंजाबी पद्धतीने एंगेजमेंट करत आहेत. आता सर्वाना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा असेल. निक हा प्रियंका पेक्षा ११ वर्षाने लहान आहे यामुळे सुध्दा दोघाचे संबंध या अगोदर मिडिया मध्ये चर्चेचा विषय ठरले होते.

प्रियांका चोप्राचे क्वान्टिको-3 मधील किसिंग सीन्स व्हायरल..

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सिंगर निक जोनससोबत झालेल्या कथित एंगेजमेंटमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. निक जोनसोबत लग्न करण्यासाठी तिने आपला भारत हा सिनेमा देखील सोडल्याची बातमी नुकतीच आली होती. यावेळी प्रियंकावर चाहत्यांनी टीका देखील केली होती. अशातच अमेरिकन टीव्ही सीरीज ‘क्वान्टिको’च्या तिसऱ्या सीझनमधील किसिंग सीन्समुळे प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

क्वान्टिको-3 मध्ये एलेक्स पॅरिशची भूमिका साकारत असलेली प्रियांका अभिनेता पॉवेलसोबत किसिंग करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवरील प्रियांकाच्या फॅन पेजवर या किसिंग सीन्सचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

💠 Quantico ~ Season 3 Episode 12 ➳ Ghosts💠

A post shared by Myla ~ 🕉 PC Maniac Forever 🕉 (@xxpriyankachopraxx) on

अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या आर्चीचा हा डान्सच्या प्रॅक्टिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल..

आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने आपल्या पहिल्याच सैराट या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकताच या सिनेमाचा हिंदी रिमेक देखील रिलीज झाला आहे. रिंकू राजगुरु आता कागर या नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर खूप दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं. आता नुकतेच या सिनेमातील एका गाण्याची प्रॅक्टिस करतानाचा रिंकुचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

लागीर झालं जी मालिकेला मोठं वळण, सर्वांचा लाडका विक्या देशासाठी बॉर्डरवर शहिद..

मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या लागीर झाल जी या मालिकेतील अनेक कलाकार प्रथमच प्रेक्षकांच्या सामोरे आले आहेत तरीसुद्धा त्यांनी केलेल्या अभिनयामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील जवळपास सर्वच प्रमुख भूमिका प्रेक्षकांना खूप आवडले. मालिकेतील कलाकारांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

मालिकेतील लीडिंग अभिनेता म्हणून आज्या हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचले.अभिनेता नितीश चव्हाण ने ही भूमिका साकारली. शितली या नावाने संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारि शिवानी बावकर सुद्धा या मालिकेत अभिनयातून छाप पाडून गेली. विक्याची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल चव्हाण असो किंवा राहुल्याची भूमिका साकारणारा राहुल मगदूम असो, सर्वांनी सर्वोत्तम अभिनय करून मालिकेला यशाच्या शिखरावर पोहचवले. याशिवाय खकनायकाची भूमिका असलेला भैय्यासाहेब ज्याप्रमाणे किरण गायकवाड ने साकारला आहे तो ही प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

याशिवाय मालिकेतील जयडी आणि मामी हे पात्र तर प्रेक्षकांना फारच आवडले. लागिर…’मध्ये विद्या सावळे (मामी) आणि किरण ढाणे (जयडी) यांच्या नकारात्मक भूमिका असल्या तरी त्या अल्पावधितच प्रेक्षकांना आवडल्या होत्या. पण नुकतेच काही दिवसांपूर्वी मामी व जयडी यान मालिका सोडल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी याला प्रोडक्शन जबाबदार असल्याची टीका केली तर काहींनी जयडी आणि मामीवर सुद्धा टीका केली. मानधन मनासारखे मिळत नसल्यामुळे अनेक वेळा प्रोडक्शन हाऊसबरोबर चर्चा करूनही दोघींना रिस्पॉन्स ना मिळाल्याने मालिका सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अनेक वेळा अतिरिक्त केलेल्या कामाचा मोबदलाही त्यांना मिळाला नाही, असे विद्या म्हणाल्या.

मालिकेला पुन्हा एकदा मोठं वळण!

लागीर झालं जी मालिकेत आता विक्या नंतर अज्या सुद्धा देशसेवा करण्यासाठी बॉर्डरवर जाणार आहे. त्यामुळे सर्वाना याबाबतीत उत्सुकता आहे. पण मालिकेत याआधी एक मोठा उलटफेर होणार असल्याचे समोर आले आहे. अज्या बॉर्डरवर जाण्यापूर्वी विक्या म्हणजेच विक्रम राऊत मालिकेत शहिद होनार आहे. विक्या बॉर्डरवर युद्ध करताना शहीद होतो हे आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे. या भागाचे शुटींग पार पडले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

संजुनंतर सनी लिओनीच्या जीवनावर आधारित वेब सीरिज धुमाकूळ घालण्यास सज्ज, बघा व्हायरल ट्रेलर..

पॉर्न स्टार ते बॉलीवूडची अभिनेत्री बनलेल्या सनी लिओनीच्या जीवनावर आधारित बायोपीकच ट्रेलर काल रिलीज झाला आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून पॉर्न स्टार बनण्यापासून ते बॉलीवूड मधील एन्ट्री घेऊन अभिनय क्षेत्रात ठसा उमटवण्यापर्यंतचा तिचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. करनजित कौर कशी य पॉर्न इंडस्ट्री कडे वळली आणि काय परिस्थिती होती अशी ज्यामुळे ती इकडे ढकलली गेली. हे सर्व या वेब सिरीजद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 16 जुलैपासून एपिसोड द्वारे जी5 अँपवर ही वेब सिरिज रिलीज होणार आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे सनी लिओनीला लहानपणी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे घरात नेहमी तणावाचे वातावरण असायचे. तिच्या सौंदर्यावरून मैत्रिणींनी तिची खिल्ली उडवल्याचे देखील दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे ती खूप अपसेट झाली होती. पॉर्न स्टार बनल्यानंतर तिच्या आई वाडीलांची रिऍक्शन काय होती, हे सर्व तुम्हाला या वेब सीरिज द्वारे बघायला मिळणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सैराटचे ‘याड लागलं’ चे हिंदी धडक मधील रुपांतर ‘पहली बार’ गाणं रिलीज आपण पाहिले का ??

सैराट चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या धडक चित्रपटातील आता पर्यंत दोन गाणी रिलीज झाली आहेत. सैराट चित्रपटातील झिंगाट हे प्रसिद्ध गाणे हिंदी मध्ये करण्यात आले पण त्या गाण्याबाबत प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. आता तिसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. सैराट च्या मराठी गाण्याल प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. आता हिंदी मधील पहिली बार या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्साक्याचे ठरेल.‘धडक’मध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. ‘पहली बार’ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

संजू चित्रपटाबद्दल नामवंत वकील उज्वल निकम यांनी उपस्थित केलेत काही प्रश्न अवश्य वाचा

संजय दत्त वरील संजू या चित्रपटाबद्दल सर्वसामान्य माणसाला बरीच उत्सुकता आहे.काय वास्तव आहे हे त्यांना माहिती करून घ्यायचे आहे. पण सध्या चित्रपटातून संजय दत्त ची एकच बाजू दाखवली जात आहे. ज्यामधून संजय दत्तच्या जीवनातील वास्तव प्रसंग गाळून संजय दत्त ला पूरक तेवढे प्रसंग घेण्यात आले आहेत. १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींच्या विरोधात खटला लढणारे देशद्रोह्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळख असणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. निकम यांनी संजय दत्त विरोधातील खटला सुद्धा लढवला आहे.त्यामुळे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामधून आपल्याला वास्तव माहिती मिळेल.

सात हँडग्रेनेड्स चित्रपटाच्या कथानकातून का लपवले ?
‘मला आणि वडिलांना धमकी आल्यानंतर मी स्वसंरक्षणाकरिता एके ५६ रायफल घरात ठेवली होती’ ही आरोपीची गुन्ह्यातील कबुली या चित्रपटात दाखवली असून हे वास्तव आहे. परंतु या खटल्यादरम्यान पुढे आलेल्या पुराव्यांनुसार, १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता, त्यातून त्याने ५ एके ५६ रायफल्स व ७ हँडग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरात ठेवल्या हे या चित्रपटात का लपवण्यात आले? काही दिवसांनंतर एक रायफल संजय दत्तने स्वत:कडे ठेवून बाकीच्या सालेमला परत केल्या, हे का दाखवले नाही. चरित्र चित्रपटात वास्तव गोष्टींचा उल्लेख असणे अपेक्षित असताे की गुन्ह्यावर पडदा टाकून सहानुभूती मिळवायचे असते, हे निर्माता, दिग्दर्शकांना समजू नये, हे या चित्रपटाचे दुर्दैव.

कयूमकडून घेतलेल्या पिस्तुलाचे काय?
टाडा कायद्यातील तरतुदींनुसार विनापरवाना संहारक शस्त्र ठेवणे हा गुन्हा संजय दत्तने केला होता. परंतु, न्यायालयाने या गुन्ह्यात त्यास दोषमुक्त केले आणि बेकायदा शस्त्रास्त्र कायद्याखाली शिक्षा ठोठावली. त्यावेळी चांगल्या वर्तणुकीच्या बॉण्डवर आपल्याला सोडावे ही विनंती त्याने केली होती. त्याच्या कबुलीजबाबानुसार, दाऊदचा शार्प शूटर कयूमकडून संजयने विनापरवाना पिस्तूल घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला बॉण्डवर सोडू नये, असा आक्षेप सरकारी पक्षाने घेतला होता. परंतु, कयूमकडून घेतलेल्या या पिस्तूलचा उल्लेखही चित्रपटात नाही.

स्वयं संरक्षणाचा दावा करण्यामागे उद्देश काय?
वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलिस संरक्षण होतेच. मग, संरक्षणाच्या नावाखाली ‘एके ५६’ बाळगणे हा भाबडेपणाचा बचाव आहे की त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे चित्रपटात दाखवणे आवश्यक होते. बॉम्बस्फोटापूर्वी अशी शस्त्रे व हँडग्रेनेड्स घेऊन सालेम आला होता. ही बाब संजयने पोलिसांना कळवली असती तर निरपराध २५६ लोकांची हत्या टाळता आली असती. याबद्दल त्याला आता काय वाटते, हेही चित्रपटात दाखवायला हवे हाेते.

‘दहशतवादी’ नसल्याचे कोर्टाचेच ताेंडी प्रमाणपत्र
कोणत्याही खटल्यात न्यायालय दोषी किंवा निर्दोष, एवढाच निकाल देते. संजय दत्तच्या खटल्यात मात्र ‘तू दहशतवादी नाहीस’ असे ताेंडी प्रमाणपत्र देण्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली. त्याचा पुरेपूर फायदा चित्रपट निर्मात्याने या चित्रपटात करून घेतला. संजय दत्तच्या घरी आरडीएक्स ठेवण्यात आले होते, असा आरोप पोलिसांनी कधीही केला नव्हता, परंंतु त्याचेही मीडियाच्या नावाने या चित्रपटात भांडवल करून सहानुभूती प्राप्त करून घेतली आहे.

सहानुभूती मिळवण्यात यशस्वी
मानसशास्त्रातील अभ्यासक सांगतात, की एखादा गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटला किंवा जामिनावर बाहेर आला तरी तो आपण गुन्हाच केल्या नसल्याचा आभास जनमानसात निर्माण करून आपल्या प्रती जनतेेची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी होतो. याच मानसशास्त्राच्या आधारे चित्रपट निर्मात्याने सदर अभिनेत्याबद्दल सामान्य जनमानसात सहानुभूती मिळवून दिली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

३०८ गर्लफ्रेंड बनवण्यासाठी संजय दत्त ने वापरली हि युक्ती… पहा काय होती आयडिया?

पुलिसवालोंने झापड मारा, अंडरवर्ल्डने सुपारी निकाला, घडीयाँ भी पहनी, हथकडियाँ भी, ३०८ गर्लफ्रेंड्स थी.. हा ‘संजू’च्या चित्रपटा मधील डायलॉग अनेकांना चांगलाच लक्षात राहिला. कारण ३०८ हा आकडा ऐकूनच अनेकांना धक्का बसला असेल. संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या का असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. संजूबाबाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रसिद्ध झाला त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद हि दिला आहे. गल्ला जमवण्याच्या बाबतीत हा चित्रपट बाहुबलीच्या पुढे गेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एक मजेशीर खुलासा केला आहे. मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्त एक युक्ती वापरायचा आणि ही युक्ती कोणती ती राजकुमार हिरानी यांनी सांगितली आहे.

‘संजय दत्त एखाद्या मुलीला डेट करू लागला की तिला एकदा तो स्मशानात घेऊन जात असे. मुलीची सहानुभूती मिळवण्यासाठी तो तिला आपल्या आईची (नरगिस दत्त) भेट करून देण्यासाठी स्मशानभूमीत आणलं आहे असं सांगत असे. त्यामुळे भावनिकरित्या ती मुलगीसुद्धा संजय दत्तशी जोडली जायची. पण मुळात तिथं नरगिस यांची कबरच नसायची,’ असं हिरानी म्हणाले. मुलींची सहानुभूती मिळवत संजय दत्त त्यांची मनं जिंकत असे.

अशा पद्धतीने त्याने अनेक मुलीना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. एकूण संजय दत्त च्या काही महत्वाच्या गर्लफ्रेंडची माहिती या चित्रपटात देण्यात आली नाही. ऐकून काय संजय दत्त च्या पहिल्या पत्नी बद्दल व मुलीबद्दल हि या चित्रपटात काही उल्लेख केला नाही .

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: अभिनेत्या सोबत शरीरसंबंध न ठेवल्याने या अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकले होते..
अधिक वाचा: जयडी मामीने केला खुलासा या कारणासाठी लागीर झाल जी मालिका सोडली
अधिक वाचा: ‘संजू’ मध्ये नाही दाखवण्यात आल्या संजय दत्तच्या जीवनातील त्या 5 महत्वपूर्ण घटना..

संजूचा दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बघा किती 2 दिवसाची कमाई…

राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या संजू सिनेमाची खूप दिवसांपासून चाहते वाट बघत होते. काल संजू सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या धडाक्यात प्रदर्शित झाला. सिनेमाला चांगले रिव्ह्यू मिळाले असून प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर सिनेमाला प्रतिसाद देत आहेत. अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कमाईचा रेकॉर्ड केला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 34.75 कोटी रुपये कमावून 2018 मधील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली आहे.

संजय दत्तच्या जीवनावर आधारित या सिनेमाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. सिनेमाने सलमान खानच्या रेस 3 आणि टायगर श्रॉफच्या बागी 2 चे रेकॉर्ड तोडले आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘संजू’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी धुमाकूळ घालत 38.60 कोटींची कमाई केली. या सिनेमा पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 34.75 कोटींचा गल्ला जमवला होता. संजू या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा आहे.

सलमान खानच्या ‘रेस-3’ ने पहिल्या दिवशी 29.17 कोटी, ‘बागी-2’ ने 25.10 कोटी कमावले होते. चौथ्या क्रमांकावर ‘पद्मावत’ (19 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर ‘वीरे दी वेडिंग (10.70 कोटी) आहे. नॉन हॉलिडे (बँक हॉलिडे नसलेल्या शुक्रवारी) प्रदर्शित होऊन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही संजूने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात ‘संजू’ हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. ‘बाहुबली’ (122 कोटी) हा या यादीतील अव्वल चित्रपट आहे. रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये ‘बेशरम’ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती. ‘संजू’ चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली असून प्रेक्षकांच्याही चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे पहिल्या वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

जयडी मामीने केला खुलासा या कारणासाठी लागीर झाल जी मालिका सोडली

टीआरपी च्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर असणारी मालिका म्हणजे ;लागीर झाल जी’ या मालिकेतील कलाकारांना महाराष्ट्रातील जनतेने भरपूर प्रेम दिले आहे. या मालिकेतील निगेटिव्ह भूमिका असणाऱ्या मामी व जयडी यान मालिका सोडल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वाना उत्सुकता आहे कि का सोडली यांनी मालिका ? ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून जयडी आणि मामी यांनी घेतलेली एक्झीट सर्वांच्याच जिव्हारी लागली आहे. ‘लागिर…’मध्ये विद्या सावळे (मामी) आणि किरण ढाणे (जयडी) यांच्या नकारात्मक भूमिका असल्या तरी त्या अल्पावधितच प्रेक्षकांना आवडल्या होत्या. पण, त्यांनी अचानक एक्झिट का घेतली हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता मामी आणि जयडीने मालिका का सोडली याचे खरे कारण समोर आले आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे उघड झाले आहे.

जयडी आणि मामी यांनी मानधनामुळे या मालिकेला रामराम ठोकला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण, यात तथ्य नव्हते. आता मामी म्हणजेच विद्या सावळे यांनीच हे उघड केले आहे. ‘मालिकेमध्ये सर्वाधिक मानधन अर्थात आजिंक्य आणि शितलला मिळते. त्यामानाने इतर कलाकारांना कमी मानधन मिळत असून आम्हाला अन्य कलाकारांपेक्षाही कमी मानधन मिळाले.मानधन मनासारखे मिळत नसल्यामुळे अनेक वेळा आम्ही प्रोडक्शन हाऊसबरोबर चर्चाही केली. मात्र तरीदेखील मानधनात वाढ करण्यात आली नाही. तसेच अनेक वेळा अतिरिक्त केलेल्या कामाचा मोबदलाही आम्हाला मिळाला नाही, असे विद्या म्हणाल्या.

ग्रामीण भागातून आलेले कलाकार जास्त मागणी करत नाहीत. तरीही त्यांना अशी वागणूक दिली जाते. त्या कलाकारालाही स्वत:ची काही तत्व असतात. तो त्यांना सांभाळून काम करत असतो, असेही विद्या म्हणाल्या. मालिका सोडल्यावर चाहत्यांचे प्रेम किती होते याची प्रचिती आली. सोशल मीडियावरून आलेल्या प्रतिक्रीयांतून कळते की चाहते आम्हाला मिस करत आहेत, असे किरणने सांगितले. आगामी काळात मिळणाऱ्या भूमिकांवर लक्ष देऊन इथून पुढे मिळणाऱ्या कामात चाहत्यांच्या अपेक्षा पुर्ण करू, असेही ती म्हणाली.

या दोघींनाही प्रोडक्शन हाऊसकडून पुन्हा बोलावणे येईल असे वाटत नाही. मात्र प्रेक्षकांच्या प्रेमाखातर पुन्हा एकदा मालिकेत परत जावे असे या दोघींना वाटले होते. परंतु प्रोडक्शन हाऊस मानधनाविषयी तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे त्यांनी हा विचार सोडून दिला. असे असले तरी त्यांचा राग हा प्रोडक्शन हाऊसवर होता. ना की मालिकेवर. यामुळेच नव्या मामी आणि जयडीवरही तितकेच प्रेम करा, असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत